प्रसारमाध्यम

पुण्यातील फटाके (कल-माडी)

0

सुरेश कलमाडी यांची तिहार तुरुंगातून सुटका झाली व पुण्यातील त्यांच्या समर्थकांनी फटाके वाजवले. यावर गुन्हेगारांचे फटाके वाजवून स्वागत करणे पुण्याच्या संस्कृतीला शोभत नसल्याचे अजित पवारांनी जाहीर केले. त्यावर माणिकराव ठाकरे कसे गप्प बसतील? कलमाडींची बाजू घेत ते म्हणाले, ‘‘पद्मसिंग पाटलांच्या मांडीला मांडी लावून बसता हे चालते काय?’’ महाराष्ट्रातील मंत्री एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले व वाभाडे काढीत आहेत. भ्रष्टाचार व गुंडगिरीचे पुरावे देत आहेत. भ्रष्टाचार व गुन्हेगारीच्या विळख्यात अडकलेल्या मंत्र्यांच्या हाती सत्ता असणे हाच महाराष्ट्रात ‘गुंडा’राज सुरू असल्याचा पुरावा आहे.

पत्रकारदिनाच्या शुभेच्छा!

0

परवा साधना साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक विनोद शिरसाट यांनी विचारलं... तू बारा वर्षं वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकारिता केलीस, सगळ्यात जास्त कुठे काम करायला आवडलं?

चांगले दृकश्राव्य कार्यक्रम

0

काय लिहीणे अपेक्षित आहे
- आंतरजालावर असलेले उत्तम दृकश्राव्य, किंवा श्राव्य कार्यक्रमांचे दुवे

'देऊळ' - स्पर्धा निकाल

0

४ नोव्हेंबर, २०११ रोजी 'देऊळ' हा मराठी चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होतो आहे. मायबोलीने माध्यम प्रायोजकत्व स्वीकारलेला हा पहिलाच चित्रपट. यानिमित्ताने मायबोलीवर काही मजेदार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या नव्या उपक्रमाला मायबोलीकरांचा नेहमीप्रमाणेच उत्तम प्रतिसाद लाभला. त्याबद्दल सर्व मायबोलीकरांचे आभार!

स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे :-

मोहमद रफी - विसरलेले सोनेरी पान

0
Average: 1 (1 vote)

मोहमद रफी या नावाची महत्ता सांगायची खरे तर गरज नाही. पण तरीही....

सध्याचे टीवी वरचे संगीत विषयक कार्यक्रम, किंवा स्पर्धा, इंटरनेट व इतर माध्यमामदले चित्रपट संगीत विषयी लेख या सर्व मध्ये रफी साहेबांचा अनुल्लेख आढळून येतो.
इंटरनेट वरती शोध घेतला तर रफी साहेबांविषयीची माहिती , लेख अथवा कौतुक इतर गायक गायिकांच्या तुलनेमध्ये कमी प्रमाणात आढळते.

मग गुगलवर मराठीच का नाही?

0

गुगलने गुजराती पासून कन्नड पर्यंत भाषांच्या भाषातराची सोय केली आहे पण त्यातून मराठीला वगळण्यात आले आहे. याविरुद्ध दाद मागण्यासाठी भरत गोठोसकर यांनी एक ऑनलाईन याचिका बनवली आहे. याद्वारे किमान काही आवाज तरी निर्माण होईल अशी आशा आहे.

आपल्या लेखात भरत म्हणतात, 'भारतीय भाषांमध्ये प्रथम हिंदीला २००८ साली या सेवेत समाविष्ट करण्यात आले. या देशातील अन्य भाषांना यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागली. आता गुगलने उर्दू, बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड व गुजराती या भाषांनाही सामील करून घेतले आहे. मराठी मात्र वळचणीला टाकली आहे!'

माहिती अधिकार कायदा

0

साधारणपणे साडेचार वर्षांपूर्वी हा कायदा अस्तित्वात आला. या कायद्याकडून खूप अपेक्षा बाळगणारे कार्यकर्ते अजूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्यासंबंधी कंठशोष करत आहेत. कायद्यातील तरतुदींप्रमाणे, एखाद्या अधिका-याला निलंबित करण्यात आल्याचे, वा दंड भरावा लागल्याचे उदाहरण शोधू पाहता क्वचितच सापडेल! या कायद्याचा प्रसार करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. तरीही त्यावर अत्यल्प खर्च केला जातो. फीपोटी जेवढी रक्कम जमा केली जाते, तेवढीही खर्च केली जात नाही ही वस्तुस्थिती आहे.

जाहिरातींचे भाषांतर

माझ्याकडे एका जाहिरातीच्या भाषांतराचे काम येउ घातलेय. त्यांनी काय चार्जेस घ्याल असं विचारलय. मला या अशा स्वरुपाच्या कामाचे काय चार्जेस असतात काहिच माहिती नाही . कोणी सांगू शकाल? मला साधारण अंदाज दिला तरी चालेल.

एक भेट टॉड बेअरशी

0

बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा केनियामध्ये जाऊन एका रिपोर्टरने त्यांच्या कुटुंबियांच्या संदर्भातली बातमी केली होती... ही बातमी अल जझीरा (इंग्लिश)च्या माध्यमातून प्रसिद्ध झाली आणि मग सीएनएन या वृत्तवाहिनीने या वार्ताहराला शोधलं... टॉड बेअर त्याचं नाव... अल जझीरा या कतारच्या वाहिनीचा तो मध्यपूर्व देशांचा प्रतिनिधी होता... मग त्याने पुण्यात साम टीव्ही, सीएनएन आयबीएन या चॅनल्सच्या वार्ताहरांना प्रशिक्षण दिलं. त्याची भेट मागच्याच आठवड्यात प्रहारच्या ऑफिसमध्ये झाली आणि ते दोन दिवस आम्ही दोघे एकत्र होतो... त्याच्याशी संवाद साधणं म्हणजे एक नवीनच जग उलगडल्यासारखं वाटलं...

शेतकरी संघटक - वर्धापनदिनाच्या निमित्ताने

0

शेतकरी संघटक - वर्धापनदिनाच्या निमित्ताने

ही गोष्ट आहे १९८६-८७ च्या सुमारातली. सुरेश चोपडे सकाळी ६ च्या सुमारास माझ्या वर्धेतील खोलीवर आला आणि आल्याआल्याच अगदी दारावरूनच हुकूम सोडला.