ललित

कंबोडिया आणि ईंडोनेशिया भेट

मला वाचायला जितक आवडत त्याहून कैक पटीने मनातले भाव लिहून काढायला फार फार आवडतात. मी साहित्य पाडणार्‍यातला नाही हे मला खूप चांगले माहिती आहे. त्यामुळे जग काय म्हणेल अशी तमा मला लिहिताना मुळीच नसते. आपण जे जग बघतो तेच जग अनेक जण बघत असतात पण इथे प्रत्येकाची सवेंदना वेगळी आहे. हे स्वान्तसुखाय म्हणून लिहिताना जितके मला दरवेळी जाणवते तेवढे इतर वेळी जाणवत नाही. खूप दिवसांपासून कंबोडियाबद्दल मला लिहायचे होते. काल परवाच मी ईंडोनेशिया वरुन परत आलो. मग तिथे जे काही पाहिले त्याबद्दल प्रवास वर्णन वगैरे नाही पण जे अनुभवल त्याबद्दल लिहू असे वाटायला लागले.

अशांत शांत

रोजच्या जगण्याचं हे दैनंदिन धबडगं इतकं आवश्यक का होऊन बसतं, काही कळत नाही. हंड्याहंड्याने पाणी भरताना माठालाच भोक असल्याने शेकडो हजारो हंडे टाकूनही तो भरू नये, पण तो भरत राहणं मात्र श्वास घेण्याइतकंच आवश्यक होऊन बसावं, असं काहीतरी. श्वास घेण्याला निदान काही निश्चित अर्थ आहे, प्रयोजन आहे. इथं मात्र ते हंडे, माठ, पाणी आणि ते भरणं- सारंच निरर्थक.

कलंदर, मी आणि जाहिराती (२)

कलंदर, मी आणि जाहिराती (१) - http://www.maayboli.com/node/15684
***
***

'माझ्या व्यवसायाच्या जाहिराती करायच्या आहेत. येऊन भेटू शकाल का?' असा एक दिवस फोन आला. आपल्याला काय, आपण सांगितलेल्या कामाचे नि दिलेल्या भाकरीचे. चलो स्वारगेट, तर चलो स्वारगेट. नो प्रॉब्लेम.

फोनवरून दिलेल्या मित्रमंडळ चौकातल्या पत्त्यावर जाऊन भेटलो. प्रसन्न-हसतमुख, गोरं, उंचनिंच सव्वासहा फुटी, बघता क्षणीच छाप पडेल असं व्यक्तिमत्व. नाव प्रताप काळे. जाहिरातींच्या स्वरूपावरून इस्टेट एजंट असावा. जाहिरातींचे ड्राफ्ट्स देऊन, हिशेब करून लगेच पैसेही देऊन टाकले.

ऑल ईज वेल

मटा ऑनलाईन मध्ये "आमची शिफारस" या सदरात प्रकाशित झालेला लेखः
"ऑल ईज वेल" (३० ऑगस्ट, २०११)
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9796864.cms

मनकोलाज - २

चालतेय. सुखद पावसाळी हवेला लपेटून. ऊन न पाऊस यातलं दोन्ही नसलेलं. मी या इथंच रहावं कायम इतकी प्रेमात या जागेच्या. अर्थात यापेक्षा सुंदर जागी मी राहिली नाहीये असं नाही पण.. बस दिल तो इसी पे आया है.. झाडं.. गवत.. बागा.. इतकं असं सुंदर असावं? ते सपर्ण सौख्य सहन न होऊन मान वळवावी तरी कुठं? इथल्या हवेलाही हिरवा वास येतो. ऑफिसेस आणि घरं यांच्या सिमेंटचाही त्रास होऊ नये इतका. कन्स्ट्रक्शन्स जणू परवानगी घेऊन या हिरवाईच्या आश्रयाला गुपचुप उभी हे ऐश्वर्य निरखत.

जावे त्याच्या वंशा (लेखमालिका) ४ : पहिलं प्रेम

जावे त्याच्या वंशा (४): पहिलं प्रेम
ऑगस्ट ३, २०११

असं म्हणतात, भारतात त्यातही मुंबईत जन्मलेलं प्रत्येक मूल रांगायला, चालायला शिकतं त्याचबरोबर एखादी खेळायची पहिली वस्तू हातात कुठली धरत असेल तर बॅट आणि बॉल. घरात "लकडी की काठी" चा घोडा नसला तरी कुठला तरी बॉल आणि एकतरी बॅट असतेच. याला कुणीही अपवाद नाही, मी ही त्यातलाच.

झीं झीं झीं झिच्यकं झिच्यक्

घरी जुन्या संगणकाच्या पडद्याचे सुरक्षाकवच पडून होते. तेव्हा म्हटले ही गंमत करून बघूया.

एक पाऊण फुटाची पी.व्ही.सी. नळी आणि रिकामी हिंगाची डबी घेतली.

त्या काचेची बाजूची चौकट काढून टाकली.

झाडारडती

गलीबाळु: अरे, ऐकलस का? झाडे सुसमंजस असतात म्हणे. तुम्ही त्यांच्या आजुबाजुला प्रार्थना केली तर ती जास्त चांगली वाढतात.
फाटेफोडु: खरंच? पण कोणत्या भाषेत करायची प्रार्थना?
गलीबाळु: अर्थातच संस्कृत. तीच तर वैश्वीक भाषा आहे. खुद्द देवांची पण.
फाटेफोडु: पण मग खरोखर फरक पडायला उच्चार अगदी योग्य असावे लागतील ना?
गलीबाळु: हो, पण कोणतीच इतर भाषा संस्कृतच्या जवळही पोचणार नाही.
फाटेफोडु: पण सगळ्या मानवांना सुद्धा तर संस्कृत कळत नाही. मग झाडांचे काय बोला? आणि झाडांना प्रार्थनेनी मदत होत असेल तर माणसांना पण नाही का होणार?
गलीबाळु: होतेच तर!
फाटेफोडु: पण मग शिव्याशापांनी वाईट परिणाम पण व्हायला हवा.

उशीर

"उद्या सकाळी या. ५:३० ला बरोब्बर. ओके? ", हसत तो ड्रायव्हरला म्हटला.
ड्रायव्हर प्रयत्नपुर्वक हसला. आणि "ओके साहेब. गुड नाईट!" म्हणून गाडी पार्क करायला निघाला.

"आजचा कार्यक्रम लांबला म्हणून उद्याची वेळ चुकवणं बरोबर नव्हे! ५.३० म्हणजे ५.३०!" त्याने ठरवलं होतं.

तो लिफ्टकडे निघाला. वॉचमन स्टुलवर पेंगत होता. अधुनमधुन चांगला घोरत बिरत होता.
" झोपेच्या वेळी झोपणारच. माणुस तो शेवटी. " त्याच्या मनात आलं.
"कामाच्या वेळी झोपा काढतोय हा!" वगैरे विचार दुरुनसुद्धा मनाला शिवुन गेला नाही. आज तरी.

हे राम!

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी शेवटच्या क्षणी "हे राम!" असे उद्गार काढले होते का याबद्दल आजही वाद आहे. शाळेतील ईतीहासाच्या पुस्तकात तरी तसेच नमूद केले असल्याने माझ्या पुरता किंवा आमच्या पिढीपुरता तो वाद तिथेच संपला होता. बापूंच्या काळी मोबाईल रेकॉर्डींग नसल्याने तसा थेट पुरावा तरी ऊपलब्ध नाही त्यामूळे अनेक शंका, वाद आणि सोयीस्कर थियरीज सो कॉल्ड तज्ञांनी आजवर नाचवल्या आहेत. काळाच्या ओघात पुस्तके बदलली (निव्वळ पुढचे मागचे कव्हर नव्हे तर आतील मजकूर देखिल. बापूंचा अंत झाल्याची तारीख मात्र तीच आहे, हे नशीब!) त्याचबरोबर अनेक तथाकथीत गोष्टी आणि ईतीहासही बदलला?