ललित

एकदा दुपारी!

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

"शू होतीये!" जोरदार रडण्याच्या आवाजात मधेच किंचाळून एक छोटा मुलगा म्हणाला आणि माझं लक्ष तिकडे वेधलं गेलं.

इथल्याच एका गल्लीतली गोष्ट ही. सुट्टीच्या दुपारची शांत वेळ होती. एक कुटुंब रस्त्यावरून चाललं होतं. आई, बाबा, आईचा हात धरून ४-५ वर्षाचा छोटुकला असे पुढे चालले होते आणि चारपाच पावलं मागे छोटुकल्याचा आठनउ वर्षाचा दादा रडत पाय ओढत मधूनच "शू होतीये!" असं ओरडत चालला होता.

"अति झालंय हं तुझं आता!"
"बोर्डिंगची चौकशी केलीयेत ना हो? तेच बरं. तिथेच जा तू."
"शू होतीये तर जा त्यांच्या घरात आणि जाउन कर!"

विषय: 
प्रकार: 

पे रु च्या झा डा मागेऽऽएऽऽ..

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

'बालपणीचा काळ सुखाचा', 'लहानपण दे गा देवा' वगैरे आपण नेहेमीच ऐकतो. आता सगळंच काही रम्य नसतं,
नव्हतंच... घडणं/घडवणं नेहेमीच आपल्या हातात नसतं, म्हणून मला तरी वाटतं 'रम्य ते आठवणं' तरी आपल्या हातात असतं ना?

-------------------------------------------------------------------------------------------

वेळेचं नियोजन आम्हाला शिकवलं ते उन्हाळ्याच्या सुट्टीनं!
म्हणजे सुट्टीच्या दिवसातला एकही क्षण वाया न जाऊ देता आणि 'मॅक्झिमम युटीलायझेशन ऑफ अ‍ॅव्हेलेबल रिसोर्सेस' या तत्वाचा वापर करून सुट्टी आनंदात कशी घालवावी हे त्या दिवसांना आठवल्यावरच ध्यानात येतं.

विषय: 
प्रकार: 

मिनीची आई!

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

काल मदर्स डे झाला. आईशिवायचा हा चौथा मदर्स डे. जुनाच लेख पुन्हा टाकतेय. अर्थातच भावना त्याच आहेत!
हा लेख मी माझ्या आईच्या, प्रा. माधवी पटवर्धन यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त (४ नोव्हेंबर २००८) लिहिला होता.
--------

वाड्याच्या ओट्यावर छोटीशी मिनी बसलेली असते. आईला टाटा करत असते. मिनीची आई, गोरीपान, एक वेणी आणि खांद्याला पिशवी. "रडायचं नाही हं. अण्णांना आजीला त्रास द्यायचा नाही. आई क्लासला जाउन दोन तासात येईलच हं." आई सांगते. मिनी हसत हसत टाटा करते. आठवणींचा तळ गाठायचा झाला तर मिनीला आईची पहिली आठवण आहे ती ही. चांदणं फुलल्यासारखा आईचा लख्ख हसरा चेहरा मिनीला आजही लक्षात आहे.

प्रकार: 
शब्दखुणा: 

अभंग, शहर, जथा आणि मी!

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

हे पण जुनेच ललित आहे.
---------------------------------------------------
सकाळची कामं उरकणं चालू होतं. अचानक मोठ्या आवाजात पखवाज आणि पेटीच्या दमदार साथीने अभंग ऐकू आले. शब्द लांबून येत होते त्यामुळे कळले नाहीत पण सूर होता सच्चा आणि खणखणीत बंदा रूपया.
एकेक सूर पांडुरंगाच्या पायाकडे नेणारा. मधेच एक दुसरा आवाज आला. योग्य जागी, योग्य वेळी आणि योग्य सूर उचलून अप्रतिम ताना आल्या. परत पहिला आवाज मूळ अभंगावर आला. आता दोन्ही आवाज पांडुरंगाला आळवत होते.
अशी स्वर्गीय भक्ती.. का नाही पांडुरंग येणार भेटीला.
मला त्या आवाजातच पांडुरंग भेटून गेल्यासारखं वाटलं.

प्रकार: 
शब्दखुणा: 

अंतिम सत्य!

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

नुकतेच श्री सत्य साई बाबा यांचे निधन झाले. देव त्यांना सद्गती देवो!

विषय: 
प्रकार: 

ओळख, नाव, वागणूक इत्यादी आणि मी.

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

हे ही जुनंच लिहिलेलं. अनेकांना लक्षातही असेल. फरक तसा काहीच नाहीये अजूनही पण प्रसंगांचा त्रास स्वत:ला करून घेण्यापेक्षा समोरच्याची समजण्याची कुवत नाही हे मी शिकलेय थोडंफार इतकंच.. Happy
--------------------------------------------------------------------------------------------
"लग्न झाल्यावरही मी नाव बदलणार नाही. आणि ते तुझ्या आइवडिलांना पटवायची जबाबदारी तुझी."
असं स्वच्छपणे त्याला सांगितलं आणि मी निवांत झाले. त्यालाही या गोष्टिचं फारसं काही वाटलं नाही. बायकोने आपलं नाव लावलंच पाहिजे इत्यादी विचार त्याच्या आसपास फिरत नसत सुदैवाने.

प्रकार: 
शब्दखुणा: 

सहजच..!

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

आयुष्यात ही जाणीव खूप भयानक वाटते... परतीचे दोर आपणच आपल्या हातांनी कापल्याची! कॉलेज संपतं.. सारे दहा दिशांना पांगतात... आपण मात्र ठरवलेलं असतं पक्कं की आपली मैत्री कधीच तुटू द्यायची नाही. सुरूवातीला रोज फोन, २-३ दिवसांनी भेटणं वगैरे उत्साहात होतं. मग काही काळाने वाटू लागतं की आता आठवड्यातून एकदा भेटलं तरी चालेल... त्या आठवड्याचा महीना कधी होतो समजतही नाही. मग नोकरी... नवे मित्र...! त्याचे फोन तरीही येत राहतात अधूनमधून.... कंटाळून शेवटी ते फोनही कमी होतात. आता बोलण्यातही मधे मधे gaps येऊ लागतात. मनाची समजूत घातली जाते की आता वेळ मिळत नाही... Life busy झालंय पार! नंतर कधीतरी वाटतं...

प्रकार: 

मोगरा, पावसाचा वास आणि बीएमडब्ल्यू!!

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

जुनेच ललित. अजून काय फारसा फरक पडलेला नाही. Wink
----------------------------------------------------
"खरं सांगतो, त्या गाडीची टेस्ट राइड घेतली तेव्हा मनापासून वाटलं की काय करतोय आपण हे सगळं? कला बिला सब झूठ आहे गं. आपण पण आता पैसा कमावला पाहिजे."
मित्र भारावून सांगत होता. आम्ही गारूड्याच्या पुंगीवर डोलावं तसं त्या बीएमडब्ल्यू स्पोर्टसकारचं वर्णन मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो.
"असा तो सिल्व्हर कलर. आतमधे थोड्या डार्क सीटस त्याही लेदरच्या. नव्या कोर्‍या लेदरचा तो वास! म्हणजे मोगर्‍याचा आणि पहिल्या पावसाचा वास सोडून इतका महान वास अजून कशाचा असू शकेल असं वाटत नाही."
आम्ही गाडीत आधीच बसलो होतो.

प्रकार: 

रंगसंगती

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

"आल्या आल्या चित्रे बाई आल्या!!!"
शारदा ओरडली आणि अख्खा वर्ग चिडीचुप्प झाला. मग आमचं सगळ्यांचं एकमेकींकडे बघून गालातल्या गालात हसणं सुरु झालं.
"बबे, ओळख आज बाईंनी कुठल्या रंगाची साडी, ब्लाउज आणि परकर घातला असेल!" शारदानी हळूच विचारलं. पण बबीच्या उत्तरा आधीच बाई वर्गात आल्या आणि आमचं नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या अत्यंत विसंगत रंगसंगतीकडे निरखून बघणं सुरु झालं.
चित्रे बाई आम्हाला ईंग्रजी शिकवायच्या. कायम हसत असायच्या. बरंच गमतीदार बोलायच्या आणि दर तासाच्या शेवटी, "काय पण दात काढता गं तुम्ही.. अचरट कार्ट्या!!!" असं काहीसं बोलून वर्गाबाहेर पडायच्या.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

ओढ

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

विमान क्रूजिंग अल्टिट्यूडला पोचलं असावं. डोळे किलकिले केले तेव्हा केबिन क्रू खाण्या-पिण्याच्या गाड्या घेऊन फिरताना दिसला. शेजारच्या सीटेवर एक बर्‍याच वयस्कर बाई बसल्या होत्या. एअर होस्टेस आमच्या रांगेजवळ आली होती.
"मिस थाँम्सन, कॉफी हवीय का आणखी?"
नावाने प्रवाशाला बोलवून विचारणं झालं म्हणजे ओळखीची किंवा प्रसिध्द व्यक्ती असली पाहिजे. मी मनातल्या मनात.
"तुम्ही काय पिणार?" बाईंच्या कपात कॉफी ओतून, तिनं मला विचारलं. मी तोवर पुन्हा डोळे मिटले होते.
"थकलेला दिस्तोय. झोपू दे." माझ्या वतीनं बाईंनी सांगून टाकलं, सुंदरी पुढे गेली. मी पुन्हा मनातल्यामनात त्यांचे आभार मानले.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - ललित