फ्री बेसिक्स - विरोध नोंदवण्याची मुदत ७ जानेवारी पर्यंत वाढवली.

Submitted by घायल on 29 December, 2015 - 01:44

अनेक लोक फ्री बेसिक्ससाठी आपला आवाज उठवतांना दिसत आहेत. तसे नोटीफिकेशन्स दर मिनिटाला, सेकंदाला येताहेत. जे लोक फ्री बेसिक साठीच्या मोहीमेवर क्लिक करून आपला आवाज ट्राय कडे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना आपण कशासाठी आवाज उठवला याची कल्पना आहे का ?

हा व्हिडीओ पहा.

https://www.facebook.com/marathimaticom/videos/10154065432884311/

नेट न्यूट्रॅलिटीला विरोध करणारी एक युक्ती मोदींच्या फेसबुकला भेट दिल्यावेळी मार्क झुकेरबर्गने केली होती. प्रोफाईलला तिरंग्याचं चित्रं लावलं की ट्राय कडे आम्ही इंटरनेट ओआरजी ला पाठिंबा देतो असा काहीतरी मेसेज जाण्ञाची व्यवस्था होती असं वाचनात आलेलं. काही उत्साही लोकांनी त्याचा प्रोग्रामही व्हायरल केला होता. त्याबद्दलचं खरं खोटं काय ते अद्याप कळालेलं नाही.

मात्र इंटरनेट ओआरजी हा रिलायन्स, फेसबुक आणि काही दिग्गज कंपन्यांचा उद्योग आहे, ज्या द्वारे इंटरनेटवर त्यांना आपला ताबा मिळवता येईल. सध्याच्या नेट न्यूट्रॅलिटीच्या कल्पनेमुळे त्यांच्या इराद्यांना तडा जातो. गेल्या वेळी प्रोफाईल प्रोग्राम प्रकरणी संताप व्यक्त झाल्यानंतर आता फ्री बेसिक्सची मोहीम सुरू आहे.

या वर क्लिक केल्यानंतर काय होतं ते वरील व्हिडीओत सांगितलेलं आहे. वेळ खूपच कमी असल्याने ट्रायकडे नेट न्यूट्रॅलिटीला सपोर्ट असणा-यांनी ऑथेन्टीक साईटवरून मेसेज पाठवायला काहीच हरकत नसावी. त्यात नुकसान काहीच नाही कारण मेसेज थेट ट्राय कडे जातो. मात्र वर दिलेल्या व्हिडीओत जो दावा केला आहे त्यामुळे फ्री बेसिक हे फेसबुकचं स्कॅम असून नेट न्यूट्रॅलिटीला सपोर्ट असणा-यांची फसवणूक होते आहे काय, खरं आणि काय खोटं हे तपासून त्यावर चर्चा व्हावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेसबुक च्या मोहीमांना सपोर्ट करणं मी बंद करणार आहे. एक म्हणजे बर्‍याच कॉमन पब्लिक प्रमाणे मलाही आपण कशाला सपोर्ट करतोय, ते नक्की चांगलं आहे का याची कल्पना नसते. त्या डिजीटल मिडीया च्या वेळी सेटिंग मध्ये तिरंगा प्रोफाइल ३१ ऑक्टोबर नेहमीसारखे करा ला क्लिक केले होते तरी ते नेहमीसारखे झालेच नाही, स्वतः परत फोटो बदलावा लागला आणी अतिरंगा करावा लागला.
त्यांची फक्त मार्क सेफ वाली सुविधा मला बरीच सोयीची आणि चांगली वाटली.
बाकी फेसबुक, त्यातली भाराभार नोटीफिकेशन्स, लोकांनी एखाद्या पुरणपोळीच्या किंवा समुद्राच्या फोटोत १०० जणांना टॅग करणे,'सनी लिऑन ला इतक्या लाइक्स देतोस, मेलेल्या (शहिद झालेल्या)सैनिकाच्या फोटोला किती देतोस बघू तरी' वाले हीन नालायक मेसेज हे 'नायजेरियन सम्राट मरुन तुमच्या खात्यात १०००००००००००० डॉलर्स ठेवून गेला' मेल्स सारखेच स्पॅम आहे.

दुनिया भुकती हे भुकानेवाला चाहीये. Happy ते नोटीफिकेशन बंद करण्याची सुबिधा उपलब्ध असल्याने अशा दुविधेत न पडता ते बंद करा. मज्जा करा. Happy

सोशल साईटस आपण वापरायच्या असतात, आपला वापर सोशल साईटसना करू द्यायचा नसतो.

मी तर कुठेही क्लिकाक्लिकी करत नाही. फेसबूक देखील मार्कचे काय कसे चालू आहे हे बघण्यासाठीच म्हणून अधूनमधून उघडतो. तेवढाच एखादा धागाही काढता येतो. हा मिसला वाटतं.

फ्री बेसिक हे नेट न्यूट्रॅलिटीच्या विरोधात आहे हे आपण पाठवत असलेल्या या मेसेजवरून लक्षात येते. सेण्ड इमेल या बटणवर क्लिक करताना हा मेसेज दिसतो.

Free Basics gives people access to vital services like communication, healthcare, education, job listings and farming information – all without data charges. It helps those who can't afford to pay for data, or who need a little help getting started online. And it’s open to all people, developers and mobile operators.
But Free Basics is in danger in India. A small, vocal group of critics are lobbying to have Free Basics banned on the basis of net neutrality. Instead of giving people access to some basic internet services for free, they demand that people pay equally to access all internet services – even if that means 1 billion people can't afford to access any services.
The TRAI is holding a public debate that will affect whether free basic internet services can be offered in India. Your voice is important for the 1 billion Indian people who are not yet connected and don't have a voice on the internet.
Unless you take action now, India could lose access to free basic internet services, delaying progress towards digital equality for all Indians. Tell the TRAI you support Free Basics and digital equality in India.

कापो

हा विषय नेटीफिकेशन्स बंद करून डोळे आणि कान बंद करून घेण्याचा नसून नेट न्यूट्रॅलिटीच्या विरोधात काय चालू आहे हे समजून घेऊन कृती करण्याचा आहे.

माझे मन फेसबूक वरुन उडालेच आता. फार कमी वावर असतो तिथे माझा आता. मधे ते खेळ होते, आता असले प्रकार असतात.
सोशल मिडीयाचा विधायक उपयोग करणारे फार थोडे..

प्रोफाईलला तिरंग्याचं चित्रं लावलं की ट्राय कडे आम्ही इंटरनेट ओआरजी ला पाठिंबा देतो असा काहीतरी मेसेज जाण्ञाची व्यवस्था होती असं वाचनात आलेलं. काही उत्साही लोकांनी त्याचा प्रोग्रामही व्हायरल केला होता.
>>

तो प्रोग्रामरचा जेन्युइन आळशीपणा होता … त्याने इमेजचे नाव इंटरनेट डॉट ऑर्गचे वापरले. (अस करतात मंडळी)
पण फ्री बेसिक्स नक्कोच.

येवढ चांगलाय तर पेज भर जाहिराती का देतय फेसबुक, तेही प्रिंट मिडियामध्ये ?

Unless you take action now, India could lose access to free basic internet services, delaying progress towards digital equality for all Indian.
>>

ही लाइन वाचूनच लक्ख प्रकाश पडायला हवा. अर्जन्सी टोन बघितलातर वाटतय ह्याला भारतीयांची एवढी काय काळजी पडलीय?

कुछ तो गडबड है दया Wink

माझे मन फेसबूक वरुन उडालेच आता. फार कमी वावर असतो तिथे माझा आता. मधे ते खेळ होते, आता असले प्रकार असतात.
सोशल मिडीयाचा विधायक उपयोग करणारे फार थोडे..

याचा संबंध फक्त फेसबुकशी नाह्ये तर तुमच्या इंटरनेट वापराशी आहे.

सोप्या शब्दात सांगायचे तर तुम्हाला एका पदार्थाची रेसिपी पाहायची आणि ती फक्त मायबोलीवरचीच पाहायची. अशा वेळी माबो जर तुमच्या सर्विस प्रोवाईडरच्या लिस्टीत नसेल तुमचा सर्विस प्रोवायडर तुम्हाला माबो पाहायचे जास्त पैसे लावणार. आणि त्याच्या लिस्टीत असलेल्या साईटवर तुम्ही रेसिपी पाहिलीत तर कमी पैसे किंवा तुम्हाला फुकटच बघायला देणार. यात तुम्ही माबोचा नाद सोडुन त्या फुकटच्या साईटीवरच जाऊन रेसिपी पाहाय्ची शक्यता वाढते. माबो कितीही चांगली असली तरी या प्रकारामुळे तिचा ग्राहकवर्ग कमी होऊ शकतो. इथे माबो हे एक उदाहरण म्हणुन घेतलेय.

सध्या तुम्ही सर्विस प्रोवायडर कडुन नेटपॅक घेतला की तुम्ही तो वापरुन माबोवर रेसिप्या टाकता की पोर्न साईट पाहता याच्याशी सर्विस प्रोवायडरला काहीही देणेघेणे नाही. तो दोन्हीसाठी सारखाच रेट लावतो. पण फेसबुकचा प्रयत्न हा चाललाय की फ्रि बेसिक मध्ल्या साईट्स फुकट द्यायच्या आणि इतर साईटसाठी काय रेट लावायचे याचा हक्क आपल्या खिशात ठेवायचा.

सध्या तुम्ही कशा कशा करता नेट वापरता याची एकदा यादी करा. मग हे प्रकरण किती महाग पडेल आणि विरोधी साईट्सची कशी गळचेपी करता येईल हे तुमच्या लक्शात येईल.

Unless you take action now, India could lose access to free basic internet services, delaying progress towards digital equality for all Indian

खोटे बोलताहेत ते. कुठल्यातरी दुर्गम भागातल्या लोकांना फ्री नेट देणार असे भासवत इथे शहरातल्या लोकांकडुन दुप्पट तिप्पट पैसे उकळायचे, कॉम्पीटीटर साईट्स् लोकांना परवडणारच नाही असे करायचे हे उद्योग सुरू होणार. दुर्गम भागातल्या लोकांना फुकट फोन आणि सोबत फुकट फ्री बेसिक नेटपॅक मिळाले तरी वेळोवेळी फोन चार्ज करायला विज कुठून मिळणार याचा विचार करायचे फेसबुकला कारण नाहीच.

माझ्यामते यामागे बरेच मोठे कारण आहे हे फेसबुकी प्रकरण काही आता पासून सुरु झाले नाही. जगातील बर्‍याच घडामोडी या संकल्पनेच्या मागे कारणीभुत आहे.

गरिबांना अजूनच पिळायचे हे कारण आहे. ३० पेक्षा जास्त देशात फेसबुक फ्री बसिकस आणतेय आणि भारतासारखा गरीब देश जिथे१ बिलियन लोक अजून इंटरनेट पासून दूर आहेत, तिथे काही दळभद्री लोक अशा चांगल्या योजनांना विरोध करताहेत हे बघून मार्क वेडा झालाय ☺. काहीच नसण्यापेक्षा थोडे असलेले बरे हे त्याचे मत आहे.

माझी नोटिफिकेशन्स ऑफ आहेत. ह्या बातम्या, शेअर केलेलं माझ्यापर्यंत क्वचितच पोचतं, बरं, पोचल्यास त्याबद्दल जास्त खोदून वाचण्यातही मला इंटरेस्ट नसतो. त्यामुळे ह्या सगळ्या बाबतीत मी कायमच अनभिज्ञ (सुखी?) असते.

साधनातै

चांगल्या पोस्ट्स आहेत तुमच्या. फेसबुकचे दावे संशयास्पद आहेतच. डिजिटल इक्विलिटी चं डोकं झुक्याचं नसावं. भारतातलीच सुपीक डोकी त्याला मदत करत असावीत बहुधा. फ्री बेसिक्स हे नेट न्युट्रॅलिटीच्या विरोधात आहे असा अजब युक्तीवाद करून एकदा नेट न्युट्रॅलिटीची आवश्यकता नाही हे ट्राय ला "पटले" की मग विशिष्ट कंपन्यांना जास्त बॅण्डविड्थ , अविशिष्ट कंपन्यांना कमी बॅण्डविड्थ असा प्रकार सुरू होईल. शिवाय सर्च मधे कुठली पेजेस आधी दिसावीत याचे निर्णय हा कंपू घेणार. या प्रकाराचा डिजिटल इक्वॅलिटीशी दूरान्वयेही संबंध नसणार.

थोडक्यात नेट न्युट्रॅलिटीच्या ज्या संकल्पनेमुळे मार्क झुकेरबर्ग आज रंकाचा राव झाला ते इथून पुढे होणार नाही. रंकांना बॅण्डविड्थच नसल्याने तिकडे ट्रॅफिक असणार नाही. सगळं ट्रॅफिक आपणाकडे वळवण्यासाठी केलेले हे कृष्णकृत्य दिसतेय. नोटीफिकेशन्स बंद करून यावर सोल्युशन कसं निघणार ? या प्रकाराला विरोध नको का करायला ?

सरळ ट्रायच्या साईटवर जाऊन नेट न्युट्रॅलिटीला आपला पाठिंबा जाहीर करावा हे उत्तम. तसंच हे स्कॅम आहे हे पटलेले असल्यास मित्रमंड्ळींना त्याबद्दल सावधान करणे हे पुढील नेटायुष्यासाठी कर्तव्यच आहे.

नेट न्युट्रॅलिटीवर इथे पूर्वी चर्चा झालेली आहे.
http://www.maayboli.com/node/53508

जे लोक फ्री basics वापरतात त्यातले ५० टक्के लोक महिनाभरात पेड सर्विस वापरायला लागतात इति मार्क.

मार्कचे वरचे वाक्य आणि खालचे जनरल अनुभवी वाक्य यातला फरक ओळखा.

ज्यांना एकवेळचे खायचे वांदे त्यांना एक महिना फ्री drugs दिले कि ते उरलेले आयुष्यभर कुठूनतरी पैसे गोळा करून ड्रग घेत राहतात.

आणि तसेही आज ज्यांना नेट परवडत नाही त्यांना महिनाभरात ते कसे परवडते एक मार्कच जाणो.

फ्री बेसिक्स आणि डिजिटल इक्वॉलिटी (!) हे दिशाभूल करणारे शब्द आहेत.

आजच्या पेपर मध्येही एका गोर्‍या मुलीचा आणि एका काळ्यामुलीचा फोटो डिजिटल इक्वॉलिटी हे नाव देऊन दिला आहे. टू मच !

थोडक्यात नेट न्युट्रॅलिटीच्या ज्या संकल्पनेमुळे मार्क झुकेरबर्ग आज रंकाचा राव झाला ते इथून पुढे होणार नाही.

येस. फेस्बुक लोकप्रिय झाल्यावर ऑर्कुट बंद पडले. आता कोणी दुस्सरा लोकप्रिय होऊन फेसबुक बंद पडायच्या आधी जोवर हातात सत्ता आहे तोवर कोणी दुसरा उभा राहाय्चे मार्ग बंद केलेले बरे हा विचार नक्कीच केलेला असणार.

मार्कला तो दाखवतोय तितका कळवळा खरेच असेल तर त्याने फ्री बेसिक्स मध्ये कुठल्या साईट्स निवडायच्या हा हक्क लोकांकडे राहु द्यावा. हवेतर बाकीच्या साईट्स साठी वेगवेगळे रेट स्लॅब्स लावावे. आणि परत त्या स्लॅबमध्ये कुठल्या साईट्स ठेवाव्या हा हक्क लोकांकडे राहु द्यावा. अर्थात हे जरी नेट न्युट्रालिटीच्या विरोधात असले तरी कुठलातरी मध्यम मार्ग काढल्यासारखे होईल. पण यातही त्याच्यासारख्या डोकेबाज लोकांना काड्या करता येतीलच.

But free basics is at risk of being banned

असं एक वाक्य आहे जाहिरातीत. त्याच अर्थ काय?

आजच्या पेपरात तीन पाने भरून जाहिराती आहेत. जाहिरातीतली, कँपेनची शैली खूप ओळखीची आहे.

नेट न्युट्रलिटीवाले तुम्हाला हे सांगणार नाहीत, अमक्या नंबरवर मिस्ड कॉल द्या....., हे देशहितार्थ आहे; हीच वेळ आहे, ती गेली तर काही खरं नाही....

But free basics is at risk of being banned

तुम्ही सपोर्ट केला नाहीत तर इथे फ्री बेसिक्स आणता येणार नाही. मग ते १ बिलिअन लोक बिचारे कायमचेच अंधारात राहणार.

कोणीतरी त्या १ बिलिअन लोकांना सांगा की मार्कसारखा देवदुत त्यांच्यासाठी झगडतोय, बिचारे धन्य होतील. त्यांना माहितच नसेल मार्क किती रक्त जाळतोय त्यांच्यसाठी ते.

वेळ जाऊच दे मग..
"आत्ताच्या आत्ता पैसे/फॉर्म/मिस कॉल्/एसएम एस करा, ही वेळ गेली तर तुम्हाला परत ही संधी आणि हा भव्य डिस्काऊंट मिळणार नाही" असं म्हणणारे बरेच जण गंडवतातच हा पूर्वानुभव.

हा विषय नेटीफिकेशन्स बंद करून डोळे आणि कान बंद करून घेण्याचा नसून नेट न्यूट्रॅलिटीच्या विरोधात काय चालू आहे हे समजून घेऊन कृती करण्याचा आहे.>> मग मला खरच आवडेल की चर्चा करुन काय कृती केलीत ते. उग्ग्गाच काहीतरी. आपल्याला न पटलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. डाकुंच्या ध्याग्यावर भलतेच विषय घेऊन भांडण्यासारखेच आहे. तुम्ही भांडल्यावर प्रतिसादांची संख्या वाढते व ते नव्या जोमाने नविन धागा काढतात. दुर्लक्ष करा आपोआप तिलांजली मिळते. इथे चर्चा करुन एक प्रकार प्रसिध्दीच देत आहात असे मला वाटते.

मग मला खरच आवडेल की चर्चा करुन काय कृती केलीत ते. उग्ग्गाच काहीतरी. >>> गव्हर्नमेंट च्या साईटवर जाऊन मेसेज कॉपी केला. फेसबुक वर या विरोधात असलेले व्हिडीओ शेअर केले. इथेही हा धागा त्यासाठीच आहे. एव्हढेच अपेक्षित होते. प्रत्येकाने त्या साईटवर जाऊन फ्री बेसिक्सच्या विरोधात आणि नेट न्युट्रलिटीच्या बाजूने असल्याचे सांगणे अपेक्षित आहे जे केवळ नोटीफिकेशन्स बंद करून होणार नाही. यात चिडण्यासारखे काही आहे का ?

इथे फेबु किंवा मार्क कडुन जे काही करण्याचा प्रयत्न केला जातो आहे,
त्याला जर सरकारी कायदेशीर मान्यता मिळाली,
तर त्याचा चांगला फायदा फक्त मोठ्या कंपन्या (ज्यातील ९९% आज फक्त कुंपणावर आहेत )नच होणार आहे.
त्यातील सर्व वाईट भाग हा सामान्य जनता आणि भारतातील नवोदीत उद्योजक यांच्य वाट्याला येणार आहे.

दुर्लक्ष करुन हा वाईट भाग फेसबुकेतर ईकोसिस्टीम आणि सामान्य जनता यांच्या पर्यंत पोहोचणे रोखता येणार नाही.
दुर्लक्ष केल्यामुळे "आज" फक्त फेबु पुरते मर्यादीत असलेले याचे तोटे उद्या फेबु बाहेरच्य सगळ्यांना भोगावे लागणार आहेत.

"उद्या" याच्या पासुन "सगळ्यांना" होणा-या तोट्यापासुन वाचण्यासाठी "आज" शक्य ती कृती करणे गरजेचे आहे.
यातील महत्वाचा भाग हा जास्तीत जास्त भारतीयांना नेट न्युट्रलीटी टिकवुन ठेवायची आहे आणि ती मोडण्याच्या दिशेने होणारे कोणते ही प्रयत्न मान्य नाहीत असा संदेश सरकार आणि योग्य त्या लोकांना जाणे गरजेचे आहे.
हा संदेश देणे आणि शक्य तितक्या लोकांना जागृत करणे आपले स्वतःचे वयक्तीक काम आहे. दुसरा कोणीही जबाबदार नाही.

आपण तामीळनाडूत राहतो म्हणून राजस्थानवर कोणी आक्रमण केले तर माझे काय जाते असे म्हणण्यासारखे आहे; नेट न्युट्रलिटी व्हायोलेट करण्याच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करा असे म्हणने.

ये सगळे फक्त फेबु पुरते मर्यादीत असते तर जगातील कोणीही डोके ठिकाणावर असलेल्या व्यक्तीने लगेच याचे नोटीफिकेशन बंद करुन दुर्लक्षच केले असते.
दुर्दैवाने तसे नाही आहे.

प्रत्येकाने त्या साईटवर जाऊन फ्री बेसिक्सच्या विरोधात आणि नेट न्युट्रलिटीच्या बाजूने असल्याचे सांगणे अपेक्षित आहे >> mee net neutrality cha bajune pan naaheeye. aso. chidaloy kuthe. mee kaay kele te saangitale. malaa to soppa upay vaatalaa.

हे नेन्यु च्या बाजुने किंवा विरोधात दोन्हीकडे नसणा-या लोकांचे लॉजीक मला आत्तापर्यंत कळलेले नाही. यांचे डोके नक्की कसे चालते?
रस्ते, एस्ट्यांची अवस्था, तिकीट दर, वाहकाचे वागणे हे सगळे सुधारण्यासाठी जर कोणी मोहीम चालवत असेल तर त्या गावाला कधीच जायचेच नसलेले रिकामटेकडे लोकं सगळ्यात पहिले येऊन त्या मोहीमेच्या बाजुने असणा-या लोकांना वेड्यात का काढतात?

असे रिकामटेकडे फक्त भारतातच असतात का?
तुम्हाला जर काहीच फरक पडत नाही, तुम्हाला दुर्लक्ष करायचे तर तुमचे तुम्ही करा ना? करुन गप्प बसा.
स्वतः आरामात जगा.
त्या मोहीमेत असणा-यांना जाउन कशाला काही बोलता? दुस-यांच्या कामात मोडता कशाला घालता?
काही काम धंदा नाही का आयुष्यात?

फेस्बुक लोकप्रिय झाल्यावर ऑर्कुट बंद पडले. आता कोणी दुस्सरा लोकप्रिय होऊन फेसबुक बंद पडायच्या आधी जोवर हातात सत्ता आहे तोवर कोणी दुसरा उभा राहाय्चे मार्ग बंद केलेले बरे
>>

बुल्स आय साधना ताई! कोणती साईंट फ्री ठेवायची ह्याचे हक्क एकदा का सर्व्हिस प्रोव्हायडरकड़े गेले की नव्या साइट्स ना काही करार करूनच पब्लिश होता येइल. मग काय नवे बिझनेस सुरु होणार नाही.

चांगली चर्चा चालू आहे.
साधना चांगले मुद्दे !
मला फेबुवर माझ्या फ्रे. लि. मधल्या अनेक जणांनी फ्री बेसिक्सला सपोर्ट केल्याचे नोटीफिकेशन्स आली होती. पण तो ही धोका असू शकतो.
http://blog.savetheinternet.in/if-youve-been-misled-by-facebook/

आवळा देउन कोहळा काढण्याची चाल आहे ही म्हणुन आवळ्याची भरमसाठ जाहिरात केली जात्ये असे माझे मत.

साधनाच्या पोस्टी बरोबर तर्कशुद्ध वाटताहेत.

Pages