अवांतर

झांबिया आणि केनिया - थरारक आणि जंगली!

Submitted by स्वीट टॉकर on 21 June, 2017 - 02:02

मी आणि स्वीट टॉकरीणबाई नुकतेच झांबिया आणि केनियाचा दोन आठवड्यांचा फेरफटका मारून आलो.

कड्यावरून खाली उडी मारणे वगैरे अतिशहाणपणाच्या गोष्टी केल्या. तिथल्या प्राण्यांबद्दल तर विचारायलाच नको. व्हीडियो आणि फोटो बरेच घेतले. त्यांना कॉमेंटरी देऊन एक डॉक्युमेंटरी फीत तयार केली आणि तू-नळीवर टाकली आहे.

अर्ध्या तासाची आहे.

लिंक

https://youtu.be/hH_B7_NtvJ4

आठवणींच्या हिंदोळ्यावर! (पुरवणी लेख)

Submitted by सचिन काळे on 19 June, 2017 - 08:17

मला बऱ्याच वाचकांकडून मी जुन्या मुंबईचे लिहिलेले वर्णन कोणत्या सालातील आहे, याची विचारणा होत होती. मी आपणांस सांगू इच्छितो, की हे सर्व वर्णन अंदाजे १९७५-७७ सालाच्या दरम्यानचे आहे.

हे सांगण्याकरिता मी मूळ धाग्यावर उत्साहाने प्रतिसाद लिहावयास सुरवात केली. पण माझा प्रतिसादच एवढा मोठा झाला, की मला त्याचा हा पुरवणी धागा काढण्याचा विचार करावा लागला.

विषय: 
शब्दखुणा: 

दहीहंडीच्या निमित्ताने

Submitted by मिरिंडा on 19 June, 2017 - 04:20

लवकरच कालाष्टमीला दहीहंडी बांधली जाईल. त्या निमि त्ताने माझे विचार मांडीत आहे. आपले मतही द्यावे.

आठवणींच्या हिंदोळ्यावर! अर्थात, ये है मुंबई मेरी जान!

Submitted by सचिन काळे on 18 June, 2017 - 03:16

माझी बालपणीची पंचवीसएक वर्षे मुंबईत गेली. आता नोकरी आणि वास्तव्य उपनगरात असल्याने वाट वाकडी करून मुंबईत जाणे सहसा होत नाही. बऱ्याच वर्षांनी काल सकाळी काही कामानिमित्त कुर्ला ते कफ परेड येथे बसने दीड दोन तासाचा प्रवास करणे झाले. प्रवास मेनरोडवर सायन, दादर, भायखळा, सीएसटी असा सरळसोट होता. बसचा लांबचा प्रवास असल्याने मी मस्त खिडकितली जागा पटकावली होती.

शब्दखुणा: 

सद्य परिस्थीतीत अमेरिकेत स्थलांतर करावे का ?

Submitted by किट्टु on 17 June, 2017 - 22:30

मुलं हाय्स्कुल ल गेल्यावर अमेरिकेत स्थलांतर करावे का... मुलांना अभ्यासात काय अड्चणी येउ शक्तिल आणि ते शाळेत अडजस्ट होउ शकतील का...
कुणाला अनुभव असेल तर कृपया सांगा....

एक वेदना

Submitted by र।हुल on 14 June, 2017 - 10:28

जाणिवपूर्वक प्रयत्न करूनही मला कधीच तुझ्या अंतरंगात डोकावता आलं नाही. मी कायम काठावरच राहीलो आणि काठावरचं जगणं म्हणजे वेदनाच! जर तु थोडंफार कधी मला समजून घेतलं असतंस तर..तर मीही तुला उमगलो असतो. कदाचित एकदम वेगळा भासलो असतो..अगदी तुला हवा तसाच. पण तु कधीच मला समजून घेतलं नाहीस. नेहेमी तु तुझ्याच कोषात मग्न होतीस. तु कसला हट्ट धरावा आणि मी तो पुर्ण करावा असं कधीच घडलं नाही. खुप वाटायचं की तुझे हट्ट पुरवून तुझे 'लाड' करावेत, तुझा रूसवा काढावा, कधी तुझ्यावरच ओरडावं तर कधी शांतपणं नुसतं तुलाच ऐकत रहावं पण..पण आता सगळंच संपलय गं.

श्रीलंका : लुनुगंगा इस्टेट : आर्किटेक्ट जेफ्री बावा यांचे विकांत घर

Submitted by निरु on 10 June, 2017 - 16:21

श्रीलंका : लुनुगंगा इस्टेट : आर्किटेक्ट जेफ्री बावा यांचे विकांत घर...
(Srilanka : Lunuganga Estate, The Weekend Cottage of Architect Geofferrey Bawa)

मुखपृष्ठ :

“कार" पुराण भाग-1

Submitted by भागवत on 4 June, 2017 - 09:46

मध्यमवर्गीय लोकांना एखादी वस्तु खरेदी करताना तिचे फायदे आणि तोटे स्वत: जाणून घेतल्या शिवाय करमत नाही. मला एखादी वस्तू घेताना चांगला सल्ला दिला तरी मी माझी पडताळणी करतो आणि वस्तु का चांगली यांची शहानिशा करतो. वस्तुचे विशेष गुण आणि मूल्य आपल्याला अंदाजपत्रकात बसतेय का ह्याची सुद्धा गुण पडताळणी करणे गरजेची असते. अश्या प्रकारे कधी-कधी २ वस्तु पैकी एक खरेदी करताना खुप सावळा गोंधळ उडतो. वस्तुचे एखादे गुण विशेष आपल्या गरजेचे आहे का ऐषाआरामा साठी आहे हे ठरवताना गोंधळ उडतो.

विषय: 
शब्दखुणा: 

कथुकल्या १०

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 3 June, 2017 - 06:12

१. अपघात

रात्रीचे अकरा वाजले होते. अशोक पानसे त्याच्या अंधाऱ्या बेडरुममध्ये बसलेला. झोपणे तर दूर, गेल्या एक तासापासून तो जागचा हललाही नव्हता. तो अॅक्सीडंट राहून राहून त्याच्या नजरेसमोर येत होता.

सिग्नलचा दिवा लाल झाला पण तो घाईगडबडीत होता, दिव्याकडे लक्ष न देता त्याने गाडी सुसाट पुढे पळवली. त्याच्या उजव्या बाजूचा सिग्नल केशरी झाला. पुढच्याच क्षणाला वाहनांचा लोंढा अन त्याच्या अग्रभागी असलेला बाईकवाला वेगात समोर आला. ब्रेक दाबायचं कुणालाच जमलं नाही. धडक बसली अन बाईकवाला दूरवर फेकला गेला.

Pages

Subscribe to RSS - अवांतर