प्लॅटफॉर्म नंबर झिरो - अमिता नायडू

'प्लॅटफॉर्म नंबर झिरो' हे रेल्वे स्टेशनावरच्या मुलांचं जीवन समोर आणणारं पुस्तक समकालीन प्रकाशनानं नुसतंच प्रसिद्ध केलं आहे. या मुलांसाठी, मुलांमध्ये गेली अनेक वर्षं काम करणार्‍या अमिता नायडू यांनी ते लिहिलं आहे. किशोर, जग्गू, अ‍ॅन्थनी, बिल्लू, झहीर, मुन्ना अशा कितीतरी मुलांच्या अस्वस्थ करून सोडणार्‍या कहाण्या या पुस्तकातून आपल्या समोर येतात.

तेंडुलकर स्मृतिदिन लेखमाला - समारोप

श्री. विजय तेंडुलकर - मराठी रंगभूमीला एक वेगळं वळण देणारे लेखक - यांचा प्रथम स्मृतिदिन १९ मे २००९ ला झाला. यानिमित्ताने त्यांचा नाटकांवर/व्यक्तिमत्वावर आधारित एक लेखमाला चालू करून पुढील वर्षभर जसं शक्य होइल तसं एक एक लेख प्रकाशित करण्याचं ठरवलं. आजच्या शेवटच्या लेखाने या लेखमालेचा समारोप करत आहोत.

८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

या संमेलनातील निवडक कार्यक्रमांची ध्वनिमुद्रणे इथे आपल्याला ऐकता येतील. महाबळेश्वर येथे पार पडलेल्या ८२व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री. कौतिकराव ठाले-पाटील यांनी केलेले भाषण खास आपल्यासाठी..

हितगुज दिवाळी अंक २०११

दिवाळीच्या दिवशी उटणी, अभ्यंगस्नान, फराळ, फटाके, आप्तेष्टांच्या/इष्टमित्रांच्या भेटीगाठी या सर्वांच्या बरोबरीने आपण उत्सुकतेने ज्याची वाट पाहता, तो 'हितगुज दिवाळी अंक २०११' आपल्यापुढे सहर्ष सादर करत आहोत.

मायबोली गणेशोत्सव २०११

गणेशोत्सवातील सर्व स्पर्धा-सांस्कृतिक कार्यक्रमांत उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल सर्व मायबोलीकरांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. तुमची मनमोकळी दाद-प्रतिसादच संयोजकांचा उत्साह वाढवत होते. परंपरेप्रमाणे हा गणेशोत्सव देखिल श्राव्य व लिखित सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरगच्च होता.

संवाद : गुरू ठाकूर

medium_gt.jpg एक उत्तम गीतकार, पटकथालेखक, संवादलेखक, व्यंगचित्रकार, छायाचित्रकार आणि अभिनेता - त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर 'कौतिक सांगू किती पठ्ठ्या बहुगुणी!' असलेल्या गुरु ठाकुरांशी थोड्या गप्पा मारू.

मराठी गझल कार्यशाळा -२

Gazal Karyashala 2008आमच्यासाठी गेला महिनाभर खूप आनंदात, एक प्रकारच्या भारलेल्या मनःस्थितीत गेला. आधी म्हटल्याप्रमाणे जर ते 'वेड' आम्ही तुम्हालाही लावू शकलो असू, तर तेच कार्यशाळेचं यश.

'उत्तम गज़ल लिहिता येणं' हे साध्य खरंच, पण ती लिहिताना आणि वाचतानाही तिचा सर्वांगीण आस्वाद घेता आला, तर तो प्रवास त्या मंज़िलइतकाच, नव्हे त्याहूनही सुंदर होतो. या आनंदयात्रेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!