कड

Submitted by समीर चव्हाण on 1 January, 2013 - 00:52

तुला पाहिले बघत राहिलो
फार दिसांनी सुखावले मन
दोन निमिष मग हसत राहिलो

ओठांवरती शब्द न आला
देहाचीही भाषा सुंदर
अर्थबोध वेळेवर झाला

कुठली आशा तरळत होती
असे वाटले सगळे शाश्वत
स्वप्नेही कड पलटत होती

तुला पाहिले बघत राहिलो...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओठांवरती शब्द न आला
देहाचीही भाषा सुंदर
अर्थबोध वेळेवर झाला....

वा वा.... '' अर्थबोध '' या ओळीने कमाल झाली आहे. सुंदर!!

वैभवः
धन्यवाद.
मुक्तछंद हाताळावा तर असा !!

हा मुक्तछंद नाही.
रचना मात्रावृत्तात आहे.

गुलमोहरातल्या अनेक कवींना शिकवणी आपण सुरू करा समीर. आपल्यासारख्यांची तिथे गरज आहे. चिमुटभर लोक वगळले तर लोक धडे पोस्ट करताहेत तिथे.

फार दिसांनी सुखावले मन
दोन निमिष मग हसत राहिलो
>> ह्या ओळी वाचताच स्माईल केलं, ह्याउपर प्रामाणिक प्रतिसाद काय द्यावा?

असे वाटले सगळे शाश्वत
स्वप्नेही कड पलटत होती>> ह्या ओळी निव्वळ खास... कुणामुळे तरी क्षणभंगूरतेला चिरकालाची शाश्वती मिळण्याजोगी जाणिवच निराळी!
मजा आया....

मस्त. Happy

बाजीरावः
गुलमोहरातल्या अनेक कवींना शिकवणी आपण सुरू करा समीर

घराण्यांची जरा भीती वाटते, तेव्हा आहे तेच बरे.

बागेश्री आणि स्वाती:
स्मितांसाठी धन्यवाद.