मृण्मयी यांचे रंगीबेरंगी पान

माझी जमीन कसण्या घेऊन प्रोफ गेले!

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

'जमीनी सुरक्षीत नाहीत' अशी सर्वत्र बोंबाबोंब आहे. त्यामुळे जमिनीचा नाद सोडून गाळा डायरेक्ट इथून उचलला आहे.

माझी जमीन कसण्या घेऊन प्रोफ गेले!
सैपाक* मीच केला, जेवून प्रोफ गेले!

'प्याले हलाहलाचे रिचवेन मीच' म्हणुनी....
कोन्याक हाय माझी सेवून प्रोफ गेले!

'माझ्या घरी बरा मी' ठसक्यात सांगताना....
दारात वाकुल्यांना दावून प्रोफ गेले!

'पाडेन काव्यचकल्या, सोर्‍या तुटो बेहेत्तर'....
झेंडा बगावतीचा रोवून प्रोफ गेले!

मृण धन्यवाद देई विचक्या न टाकल्याचे....
मातब्बरांस इथल्या भोवून प्रोफ गेले!

* 'आर्ती'च्या चालीवर वाचावे.

विषय: 
शब्दखुणा: 

भोकsरूss

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

शेवाळी रंगाचं,
शेंबड्या अंगाचं,
मराठी ढंगाचं,
माझं भोकरूss

लोणची जायाचं,
पुरवून खायाचं,
सांभाळा रातीचं,
माझं भोकरूss

कैरीशी मैत्रीचं,
चवीच्या खात्रीचं,
तों.पा.सो, रुपाचं,
माझं भोकरूss

मुरल्या वाणाचं,
भेव गंss पाण्याचं,
रक्षण दाद्र्याचं
माझं भोकरूss

प्रेरणा: http://www.maayboli.com/node/43403 आणि http://www.maayboli.com/node/42775

विषय: 

फाटती विरल्या विजारी फार हल्ली..

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

सांडती नोटा नि नाणी याच गल्ली
फाटती विरल्या विजारी फार हल्ली

पुसल्या न शंका मम मनाला डंखणार्‍या,
मंडळी देतात सल्ले फार हल्ली

गावता ब्लिंपास उंची विरहण्याची,
खेचती खाली दिवाणे फार हल्ली

लेखिता कवतीक आपुले चिमुटभरिचे
सांगती, 'माझेही अस्से' फार हल्ली

जमताच माझा कंपू मजला चेव येतो
कोपचे उजळून येती फार हल्ली

का कुणी ओळींस वाची या फुकाच्या
गावतो का वेळ हापिसी फार हल्ली?

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

ग्रॉपुल्याची खुर्ची

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

'व्हेकेशन'ला जाऊन आलं की वर्णनं आणि छायाचित्र टाकणं हे मायबोलीवर जवळपास मँडेटरी झाल्यासारखं आहे. लोक रम्यातीरम्य जागी जातात. आम्ही रम्य जागी जायला मिळालं नाही की जागेत रम्यता शोधतो.

सचित्र प्रवासवर्णन करून माय्बोलीकरांना नुस्तं जळवून जळवून टाकायचं ठरवलं होतं पण..!

गेल्याच आठवड्यात आम्ही अ‍ॅलबामा राज्यातल्या बोरखेडीएवढ्या मोठ्या गावी गेलो होतो. गावात बघायला काय काय आहे अशी पृच्छा केल्यावर, 'बरंऽच काही' असं उत्तर मिळालं. ३ पेट्रोलपंपं, मोठी - छोटी धरून १० हॉटेलं, एक बोलिंग अ‍ॅली आणि जवळपासच्या परिसरात (सर्वानुमते) नयनरम्य (ठरायला हरकत नसलेली) नॅशनल फॉरेस्टातली वाट एवढा ऐवज मिळाला.

विषय: 
शब्दखुणा: 

रंगसंगती

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

"आल्या आल्या चित्रे बाई आल्या!!!"
शारदा ओरडली आणि अख्खा वर्ग चिडीचुप्प झाला. मग आमचं सगळ्यांचं एकमेकींकडे बघून गालातल्या गालात हसणं सुरु झालं.
"बबे, ओळख आज बाईंनी कुठल्या रंगाची साडी, ब्लाउज आणि परकर घातला असेल!" शारदानी हळूच विचारलं. पण बबीच्या उत्तरा आधीच बाई वर्गात आल्या आणि आमचं नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या अत्यंत विसंगत रंगसंगतीकडे निरखून बघणं सुरु झालं.
चित्रे बाई आम्हाला ईंग्रजी शिकवायच्या. कायम हसत असायच्या. बरंच गमतीदार बोलायच्या आणि दर तासाच्या शेवटी, "काय पण दात काढता गं तुम्ही.. अचरट कार्ट्या!!!" असं काहीसं बोलून वर्गाबाहेर पडायच्या.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

ओढ

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

विमान क्रूजिंग अल्टिट्यूडला पोचलं असावं. डोळे किलकिले केले तेव्हा केबिन क्रू खाण्या-पिण्याच्या गाड्या घेऊन फिरताना दिसला. शेजारच्या सीटेवर एक बर्‍याच वयस्कर बाई बसल्या होत्या. एअर होस्टेस आमच्या रांगेजवळ आली होती.
"मिस थाँम्सन, कॉफी हवीय का आणखी?"
नावाने प्रवाशाला बोलवून विचारणं झालं म्हणजे ओळखीची किंवा प्रसिध्द व्यक्ती असली पाहिजे. मी मनातल्या मनात.
"तुम्ही काय पिणार?" बाईंच्या कपात कॉफी ओतून, तिनं मला विचारलं. मी तोवर पुन्हा डोळे मिटले होते.
"थकलेला दिस्तोय. झोपू दे." माझ्या वतीनं बाईंनी सांगून टाकलं, सुंदरी पुढे गेली. मी पुन्हा मनातल्यामनात त्यांचे आभार मानले.

विषय: 
प्रकार: 

आमालाबी चित्तरगाणी व्हताना...

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

मायबोलीवर नवनव्या क्लुप्त्या काढून फोटो डकवायची स्टाईल आहे. वरिजिनल आयड्या येण्याइतके आम्ही हुषार नाही, पण आम्हालाबी चित्तरगाणी व्हतात...

उगवला चंद्र पुनवेचा
उगवला चंद्र पुनवेचा !

मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा..॥
दाहि दिशा कशा खुलल्या,
वनिवनी कुमुदिनी फुलल्या,
नववधु अधिर मनी जाहल्या
प्रणयरस हा चहुकडे वितळला स्वर्गिचा..॥

ugavalaa-chandra-punavechaa.JPG

__________

आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली
मजलाच हाय माझे जपता न भान आले

शब्दखुणा: 

आमचा(बी) व्यसनी बाप

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

ही ह्या कविते(?)ची प्रेरणा!

हे हटकेश्वरा, कंपूशेठ फलकाण्या, हिरवट फोकनाडेश्वरी माते आणि
बाराहून खास भगतगणाला, उदा: डोंमकावळ्याला भेटायला आलेल्या सरकोजीदेवा...

तुम्हाला चांगलच माहिती आहे
मायबोलीवर काय चाल्लंय ते
तरीपण.....

आमचा बाप काडेल आणि मायबोलीचा व्यसनी
ID अजून शाबूत आहे.
नाहीतर कधीच 'अंतू' आणि 'हवालदार'सारखा
पार्श्वभागावर हाणल्या जाऊन गचकला असता.

बापाचा मायबोलीवर लई जीव!
इतका, की हापिसात कामचुकार्‍या करून
आणि घरी मायपासून चोरून लपून मायबोलीवर टवाळक्या कराव्या.

प्रकार: 

(हिंमत असेल तर), डोळ्यांत वाच माझ्या..

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

काल
आपल्या फस्टम् फस्ट रात्री
हे बटबटीत गोळे तुझ्या डोळ्यांचे
रोखून बघताना माझ्याकडे........
नको म्हंटलं तरी जातंच ना लक्ष
त्यांच्याकडे...!
दिसलंच मला त्यांच्यात प्रतिबिंब
तुझ्या मनातल्या भावांचं, धाकी पाडणार्‍या जरबेचं.
पटापटा मान वळवून ती नजर
टाळण्याचा मी केलेला तो आटोकाट प्रयत्न
कोणी असं करत नाही!
पण इतक्या रागावून अर्पित केलेली ती एक्सरे व्हिजन
मला पाहवलीच नाही बघ.
आणि मग निरखू लागलो मी
भिंतीवरची किडा पकडणारी पाल, गुणगुणणारे डास.
तुझ्या आयशॅडो थापलेल्या नेत्रांचे निखारे
वर खोट्या पापण्या डकवलेले..
बचाबच आयलायनर लावून वटारलेले!
मी हळूच चोरून बघतो तर काय..

ढुंकून कोण पाही

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

मुजरा अखेरचा हा
सोडून जात माबो*
वदलो जरी असे मी
ढुंकून कोण पाही........ ||१||

खरडून चार कविता
ललिते अणीक गोष्टी
रिझवावयास गेलो
ढुंकून कोण पाही........ ||२||

डोकावलो जरासा
वीचारपूस करण्या
पण ह्या वि. पू. त माझ्या
ढुंकून कोण पाही........ ||३||

Pages

Subscribe to RSS - मृण्मयी यांचे रंगीबेरंगी पान