स्वतःकडे स्त्री वा पुरूष असूनही लिंगनिरपेक्ष पाहता येते का? ते शक्य असते का? असेच समोरच्याकडे पाहता येते का? अशी मैत्री असू शकते का?या सगळ्याला घेऊन आपण एक 'लिंगनिरपेक्ष मैत्री-अस्तित्व' या विषयाकडे विविध अंगांनी बघायचा प्रयत्न करूया. हा परिसंवाद-विशेषांक असल्याने अंकामधे प्रामुख्याने आपल्या विचारांवर/ अनुभवांवर/ अभ्यासावर आधारित लेख अपेक्षित आहेत.
जगभरात विखुरलेल्या अनेक मायबोलीकरांच्या सहभागाने ’मायबोली शीर्षकगीत’ संगीतबद्ध करणं हा उपक्रम म्हणजे एक फार मोठं आव्हान. एक सुंदर कलाकृती निर्माण करायची हे सर्वांचं ध्येय.कला, तंत्रज्ञान आणि मायबोलीकरांनी ’आपल्या मायबोलीचा उपक्रम’ यशस्वी करण्यासाठी आत्मीयतेने घेतलेली मेहनत; अशा त्रिवेणी संगमातून एक सृजनसोहळा सांघिकरीत्या घडतोय.
येत्या २६ जानेवारीला ’जन गण मन’ हा श्री. नंदू माधव यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट प्रदर्शित होतो आहे. रामचंद्र सोनटक्के नामक एका ध्येयवादी शिक्षकाची भूमिका त्यांनी या चित्रपटात साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या कारकिर्दीविषयी, आणि सामाजिक कार्यासंबंधी जाणून घेण्यासाठी केलेली ही बातचीत...
मित्र आणि आप्तेष्टांबरोबर अलिबागच्या किनाऱ्यावरुन २०११ला निरोप देताना सर्व वर्ष झर्रकन् डोळ्यासमोरून गेले. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने, आशिर्वादाने २०१२ तेवढेच यशस्वी आणि आनंददायी घालवू या. १४ तारखेला मकर संक्रांत. दिवाळीनंतर २ महिन्यांच्या ब्रेकनंतर उत्तर अमेरिकेतल्या विविध मंडळांत संक्रांत साजरी होईल. तुमच्या आमच्यातला स्नेह तिळातिळाने वृध्दिंगत व्हावा हीच संक्रांतीनिमित्त शुभेच्छा.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.
यंदा पंचविशीत पदार्पण करणारं 'चिन्ह' हे मराठी कलावार्षिक चित्रकला आणि तिच्याशी संबंधित दृश्यकलांना केंद्रस्थानी ठेवून निघतं. मात्र चित्रकलेचा सर्वांगानी वेध घेणे इतकाच मर्यादित हेतू 'चिन्ह'चा निश्चितच नाही. 'नग्नता - चित्रातली आणि मनातली' या विशेषांकाच्या संपादनाची जबाबदारी घेतलेल्या शर्मिला फडके यांनी या अंकात हा अंक काढण्यामागची 'चिन्ह'ची भूमिका मांडली आहे
लहानपणी शुभंकरोती म्हणताना आपण काही काही स्तोत्रे, श्लोक म्हणत असू. आपल्या ऋषी-मुनींनी तपसाधना करुन अनेक स्तोत्रे, स्तवने सिद्ध केली आहेत. त्यातील काही आपल्या नित्य पठणात असतात तर काही तात्कालीक कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात.
आणि मग एवढ्या माहितीच्या आधारे अनेक वधुपिते त्या स्थळाच्या मागे लागतात. भराभर सोयीच्या तारखांना भेटीगाठी ठरविल्या जातात, चट मंगनी पट ब्याह होतो, नवरा-नवरी परदेशी त्यांच्या घरी रवाना होतात, किंवा नवरा अगोदर जातो - नवरी काही कालाने व्हिसा वगैरे औपचारिकता पूर्ण करून मग जाते. सारे काही आलबेल होते. पण ते तसे खरेच होते का?
गझल परिचय यात गझलेबाबत एक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न आहे व त्याबरोबरच संपूर्ण गझल तंत्र, मात्रा कशा मोजाव्यात, सुटी कोणत्या घ्याव्यात, विविध वृत्ते कोणती, ती कशी योजावीत हे सोदाहरण लिहीलेले आहे.
मायबोलीवरील छोट्या जाहिराती काही काळासाठी बंद होत्या. तो विभाग आता पुन्हा सुरू झाला आहे.
या दुव्यावर तुम्हाला जाहिराती पहता येतील. http://jahirati.maayboli.com/