(स्मितागद्रे यांनी टाकलेली क्लेपासून बनवलेल्या सांताक्लॉजची प्रकाशचित्रं बघितल्यावर आम्हालापण स्फुरण चढले!
आकाराचा अंदाज येण्यासाठी - डोळे मंगळसूत्रात असतात त्या मण्यांच्या आकाराचे आहेत.)
(स्मितागद्रे यांनी टाकलेली क्लेपासून बनवलेल्या सांताक्लॉजची प्रकाशचित्रं बघितल्यावर आम्हालापण स्फुरण चढले!
आकाराचा अंदाज येण्यासाठी - डोळे मंगळसूत्रात असतात त्या मण्यांच्या आकाराचे आहेत.)
गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीपण शाळेतून फॅन्सी ड्रेसची नोट आली होती. गेल्या वर्षीच्या अनुभवामूळे यावेळी मी स्वतःच जरा आधी काय काय बनवता येईल याची कल्पना घेतली होती. शाळेतली एक महत्वाची अट नाताळाच्या संदर्भातलीच वेशभुषा असावी अशी होती.
एल्फ, सँटा, ख्रिसमस ट्री, ख्रिसमस बेल असे काही पर्याय मुलाला दिले आणि नेटवर त्यांची चित्रं दाखवली तर त्याने आधी मला रावण बनायचंय असं सांगितलं.
मग सँटा आणि सर्वात शेवटी एल्फ बनूंगा असं उत्तर मिळालं. (वर्गात दरवर्षी बरेच सॅन्टाक्लॉज येत असतात म्हणून एल्फच बन हे मला खूप वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगावं लागलं. )
समर सेमिस्टर मध्ये जे क्रिस्टलाइन ग्लेझेस बद्दल काम करायला आम्हाला शिकवले तेच या फॉल सेम मध्ये स्वतःहून पुढे चालू ठेवायचे असे मी ठरवले होते. खर तर हे इतके जास्त वेळखाऊ काम होते की क्लास करतांना मी परत हे कधी करायला घेईन असे वाटले नव्हते. खर तर I never realized that I was actually addicted to crystalline glazes.
फॉल सेम मध्ये मी खर तर पाण्याचे जग/ चहाची किटली इ. (pouring vessels) क्लासमध्ये नाव घातले होते. ह्या क्लासच्या सगळ्या असाइनमेंट्स पूर्ण केल्यावर उरलेल्या वेळात क्रिस्टलाइन ग्लेझ करायचे असतील तर परवानगी मिळेल असे सरांनी सांगितले.
बांबूच्या चोयट्यांपासून करायच्या चौकोनी आकाश कंदीलाची कृती...
१८ इंच लांबीच्या बांबूच्या चार चोयट्या.. १० इंच लांबीच्या बांबूच्या ३२ चोयट्या.. निरनिराळ्या रंगाचा पतंगाचा कागद, फेव्हीकोल आणि भरपूर दोरा,
सगळ्या चोयट्या छोट्या सुरीने किंवा खोरपेपरने साफ करुन घ्याव्यात.
१८ इंची चोयट्या उभ्या वापरायच्या आहेत तर १० इंची आडव्या...
प्रत्येक कोपर्यापाशी तीन किंवा चार काड्या एकत्र येणार आहेत.
पहिल्यांदा १० इंच लांबीच्या चोयट्या वापरुन चार चौरस तयार करुन घ्यावेत. ह्या चौरसांच्या एका कोपर्यात एक १८ इंची काडी लावायची आहेत... अश्या चार कोपर्यात चार काड्या एका चौकोनाला लावाव्यात.
मल्टिपर्पझ होल्डरः चार्जिंग सुरू असताना मोबाईल ठेवता येतो. कागदपत्र तसेच इतर काही ठेवण्यासाठी.


मॅगझिन/ पेपर होल्डर

हे पाऊच संक्रांतीच्या वाणासाठी बनवले होते. त्याच्यावरचे काचकाम पण घरीच केले आणि पाऊच सुद्धा घरीच बनवले. एकूण ४० पाऊच बनवण्यासाठी ३ दिवस लागले होते.


भाचीच्या रुखवदासाठी हि उतरंड ओळखीच्या कुंभाराकडून बनवून घेतली व घरी रंगवली. (प्रेरणा अर्थातच रूनीकडून)

टेलिफोन मॅट

की होल्डर प्रकार १

की होल्डर प्रकार २

आरसा प्रकार १

आरसा प्रकार २
रविवारच्या बालरंगमध्ये वाचल्यापासून लेकीला त्यातील जाड दोर्यांचा द्विमिती बाप्पा बनवायचा होता. त्यात स्कूलमध्येपण क्राफ्ट प्रोजेक्ट्साठी दोन ग्रीटिंग कार्ड बनवून आणायला सांगितले.
मग काय काम सूरू.
साहित्य--- हँड्मेड किंवा कार्ड्बोर्ड पेपर, ग्लू, पेन्सिल, जाड दोरा, कात्री.

नाव - श्रेयान
वय - ६.५
श्रेयान ला मिकीमाउस खूप आवडतो. आणि बाप्पांचा पण माउस असतो म्हणून त्याने हे चित्र काढ्लेय.
मन लाउन काम चालू आहे

आता रंगकाम

आणि हे झालं चित्र पूर्ण