दिवाळीचा प्रसाद!!!!

Posted
4 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago
Time to
read
<1’

सिंगापुरमधे तमिळ लोकांचे खूप चांगले बस्तान बसलेले आहे. तमिळ ही इथली एक कार्यालयिन भाषा आहे. दिवाळीच्या दिवसाची आम्हाला इथे एक दिवस सुट्टी मिळते त्याचे श्रेय आणि आभार इथल्या तमिळ जनतेला द्यायला हवेत. पण ह्यांची दिवाळी फक्त एकच दिवसाची असते. आपल्यासारखे पाच पाच दिवस ते साजरे करत नाही. पोंगल हा त्याचा सर्वात मोठा सण. ह्याशिवाय, ज्या दिवशी नरकचथुर्दशी असते त्या दिवशी ही लोक सगळी पुजाविधी करतात. आपला मुख्य दिवस ह्या नंतरचा असतो. म्हणून काल मी पुजेची तयारी केली. मी पुजेच्या गोष्टी विकत आणणे सहसा टाळतो. शक्य तेवढ्या गोष्टी आजूबाजूला निसर्गापासून मिळतील तेवढ्या गोळा करतो. जसे की ताजा दुर्वा, फुले, पाने, ताजी फळे हे सगळे थोडे प्रयत्न करुन आपण आपले गोळा करु शकतो. आणि मग, ह्या वस्तू पुजेत मानाच्या असतात त्या विकत आणतो. जसे की दिवाळीला लाह्या बत्तासे हवेच असतात. पाच बोळक्यात (गौरीहार) आधी लाह्या आणि त्यावर बत्तासा ठेवतात. बत्तासा मला फार आवडतो. एकतर तो इतर साखरेच्या पदार्थाप्रमाणे दाताला चिकटून बसत नाही. जिभेवर आणून थोडा दाब दिला की चुरकन विरघळतो.

photo 1_2.JPG

मला ह्यावेळी बोळके आणायचे लक्षात राहिले नाही. एकदा दोनदा दिसले होते पण मीच विकत घ्यायचे टाळले. शेवटी पणत्या विकत घेताना बोळके शिल्लक राहिलेच नव्हते. म्हणून मी केळीचे एक पान एका चिनी काकूच्या अंगणातून आणले. ती दोरीवर कपडे लावत होती आणि तिच्यासमोर मी तिला न विचारता एक पान घेतले. तिने काहिच म्हंटले नाही. मग मी चहासाठी गवतीचहाच्या दोन पाती देखील घेतल्या. तिने काहीच म्हंटले नाही. तिच्या बाजूला राहणार्‍या काकूंकडे नागलीचा वेल होता. मी हावरट होऊन २५ विड्याची पाने तोडून घेतली. तो वेल देखील इतका बहरला होता की पावसात मदमस्त न्ह्वाउन निघालेली ती वेल, पानाच्या टोकाटोकातून निथळणारे पाणी बघून माझी हाव आणखीनच वाढली. मी विचार देखील केला नव्हता. एकाच ठिकाणी मला हव ते मिळेल. विड्याच्या पानाचा हिरवा रंग किंवा कोवळा पोपटी रंग मला फार आवडतो. त्या पानांना नखानी कुस्करुन सुवास ओढायला मला फार आवडत. फक्त मला पान खायला मुळीच आवडत नाही. आणि पिंका टाकतान कुणाला बघताना तर मुळीच च च नाही!!!!

तर आज मी केळीच्या पानांपासून पाच बोळके तयार केले. काल रात्रीच माझ्या डोक्यात विचार आला होता की आप्ण केळीच्या पानांना टुथपिक वापरुन द्रोण करु शकतो. त्यातच बत्ताशे लाह्या ठेवायच्या. पण घरात टुथपिकच नव्हते. दुर्वा मात्र होत्या. मी काही दुर्वाच्या टोकदार भागाचा उपयोग करुन केळीचे पानाला टाका मारला. एक एक द्रोण तयार होत केले. मलाही गम्मत वाटत गेली. मग त्यात लाह्या बत्ताशे घातले पण द्रोण मुळात त्रिकोणी होते म्हणून लवंडत होते. मी येताना किवीचे एक पनेट आणले होते. त्यातील किवी बाहेर काढून त्यात पाच द्रोण ठेवले. येताना रुक्मिनीच्या कुंपणावरुन तिची थोडी फुले खुडली. ती लाह्या बत्ताशावर ठेवली. पान कळ्यांची पणती समोर तेवली आणि एक फोटो काढून मायबोलिची आठवण आली...

photo 2_2.JPGphoto 4.JPG

विषय: 
प्रकार: 

छान वर्णन.
बी, अरे पण कुणाच्याही बागेतून काहीही घेताना विचारून घेत जा.

केळीचे एक पान एका चिनी काकूच्या अंगणातून आणले. ती दोरीवर कपडे लावत होती आणि तिच्यासमोर मी तिला न विचारता एक पान घेतले. तिने काहिच म्हंटले नाही. मग मी चहासाठी गवतीचहाच्या दोन पाती देखील घेतल्या. तिने काहीच म्हंटले नाही>>>>> काय हे! आपली पर्यायाने आपल्या देशाची प्रतिमा ,आपण खराब करतो हे लक्षात ठेवा.तसेही झाडे वाढवणार्‍यांसाठी अशी तोडणी क्लेश कारक असते.
काल छोटे झाडू पाहून तुमच्या लेखाची आठवण झाली.

देवकी मी इथे २० वर्षांपासून राहतो आणि रोज काकू मला येताजाताना बघतात त्यामुळे परिचयाची व्यक्ती म्हणून त्यांनी मला फुले घेऊ दिलीत. तू म्हणते आहेस ते मला पटते आहे आणि तशी मी खबरदारी नेमीच बाळगत असतो. मी स्वतः निगप्रेमी आहे. झाडांना हानी होणार नाही हे पाळतो.

:):)

छान लिहिलं आहेस.
ज्या दिवशी नरकचथुर्दशी असते त्या दिवशी ही लोक सगळी पुजाविधी करतात >>> दुसर्‍या दिवशी काही लोकांकडे गौरी पूजन असते त्यासाठी सवाष्णी दिवसबर काही खातपित नाहीत बोलत नाहीत आनि मध्यरात्री गौरीची पूजा करतात असं मला शेजारणीनं सांगितलं. तिच्या घरामध्ये मात्र अशी पूजा नसते.

दर अमावस्येला इथं सर्वसाधारणपण कोहळा फोडणं आणि नॉनव्हेज शिजवणं चालतं, दिवाळीच्याही दिवशी बहुतेकांकडे चिकन बिर्याणीचा बेत असतो. काहीजणांकडे मटण आणि मासे.

फराळामध्ये तमिळ लोकं बर्‍याचदा चकली (मुरूक्क्कू) तुक्कडा (शंकरपाळे) शेव आणि आतिरस (अनारसेसारखेच लागतात) बनवतात.

बी, किती हौस आहे तूला ! छान वाटलं हे सगळे बघून.
तामिळ लोक देवदिवाळी पण साजरी करतात ना ? आमचे शेजारी करतात. नेमका महिना लक्षात नाही माझ्या.

छान आहे लेख.

सिंगापूरमध्ये मस्त न विचारता इतकं डेरिंग. जरी ओळख असली तरी, अरे मी इथे नाही करत, अगदी सख्ख्या शेजाऱ्यांनापण विचारते फुले, पाने घेताना.