प्रेम म्हणजे जणू क्रिकेटचा खेळ

Submitted by सिद्धेश्वर विला... on 4 June, 2021 - 06:32

प्रेम म्हणजे जणू क्रिकेटचा खेळ

आपली संयमी फलंदाजी

तिचे धारधार तेजतर्रार मादक यॉर्कर

गोलंदाजी नीट समजण्यास द्यावा लागणार वेळ

सर्व मुलींना समजत होतो पाटा खेळपट्टी

सुमार वाटल्या म्हणुनी चालू होती हातभट्टी

त्यातल्या त्यात बरी म्हणावी , शेजारी एक होती

कळलं असतं घरी तिच्या तर झाली असती माती

देउनी तिजला तिलांजली मी बनलो पुन्हा सेहवाग

तय्यार झालो बॅट परजुनी, ज्वानीची शोधण्या आग

ओढ लागली भेटीची , झालो दुखी कष्टी

एक अनामिक यॉर्कर आला आणि उडवली मधली यष्टी

भानावरती येऊनि तिजला डोळेभरून पाहिले

हीच ती शोएब अख्तर जिच्या शोधास मन आसुसले

काय तिची ती अदा वर्णावी, बॉल टाकते गदागदा

सेहवागला मी खिशात घालून द्रविड बनलो साधा

पट्टीवरची हिरवळ पाहून अंदाज आला मला

म्यान करुनि आक्रमक बाणा , संयमाने खेळा

कसेबसे मी चेंडू तटवले, धाव घेतली पहिली

जळजळीत ते नेत्र भेदूनि मैत्री तिच्याशी केली

शतक होईस्तोवर पडणार होती बॅटीला माझ्या भोके

मैत्री होताक्षणी वाढले काळजाचे ठोके

सराव नव्हता मला कदाचित म्हणून अडखळत होतो

चेंडू पुढे सरसावून मारण्या लागणार होते डोके

असाच रंगत गेला सामना , काहीच होत नव्हते

दोघेही कसलेले खेळाडू एकमेका भिडत होते

कसली हिरवळ अन कसली पाटा

खेळ असतो तोच

भोकबळींची संख्या वाढते

बाकी फरक नाही , शाटा

===========================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

इथे क्रिकेटप्रेमी बरेच आहेत. त्यांना रीलेट होईल. ते वाचून गालातल्या गालात हसतील. पण रिप्लाय देणार नाहीत. तुम्हीही असे करीत असाल. बऱ्याच वेळा मी देखील असेच करतो. रिप्लाय नाही म्हणून लिहिणं, प्रकाशित करणं थांबवू नका. लिहित रहा. Wink

क्रिकेटप्रेमी Lol
सरांना दाद द्यायलाच मी लॉगिन केले आज खरंतर. पाटणकर खरोखर सिद्धहस्त कवी आहेत. NSFW कविता कमीकरून 'सुखाच्या सीमेवर दुःखांची घरे वसतात' आणि 'हे गगना तू मजला ताऱ्यांचे दान दे' ह्या सारख्या कविता अजून लिहिल्या तर प्रतिसादही वाढतील.