घोषणा

मायबोली गटगच्या माहीतीचे जतन

मायबोलीवर गेली १६ वर्षे वेगवेगळ्या देशात गटग होत आहेत. पण अनेक जुन्या गटगला कोण कोण आले होते याची माहिती उपलब्ध नाही. त्यांचे फोटोही नाही. प्रत्येक गटग (विशेषतः ज्याला बरेच जण जमले असतात) आपल्या परीने एक वेगळा अनुभव असतो. असे अनुभव जतन व्हावे म्हणून ज्या गटगला १० पेक्षा जास्त मायबोलीकर जमले होते त्यांचे ग्रूप फोटो जतन करून ठेवायचा आमचा प्रयत्न आहे. या ग्रूप फोटोला मायबोलीच्या अधि़कृत फेसबुकपानावर विशेष अल्बम मधे जागा दिली जाईल.

जाती धर्म विषयक लेखन

गेले काही दिवस मायबोलीवर जाती धर्मविषयक लेख आणि त्यावरच्या प्रतिसादांमध्ये शिवराळ भाषा काही सदस्य वापरत असल्याचे दिसून आले आहे. त्यातले शक्य तेवढे प्रतिसाद अप्रकाशीत केले आहेत आणि ते काम चालूच असते. काही लेखांवर प्रतिसादाचे प्रमाण एवढे आहे की त्यामुळे मूळ लेखच नाईलाजाने अप्रकाशीत करावा लागला आहे.

लेखकाचे/लेखिकेचे जुने लेखन पाहण्याची सोय पुन्हा सुरु

पाउलखुणांमधला उपविभाग, लेखकाचे/लेखिकेचे लेखन दाखवण्याची सोय पुन्हा सुरु केली आहे. कुठल्याही मायबोलीकराच्या व्यक्तिरेखेत जाऊन "लेखन" या टॅबवर टिचकी मारून हे पूर्वीप्रमाणेच पाहता येईल. मूळ मालकाला स्वतःचे अप्रकाशित लेखन पहायची जी सोय होती ती तशीच या टॅबवर जाऊन पाहता येईल.

एकाच व्यक्तीच्या सगळ्या प्रतिक्रिया पाहण्याची सोय अजूनही बंद ठेवली आहे.

पाऊलखुणांची सोय तात्पुरती बंद

तांत्रिक कारणांमुळे "पाऊलखुणांची" सोय सध्या तात्पुरती बंद ठेवली आहे.

पाऊलखुणांच्या अतिरेकी वापरामुळे सर्वरवर ताण येतो आहे का अशी शंका आहे. आम्ही पर्यायी व्यवस्था शोधतो आहोत.

मायबोलीवर प्रवेश करताना (लॉगिन) एक महत्वाचा बदल.

मायबोलीवर प्रवेश करण्याच्या पायरीत (लॉगिन) एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे. हा बदल काही आठवड्यांनी जास्त प्रकर्षाने जाणवेल.

यापूर्वी लॉगिन करण्यासाठी मायबोली आयडी वापरावा लागत असे. या पुढे काही आठवडे आयडी किंवा ईमेल यापैकी काहीही एक वापरून मायबोलीवर प्रवेश करता येईल. तुमच्या परवलीच्या शब्दामधे (पासवर्ड) काहीही बदल नाही आणि तोच चालेल. तुमच्या आयडीतही काही बदल नाही.

टोरांटो मराठी भाषिक मंडळ, यांच्यातर्फे दिवाळी अंक विक्री

मराठी भाषिक मंडळ, टोरांटो आणि मायबोली.कॉम यांनी एकत्र येऊन परदेशस्थ मराठी रसिकांसाठी दिवाळी अंक विक्रीची योजना सुरू केली आहे. कमीतकमी वेळेत आणि वाजवी किंमतीत दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे.

MBM_Toronto2.jpg

diwali_ank_2011.jpg

ऑरलॅंडो मराठी मंडळ यांच्यातर्फे दिवाळी अंक विक्री

ऑरलॅंडो मराठी मंडळ आणि मायबोली.कॉम यानी एकत्र येऊन परदेशस्थ मराठी रसिकांसाठी दिवाळी अंक विक्रीची योजना सुरू केली आहे. कमीतकमी वेळेत आणि वाजवी किंमतीत दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे.

omm.jpg

diwali_ank_2011.jpg

अंकविक्रीच्या फायद्याचा काही भाग ऑरलॅंडो मराठी मंडळाला मिळणार आहे.

कनेक्टिकट महाराष्ट्र मंडळ यांच्यातर्फे दिवाळी अंक विक्री

कनेक्टिकट महाराष्ट्र मंडळ आणि मायबोली.कॉम यानी एकत्र येऊन परदेशस्थ मराठी रसिकांसाठी दिवाळी अंक विक्रीची योजना सुरू केली आहे. कमीतकमी वेळेत आणि वाजवी किंमतीत दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे.

ctmm.jpg


diwali_ank_2011.jpg

रसग्रहण स्पर्धा - २०११ - घोषणा

दरवर्षी पुस्तक प्रदर्शनं, ग्रंथजत्रा, पुस्तकांची दुकानं, ऑनलाईन पुस्तकविक्री करणारी (मायबोलीसारखी) संकेतस्थळं अशा अनेक वाटांनी नवनवीन पुस्तकं आपल्या भेटीला येतात. वाचायची आवड असेल तर आपण नियमितपणे दुकानं-प्रदर्शनांना भेटी देतो, पुस्तकं चाळून पाहतो. कधीतरी वर्तमानपत्र अथवा नियतकालिकात आलेला एखाद्या पुस्तकाचा परिचय लक्ष वेधून घेतो. वेगवेगळी पुस्तकं मग यथावकाश आपल्या पुस्तकसंग्रहात, वाचनयादीत दाखल होतात. पुस्तकं घेण्यापर्यंतचा कुठल्याही दोन व्यक्तींचा प्रवास हा साधारण असाच असतो.

नाचायला मोकळा...

माझ्या रंगीबेरंगी ब्लॉगचे हे पहिले पान मी माझे गुरुमित्र प्रो. आगाऊ साहेब यांना सादर सम्रपित करतो.

------------------------------------------------------------------------------------------

मा. प्रो. साहेब,

स. न. वि. वि.

जागलो हो शब्दाला. घेतला बलॉग.
हक्काची जागा मिळाली. आता कसं, छान झालं. नुसता धुमाकुळ.
आता कसं, इथं मनसोक्त नाचायला मोकळा!

आ. न.
- ऋयाम.

------------------------------------------------------------------------------------------

दिवा घ्या