आतला आवाज माझा,,,

Submitted by वैवकु on 23 December, 2012 - 00:53

तू नको समजूस की मी एकटा आहे
सोबतीला पोळणारा गारवा आहे

मी तुला कोरा कुठे पीतोय रे दु:खा
मिसळला माझ्या मनाचा गोडवा आहे

दे मला शोधून आता तूच तो पत्ता
जो तुझ्या शोधात माझा हरवला आहे

मी स्वतःशी बोलताना शब्द देशिल का
आतला आवाज माझा गोठला आहे

तो चहूबाजूस परिमळ होत दरवळला
मी कधी स्पर्शू न शकलो ही व्यथा आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी स्वतःशी बोलताना शब्द देशिल का
अतला आवाज माझा गोठला आहे

तो चहूबाजूस परिमळ होत दरवळला
मी कधी स्पर्शू न शकलो ही व्यथा आहे

<<<

सुंदर शेर

अतला?
असा शब्द पहिल्यांदाच ऐकतोय.
मात्रा सांभाळण्यासाठी उगाच शब्दांची अशी फरपट करू नका वैवकु!

नवाच १ कुणीतरी ,. भुंगा, बेफीजी, पाभे, देवकाका सर्वांचे मनःपूर्वक आभार

देवकाका क्षमस्व !! तो टायपो होता ..दुरुस्ती करत आहे .निदर्शनास आणून दिल्याबद्दल शतशः आभार

वैभवा! तुझ्या गझलेवर आम्ही का बरे प्रतिसाद नाही देणार बुवा?
उलट तू गझल टाकल्या टाकल्या आमचा प्रतिसाद लिहून झाला होता आमच्या चोपडीत!
पण आधी आमच्या समर्थांवरील रचनेवरच्या प्रतिसादांचा समाचार घेतला, आता तुझाच नंबर!

वैभवा, या तुझ्या गझलेतील रदीफ आहे............''आहे''!
काफिया कोणता आहे?
काफियातील न बदलणारे अक्षर कोणते?
आलामत कोणती? अ की, आ?

खयाल/मिसरे/प्रतिके/पा्रतिमा टकराना होवू शकते.
त्यात कुठलाही कमीपणा वाटण्याचे कारण नाही.
उर्दूत तर अशा टकरानेवाल्या शेरांची पुस्तके उपलब्ध आहेत.
गझल आवडली!

तू विचारलेस म्हणून (एरव्ही देखिल दिले असतेच हा भाग वेगळा) दोन शेर देत आहोत, जे आम्हास तुझी ही गझल वाचता वाचताच सुचले!

मतला आम्ही असा केला...........(अर्थ तुझाच रहाणार नाही)

ऊब देणारा स्मृतींचा गारवा आहे!
गारव्यामध्ये अनोखा गोडवा आहे!!

वाटते आकशवाणी आज होवू दे.......
आतला आवाज माझा गोठला आहे!*

* इथे काफिया आम्ही दिलेल्या मतल्याखाली बसत नाही. पण तुझाच शेर तुझा सानी मिसरा कायम ठेवून वरीलप्रमाणे करावासा वाटला!

पहा कसे वाटतात हे बदल! न रुचल्यास दुर्लक्ष करावेस!

टीप: असे काफिये घेवून गझल करू नये हे आमचे व आमच्या गुरूंचे वैयक्तिक मत
आहे! असो.
गझललेखनास शुभेच्छा!
प्रा.सतीश देवपूरकर

धन्यवाद देवसर

अलामत आ ही आहे जी काफियाच्या शेवटच्या अक्षरावर आहे काफिये असे आहेत ...एकटा , गारवा , गोडवा , हरवला, गोठला ,व्यथा इत्यादी

उर्दूत तर अशा टकरानेवाल्या शेरांची पुस्तके उपलब्ध आहेत.>>रोचक माहिती !! तुमच्याकडे असतील अशी पुस्तके तर मला जरूर कळवा सर

तुम्ही रचलेला नवीन अर्थ असलेला मतला आवडला
'आकाशवाणी' चे प्रयोजन मी समजू शकतो पण पहिलावाचनात चट्कन रेडियो हाच सामान्य अर्थ लागतो त्यामुळे जरासा रुक्ष वाटतो तो शेर

असो
गझल लेखनासाठी शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल शतशः आभार !!...... पण नुसत्याच शुभेच्छा नकोत बरका सर आशिर्वादही हवेत Happy

वैभवा!
अलामत आ ही आहे जी काफियाच्या शेवटच्या अक्षरावर आहे
<<<<<<<<<<<<असे चालत नाही आमच्या माहितीप्रमाणे मराठी गझलेत.
अलामत ही काफियाच्या न बदलणा-या अक्षराच्या आधील अक्षरावर असते. काफियाच्या शेवटच्या अक्षरावर नव्हे.
म्हणून गारवा/गोडवा/मारवा/ गाढवा/पारवा/पाडवा/सांडवा/नवा/हवा/वानवा/खवा/थवा/रवा/गवा/कारवा/सारवा.... इत्यादी
इथे काफियातील न बदलणारे अक्षर आहे 'वा' आणि त्याच्या आधीच्या अक्षरातील अलामत अकारान्ती आहे.
असे चालते.

आम्ही सुचवलेला शेर होता......

वाटते आकाशवाणी आज होवू दे......
आतला आवाज माझा गोठला आहे!

इथे सानी मिस-यात आतला आवाज, म्हणजेच अंतरदेवतेचा आवाज, अतर्नाद, विवेकबुद्धीचा आवाज, समज, उमज, शहाणपण, विसडम इत्यादींचा आवाज वगैरे!
तो आवाज गोठला आहे, म्हणजेच क्षीण झाला आहे, ऐकू येत नाही, म्हणून आता आज बाहेरून/आकाशातूनच देववाणी मला ऐकू यावी!
इथे आतला आवाज शब्द आला व त्या पार्श्वभूमीवर जेव्हा आकाशवाणी शब्द येतो, तेव्हा त्याचा अर्थ आकाशातून होणारी (बाहेरून ऐकू येणारा देवाचा आवाज) देववाणी असाच लगेच मनात येतो. निदान शेर पूर्ण वाचल्यावर तरी. कंसाने एकलेली आकाशवाणी आपणास शाळेत असतानाच माहिती होते. होय की, नाही?
इथे रेडिओ असा अर्थ कसा लागू शकतो?
पहा पटते का ते!
थांबतो!

प्रा.सतीश देवपूरकर

वैभव - अभिनंदन - ही एक उत्तम गझल आहे शिवाय पारंपरिक यमकप्रवणेतला फाटा दिल्याने तुम्ही तुम्हाला जे म्हणावयाचे आहे ते गझलेतून सांगण्यात यशस्वी ठरला आहात.

इतर काही मुद्दे :

-मराठी गझलेत स्वर यमक चालत नाही : हे कुणाचे मत आहे? सुरेश भटांचे या संदर्भातले मत किमान काही दशकांपुर्वीचे असावे. त्यानंतर किती उलथापालथ झाली - अनेक लोक गझला लिहू लागले. काळाबरोबर मराठीतल्या या विधेची व्याप्ती वाढणे - आशय आणि तंत्र या दोन्ही दृष्टीकोनांतून अत्यंत महत्वाचे आहे. मी स्वतः गेली अनेक वर्षे स्वरयमकात गझला लिहीतो आहे.

- गझलेची बाराखडी या एका निकषावर किती पिढ्या आपली अवघी कारकीर्द टेकवणार आहेत???? कवीने स्वतंत्र विचार करणे आवश्यक आहे.

- स्वर यमकातल्या गझला या यमकाला धरून नव्हे तर आशयाला धरून पुढे जातात. हे महत्वाचे नाही काय ?

वैभव, गझलतंत्रावर प्रयोग करणारी गझल वाटली..थोडासा गोंधळ झाला माझा त्यामुळे. खयाल सर्वांगसुंदर.

तंत्राच्या काचातून सुटणे आवश्यक वाटणे स्वाभाविक. अशा वेळी गझलियत असलेली कविता का लिहू नये ? माझे वै.म.

काही सार्वत्रिक निरिक्षणे- तंत्राच्या अट्टाहासामुळे गझल लिहिणे कित्येकदा एक शब्दकोडे सोडवणे होऊ लागते, आत्मा हरवल्यासारखा होतो.. शब्दांचे सैनिक कवायती करताना दिसतात. एकूणच गझल वाचताना/ लिहिताना असे कधीकधी जाणवते. अर्थात तो एक अत्यंत सुंदर फॉर्म आहे, सतत एकाच फॉर्ममध्ये लिहिताना आपली उत्कटता कमी पडणेही नैसर्गिकच.

खूप लेखनशुभेच्छा.

सतीश देवपूरकर,
मराठी गझल आणि एकूणच गझल या विधेला ''अ'' कारान्त स्वरकाफिया चालत नाही.

बाकी सगळ्याच गझल ह्या ''आ'',''ई'' आणि ''ऊ'' कारान्त स्वरकाफियाच्या असतात हे मी सप्रमाण सिद्ध करु शकतो. अगदी सतीश देवपूरकर ह्या ''वल्लीच्या'' गझला सुद्धा स्वरकाफियाच्या गझला आहेत.

असो,वैभव्,आपली व्यक्त होण्यातली प्रगती वाखाणण्याजोगी आहे.सुंदर गझल.आगे बढो.

ढवळे सर ,भारती ताई , कणखरजी ,रिया, अरविंदजी, कावळा सर्वांचे आभार

देवसरांचेसुद्धा आभार
__________________________
काही मुद्दे :

यमकप्रवणेतला फाटा दिल्याने गझलकाराला जे म्हणावयाचे आहे ते गझलेतून सांगण्यात तो यशस्वी ठरतो या मुद्द्याशी काही प्रमाणात सहमत ......फाटा दिल्यानेच तो यशस्वी ठरतो असा अर्थ काहीजण काढू शकतात जो मला चुकीचा वाटतो

कवीने स्वतंत्र विचार करणे आवश्यक आहे.>>>१००%सहमत

स्वर यमकातल्या गझला या यमकाला धरून नव्हे तर आशयाला धरून पुढे जातात>>>> काही प्रमाणात सहमत पण आ शयाला धरून पुढे जायचे असल्यास स्वरयमके योजावीत असा गैरसमज होवू शकतो असे वाटले

गझलतंत्रावर प्रयोग करणारी गझल वाटली>>>तसे बिल्कुल नाही आहे

काही सार्वत्रिक निरिक्षणे:.....>>>>>तेवढी पटली नाहीत क्षमस्व

मराठी गझल आणि एकूणच गझल या विधेला ''अ'' कारान्त स्वरकाफिया चालत नाही.>>सार्वमताचा आदर असल्याने तूर्तास कबूल !! पण चालायला हवीत असे वै.म. ..आग्रह वगैरे नाही... कृ.गै. न.(चलता है सबकुछ चलानेवाला चाहिये या वाक्यावर विश्वास !!! :))

आपली व्यक्त होण्यातली प्रगती वाखाणण्याजोगी आहे.सुंदर गझल.आगे बढो.>>>या वाक्याची नितांत आवश्यकता होती!! विषेश आभार

______________________________

आता देवसरांचा नंबर .................

अलामतीचा/स्वरकाफियाचा मुद्दा मुद्दाम उकरून काढला आहे आसा संशय

देवसर मध्यंतरी शैक्षणिक सहलीला जायच्या आदल्या दिवशी फोनवर हा विशय चर्चिला होता मतभेद स्पष्ट झाले होतेच त्यामुळे आत्ता हा विषय त्यांच्या सोबत चर्चिणे माझ्यालेखी मूर्खपणाचे !!

________________________________-

चलता है सबकुछ चलानेवाला चाहिये या वाक्यावर विश्वास असे वर गमतीने म्हणालो नव्हतो त्याबाबत काही विचार केला आहे तो तुमच्याशी शेअर करीन म्हणतो..............

अ या अलामतीबाबतही देवसरांशी चर्चा झाली होती त्यादिवशी . मी जे माण्डलेले मुद्दे असे होते

१) अ हा आद्य स्वर आहे यास्तव मला त्यामध्ये विषेश रस वाटतो

२)स्वरकाफिया अ या अलामतीचा आल्यास काफियात जी आल्हाद निर्माण करायची क्षमता असते ती सर्वात कमी जाणवते प्रत्येक व्यन्जनात अर्धा अ समाविष्ट असल्याने काफियात त्याचे वेगळेपण उठून दिसत नसावे

३) यावर उपाय करता येतील असे माझे मत आहे
- ज्या अक्षरावर अलामत येते त्या अक्षराआधीच्या अक्षरावरही एक स्वर स्वरचिन्ह असल्यासारखा कायम करावा
- काफियाची अक्षरसंख्या समान असणे हाही उपाय या सोबत जोड्ला तर तर अधिक बरे असेही मला वाटते
- असे काफिये समवृत्तीय /सममात्रीय वगैरे देखील योजता येतील

उदा
१) चल , फळ , घर, नस ....
२) गाव , आस , वार , नाद .....
३) फरक, सवय, कणव , दफन.........
४) सुंदर , विठ्ठल , सोबत, पुस्तक .........
____________________________

टीप : वरील प्रतिसादातील शेवटच्या भागास केवळ प्रयोग म्हणून पहावे ही नम्र विनंती !!!
____________________________

आपला नम्र
-वैवकु
Happy

तो चहूबाजूस परिमळ होत दरवळला
मी कधी स्पर्शू न शकलो ही व्यथा आहे

***
चलता है सबकुछ चलानेवाला चाहिये या वाक्यावर विश्वास असे वर गमतीने म्हणालो नव्हतो त्याबाबत काही विचार केला आहे तो तुमच्याशी शेअर करीन म्हणतो..............
***

वो के खुश्बू की तरह फैला था मेरे चारसू
मै उसे महेसूस कर सकता था, छू सकता न था...

सुंदर भाषांतर केलं आहे तुम्ही. धन्यवाद.

चौर्यकर्म ??????
.....................विठ्ठला!!!!

वैभवा!
वेड घेवून पेडगावला जाण्याचा प्रकार चाललेला दिसत आहे!
अलामत ही काफियाच्या शब्दातील न बदलणा-या अक्षराच्या आधीच्या अक्षरावर असते. मग ती अकारांत आहे की इकारांत आहे हे गौण आहे!
मूळ मद्दा तर बाजूलाच रहात आहे!
शेवटी हे सर्व संकेत आहेत! पाळायचे की, नाही हे व्यक्तीवर अवलंबून आहे.
शेवटी अस्सल काव्य कोणत्याही काव्यप्रकारात लिहिले तरी काळजास भिडतेच!
त्याकरता कुठलाही विद्रोह/बंड/साहित्यिक साहस वगैरे अनंत खटाटोप करावेच लागत नाहीत.
जमत नसेल तर जो जमेल तो काव्यप्रकार निवडावा!
मग कुठलेच बंधन न पाळता मुक्तछंदातही गझल लिहून मंत्रमुग्ध करता येईल की, होय ना?
शेवटी नंगेसे खुदा भी डरता है....हेच खरे!
भटांनंतर झालेल्या उलथापालथींचे अनुयायी मात्र मोजकेच महाभाग असावेत, जे आपली पाठ आपणच थोपटण्यात धन्यता मानतात!
..........प्रा.सतीश देवपूरकर
टीप: गझलेचे अंतरंग व बहिरंग, गझलेचा आत्मा इत्यादींविषयीच्या अज्ञानापोटीच अशा बिनबुडाच्या चर्चेचा धुरळा उडताना दिसत आहे!
थांबतो!

.........प्रा.सतीश देवपूरकर

आयला इब्लिसराव ...........डोक्याला शॉट !!! Happy
कसं ओळखलत तुम्ही???? Uhoh
तुम्ही गुलाम अली साहेबांची ती पुण्यातली मैफल ऐकली असेल किंवा माझ्यासारखा पेपरतला तिचा वृत्तांत तरी नक्कीच वचला असेल...................
________________________________________________

त्या "वो" या पहिल्याच शब्दात विठ्ठल पहिला मी ....अन ठरवलं की हा मी शेर माझ्या गझलेत हवाच !!
(मी मराठीत गझल करतो म्हणून नैतर असाच्याअस्सा ढापला असता मी तो शेर!)
........... फक्त जमीन सुचली नव्हती ..........ही गझल होत असताना ती दिसली अन अनुवाद करून मो़कळा झालो !!
सुरुवातीलाच सांगणार होतो मी ; पण म्हट्लं आधी बघू कुणी काही म्हणतय का ते .....
__________________________
धन्स इब्लिसराव !!...........धन्स!!
__________________________
या मूळ शेराचे जे कर्ते आहेत त्याना सा.न. अन अनेकानेक धन्स!!
.......कुणाला त्यांचे नाव माहीत असेल तर कळवाल का मला .....प्लीज!!

वैवकु,
नवाच एक कुणीतरी हा तुमचा डुप्लिकेट आयडि आहे का?

त्या आयडीने लिहिलेले आता तुमच्या नावाने शेवटी दिसते आहे
व तिथे प्रतिसाद संपादित झालेला आहे. दोन एडिटिंगमधे २ मिन्टाचे अंतर आहे.

इट्टल इट्टल इट्टला, हरि ओंब इट्टला - मा. आसाराम बा. पू.

लोक असावेत बहुतेक..

गझलेत स्वरयमकाचा वापर अगदी जुना आहे.
वली दकनी, ज्याने उर्दू गझलेच्या अनेक सुंदर जमिनी दिल्या, स्वरयमकाचा वापर ब-याच प्रमाणात करतो. त्याचा एक मत्ला देतो:

सनम मेरा सुखन सू आशना है
मुझे फिक्र-ए-सुखन करना बजा है

वली दकनी नंतर मीर-गालिब अश्या नंतरच्या सगळ्याच दिग्गजांनी स्वरयमकाची गझल लिहिली.
उर्दू गझलेचे मराठी गझलेने सगळे घ्यावे, एक स्वरयमक सोडल्यास, हे पटत नाही.
मराठीत स्वर-यमके चालत नाही, असे वाटावे ह्याचे कारण समजून घेणेही आवश्यक आहे.
भटांना कदाचित स्वरयमकामुळे गझलेचा गोटीबंदपणा ढळेल असे वाटले असावे.
भटांशी भेट न झाल्याने मला खात्री नाही.
भटांच्या बहुतेक शिष्यांचा स्वतःचा विचार नसल्याने त्यांच्याशी अनेक वर्षे बोलूनही मला ह्याचा उलगडा झाला नाही. असो, सुदैवाने अनेक जुने-नवे गझलकार स्वरयमकाची गझल सर्रास लिहित आहेत.
हा प्रवाह थांबवणे मलातरी अशक्य वाटत आहे.

समीर चव्हाण

समीरशी शत प्रतिशत सहमत.

गोटीबंदपणा(चुस्तपणा) आणि काफिये ठसण्याची प्रक्रीया ह्या गोष्टींचा विचार करून भटसाहेबांनी कदाचित तसा स्टँड घेतला असल्याशी शक्यता आहे. पण उर्दूत हे सर्रास झालेले आहे आणि मराठीतही आजमितीला प्रस्थापित झालेले आहे त्यामुळे वापरायचे की नाही हा वाद आता काढून काही उपयोग नाही.

स्वरयमकांमुळे प्रेडीक्टीबिलिटी कमी होऊन विचार शायराला हवा तसा व्यक्त करता येतो ह्या ढवळेसाहेबांच्या मताशीही मी सहमत आहे.

धन्यवाद!

प्रेडीक्टीबिलिटी कमी होणे या बाबत १००% सहमत
गोटीबंदपणा=चुस्तपणा....... वा!!
या माहीतीबाबत धन्स कणखरजी. मी आजवर गोटीबंदपणा २ प्रकारचा मानत होतो १- वृत्तातला २-आशय अन अभिव्यक्तीतला !! पहिला मी साध्या डोळ्यांनी पाहू शकत होतो .दुसरा फक्त मनाला जाणवत असे तो कसा दिसतो किंवा अस्तो हे नक्की समजत नव्हते. चुस्तपणा हे अत्यंत नेमके व चपखल वर्णन वाटले
पुनश्च धन्स

समीरजी मायबोलीवर आपणास प्रथमच पाहिले .प्रतिसादातून बरेच काही शिकायला मिळाले .धन्यवाद.

सुप्रियातै तुमचा प्रतिसाद आता खूप उशीराने पाहिला क्षमस्व अन् धन्यवाद !

समीर!
भटांच्या बहुतेक शिष्यांचा स्वतःचा विचार नसल्याने त्यांच्याशी अनेक वर्षे बोलूनही मला ह्याचा उलगडा झाला नाही.
अत्यंत धाडसी, बिनबुडाचे व उथळ फेकण्याचे वाक्य!
मराठी, उर्दू, अरेबिक, पर्शियन या भाषा मुळातूनच वेगळ्या आहेत! प्रत्येकीतील संस्कार, इतिहास,व्याकरण, बाज, वेगळा आहे! ती ती भाषा बोलणा-यांची मानसिकताही वेगळी आहे!
खुद्द भट हयात नाहीत म्हणून लोक छाती फुगवून काहीही बरळायला लागलेले आहेत! असो.
कोणते काफिये वापरावेत/वापरू नयेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे!
आज समाजात भटांनी प्रस्थापित केलेल्या गझलेस लोक मानतात व पुढेही मानतील कारण ते जे बोलत असत, ते करत असत.
मराठी भाषेचा बाज, एकंदर तबीयत बघूनच काही संकेत त्यांनी स्वत:च्या लिखाणातून प्रस्थापित केले!
मराठी गझलही तितकीच गोड व्हावी हीच त्यांची कळकळ होती!
आता नाचता येइना अन् अंगण वाकडे असा प्रकार असला की, काहीही पळवाटा काढून त्यांना अभिनवतेचे गोंडस नाव देण्याची टूमच झालेली दिसते!
पण येणारा काळच ठरवील की काय टिकाऊ आहे आणि काय टाकाऊ आहे!
मायबोली वा इतर कोणत्याही संकेतस्थळावरील चारदोन डोकी म्हणजे समस्त मराठी जनता नव्हे!
शेवटी लिहा कोणत्याही प्रकाराने, आधी ते दर्जेदार काव्य असले पाहिजे!
काफिया/ स्वरकाफिया वगैरेंची वरील चर्चा म्हणजे निव्वळ धुरळा वाटत आहे!
शेवटी रसिक माणसाला पाहिजे असते ते दर्जेदार व दिव्य काव्य मग ते मुक्तछंदात का असेना!
मुक्तछंदात/अष्टाक्षरीतही गझल लिहिता येते की! पण तसे संकेत अजूनपर्यंत तरी नाहीत.
काय सांगावे, उद्या कुणाच्या सुपीक डोक्यातून तसे संकेत निघतीलही!
पण प्रश्न हा आहे की त्याचे अनुयायी किती असणार?
गझलेचे सर्व संकेत, डौल, ताल, तोल, नखरे सांभाळून अत्यंत बोलका अर्थपूर्ण व प्रासादिक शेर लिहिण्यातच तर खरी मजा आहे!
भट नेहमी म्हणायचे......कमीत कमी सूट घ्यावी गझलेत! शक्यतोवर सूट घेवूच नव्हे!
आता पाळायचे की नाही ते कवींनी ठरवायचे!
काय चांगले आहे, कोणता मार्ग योग्य ते भटांनी दाखविले आहे, त्या मार्गावर चालायचे की, नाही हे ज्याने त्याने ठरवायचे! येणा-या पिढ्या व येणारा काळ ठरवेल काय बरोबर व काय चूक ते!

अवांतर: भटांना आम्ही एकदा रुबायांबद्दल छेडले होते. तेव्हा ते आम्हास म्हणाले.............
रुबायांची २२/२४ वृत्ते आहेत, त्यातच कोणतीही सूट न घेता लिहायचे असते.
रुबाईत खयालाच्या नाविन्यतेला फार महत्व असते!
इतक्यात तू रुबायांच्या वाटेला जाऊ नकोस, मी देखिल रुबाया लिहायला धजावलो नाही!
सधया गझलेवरच लक्ष केंद्रीत कर. आजवर आम्ही ते पाळले आहे!
तरीदेखिल कधी कधी लाडामधे रुबाईचे एखादे वृत्त ते आम्हास द्यायचे व ४ओळींची रुबाई लिहायला सांगायचे!
२/४ रुबाया लिहून त्यांना ऐकवायचोही!
हे सांगण्यामागे उद्देश हाच की,एखादा कर्मठ काव्यप्रकार हाताळायचे ठरविले की, तो त्याच्या सर्व बंधनासकट
.
हाताळला जायला हवा. सबबी सांगून, अनेक सुटी घेवून त्या कर्मठ काव्यप्रकाराचे नाव मिरवायचे हे बरोबर नाही!

जमत नसेल तर, इतर किती तरी काव्यप्रकार आहेतच की हाताळायला! गझलेचाच सोस कशासाठी?

मग गझलेएवजी भावगीते, भक्तीगीते, कविता, मुक्तछंद लिहावा माणसाने !त्यात काय आला कमीपणा
हल्ली गझलेचा आवच जास्त व गझल कमी असे दिसून येते!......असे खेदाने म्हणावेसे वाटत आहे
थांबतो!


प्रा.सतीरश देवपूरकर

काफिया/ स्वरकाफिया वगैरेंची वरील चर्चा म्हणजे निव्वळ धुरळा वाटत आहे!>>>

-सुरुवात कुणी केली ??.तुम्हीच ना!!!.मग..???

_______________________________________________________
प्रश्न हा आहे की त्याचे अनुयायी किती असणार?>>>>>

-अनुयायी जास्त असतील की कमी हा प्रश्नच नाही आहे !! असावेत की नाही हाही प्रश नाही आहे !!....................गझल आज आहे त्यापेक्षा अधिक चांगली , अधिक सुंदर होईल का अन् होवू शकत असेल तर आपल्याला ती कशी करता येईल हा प्रश्न आहे ; हे अजूनही आपणास ३५-४० वर्षे गझल करूनही समजलेले नाही हे पाहून तीव्र खेद होतो आहे !!!

तंत्र सोडून गझलेतले बाकी काहीच भटांनी तुम्हाला प्रात्यक्षिकस्वरूपात शिकवलेले दिसत नाही !!!...अरेरे !!!

असो

वैभवा!
परत वेड घेवून पेडगावला जातो आहेस!
काफियाचा शब्द असतो.
त्यात एक न बदलणारे शेवटचे अक्षर असते, जसा रदीफाचा शब्द बदलत नसतो !
या न बदलणा-या अक्षराच्या(काफियातील) आधीच्या अक्षरावर अलामत ठरते जी अकारान्ती असेल, आकारान्ती असेल, उकारान्ती, ऊकारान्ती असेल एत्यादी!
आता या गझलेतील मतल्यात 'आहे'................रदीफ आहे!
काफिये..........एकटा/गारवा............कसे चालतील हे?
काफियातील न बदलणारे अक्षर कोणते?............बाळा या प्रश्नाला बगल देवू नकोस!
तिस-यांदा हे लिहित आहे!

...........प्रा.सतीश देवपूरकर

वैवकु, देवपूरकरमामा जे काही सांगतात ते त्यांना लागू होत नाही..ते सगळ्याच्या पलीकडे पोचलेत...जे काही शिकायचंय ते तुम्हा(जुन्या-नव्या) गझलकार भाचेमंडळींनी...कळत कसं नाही तुम्हाला....अजून तुम्हाला देपुमांसारखी गझल कुठे जमतेय...त्यासाठी तुम्हाला किमान ३५-४० वर्ष साधना करायला लागेल..एका पायावर उभं राहून...आता भटसाहेब नाहीयेत..तेव्हा त्यांचे शिष्योत्तम म्हणवून घेणार्‍या देपुमांचाच गंडा बांधा आता तुम्ही लोक. Wink

Pages