रूक्मिणीचे अंगण , काय नव्हते तिथे... वेगवेगळी झाडं, वेलींच्या महिरपी, फुलांची गर्द राई. सतत निरनिराळे प्रयोग करायची रूक्मिणी, गावभरच्या लेकीबाळी हक्कानं फुलं, पानं न्यायच्या. श्रावणातल्या मंगळागौरीला तर स्वतःच्या हाताने वेण्या माळून कौतुकाने द्यायची. अंगण आणि तिच हसू कायम फुललेले असायचं. पण घरामागच्या फुलांमधे तिचा विशेष जीव,किती पसरल्यात वेली.... घरभर सुवास दरवळत असतो.
(मी गणोत्सवानिमित्त एक छोटासा प्रयोग/गंमत केली आहे. एकाच शीर्षकाच्या साधारण समान संकल्पनेला किंवा धारणेला छेद देणाऱ्या दोन कथा एकत्र देऊन पण संयोजकांनी दिलेली वेगवेगळी सुरुवात वापरून ते विच्छेदन अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या कथेत देह हीच ओळख मानणारा योगी आणि दुसऱ्यात प्रथमदर्शनी देहाचेच आकर्षण वाटणारी नायिका.....)
देह
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय.
निखळ आनंदास-गोविंदासही
कोणे एकेकाळी.....
अभिनेता गोविंदा मला कधीही क्लासी वाटायचा नाही. एवढंच काय ज्यांना तो आवडतो तेही क्लासी नाहीत हेही मी ठरवले होते. स्वतंत्रविचारसरणीमुळे सगळ्यांचा क्लास मीच ठरवायचे. बेसिकली मीच एकटी क्लासी यावर माझा अढळ विश्वास होता. अजूनही जुन्या अस्मिताचा रेसेड्यू माझ्यात आहे व तो अधूनमधून फणा काढतोच.
अंतरीच्या गहिऱ्या गुहेतून
आज माझा या परदेशतील शेवटचा दिवस होता. विमानात बसल्या बसल्या इथे घालवलेला काळ एखाद्या चित्रपटा प्रमाणे माझ्या नजरेपुढून सरकू लागला.
भारता पासून हजारो मैल लांब असलेल्या या परदेशात गेली कित्येक वर्षे मी इथे कामानिमित्त काढली. सुरवाती सुरवातीला हा अनोळखी देश, इथली अनोळखी लोकं आणि अनोळखी संस्कृती बघून दचकायला होत होतं. त्यामुळे मी थोडासा बुजूनच वावरत असे. पण ती अवस्था जास्त काळ टिकली नाही कारण सुदैवाने काही दिवसांनीच एका मॉल मध्ये गरजेच्या वस्तू खरेदी करायला गेलो असताना मुळचा पाटना येथील असलेला एक बिहारी व्यक्ती मला भेटला.