काळा घोडा फेस्टिव्हल २०२३ दरम्यान मायबोली गटग

Submitted by अश्विनीमामी on 4 January, 2023 - 04:19

तर मित्र मैत्रीणींनो ,

नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. मायबोलीकर टी आय ह्यांच्या मुंबई हेरिटेज वॉक धाग्यावर मुंबई प्रेमींची चर्चा झालेली आहे. त्या अनुसार
गटग चा धागा काढत आहे. या वर्शीचे काळा घोडा फेस्टिवल चार ते १२ फेब्रुवारी दरम्यान आहे. तर कोणा कोणाला यायला आव्डेल? लॉक डाउन नंतरचे पहिलेच मोठे गटग प्लॅन होते आहे. मला शनिवार रविवार चालेल. पण त्यादिवशी फार गर्दी असेल हे नक्की आहे. तारीख नक्की झाल्यावर मला एक दिवस काम सोडून येणे पण सहज शक्य आहे. ब बरोबर शॉपिन्ग साठी रिकाम्या पिशव्या व खाउ घरी नेण्यासाठी डबे पण घेउन या.

त्या दिवसात कोविड परिस्थिती कशी असेल त्या अनुसार मास्क व इतर घेउन येणे.

कोण कुठुन येणार कधी जमेल चर्चे साठी धागा. चला भेटु या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Wahh thanks ya initiative baddal! Mala hi weekend chalel, me out of mumbai ahe so mala tarikh tharli tr booking karta yeil!

https://www.maayboli.com/node/add/event

हितगुज गावानुसार - मुंबई - सभासद व्हा - त्यांचं ग्रुपमध्ये खाली ( फोनवरून) किंवा बाजूला ( डेस्कटॉपवरून) कार्यक्रम टॅब निवडा.

मलाही सर्वांना आवर्जून भेटायचे आहे. पण पाच, अकरा किंवा बारा फेब्रुवारीला गटग ठेवावे ही विनंती. नवी मुंबईहून यायचे आहे, त्यामुळे शुक्रवारी जमणार नाही.

माझीही बरीच ईच्छा आहे या काळात घोडाला जायची. माबो गटग सोबत नाही जमणार. कारण मुलांनाही सोबत न्यायचे आहे. पण ईथली माहिती उपयुक्त ठरेल. लवकर जाऊन या. म्हणजे वृत्तांतही कामात येईल तुमचा Happy

एन्जॉय करा. बरं झालं अमा तुम्ही पुढाकार घेतला ते. होउन जाउ द्या धमाल. मात्र फोटो टाकाच्च.

भरत व मंदार डी ह्यांना पण यायचे आहे.

अकरा तारीख जमते आहे का सर्वांना. अजून एक महिना आहे.

११ चा मुहुर्त निघतोय. दोन्ही बाजुंना पसंत पडत आहे. रघू आम्हाला भेटून मग १४ वेगळा साजरा करा.

११ तारखेचे जमते य का बघा निकू. मेजोरिटी ला जमते आहे.

निकू
भरत
मंदारडी
अश्विनीमामी
टी आय
राहुल बावन कुळे.

पुढे चला पुढे चला बशीत बसुन घ्या.

हो अमा. सध्यातरी जमतेय!
११ तारीख ठरत असेल तर मला वाटते भरत यांनी दिलेल्या लिंकचा वापर करावा. म्हणजे तिथे लोक्स नक्की करु शकतात.

मायबोलीकरांनी एकमेकांवर प्रेम केले पाहीजे या ध्येयापोटीच तारीख धरली होती. >>>>
Lol

गटगसाठी सगळ्यांना शुभेच्छा, मजा करा. न आलेल्यांच्या चहाड्या करा Wink Proud , खा-प्या गप्पा मारा. आम्हाला वृत्तांत द्यायला विसरू नका. आठवण ठेवा. Happy

गटग करता शुभेच्छा!
११-१२ फेब्रुवारीला आमच्या शाळकरी मित्रांचे पेंच येथे गटग आहे. तेव्हा या गटगला येणे शक्य नाही.

माझा विचार पहिल्या दिवशी (४फे,बारा वाजता) जाण्याचा आहे. किंवा भायखळा झाडे फुले प्रदर्शन त्या दरम्यान असल्यास त्या दिवशी.

भायखळा झाडे फुले प्रदर्शन त्या दरम्यान असल्यास त्या दिवशी.>>> he 16th to 26 th jan ahe bahuda
>>>

मी गेलोय ईथे दोनेक वेळा. मित्रांसोबत. त्यांना जास्त आवड होती. तरी मलाही आवडलेच. पण सध्या मुंबईचे घर मार्चनंतरच ताब्यात येईल. त्यामुळे हे दोन्ही जरा अवघड वाटत आहे.

सर्वांना भेटायला आवडले असते.
अमा, भरत, ऋन्मेष, शरदजी , ......... यांचे व्यक्तीमत्व वाचून काही अंदाज आहे स्वभावाचा.

मिसिंग द गटग.

काळा घोडा फेस्टीव्हलला मी एकदाही गेलेलो नाही. या वर्षी चार किंवा पाच तारखेला मुलांना वेळ असेल तर जायचा विचार आहे.

Pages