पुण्यात मायबोली गटग

Submitted by अजय on 17 January, 2018 - 09:59
ठिकाण/पत्ता: 
मल्टीस्पाईस , डीपी रोड म्हात्रे पुलाजवळ , पुणे

आम्ही काही मायबोलीकर शनिवारी (२० जानेवारी, २०१८) सकाळी ९ वाजता भेटणार आहोत. इतर कुणाला यायला जमणार असेल तर दुधात साखर. शक्य असेल तर भेटूच.

माहितीचा स्रोत: 
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, January 20, 2018 - 09:00 to 11:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्रर्र, शनीवार-रवीवार पुण्याबाहेर असल्यामुळे इच्छा असूनही यायला जमणार नाही.
अजय यांना १०-१२ वर्षांपूर्वी बॉस्टनमधे भेटलो होतो, त्यानंतर आत्ता भेटायची संधी हुकणार!

आणि मायबोलीचे एक छोटेखानी गटग शनिवारी सकाळी पार पडले..

सध्या पुणेकर फारच बिझी झाल्यामुळे मोजकेच पुणेकर गटगला आले होते..

दस्तूर खुद्द वेमा, साजिरा, टवणे सर, सिम्बा, विक्रम देशमुख, मुग्धमानसी आणि मी अश्या मोजक्याच लोकांची उपस्थितीत होती.. दोन व्यक्ती ऐनवेळेस आजारी पडल्यामुळे हजर राहू शकले नाहीत, पण वेमांनी वेळातवेळ काढून पुणेकरांना भेटण्याची संधी दिली.

ह्या वेळेस मल्टीस्पाईसच्या मॅनेजरला पण एकदम हलके वाटले असणार कारण चक्क चक्क त्याला "अहो जरा हळू बोलता, आजूबाजूला पण माणसं बसलेली आहेत" असं सांगावंच लागलं नाही.. नेहमी प्रमाणेच मायबोली आणि त्याच्या अनुशंगाने अनेक विषयांवर दोन चार वेळा चहा घेत चर्चा घडली. गटगला गालबोट लागू नये म्हणून साजिर्‍याने चहा सांडलाच आणि त्याची परंपरा कायम ठेवली... काही जण पहिल्यांदाच समोरासमोर भेटले तर काहीजण अनेक वर्षांनी परत भेटले.. पण गटगला बहुसंख्येने उपस्थित रहाणार्‍या मायबोलीकरांची रोडावलेली संख्या ही चिंताजनिक बाब आहे..

मलाही यायचं होतं पण उमा आजारी पडली त्यामुळे रद्द केलं. नावनोंदणी केली नव्हती पण थोडा वेळ तरी येऊन भेटले असते.

अरे हिम्या तो मल्टिस्पाईसचा चहाचा कपच प्रॉब्लेमॅटिक आहे. टण्याला अर्धा चहा देताना सांडलाच शेवटी. नाहीतर ते चहावालं रिच्युअल मी विसरून जायलाही हजारो वर्षे झाली. Proud

अजयने मायबोलीकरांच्या ऑनलाईन वागण्याबद्दल आणि शिवाय ते पुर्वीसारखे एकमेकांना भेटत नसल्याबद्दल अनेक चिंता व्यक्त केल्या. मी त्या सार्‍या 'अरे इट्स ह्युमन!' असं म्हणून सिंप्लिफाय करून टाकल्या. Proud

गतग संपल्यावर टण्या नि सिंबा मस्पाच्या बाहेर अंगणात (पुन्हा) एकमेकांना भिडले. मी आपला 'अरे सिंबा, टण्याला बहुधा असं म्हणायचं आहे', 'टण्या, मला वाटतं की सिंबाचं म्हणणं असं आहे..' अशी कॉमन दोस्त राष्ट्राला करावी लागते तशी डिप्लोमसी करत राहिलो. त्यात साडेबारा झाल्याने तहाची बोलणी उरकून निरोप घ्यावा लागला..

म्हणजे पुढच्या गटग मधे टण्या विरुद्ध सिम्बा अशी जुगलबंदी बघायचा चान्स आहे तर...

आणि मेन गटग संपल्यावर समारोपाचे गटग पुढचा तासभर तरी चाललेच पाहिजे ही परंपरा सुद्धा टिकली म्हणायची.. Happy
(तरी नशीब तिथे उभं राहूनच गप्पा मारल्यात, दुसर्‍या हॉटेल मध्ये जाऊन बसला नाहीत, म्हणजे हा फाऊलच म्हणायला पाहिजे)

सिंबाला घरी पाहुणे आले होते म्हणून जायचे होते. तरी त्याने दीड तास किल्ला लढवला. शेवटी मीच म्हटले जा आता, नाहीतर घरातले मोदीला सपोर्ट करायचे. Light 1

कार्डहोल्डर सिम्बा, मुग्धामानसी तुम्हाला भेटून आनंद जाहला.

गौर से देखो इस गॅप को,
तो दुसरा हात (हिमांशू चा आहे) कसा टण्याला सामावून घेतो आहे,
बिचारा मी एक बाजूला गेलो आहे,
आमच्या विचारसरणी मधले अंतर असे अवचित फोटो यामध्ये कैद झाले Lol

>>>>>
कार्डहोल्डर सिम्बा, मुग्धामानसी तुम्हाला भेटून आनंद जाहला>>>>
मला पण मज्जा आली
कोणाशी वाद घालतोय त्या id ला चेहरा मिळाल्याने, वाद घालण्यात मजा येईल Wink
हे कार्डहोल्डर काय आहे?

त्या दिवशीचा अजून एक किस्सा म्हणजे,
कॉफी चे पैसे देऊन चेंज न घेताच वेमा निघून गेले,
वेटर उरलेले पैसे घेऊन आम्हाला शोधत पार्किंग मध्ये आला.
माबो असेट्स असल्याने पैसे साजिऱ्याकडे गेले .
आता अजय बरोबरचा हिशेब सेटल लरून उरलेले पैसे अमेरिकेत पाठवण्यात येतील.

कोणाशी वाद घालतोय त्या id ला चेहरा मिळाल्याने, वाद घालण्यात मजा येईल >>> अहो आतापर्यन्त चा अनुभव असा आहे, की आधी मस्त धुवाधार वाद घालणारे लोक गटग ला जाऊन आले की अगदीच ह्या पोस्टी टाकतात एकमेकाला. रॉबिनहूड आणि झक्की एकदा भेटले काय आणि नंतर मग प्रेमातच पडले जवळजवळ. त्यांच्या भांडणाला सोकावलेल्या पॉपकॉर्न फ्यान लोकांची झाली ना पंचाईत! Happy

मी त्या पैशाची काटाकिर्र ला मिसळ खाल्ली आणि अजयला तसे सांगितलेही. Proud बॅलन्सशीट मध्ये काय दाखवावे हा एक प्राॅब्लेम आहेच. डिप्लोमसी एक्स्पेंसेस असे चालतेय का ते सीएला विचारायला हवं Proud

हे कार्डहोल्डर काय आहे?
>>>>
https://en.wikipedia.org/wiki/Card-carrying_Communist

ही टर्म एकेकाळी फार प्रचलित होती. कार्डकॅरिंग (कार्डहोल्डर कम्युनिस्ट) म्हणजे अगदी ऑफिशिअल पार्टी मेंबर.

त्यांच्या भांडणाला सोकावलेल्या पॉपकॉर्न फ्यान लोकांची झाली ना पंचाईत! Happy>>>>
वेमा नि पाजलेल्या कॉफी ची कसम, एंटरटेनमेंट मैं कमी नही आयेगी Happy

अच्छा ते कार्डहोल्डर होय....
बरी आठवण केलीस, हे राहिलेले सांगायचे Wink
टकरीआधी मेंढे जसे परस्परांचा अंदाज घेतात, तसे टण्याने मला विचारले , " तू फक्त अड्ड्याच्या मेम्बर आहेस? की आधारचा पण आहेस?"
माझे उत्तर ऐकल्यावर, 25 वर्षे शाखेत जाणाऱ्या माणसाकडे पाहून कम्युनिस्ट जसा चेहरा करेल तसा चेहरा करून तो चहा पिऊ लागला.

हिम्या., संक्षिप्त वृ चांगला आहे Happy

"अहो जरा हळू बोलता, आजूबाजूला पण माणसं बसलेली आहेत" असं सांगावंच लागलं नाही. >>> गटगला न आलेल्या लोकांबद्दल असे बोलू नये Wink

मै - बरोबर. त्यामुळे नेहमी वाद घालणार्‍या लोकांना गटगला एकमेकांना भेटण्याची बंदी घालायला हवी.

सिंबाॅलिक दरी >>> Lol

Pages