मायबोली

मायबोली या संकेतस्थळाबद्दल माहिती

रंग नवा...

Submitted by शब्दवेडा दिपक लोखंडे on 28 April, 2017 - 12:55

रंग नवा स्पर्शाचा, रंग तुझ्या सूगंधाचा..

स्वप्न नवे पाहन्याचा, रंग तुझ्या स्मित हास्याचा..

धूंद तुझ्या प्रेमाची, बरसते वर्षा होऊनी..

चिंब होते मन माझे, भिजूनी तुझ्या रंगात..

रंग नवा आनंदाचा, रंग तूझ्या सहवासाचा..

मोहून जाई मन माझे, पाहता तूला सामिप येता..

कळे ना काही, बावऱ्या मनाला..

देशिल का गं? प्रेम थोड, माझ्या या वेडया जिवाला.....

.

https://manmajhesairat.wordpress.com/

पाळणा

Submitted by मीनल कुलकर्णी on 25 April, 2017 - 01:17

Hiii...मुलींसाठी लिहिलेला पाळणा...जेंव्हा मला मुलगी झाली तेंव्हा मी खूप शोधलं पण एकही खास मुलीसाठी लिहिलेला पाळणा मिळाला नाही....म्हणून राम आणि शिवाजीराजांचा पाळणा म्हणून लेकीला पाळण्यात घातलं....मात्र परवा भावाच्या मुलीसाठी पाळणा लिहायचा प्रयत्न केला ...तिचा हक्काचा पाळणा...पहिलाच प्रयत्न आहे...समजून घ्या...
- मीनल

प्रांत/गाव: 

मायबोलीचे नवीन सेवादात्याकडे स्थलांतर

Posted
22 April, 2017 - 15:30
शेवटचा प्रतिसाद
6 दिवस ago

मायबोलीचे नवीन सर्वरवर आणि नवीन सेवादात्याकडे स्थलांतर पूर्ण झाले आहे.

मायबोलीवरच्या सुविधांमधे (किंवा असलेल्या अडचणींमधे ) काहीच बदल झालेला नाही. सभासदांना काहीच बदल जाणवू नये अशी अपेक्षा आहे. काही कारणामुळे पाने नीट दिसत नसतील तर तुमच्या ब्राउझरची पाने ताजीतवानी करून घ्या.
जर काही नवीन अडचणी आल्या तर कृपया इथे लिहा म्हणजे त्यावर मार्ग काढता येईल.

विषय: 
प्रकार: 

मी शब्दवेडा - भाग 1

Submitted by शब्दवेडा दिपक लोखंडे on 22 April, 2017 - 11:49

भाग - 1

प्रत्येक माणसाचा जगण्याचा दष्टीकोन हा वेगवेगळा असतो.. आता उदाहरण म्हणून एक किस्सा सांगतो .....

 हि घटना आहे पाच वर्षा आधिची. आम्ही कॉलेजमध्ये होतो .. 12 वीचं वर्ष होतं.. अभ्यासाचा दबाव तर होताच... पण enjoyment full on. चालु  होत... 

तसा आमचा गृप पुर्ण कॉलेजमधे गाजलेला होता.. सगळ्याच बाबतीत आमचा गृप पुढे  असायचा..  शक्यतो सगळ्यांचा स्वभाव सारखांच.. पण कोमल !!..

जल............ नीर, तोय, उदक...........जीवन

Submitted by अंबज्ञ on 21 April, 2017 - 01:11

पाणी हेच जीवन .... ही गोष्ट आपण शाळेत शिकलेली व पुढे आयुष्यात पदोपदी अनुभवलेली आहे. निसर्गाने प्रत्येक सजीवास जीवन जगण्यासाठी उचित प्रमाणात अन्न पाणी नेहमीच उपलब्ध ठेवलेले आहे. नैसर्गिक अन्न साखळीतील मानवी हस्तक्षेपाने आज आपल्याला पाणी टंचाई जाणवते.

घोर हा घनघोर आहे!

Submitted by सत्यजित... on 20 April, 2017 - 23:08

चोर तर आहेच वर शिरजोर आहे
काळजाचा घोर हा घनघोर आहे!

जाळतो आहे जिवाला रोज थोडे
पावसाचा जोर या कमजोर आहे!

ऐन दुःखाचा पसारा मांडला मी
वाह् वा झाली,म्हणाले..जोर आहे!

तू नको जावूस माझ्या शांततेवर
वेदने,मी वादळाचा पोर आहे!

जिंदगी एकाच दुःखावर उधळली
मी हिशोबी,फार काटेकोर आहे!

वाचण्याआधीच हे लक्षात घे तू
मी कुणी नाही कवी,चितचोर आहे!

—सत्यजित

तडा गेलाच आहे तर...

Submitted by सत्यजित... on 16 April, 2017 - 21:07

नका बांधू चौकटींनो मला उधळून जावू द्या
तडा गेलाच आहे तर मला निखळून जावू द्या!

नको ते रोजचे बघणे मुखवट्याआडचे मुखडे
मुलामा वाटतो पारा,पुरा निथळून जावू द्या!

घन्या अंधारल्या वेळी तरी द्या हाक स्वप्नांनो
पहाटे काफिला तुमचा मला वगळून जावू द्या!

अशा बेरंग अश्रूंच्या कुठे उरती खुणा मागे?
गुलाबी रंग प्रेमाचा तरी मिसळून जावू द्या!

मलाही वाटते आहे तशी माझीच प्रतिमा ती
म्हणाली पेटले आहे..अता उजळून जावू द्या!

नको अश्रू,नको सुमने,नका श्रद्धांजली वाहू
ऱ्हदय असलेच तर त्याला जरा ढवळून जावू द्या!

‘पश्चिम’चा प्रवास (भाग-२)

Submitted by पराग१२२६३ on 16 April, 2017 - 03:27

आता वसई रोड जवळ येऊ लागले तसा ‘पश्चिम’चा वेग वाढत चालला होता. गाडी वळताना खिडकीतून पासून आज आमचा कार्यअश्व कोणता आहे, बडोद्याचा लालेलाल डब्ल्यूएपी-४ ई की गाझियाबादचा पांढराशुभ्र डब्ल्यूएपी-७ याची खात्री करून घेतली, तर तो गाझियाबादचा डब्ल्यूएपी-७ होता. डहाणू रोडपर्यंत तरी थांबायचे नव्हते आणि बडोद्यापर्यंत Automatic Block System ही यंत्रणा कार्यरत असल्यामुळे पुढच्या गाडीच्या हालचालीनुसार मागच्या गाडीला सिग्नल्स मिळत जाणार होते. त्यामुळेही गाड्यांचा वेग वाढण्यास मदत होत असते. आता गाडीतली गडबड जरा कमी झाली होती आणि रसोई यानातील कर्मचाऱ्यांची वर्दळ वाढली होती.

‘पश्चिम’चा प्रवास (भाग-१)

Submitted by पराग१२२६३ on 12 April, 2017 - 06:59

दरवर्षी १० ते १६ एप्रिल दरम्यान साजऱ्या होणाऱ्या रेल्वे सप्ताहाच्या निमित्ताने माझ्या एका प्रवासातील आठवणींचा हा लेखाजोखा...
-----

त्या सुऱ्याची चालही लयदार आहे!

Submitted by सत्यजित... on 9 April, 2017 - 14:37

साचला का एवढा अंधार आहे?
काजव्यांचा तेवढा आधार आहे!

जागल्या होत्या मशाली काल येथे
आज इथला सूर्यही बेजार आहे!

एकही ठिणगी कशी येथे पडेना?
कोण इथला आंधळा सरदार आहे?

फुंकतो आहे कधीचा सूर्य मीही
श्वास माझाही जरा उबदार आहे!

सारखा हिंदोळतो हा प्राण माझा
त्या सुऱ्याची चालही लयदार अाहे!

—सत्यजित

Pages

Subscribe to RSS - मायबोली