मला आवडते
झुंजुमुंजु पहाटे होणारी
तुझ्या बांगड्यांची किणकिण
आणि निरव रात्री
झोपेत होणारा
तुझ्या पैजणांचा आवाज
मला आवडतात तुझ्या
बनारसी रेशिम साडीवरचे
जरतारी सोनेरी बुंदके
आणि राजस्थानी ओढणीचे
नरम मुलायम चंदेरी काठ!
मला आवडतो
थंडगार काळ्या फरशीवर
उमटलेला तुझ्या
चारवेढी जोडव्यांचा ओरखडा
आणि मला आवडतो
तुझ्या हनुवटीवर गोंदलेला
पाच ठिपक्यांचा डाग हिरवा!
मला आवडते
तू रंगवलेल्या मधुबनी चित्रातले
पिवळसर हिरवपोपटी रान
आणि पदराआडून दिसणार्या
मीरेच्या चेहर्यावरील उत्कट भाव!
मला आवडते
तुझ्या नाकात टोचलेल्या
बेसरबिंदीची जांभळी झाक
आणि कानात घातलेल्या



