असेच काहीसे आहे पण नक्की माहित नाही

Submitted by वैवकु on 30 December, 2012 - 15:08

घे ; हे चिंतनमात्रांचे रामबाण औषध आहे
तुला म्हणे गझले तंत्राबिंत्राची लागण आहे

अजूनही माणुस पुरता माणुस का नाही झाला
माणुस होण्यामागे त्याच्या मधले माकड आहे

बरेच तत्त्वज्ञान खरडले पण ते जगला नाही
म्हणून कोरे त्याच्या आयुष्याचे पुस्तक आहे

प्रत्यक्षात नसावे पण दु:खाला बघता यावे
त्याच्या असण्यापेक्षा त्याचे दिसणे सुंदर आहे

असेच काहीसे आहे पण नक्की माहित नाही
आहे आणिक नाही मधले काही विठ्ठल आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

...........................
...........................
...........................
अ या अलमतीच्या स्वरकाफियाबद्दल काही मुद्दे माण्डले होते . जे म्हणालो ते करून पहावे यासाठी ही रचना करून पाहिली आहे

प्रत्यक्षात नसावे पण दु:खाला बघता यावे
त्याच्या असण्यापेक्षा त्याचे दिसणे सुंदर आहे
वावावा!!

शेर आवडला असला तरी 'अ' स्वरकाफिया असल्यामुळे थोडे खटकलेही.. हेमाशेपो.

वैभवा!
छान!
आमचा एक शेर आठवला.........
एक चेहरा, रंग परंतू किती त-हेने पालटतो!
घोर लागला त्यास केवढा असण्यापेक्षा दिसण्याचा!!

बरेच तत्त्वज्ञान खरडले पण ते जगला नाही
म्हणून कोरे त्याच्या आयुष्याचे पुस्तक आहे

प्रत्यक्षात नसावे पण दु:खाला बघता यावे
त्याच्या असण्यापेक्षा त्याचे दिसणे सुंदर आहे

तत्वज्ञान अन दु:ख यावर भाष्य करणार्‍या द्विपदी आवडल्या.
विठ्ठलावरची शेवटची द्विपदी अप्रतिमच.
पु.ले.शु.

प्रत्यक्षात नसावे पण दु:खाला बघता यावे
त्याच्या असण्यापेक्षा त्याचे दिसणे सुंदर आहे

असेच काहीसे आहे पण नक्की माहित नाही
आहे आणिक नाही मधले काही विठ्ठल आहे<<<

अतिशय सुंदर खयाल. 'अकारान्त स्वरयमक' योजू नये अशी इच्छा व्यक्त करून थांबतो.

वैवकु ,

गजल आवडली
प्रत्यक्षात नसावे पण दु:खाला बघता यावे
त्याच्या असण्यापेक्षा त्याचे दिसणे सुंदर आहे

असेच काहीसे आहे पण नक्की माहित नाही
आहे आणिक नाही मधले काही विठ्ठल आहे

हे दोन शेर विषेश भावले !!

विठ्ठल विठ्ठल !!

ह्म्म्म....अकारान्त स्वरयमक.... माफ करा पण गझल वाचल्यासारखे वाटलेच नाही. माझ्यापुरती नाही आवडली.

खुप सुंदर आहे,
बरेच तत्त्वज्ञान खरडले पण ते जगला नाही
म्हणून कोरे त्याच्या आयुष्याचे पुस्तक आहे
विशेष आवडले