बस्के यांचे रंगीबेरंगी पान

ल्हानपण देगा देवा !

साधारण महिन्याभरापुर्वी पूर्वीचे दिवस आठवताना केलेले हे असंबद्ध लिखाण. असे म्हणण्याचे कारण, कितीतरी विषयांवरून कोलांट्या उड्या मारल्या आहेत मी.. स्मित

आज मी खरंतर कम्प्लीट वेगळ्या विषयावर लिहायला बसले होते. पॅशन्स, आवडीनिवडी , माझी नाटकं, ऍक्टींग, डान्स, बॅडमिंटन, थ्रोबॉल.. हे सगळं आठवता शाळा आठवली.. मग अर्थातच माझे लहानपण असा आवडता विचार सुरू झाला.. मनातल्या मनात विचार करायचा कंटाळा आला, एकट्यानेच किती बडबडायचे ना? त्यामुळे म्हटलं (खोटा/व्हर्चुअल का असेना) कागद बराय. निदान मोनोलॉगच्या ऐवजी डायलॉग्स होतायत असे तरी वाटेल.

गुलाब

माझ्या बागेतील गुलाबाची फुलं/कळ्या..

याच फुलाचा कळी असताना फोटो काढला होता. तो मिळाला आत्ता.

आह .. साझ !

Wow !! मला काय लिहावं सुद्धा सुचत नाहीये ! भयंकर आनंद झालाय! गेली कित्येक वर्षं मी शोधत असलेल्या सई परांजपेच्या ’साझ’ पिक्चरची गाणी निदान युट्युबवर का होईना सापडली!
आत्ता तेच वाजतंय - क्या तुमने है कहे दिया.. क्या मैने है सुन लिया.. तुम ही कहो, अब मै कहू.. क्या!

श्री वेंकटेश्वरा स्वामी देऊळ - मालिबू

मालिबूला जाताना लागणारा समुद्र.
IMG_8107.JPG

मालिबू टेंपल - बाहेरून
IMG_8135.JPG

देवळामधील कलाकुसर..
IMG_8142.JPG

IMG_8143.JPG

राधा कृष्णाच्या मंदिरावरील शिल्पं..
IMG_8144.JPG

तो पाऊस .. हा पाऊस ..

फार सुंदर, अप्रतिम, संततधार, मुसळधार, धोधो वगैरे पाऊस पडतोय.
रवीवारपासून शुक्रवार पर्यंत.
रस्त्यावर तळी साचली आहेत..
जस्ट पुण्यातून परतल्यामुळे मला होमसिक वाटू नये म्हणूनच की काय असा पाऊस पडतोय.

मी .. खिडकीपाशी बसून ते सर्व पाहतीय.. गेले ३ दिवस.. आणि पाहीन पुढील ३ दिवस..

पाऊस.. !

का मला वेड लागतं पाऊस पाहून काही कळत नाही!
माझ्या जीटॉकवर असणार्‍यांनी नक्कीच जानेवारीच्या सुमारास its raining! हे स्टेटस पाहीले असेल ! स्मित)
आता त्यात काय नाचायचे? पण होतो आनंद..

|| श्री ||

खूप दिवस..
चांगल्या दिवसाची वाट पाहीली.
बेसिकली काहीतरी चांगलं लेखन सुचायची वाट पाहीली !

पण काहीच सुचेना.
आणि राहवेना सुद्धा.
त्यामुळे असेच बिना मुहुर्तावर , बिना लेखनाने माझ्या रंगीबेरंगी पानाची सुरवात करते.

"मायबोली गणेशोत्सव २००९ " मध्ये असलेल्या संयोजन समितीमधील सहभागामुळे , मायबोलीकडून मिळालेली ही प्रेमाची भेट मी खूप आनंदाने स्विकारत आहे! स्मित
त्याचबरोबर इथे लिहीण्यासाठी खरंच उत्तमोत्तम काही सुचुदे ही त्या गणरायापाशी प्रार्थना!

!! गणपती बाप्पा मोरया !!