चित्रपट

मी दक्षिणात्य चित्रपटांचा आस्वादक कसा बनलो ?

Submitted by ब्लू कोलंबसे on 21 April, 2024 - 04:01

२०१२ – मी तेलुगु गाण्याच्या प्रेमात पडलो. आणि प्रवास चालू झाला.

तेलुगू सिनेमा आणि मी !

मी 2012 मध्ये माझ्या मित्राच्या – ऋषिकेशच्या(धर्माबाद, नांदेड) – तेलूगु गाण्याच्या प्रेमाने ती अवीट गोडीची गाणी ऐकू लागलो. मग ती समजून घ्यावी, म्हणून ती भाषा (अगदी त्याला ‘तेलगू’ नव्हे, तर ‘तेलूगु’ असे म्हणावे इथून) त्याच्या मित्राकडून (त्याचे मुळ गाव – काकीनाडा, आंध्र प्रदेश) शिकू लागलो. तो मुलगा तीन महिन्यांसाठी सीए कोचिंगला पुण्यात आलेला.

कृष्णा कॉटेज

Submitted by संप्रति१ on 13 April, 2024 - 22:24

'कृष्णा कॉटेज'

सोहेल खान - मानव
ईशा कोप्पीकर - दिशा
अनिता रेड्डी - शांती
व्रजेश हीरजी- टल्ली
राज झुत्शी- लेखक ऊर्फ प्रोफेसर सिद्धार्थ दास

कट टू :
'कहीं अनकहीं बातें' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. पुस्तकाच्या लेखकानं थोर रशियन लेखक चेकॉव्ह यांच्यासारखी दाढी मिशा राखलेली आहे. भाषणात लेखक सांगतोय की सदर पुस्तकात साडेनऊ लव्ह स्टोऱ्या आहेत.

उरलेली अर्धी कोणती, ते आता या सिनेमाच्या माध्यमातून दाखवणार आहेत.‌

प्रत्यक्षासम प्रतिमा उत्कट :स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट

Submitted by प्राचीन on 29 March, 2024 - 09:35

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - रणदीपनं यशस्वीरीत्या पेललेलं आव्हान.
मी स्वातंत्र्योत्तर काळात जन्माला आल्यामुळे पारतंत्र्याच्या अनुभवातून होरपळून निघालेले नाही. तरीही बालभारतीच्या पुस्तकात वा इतिहासविषयक ग्रंथांत तत्कालीन भारताबद्दल वाचनात आलेलं. त्यामुळे स्वा. सावरकर हे नाव तेव्हापासून परिचित. मराठीच्या पुस्तकात 'माझी जन्मठेप' मधले एक- दोन प्रसंग होते. त्या संदर्भात पुढे मूळ पुस्तक वाचलं. 'काळे पाणी' व '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' अशी पुस्तकं वाचल्यानंतर मग वीर सावरकरांची लेखनशैली व एकंदर देशकार्य व तत्संबंधी लेखनाचा सूर आणखीन थोडा उमगत गेला.

'पुअर थिंग्ज्स' वयात येण्याची एक तिरपाकडी (परि)कथा

Submitted by अमितव on 19 March, 2024 - 10:33
पुअर थिंग्ज्स

पुअर थिंग्ज्स

विषय: 

शैतान चित्रपट

Submitted by प्रथमेश काटे on 16 March, 2024 - 10:04

चित्रपटाचे नाव - शैतान

दिग्दर्शक - विकास बहल
रिलीज डेट - ०८ मार्च २०२४

कलाकार :- अजय देवगण, आर माधवन, ज्योतिका, Janki Bodiwala

•••••

चित्रपट भाजणी

Submitted by रघू आचार्य on 28 February, 2024 - 08:48

कधी कधी कसलाही चित्रपट आवडत नाही. मग ठेवणीतल्या चित्रपटांचाच सहारा असतो.
लोक म्हणतात कि त्याची पिसं काढायची असतात. पण हे एक वेगळं मनोरंजन असतं.

तर मायबोलीवरच्या भट्ट्यांमधे खरपूस भाजले जाऊ शकणार्‍या चित्रपटांची चर्चा इथे करू. भाजावासा वाटला तर भट्टीत घालायचा.
दंगा होऊन जाऊ द्यात.

विषय: 

'ॲनिमल' (सुद्धा पाहणार नाहीत असा) ए सर्टिफिकेटचा बी ग्रेड चित्रपट

Submitted by अतुल. on 5 January, 2024 - 13:11

मजा तुम्ही एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला गेलात. तिथले अलिशान आणि भरगच्च वैभव पाहता पाहता तुम्ही जेवणाची ऑर्डर दिली. आणि वेटरने अगदी अदबीने तुम्हाला ताटातून आणून दिला गरमागरम वरणभात. कुबट वास येणारा भात आणि खारट वरण! घ्या. खा पोटभरून. कसे वाटेल? 'ॲनिमल' चित्रपट मल्टिप्लेक्सला पाहत असताना अगदी तसेच वाटते. हल्लीचे चित्रपट तांत्रिकदृष्ट्या खूप खूप पुढे गेलेलं आहेत. सिनेमॅटोग्राफी, ऑडीओ व्हिज्युअल तंत्रज्ञान इत्यादीचा झगमगाट असतो. अरे पण जे आम्ही बघायला जातो त्याचे काय? मनात रुंजी घालणारे संगीत, दीर्घकाळ स्मरणात राहणारे संवाद, दिग्दर्शनातले टॅलेन्ट.

शब्दखुणा: 

चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 

दृश्यावरून गाणे ओळखा - ५

Submitted by mi_anu on 2 January, 2024 - 23:37
Puzzle

(फोटो असाच उदाहरण म्हणून)
आधीच्या धाग्यावर प्रतिसाद मर्यादा उलटल्याने हा नवा धागा काढत आहे.
होऊन जाऊद्या सुरू!! लोकांना आपली अलौकिक प्रतिभा ओळखण्याची संधी द्या.जमिनीवरील माती, चेहरा झाकलेल्या दृश्यातील केसांचे वळण,मागची झाडे, समुद्रात जहाज,पडलेली अंगठी,नातेवाईकांवरून दिलेले क्लू यावरून गाणी ओळखण्याचा आत्मविश्वास आणि बुद्धीला धार करण्याची संधी द्या.

आधीचा भाग इथे आहे:
https://www.maayboli.com/node/77818

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - चित्रपट