आताच्या आम्ही
फोटो बदलायची वेळ झाली बाबा... आता किती दिवस तोच फोटो दाखवाल... आता मीच बदलते फोटो.. हे घ्या...
ही इरा
ही राधा
आणि हे आमचे बाबा
फोटो बदलायची वेळ झाली बाबा... आता किती दिवस तोच फोटो दाखवाल... आता मीच बदलते फोटो.. हे घ्या...
ही इरा
ही राधा
आणि हे आमचे बाबा
ऐन वसंतात एका वेळी...
कार्यक्रमाची रुपरेषा साधारण अशी-
१. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सगळे आमच्या घरी या. दुपारचे जेवण, गप्पा करुन मग डीसीमध्ये जाता येईल.
२. डीसीत भटकून झाल्यावर रात्रीची खादाडी restaurant मध्ये बुकिन्ग करुन करता येईल, तिथेही गप्पा मारता येतील. वेगळ्या हॉलची गरज नाही.
३. शनिवारी मुक्काम करणार्यांना हॉटेलमध्ये रहायचे असेल त्यांना मध्यवर्ती ठिकाण सुचवता येईल. ज्यायोगे त्यांना दुसर्या दिवशीही डीसीत जाता येईल. तसे कळवा.
४. ज्यांना शनिवारीच परत जायचे आहे त्यांना जाता येईल.
गेल्या आठवड्यात झेंडा चित्रपट पाहिला..! एका पुनःस्थापित होउ इच्चिणार्या राजकीय नेत्याची छबी काळी करण्याचा प्रयत्न आहे असे वाटले. पण त्यात सामान्य कार्यकर्त्यांची जी घुसमट दाखवलीय...ती लाजवाब! प्रत्यक्ष अनुभवलेले असल्याने अगदी मनाला भिडले.
सगळे नेते सारखेच! कार्यकर्ते वापरुण घेणे अन सत्तेत सहभाग फक्त जवळच्या लोकांनाच देणे, हा एकजात धंदा! कार्यकर्त्यांना पण त्या वयात काही अक्कल नसते! नुसती मेंढरं, कुणी पण हाका.
शेवटी जेंव्हा नेत्याचे पण पाय मातीचेच आहेत, हे लक्षात येते, तोवर कार्यकर्त्याची माती झालेली असते!
सुमारे दोन-अडीच वर्षांपूर्वी मायबोली.कॉमशी व्यावसायिक संबंध जुळले आणि त्यानुसार आमच्या विहंग प्रकाशन संस्थेची पुस्तकं या वेबसाईटवरून उपलब्ध झाली. मराठी पुस्तकांची सर्वप्रथम ऑनलाईन विक्री करण्याचं श्रेय बहुधा याच वेबसाईटकडे जातं.
ही ह्या कविते(?)ची प्रेरणा!
हे हटकेश्वरा, कंपूशेठ फलकाण्या, हिरवट फोकनाडेश्वरी माते आणि
बाराहून खास भगतगणाला, उदा: डोंमकावळ्याला भेटायला आलेल्या सरकोजीदेवा...
तुम्हाला चांगलच माहिती आहे
मायबोलीवर काय चाल्लंय ते
तरीपण.....
आमचा बाप काडेल आणि मायबोलीचा व्यसनी
ID अजून शाबूत आहे.
नाहीतर कधीच 'अंतू' आणि 'हवालदार'सारखा
पार्श्वभागावर हाणल्या जाऊन गचकला असता.
बापाचा मायबोलीवर लई जीव!
इतका, की हापिसात कामचुकार्या करून
आणि घरी मायपासून चोरून लपून मायबोलीवर टवाळक्या कराव्या.
"देव एक आहे आणि त्याच्यापर्यंत जाण्याचे मार्ग अनेक आहे" असं जे म्हटलं जातं त्याचप्रमाणे मायबोलीवरील लेखन एक (तेच) आहे आणि त्यापर्यंत पोचण्यासाठी अनेक मार्ग आहेत. 
तर हे जे अनेक मार्ग आहेत त्यापैकी तुम्ही कुठला पर्याय वापरता? इतर मार्गांची तुम्हाला माहिती आहे का? मायबोलीवर येताना कींवा आल्यावर तुम्ही प्रथम कुठला दुवा बघता. जुने लेखन कसे शोधता? मायबोलीवर दरवेळी आल्यावर नवीन लेखन्/प्रतिसादासाठी सर्वप्रथम तपासले जाणारे तुमचे काही ठरावीक दुवे आहेत का?
मालिबूला जाताना लागणारा समुद्र.
मालिबू टेंपल - बाहेरून
देवळामधील कलाकुसर..
राधा कृष्णाच्या मंदिरावरील शिल्पं..
तिसरीत आल्यापासून मी आणि मोरे शाळेत बरोबर जातो. मोरे माझ्याच वर्गात आहे, जवळच राहते. मोरेचं घर पण एका खोलीचं आहे पण ती वेगळीच आहे. ती खूप हसते. दंगा करते. आज शाळा सुटल्यावर मी आणि मोरे येत होतो. तर एक माणूस गाडीवर लाल रंगाची फळं विकत होता.
कोकऽऽम..!
कोकम? म्हणजे काय ..? मी विचारलं
अगं मस्त फळ आहे, तू खाल्लं नाहीस कधी? मी गाडीकडे बघतबघत 'नाही' अशी मान डोलावली
पुढे आल्यावर "नीलम" च्या दुकानाशी मोरे एकदम खूप हसायला लागली ती नेहमीच अशी खूपच हसते. मी पहातच राहीले
काय झालं? का हसतेस उगीच?
तीनी तीचा हात माझ्यासमोर धरला हातातला रुमाल उलगडला आणि त्यात कोकऽऽऽम..
भुकंपग्रस्त लोकांकरीता निधी उभारण्यासाठी माझ्या कार्यालयात 'चॅरीटी बझार' हा उपक्रम अलिकडेच राबविण्यात आला. आम्ही काही भारतीयांनी फार कष्ट आणि पैसे खर्च न करता जास्तीत जास्त निधी कसा उभारता येईल म्हणून भारतीय कलेचे प्रदर्शन भरविले. यातून ३००० सिंगापूर डॉलर अर्थात जवळ जवळ ९० हजार भारतीय रुपये मिळालेत. प्रत्येक १ $ मागे कंपनीकडून आणखी १ $ असे ऐकून ६०००$ निधीसाठी प्राप्त झालेत. हे सर्व कसे केले याचे हे सचित्रमय वर्णन.
