मीन्वा यांचे रंगीबेरंगी पान

उणीव

किती सुरेख निसर्गचित्र आहे हे,
डोंगर, झरे, हिरवाई, निळंशार आकाश..
पण काही तरी कमी आहे यात,
नक्कीच काही तरी राहून गेलंय....
हे पुढचं चित्र सुंदर तरुणीचं,
सरळ तरतरीत नाक, लांबसडक बोटं, कुरळे केस..
पण इथेही तोच अनुभव..काही तरी कमी आहे
एक, दोन, तीन.... किती तरी चित्र पाहीली,
सगळीकडे तोच अनुभव.. अस्वस्थ करणारा
नक्की कसली उणीव आहे?
आता उमगलं... प्रत्येक चित्र निर्जीव..
प्राण उडून गेल्यासारखं
आता ही स्त्री...... इथेही ... ओह!
आरसा!

पॅकेज डील

प्रिय....,
तसं वागणारी ती तूच का?
आणि आज असं वागणारी ही पण तूच का?
असे प्रश्न 'तुला' का पडलेत?
या विषयावर आपण बोललो नव्हतो का?
आणि फार पूर्वीच मान्यही केलंय आपण..
'Every individual is a package deal'

निरोप

ठीक आहे तर, आता आपल्या वाटा वेगळ्या
तू पूर्वेकडे जा, मी पश्चिमेकडे...
हो! चुकूनही भेट व्हायला नको पुन्हा...
आता मोठ्ठे झालोत ना आपण?
क्षणात कट्टी..क्षणात बट्टी करायला,
लहान का आहोत आता?
असं करु यात.. सीमारेषाच आखू यात,
हा भाग तुझा, तो भाग माझा..
वाटून घेऊ सगळं..
तू माझ्या भागात यायचा नाहीसच,
(आणि मला तुझ्या भागात यायची बंदीच आहे)
ए, पण तुला खरं सांगू का?
आपल्या दोघांमधलं नातं..
च्च! नातं म्हणलेलं चालेल ना?
अंऽऽ! किंवा असं म्हणू यात..
कुठलंही नातं, असं 'संपलं' म्हणून संपतं,
यावर माझा खरंच विश्वास नाहीये..
तू मला विचारलंच नाहीयेस म्हणा, असो.

इंद्रधनुष्य

तुला कुणी सांगितलं होतं रे,
अंधार रेखाटायला...?
आणि इतर सगळ्यांना दिसला,
तसा..तुला तो काळाकुट्ट का नव्हता दिसला?
की सगळे रंग तुझ्या नजरेतच आले होते वस्तीला..?
तसंच असणार..
सगळं जगच रंगीत दिसत असणार मग तुला..
आणि तू स्वत: ?
तुझा रंग कोणता दिसला होता तुला?
आरशात इंद्रधनुष्य पाहिलेला,
तू एकटाच असशील.. हो ना?

नाव नाही.

सहर का टूटा हुआ तारा लगे
अब तो ये दिल और बेचारा लगे..

जिंदगी हैरान है ये सोचकर
क्यूं किसीको मौत भी आसां लगे

रात कि तनहाईमे जब शाम डूबी
'सुबह होगी', ये भी इक वादा लगे

भीड से घेरा हुआ हर शक्स है
फिर भी हर कोई यहा तनहां लगे

ठोकरे खाता फिरे वो दर बदर
जिंदगी के बोझ का मारा लगे..

----------------------

न रुठ हमसे इतना भी साकी...
के जिंदगी लगे, जैसे सजा कोई बाकी

(मॉडरेटर - सध्या हिंदी सुचतंय म्हणून लिहीतेय खरं! पण इथे चालणार नसेल तर कळवलंत तर मी हिंदी पोस्ट कॉपी करुन दुसरीकडे हलवेन. स्मित )

बहाने..

मेहफिल के हुए ना..ना तुम्हारे हुए,
औरों के क्या हो? ना हम हमारे हुए ..

सपना ही होगा..सपना ही था वो
कुछ पल साथ हमने गुजारे हुए ..

गैरोंसे क्यूं हम शिकायत करे
अपनों के भी हम ना प्यारे हुए

के तुफां से रिश्ता गहरा है इतना
बडे दूर हमसे किनारे हुए ..

वो समझे ना हमको.. गहराइओंको..
छोडो भी, ये बस बहाने हुए ..

पाऊस

(सगळ्या कविता लिहीणार्‍यांनी आणि न लिहीणार्‍यांनी पण पाऊस पडायला लागला की एखादी तरी कविता पावसावर लिहीलीच पाहीजे असा एक नियम आहे. नियमाच पालन झालच पायजे स्मित )

पाऊस,
कधी सरकारी नोकर,
त्रयस्थपणे पाणी शिंपडून,
कर्तव्य बजावून जातो..

पाऊस,
कधी हळवा प्रियकर,
हळूवारपणे तासनतास,
रेंगाळत राहतो..

पाऊस,
कधी जिवलग मित्र,
संध्याकाळच्या हळव्या क्षणांना
सोबत करत राहतो, मुकपणे..

ती आणि तो..

त्याचं नदीशी नातं खूप जुनं. म्हणजे अगदी रोज नाही, तरी नियमितपणे तो इथे नदीकिनारी येऊन तासनतास रेंगाळायचा. आपली सुख दु:ख हक्कानी या नदीशी बोलायचा. धीरगंभीरपणे नदी सगळं पहायची ऐकुन घ्यायची. कधी एखाद्या खळाळत्या लाटेनी कोपरखळी मारुन त्याला हसवायची देखील. नदीची आठवण त्याला छळायची. खूप दिवसात नाही यायला मिळालं किनार्‍यावर की बेचैन व्हायचा तो.

तू आणि मी

जेव्हा जेव्हा भेटशील तू
तेव्हा तेव्हा रुजेन मी
मातीतून तरारणारा
कोंब होऊन बहरेन मी

जेव्हा जेव्हा भेटशील तू
तेव्हा तेव्हा फुलेन मी
तुझ्या डोळ्यात पाहता पाहता
तुझ्याआत उतरेन मी

जेव्हा जेव्हा भेटशील तू
तेव्हा तेव्हा हसेन मी
हसता हसता कुशीत शिरुन
तुच होऊन जाईन मी

वेषांतर

हे दाटून आले नभ की,
ओघळले काजळ आहे..
वेषांतर करुन आले,
पण जुनेच वादळ आहे..

अश्रूंना समजावून तू,
जा परत धाड तू आता..
कधी न पाझरणारा,
असला तो कातळ आहे..

संकोच नको वचनांचा,
संकोच नको घटनांचा..
परत न येणे आता,
झरला जो ओघळ आहे..