फास्टटॅग
How to take fastTag online. Any govt website is there?
Pls help
How to take fastTag online. Any govt website is there?
Pls help
मी राहत असलेल्या रहिवासी सोसायटीचे दरमहा मेंटेनन्स बिल्स (प्रत्येक सदनिकाधारकाला देण्यासाठी) बाहेरून एका व्यक्तीकडून तयार करून घेतले जाते. तेव्हा माझ्या मनात असे आले की, आपल्या सोसायटीचे मेंटेनन्स बिल्स आपणच बनवावे, म्हणजे सोसायटीचे थोडेफार पैसे वाचतील आणि आपल्या सोसायटीचे काम नीट जमू लागले की मग आजूबाजूच्या इतर सोसायट्यांचेही काम घ्यावे, म्हणजे अधिकचे चार पैसे कमावता येतील.
तर या कामाविषयी थोडी माहिती हवी आहे.
१. अशा प्रकारच्या सेवेला काय संबोधले जाते? म्हणजे जर उद्या मला जाहिरात करायची असेल तर नेमकी काय service देत आहोत असे जाहिरातीत द्यायचे??
चला आता मायक्रोफोन मध्ये बोलून टायपिंग करू या
बरेच दिवस टायपिंग चा त्रास कसा कमी करता येईल याचा विचार मी करत होतो दोन चार दिवसापूर्वी मला असे ऐकायला मिळाले आता गुगल मी मराठी भाषा केली आहे तर मायबोली वरचे कसे मायक्रोफोन वरती बोलून टाईप करता येतील याचा विचार करताना मला सापडली
गुगल डोक्स ओपन करा. आपला मायक्रोफोन सुरु करा. जिथे मायक्रोफोन दिसतोय सेटिंग आहे त्यामध्ये जाऊ मराठी भाषा सेट करा आपण बोलायला लागला आज मराठी टायपिंग होऊ लागेल. थोडे एडिटिंग करावे लागेल
आता टायपिंग केलं आहे ते कॉपी-पेस्ट करा मायबोली वर
ऐन लॉकडाऊनच्या काळात सर्व भिस्त फोन आणि इंटरनेटवर असल्याने फोन बंद पडणे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. माझ्या भावाचा फोन असाच बंद पडला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मागच्या काही वर्षात वेळोवेळी साठवला गेलेला अतिशय महत्वाचा डेटा त्यात होता. थोडाथोडका नव्हे तर जवळजवळ ६४ गिगाबाईट!
मी काही महिने (जास्तीत जास्त 5 ते 6) मिरजमध्ये राहायला जातोय. कंपनीच्या कामासाठी मला एक चांगल्या इंटरनेट कनेक्शनची गरज आहे. तर त्या भागात कोणतं कनेक्शन जास्त चांगलं आहे? अनलिमिटेड असेल तर बरं होईल.
Laptop नवा घ्यावा की सेकंडह्यांड घेणे योग्य ठरेल?
कोणत्या कंपनी चा,ब्रांड चा व किती किंमतीपर्यंत बसेल,अंदाजे!!!
कुणाला काही माहिती असेल तर कृपया त्यांनी माहीती देऊन सत्कार्य करून पुण्य मिळवावे,ही विनंती!!!
तसेच धन दिल्याने (वाटल्याने) एकवेळ कमी होत असेल ,पण ज्ञान दिल्याने (वाटल्याने) ज्ञान वाढते,हे लक्षात असू द्यावे.
त्यामुळे निश्चिंत राहून ज्ञानदानाचे कार्य जमेल, तसे करावे!!!
टिंगलटवाळी करुन ,टाईमपास करण्याने ,आनंदनिर्मितीसह दु:खनिर्मितीचेही, पालक बनण्याचे महापातक नशिबी येऊ शकते.अन् हे आपण टाळू शकतो.
मायक्रोसॉफ्ट विण्डोज् सेव्हन ६४ बिट (Windows 7 64 Bit) ऑपरेटिंग सिस्टीम सध्या वापरत आहे. त्यावर सर्विस पॅक १ इन्स्टॉल कसा करावा?
नेटवर शोधाशोध करुन खालील तीन फाईल्स डाऊनलोड केल्या पण त्यापैकी कुठलीच रन होत नाही.
windows6.1-KB976932-X64
Windows6.1-KB947821-v34-x64
windows6.1-KB976932-X86
त्याकरिता नेटवरील कुठल्या साईटवरुन कोणत्या फाईल्स डाऊनलोड करुन घ्याव्यात?
तसे केल्यास स्पीड वाढेल का? लायब्ररीतील (माय डॉक / माय व्हिडीओ / माय म्युझिक) फाईल्स आणि फेवरिट्स / बुकमार्क्स इत्यादी डिलीट होतील का?
इंटरनेट वर टाईमपास सॉफ्टवेअर्स मधे बराच वेळ घालवला . नवरा आणि बायको दोघांचेही फोटो दिले की त्यांचे होणारे बाळ कसे दिसेल ? बायकोच्या जागी सेलेब्रिटीजचे फोटो टाकून पाहीले. दोघांच्या चेह-यासारखा एक तिसराच चेहरा बनायचा.
अजून एक सापडले त्यात नवरा किंवा बायको, दोघांपैकी एकाचेही चित्र दिले तरी चालायचे (लग्न न झालेल्यांसाठी अत्यंत उपयुक्त). ज्यांचे बाळ ऑलरेडी आहे त्यांचे बाळ मोठे झाल्यावर कसे दिसेल असे एक सॉफ्टवेअर होते. तर बाळाचा आणि बाबाचा / आईचा फोटो देऊन मोठेपणी ते कसे दिसेल असेही एक सॉफ्टवेअर होते.
गुगल इनपुट टूल्स वापरून ऑनलाईन टाइप करता येते.
https://www.google.com/inputtools/
पण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये टाईप करण्यासाठी त्याचा उपयोग नाही. भाषाइंडीया या साईटवरून डाऊनलोड केलेल्या इनपुट एडिटरचा अनुभव कसा आहे?
https://bhashaindia.com/downloads.aspx
बरेच दिवस मी macOS (iMac आणि MacBook) आणि iOS (iPad आणि iPhone) विषयी मला माहित असलेली माहिती देण्यासाठी एक सदर सुरु करावे म्हणत होतो. यात काही टिप्स असतील, ट्रबलशुटींग असेल किंवा मला आवडलेली काही ॲप असतील. किंवा ॲप्पलविषयीच्या नव्या बातम्याही असतील. सगळ्याच गोष्टी या कामासाठी ऊपयोगी असतिलच असे नाही. काही काही गोष्टी 'जरा गम्मत' म्हणूनही असतील. पण प्रश्न होता भाषेचा. ईंग्रजीत तर लिहायचे नाही आणि मराठीत लिहायचे तर ईंग्रजी शब्दांना पर्याय सापडत नाही. म्हणजे निदान मला माहित नाहीत. मग ठरवले जमेल तसे लिहावे, सुचतील ते शब्द वापरावे. हळूहळू सफाई येत जाईल लिखाणात. तोवर ॲडजस्ट करा.