
पत्रापत्री
—------
नावाप्रमाणे ही पत्रापत्रीच आहे, म्हणजे माधवराव आणि तात्यासाहेब ह्या दोन साठीतील (अंदाजे) निवृत्त मित्रांनी एकमेकांना लिहिलेली पत्रे आणि त्या पत्रांतून उलगडत गेलेल्या घटना, माणसं, कुटुंब, कुटुंबीय आणि पर्यायाने सामाजिक परिस्थितीचा, सामाजिक मनस्वास्थ्याचा आरसा!
आता कोणालाही वाटेल, पत्र व्यवहार - तीही प्रेमपत्रंही नव्हेत, म्हणजे किती रुक्ष. पण पत्रापत्री लिहिली आहे खुद्द दिलीप प्रभावळकरांनी - ज्यांनी डायरी म्हणजेच अनुदिनीला (गंगाधर टिपरे) एव्हढ लोकप्रिय केलं.
नर्मविनोदी शैली, विसंगती आणि विरोधाभासावर मारलेल्या कोपरखळ्या, माणसाच्या स्वभावाचे विविध कंगोरे अशा पैलूंनी नटलेली ही पत्रापत्री अतिशय मनोरंजक आहे.
तात्यारावांचा परदेशवारीचा किस्सा तर लाजवाब! ऐकताना अपूर्वाईची आठवण येते. आज जर पुलं असते तर अपूर्वाईत कदाचित असही एखादं प्रकरण समाविष्ट झालं असतं, असा विचारही एखाद क्षण मनात येऊन गेला. कदाचित पुलं आणि दिलीप प्रभावळकर दोघंही आवडत असल्यामुळे असेल पण त्यांच्या शैलीत समान सूत्र सापडतं.
पत्रापत्री आधी स्टोरीटेलवर (मोबाईल ऍप) दिलीप प्रभावळकरांच्या आवाजात ऐकलं.अर्थात् अतिशय आवडलं.

त्यामुळे इकडे प्रयोग येणार म्हंटल्यावर न जाण्याचा प्रश्नच नव्हता.
हा प्रयोगही रंगतदार झाला आहे. दिलीप प्रभावळकर आणि विजय केंकरे हे दोन प्रतिभावंत कलाकार दोन-सव्वादोन तास प्रेक्षकांनी खिळवून ठेवतात.
दोघंही उत्तम कलावंत असल्यामुळे एक पत्र वाचत असताना त्यावेळी दुसऱ्याच्या रिऍक्शनही बघण्यासारख्या आहेत.
९५ वर्षांच्या दादोबांच्या आवाजातील कंपनं, हातातील थरथर प्रभावळकरांनी उत्कृष्ट दाखवली आहे. अभिवाचनाचा एक उत्तम नमुना वाटला.
व्यक्तीशः मला दिलीप प्रभावळकरांच्या आवाजातील ऑडिओ बुक ( storytel app वरील पत्रापत्री) जास्त आवडलं. एक तर ते जास्त विस्तृत - चार तासांचे आहे. कदाचित पुस्तक ( श्राव्यस्वरूपात असली तरी) माध्यम मला जास्त जवळच वाटत हे ही एक कारण असावं. स्वतंत्रपणे पुस्तक ऐकताना त्या लयीत, जगात हरवून जायला होतं. उलट नाट्य/ अभिवाचन सगळ्यांबरोबर ऐकताना ती लय तुटल्यासारखे वाटत होते, तसेच काही विनाकारण /जास्तीचे लाफ्टरस् व्यत्यय वाटत होते.
निखळ मनोरंजन देणारा पत्रापत्रीच प्रयोग तुमच्या जवळच्या ठिकाणी येणार असेल तर जरूर बघा. नाहीतर storytel वर ऑडिओ बुक ऐका. किंवा पुस्तक घेऊन वाचा.
----
हा धागा पत्रापत्री किंवा दिलीप प्रभावळकरांच्या इतर कलाकृतींसाठी वापरता येईल.
अरे वा! उत्तम ओळख.
अरे वा! उत्तम ओळख.
धन्यवाद ओळख करून दिल्याबद्दल.
धन्यवाद ओळख करून दिल्याबद्दल.
सामो, अमितव धन्यवाद!
सामो, अमितव धन्यवाद!
काल सहजच बघितलं तर कळलं, दिलीप प्रभावळकर ८० वर्षांचे आहेत. त्यांची एनर्जी (ऊर्जा), उरक अफाट आहे.
छान ओळख.
छान ओळख.
आजच पहिले हे नाटक. अतिशय
आजच पहिले हे नाटक. अतिशय सुरेख आहे. दोघे कसलेले कलाकार आहेत त्यामुळे मजा येते.
सुरेख लिहीलंयत. मी पाहिलाय हा
सुरेख लिहीलंयत. मी पाहिलाय हा द्विपात्री प्रयोग. नाटकाच्या धाग्यावर रिव्ह्यूही लिहीला आहे.
https://www.maayboli.com/node/2212?page=14
छान ओळख.
छान ओळख.
अरे वा. छंदीफंदी धन्यवाद
अरे वा. छंदीफंदी धन्यवाद धाग्याबद्दल.
आम्ही काल संध्याकाळी पाहून आलो. अपेक्षेपेक्षा गर्दी कमी होती. नवीन नाटक आणि वेगळा प्रयोग म्हणून कदाचीत असे असेल.
प्रयोग मस्त झाला. दोघेही कसलेले कलाकार असल्याने त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्यास मज्जा आली. तसा अभिवाचनाचा प्रकार असला तरी दोघांनीही आपापल्या चेहऱ्यावरचे वेगवेगळे भाव सुंदर दर्शवले. एकाच्या वाचनाला दुसऱ्याची चेहऱ्यावरच्या बदललेल्या भावांनी दिलेली प्रतिक्रिया, त्यांच्या आवाजातले चढ उतार, त्यांची बोलण्याची लय असे सगळे पाहून गंमत वाटली. दोघांनी ही एक एक अधिक भूमिका ९०-१०० तील वृद्धांची केली. मामीने लिहिल्याप्रमाणे केंकरेंचा आवाज मस्त लागला तिथे.
मला त्यांचे प्रत्येक प्रसंगाला दिलेले वेगवेगळे गाण्यांचे क्यू आवडले. त्यामुळे प्रसंग काय असणार आहे त्याची पार्श्वभूमी तयार होते. प्रभावळकरांनी इतक्या वयात पण असे नाटक करणे म्हणजे त्यांच्या कलेला हॅट्स ऑफ! सुरुवात थोडी संथ वाटली पण लगेचच वेग पकडला नाटकाने आणि मग संपताना अरे अजून थोडे हवे होते असे वाटले.
त्यांचे अजून दोन तीन आठवडे इकडे प्रयोग आहेत. कोणाला आवड असल्यास नक्की जा. इथे तिकिटांची लिंक -
https://kallolentertainment.org/patrapatri
अस्मिता rmd मामी आणि धनी
अस्मिता rmd मामी आणि धनी प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
हो विजय केंकरे म्हणाले की कार्यक्रमाला तशी कमी गर्दी असते म्हणून...
हो बहुतेक वाचनाचा कार्यक्रम आहे, अभिवाचनाचा, त्यामुळे बरेच लोक येत नसावेत.
मामी तुमचा अभिप्रायही वाचला...
रॉयल ऑपेराला सुद्धा कधी जमले तर जायला पाहिजे.
धन्यवाद. ओळख करून दिल्याबद्दल
धन्यवाद. ओळख करून दिल्याबद्दल.
छान!
छान!
पेपरात याची जाहिरात पाहिल्याचं आठवतंय.
लक्ष ठेवून प्रयोग बघायला हवा.
ऋतुराज आणि ललिता - प्रीति
ऋतुराज आणि ललिता - प्रीति धन्यवाद!
त्यांनी सांगितले ३५ प्रयोग केलेत ..
बहुदा वय आणि इतर कार्यक्रमात व्यस्त ता यामुळे जास्त प्रयोग करत नसावेत..
दशावतार
दशावतार
चित्रपट आवडला. Recommended!
त्यातील मला भावलेल्या ह्या काही गोष्टी..
१. दिलीप प्रभावळकर - अप्रतिम अभिनय, बॉडी लँग्वेज -
कोकणातील बेरकी, मिश्किल, कष्टकरी, हेकट म्हातारा,
प्रेमळ आली पुत्रवियोगाने झुरणारा बाप,
सच्चा / हाडाचा कलाकार,
त्या मायबापासम असणाऱ्या कातळोबावर निस्सिम श्रद्धा ठेवणारा भक्त,
जंगलच्या अस्तित्वासाठी झगडणारा शिपाई अशा अनेक भूमिका उत्तम रीतीने वठवल्या आहेत.
अर्थात रंगभूमीवर ‘हसवाफसवी’ च्या माध्यमातून अगदी स्त्री पात्रापासून ते सत्तरीतील ज्येष्ठ रंगकर्मीपर्यंतच्या सहाही भूमिका लीलया पेलणाऱ्या कसलेल्या अभिनेत्यासाठी दशावतार म्हणजे तसा सोपा पेपर होता.
साधा भोळा कुटुंबवत्सल चिमणराव, गंगाधर टिपरे, चौकट राजा, तात्या विंचू या अनोख्या भूमिकांच्या पंगतीत बाबुली दिमाखात आसनस्थ झाला असंच वाटून गेलं.
२. सिनेमाटोग्राफी - हिरवंगार कोकण, झाडी, जंगल, जंगलातील पायवाट, नदी, धुकं, गाव, देऊळ, उत्सवातील वातावरण सगळंच छान दाखवलंय. दशावताराची सोंगं घेऊन खलनायकाचा संहार करतानाचे दृश्य फारच भेदक झाली आहेत.
३. दशावतारातील कलाकारांना/ गावकऱ्यांनाही सहभागी करून घेतले आहे
४. गाणीही सुश्राव्य.. विशेष करून अजय गोगावले यांच्या च्या आवाजातील रंगपूजा हे गाणं जास्त आवडलं
५. बाप लेखकाची ही वेगळी कथा आहे. त्यामध्ये दशावतारा सारख्या एका जुन्या चांगल्या परंपरेचा इतका सुंदर मिलाफ साधला आहे. जाता जाता कोकणातील सद्य परिस्थिती, रोजगाराची चणचण, कोकणचा विकास या नावाखाली हरपत चाललेले कोकणचे वैभव ( निसर्गसंपत्ती) ह्या विषयांनाही स्पर्श केलाय.
६. बाकी कलाकारांचीही कामे चांगली आहेत. सिद्धार्थ मेननला राजवाडे अँड सन्स नंतर पहिल्यांदाच सिनेमात बघितलं. इकडेही काम छान केलंय.
प्रियदर्शनीच पहिल्या भागातील काम तिच्या हास्य जत्रेतील कामाला अनुसरूनच आहे. मात्र उत्तरार्धात तिने अभिनयाची वेगळी चुणूक दाखवली आहे.
भरत जाधव यांना खलनायकी भूमिकेत पहिल्यांदाच बघितलं. सुनील तावडे, महेश मांजरेकर, विजय केंकरे, अभिनय बेर्डे यांची सगळ्यांचीच कामे चोख.
चित्रपट बघत असताना, तीन - चार वेळेला जेवढे कोकण बघायला मिळाले ते सर्व आठवल्यामुळे अजून छान वाटलं. तसेच कोकणातील खेळे हा प्रकार अनुभवला होता आणि दशावतार विषयी ऐकून होते. त्यानिमित्ताने त्याची झलक बघायला मिळाली. हे थोडे वैयक्तिक कारणही आहेच.
थोड्याफार काही जाणवलेल्या उणीवा किंवा काही गोष्टी अजून छान झाल्या असत्या असेही वाटून गेलं त्या म्हणजे
सिद्धार्थ म्हणून जास्त जाणवलं मध्येच मध्ये तो नॉर्मल मराठी बोलत होता आणि मध्ये मालवणी ते थोडं जास्त जाणवलं.
योगायोगांची मालिका, खलनायक वगैरे गोष्टी चित्रपटाच्या व्यावसायिक यशासाठी आवश्यक (?) त्या इथेही येतात.
उत्तरार्धा थोडा जास्त आवडला असं म्हणता येईल कारण तो खूप फास्ट पण आहे.
चित्रपट पाहिल्यावर एक विचार आला, ह्यातून ही कला, ते कलाकार ह्यांची काही उन्नती झाली. यासारख्या लोककलांना व्यासपीठ मिळाले, लोकाभिमुखता मिळाली तर फारच छान होईल.
पत्रापत्री - छान ओळख !
पत्रापत्री - छान ओळख ! धन्यवाद.
प्रभावळकर -- त्रिवार सलाम !!!
दशावतार - ज्या होम पीचवर आम्ही भावंडांनी खूप बॅटिंग केली ( करली नदी, धामापूर, जत्रेतील दशावतार इ इ ), तिथे चित्रित झालेला सिनेमा व त्यात प्रभावळकर प्रमुख भूमिकेत, म्हणजे सिनेमा पहाणं आलंच. इथल्या प्रतिसादानी उत्सुक्तता वाढतेच आहे. बघू कधी जमतंय तें !
ज्या होम पीचवर आम्ही
ज्या होम पीचवर आम्ही भावंडांनी खूप बॅटिंग केली ( करली नदी, धामापूर, जत्रेतील दशावतार इ इ ), तिथे चित्रित झालेला सिनेमा >>
तुमच्यासाठी तर अजून खास होईल मग.. नॉस्टॅल्जिया
भाऊ नमस्कार, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!