मृण्मयी यांचे रंगीबेरंगी पान

रंगसंगती

"आल्या आल्या चित्रे बाई आल्या!!!"
शारदा ओरडली आणि अख्खा वर्ग चिडीचुप्प झाला. मग आमचं सगळ्यांचं एकमेकींकडे बघून गालातल्या गालात हसणं सुरु झालं.
"बबे, ओळख आज बाईंनी कुठल्या रंगाची साडी, ब्लाउज आणि परकर घातला असेल!" शारदानी हळूच विचारलं. पण बबीच्या उत्तरा आधीच बाई वर्गात आल्या आणि आमचं नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या अत्यंत विसंगत रंगसंगतीकडे निरखून बघणं सुरु झालं.
चित्रे बाई आम्हाला ईंग्रजी शिकवायच्या. कायम हसत असायच्या. बरंच गमतीदार बोलायच्या आणि दर तासाच्या शेवटी, "काय पण दात काढता गं तुम्ही.. अचरट कार्ट्या!!!" असं काहीसं बोलून वर्गाबाहेर पडायच्या.

ओढ

विमान क्रूजिंग अल्टिट्यूडला पोचलं असावं. डोळे किलकिले केले तेव्हा केबिन क्रू खाण्या-पिण्याच्या गाड्या घेऊन फिरताना दिसला. शेजारच्या सीटेवर एक बर्‍याच वयस्कर बाई बसल्या होत्या. एअर होस्टेस आमच्या रांगेजवळ आली होती.
"मिस थाँम्सन, कॉफी हवीय का आणखी?"
नावाने प्रवाशाला बोलवून विचारणं झालं म्हणजे ओळखीची किंवा प्रसिध्द व्यक्ती असली पाहिजे. मी मनातल्या मनात.
"तुम्ही काय पिणार?" बाईंच्या कपात कॉफी ओतून, तिनं मला विचारलं. मी तोवर पुन्हा डोळे मिटले होते.
"थकलेला दिस्तोय. झोपू दे." माझ्या वतीनं बाईंनी सांगून टाकलं, सुंदरी पुढे गेली. मी पुन्हा मनातल्यामनात त्यांचे आभार मानले.

आमालाबी चित्तरगाणी व्हताना...

मायबोलीवर नवनव्या क्लुप्त्या काढून फोटो डकवायची स्टाईल आहे. वरिजिनल आयड्या येण्याइतके आम्ही हुषार नाही, पण आम्हालाबी चित्तरगाणी व्हतात...

उगवला चंद्र पुनवेचा
उगवला चंद्र पुनवेचा !

मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा..॥
दाहि दिशा कशा खुलल्या,
वनिवनी कुमुदिनी फुलल्या,
नववधु अधिर मनी जाहल्या
प्रणयरस हा चहुकडे वितळला स्वर्गिचा..॥

ugavalaa-chandra-punavechaa.JPG

__________

आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली
मजलाच हाय माझे जपता न भान आले

आमचा(बी) व्यसनी बाप

ही ह्या कविते(?)ची प्रेरणा!

हे हटकेश्वरा, कंपूशेठ फलकाण्या, हिरवट फोकनाडेश्वरी माते आणि
बाराहून खास भगतगणाला, उदा: डोंमकावळ्याला भेटायला आलेल्या सरकोजीदेवा...

तुम्हाला चांगलच माहिती आहे
मायबोलीवर काय चाल्लंय ते
तरीपण.....

आमचा बाप काडेल आणि मायबोलीचा व्यसनी
ID अजून शाबूत आहे.
नाहीतर कधीच 'अंतू' आणि 'हवालदार'सारखा
पार्श्वभागावर हाणल्या जाऊन गचकला असता.

बापाचा मायबोलीवर लई जीव!
इतका, की हापिसात कामचुकार्‍या करून
आणि घरी मायपासून चोरून लपून मायबोलीवर टवाळक्या कराव्या.

(हिंमत असेल तर), डोळ्यांत वाच माझ्या..

काल
आपल्या फस्टम् फस्ट रात्री
हे बटबटीत गोळे तुझ्या डोळ्यांचे
रोखून बघताना माझ्याकडे........
नको म्हंटलं तरी जातंच ना लक्ष
त्यांच्याकडे...!
दिसलंच मला त्यांच्यात प्रतिबिंब
तुझ्या मनातल्या भावांचं, धाकी पाडणार्‍या जरबेचं.
पटापटा मान वळवून ती नजर
टाळण्याचा मी केलेला तो आटोकाट प्रयत्न
कोणी असं करत नाही!
पण इतक्या रागावून अर्पित केलेली ती एक्सरे व्हिजन
मला पाहवलीच नाही बघ.
आणि मग निरखू लागलो मी
भिंतीवरची किडा पकडणारी पाल, गुणगुणणारे डास.
तुझ्या आयशॅडो थापलेल्या नेत्रांचे निखारे
वर खोट्या पापण्या डकवलेले..
बचाबच आयलायनर लावून वटारलेले!
मी हळूच चोरून बघतो तर काय..

ढुंकून कोण पाही

मुजरा अखेरचा हा
सोडून जात माबो*
वदलो जरी असे मी
ढुंकून कोण पाही........ ||१||

खरडून चार कविता
ललिते अणीक गोष्टी
रिझवावयास गेलो
ढुंकून कोण पाही........ ||२||

डोकावलो जरासा
वीचारपूस करण्या
पण ह्या वि. पू. त माझ्या
ढुंकून कोण पाही........ ||३||

तोंडलीभात ते तिरामिस्सु

"नऊ वाजत आलेत. पिझ्झा खाऊन पोरं निवांत आहेत. आता आपल्या जेवणाचं काय?" अचानक १५-२० माणसं एकत्र आली आणि वेळ छानच जात होता. फक्त स्वयंपाकघरात जाऊन खुडबुडायचा कंटाळा आला होता.

पिसारा

काल पार्ले बाफवर स्वातीची इंग्रजीतली एक अप्रतीम कविता वाचली आणि बर्‍याच वर्षांपूर्वी लिहिलेल्या साधारण तश्याच अर्थाच्या २-३ चारोळ्या आठवल्या. त्यातली एक.....

रंगाना विटून
त्यानं पिसारा जाळला..
कसं सांगू त्याला

Yes, I can!!!!!

निषाद ला ताय क्वॉन डो नामक कोरियन मार्शल आर्ट्स च्या ATA (American Tae-kwon-do Association) च्या नुकत्याच झालेल्या 'फॉल नॅशनल्समधे' 'स्पारिंग' आणि 'फॉर्म' ह्या दोन गटात पहिलं बक्षिस मिळालं.

चर

आजकाल काय झालंय कुणास ठाऊक, पण काही म्हणता काही कविता सुचंत नाहीत. फिदीफिदी (कोण ते 'बरंय! छळवाद कमी!!' म्हणालं?) कविता स्फुरावी म्हणून संत्र्याच्या झाडाखाली (सकाळ, दुपार आणि संध्याकाळ) बसून बघीतलं, पण ढीम्म!!! काय करावं?