काव्यलेखन

मैत्रीचे नाते

Submitted by अक्षय दुधाळ on 26 May, 2017 - 01:56

मैत्रीचे नाते

तू नाहीस नुसताच मित्र
तुझ्याविना विना रंगत नाही आयुष्याचं चित्र
मैत्री असते एक अतूट नाते
जसे वाऱ्यावर डोलणारे गवताचे पाते
मैत्रीचे हे नातेच वेगळेच असते,
घरचा लोकानप्रमाने घट्ट असते,
तिची कधी जात नसते
तिला कधी लिंग नसते
या स्नेहाच्या वर्षावात मन आनंदून जातं
मग सर्वाना हेच सांगावसं वाटतं
माझे नाही, तुझे नाही,
तर हे मैत्रीचे नाते आपले असते.

जय जवान....

Submitted by राजेंद्र देवी on 26 May, 2017 - 00:19

जय जवान....

अजून जन्मदाखल्याची
वाळली ना शाई
तोच सोडुनी गेलीस
तू मज आई

रुप पाहिले मी
तुझे ठायी ठायी
परी ना भेटली मज
माझी जन्मदाती आई

भोग नशिबाचा
पाहा कसा आई
का तुझ्याच बाबतीत
देव कसा झाला कसाई

आई तुझ्यापायी
तळमळला आत्मा
भारतमाते साठी
झालो आज हुतात्मा

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 

मला जगू द्या

Submitted by निशिकांत on 25 May, 2017 - 22:49

आर्त हाक ना कुणी ऐकली "मला जगू द्या"
तिची विनवणी आतच विरली "मला जगू द्या"

माता, भागिनी, सून जगाला हवी हवीशी
पण कन्या का गर्भामधली नको नकोशी
जन्मायाच्या अधीच रडली "मला जगू द्या"
तिची विनवणी आतच विरली "मला जगू द्या"

एकच गाणे तिच्या नशीबी कारुण्याचे
जन्मच अवघड, स्वप्न कुठे मग तरुण्याचे?
करुणाष्टक ती गात राहिली "मल जगू द्या"
तिची विनवणी आतच विरली "मला जगू द्या"

देवदूत जे डॉक्टर, झाले अता कसाई
मुल्य पराजित, स्वार्थ जिंकतो, कशी लढाई?
श्वास घ्यावया ती तडफडली "मला जगू द्या"
तिची विनवणी आतच विरली "मला जगू द्या"

तो जेथेही खणेल तेथे पेरत जाते ..

Submitted by सुप्रिया जाधव. on 25 May, 2017 - 13:56

मुळांप्रमाणे धाड स्वतःला खोल जराशी
मातीलाही सापडेल मग ओल जराशी

माणसाहुनी सच्ची असते भाषा त्यांची
ऱानामधल्या पाखरांसवे बोल जराशी

वादळात उन्मळून पडली काही घरटी
काही घरटी तगली राखत तोल जराशी

ते ऐकुन मी मलाच भेटायला निघाले
अफवा होती पृथ्वी असते गोल जराशी

त्याने कूस उजवल्यावर ती होत राहते
क्षणोक्षणी पहिल्यापेक्षा अनमोल जराशी

तो जेथेही खणेल तेथे पेरत जाते
साधत जाते ढळलेला समतोल जराशी

सुप्रिया

बरसू दे जलधारा

Submitted by द्वैत on 24 May, 2017 - 08:05

बरसू दे जलधारा

ग्रीष्म झळानी पोळून निघतो
तन मन देह निवारा
नदी किनारे डोन्गर वारे
लाही लाही जग सारा
बस कर आता पुरे भास्करा
जरा ढळू दे पारा
अन पुन्हा भिजू दे ह्या धरणीला
बरसू दे जलधारा
आता बरसू दे जलधारा

- द्वैत

तेवढे आयुष्य सावरण्यात जाते..

Submitted by श्रीगणेशा on 24 May, 2017 - 05:11

'हो-नको' च्या जेवढे वादात जाते..
तेवढे आयुष्य सावरण्यात जाते..!!

डांबरी सडकेत ती हरवून गेली..
एक गाडीवाट जी गावात जाते...!!

एेवढ्या जोरात भांडे बोलते की..
बातमी मग नेमकी चौकात जाते...!!

'फोडुनी' घर चांगले गावातले मग..
ती 'त्सुनामी' शेवटी शहरात जाते..!!

पावसाला वेळ लागू लागला की ..
स्वप्न हिरवेगार मग सरणात जाते..!!

एक नाते ओघळाया लागल्यावर..
तावदानी मन जुन्या काळात जाते..!!

गणेश शिंदे दुसरबीडकर

मैत्री होता संगणकाशी

Submitted by निशिकांत on 24 May, 2017 - 01:50

संगणक या विषयावर रचना असल्यामुळे कांही इंग्रजी शब्द अपरिहार्यपणे आले आहेत.

पोरांसोरांकडून शिकलो
नाळ जोडण्या नव्या युगाशी
दशांगुले आकाश राहिले
मैत्री होता संगणकाशी

फोन जाहला स्मार्ट अताशा
टॅबलेट अन् किंडल आले
व्हाट्सअ‍ॅपच्या भडिमाराने
दिवस केवढे लहान झाले !
चोविस घंटे वाचन, ज्याचे
नाते नसते बुध्द्यांकाशी
दशांगुले आकाश राहिले
मैत्री होता संगणकाशी

सरा ग बायांनो मी जाते रायाच्या भेटिला..

Submitted by किश्या on 23 May, 2017 - 01:05

सरा ग बायांनो मी जाते रायाच्या भेटिला..
भाकर ठेचा अन कांदा हाय माझ्या शिदोरीला..

पहाटच गेला राया माझा,
घेउन संगती तिफन पेरणीला,
एकटाच कसा पेरिल त्यो धान,
चावड धरायची मह्या हाताला...

उजवुनी कुस त्या धरणीमायेची,
घटकाभर थांबतो आम्ही विसाव्याला
टचकण दिसते माया म्ह्यावरची,
आंब्याच्या त्या सावलीला....

सर्ज्या अन राजा संगती आमच्या,
मायेचा घास त्यांच्या दावनीला,
पिवुद्या त्यांना घोटभर पाणी,
सैल सोडा त्यांच्या येसनीला..

चारोळी

Submitted by मीनल कुलकर्णी on 22 May, 2017 - 22:02

अरे पावसा, थोडा तरी वेळ दे
मला सावरायला....
आत्ता कुठे सुरुवात केली मी
मनातला पसारा आवरायला....
- मीनल

प्रांत/गाव: 

वेदनेच्या राउळी...

Submitted by राजेंद्र देवी on 22 May, 2017 - 01:31

वेदनेच्या राउळी...

कष्टाने रचीली ईमारत
पाया तो ढासळे
आठवणींच्या मलब्यात शोधतो
शब्द मी ते कोवळे

पाप पुण्य , कर्म धर्म
व्यर्थच होते सारे त्या वेळी
नव्हताच कोणता गुन्हा
होती राशी नक्षत्रांची खेळी

मनाच्या गाभार्‍यात
खिन्न त्या संध्याकाळी
घंटारव आठवणींचा
वेदनेच्या राउळी...

राजेंद्र देवी

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन