सामाजिक उपक्रम - वर्ष २०१४ - पूर्वतयारी (सार्वजनिक धागा)

Submitted by सुनिधी on 29 January, 2014 - 14:31

नमस्कार,
दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे सामाजिक उपक्रमाचे हे पहिले आवाहन.

गेल्या काही वर्षात आपण काही संस्थांना वस्तुरुपात मदत केली. त्या सर्वच संस्था शाळांशी निगडीत असल्याने त्यांना दरवर्षी मदतीची जरूर असतेच. त्यानुसार यावर्षी देखील जितकी मदत करता येईल ती करणार आहोतच पण त्याचबरोबर आपल्यापैकी कोणाची एखाद्या नवीन गरजु संस्थेची ओळख झाली असेल तर त्याबद्दलची माहिती मागवत आहोत.

ज्या संस्थेला वस्तुरुपात मदत हवी असेल त्याबद्दल खालीलपैकी शक्य तितकी माहिती द्यावी.

१. संस्थेचे नाव. (संस्था नोंदणीकृत असावी), संस्था कोणासाठी व कशा प्रकारचे काम करते याबद्दल थोडक्यात माहिती.
२. वेबसाइट असेल तर त्याचा दुवा
३. संस्थेला सरकारी वा बाहेरुन अतिशय कमी मदत मिळत असावी. आपण अशाच संस्था निवडतो.
४. संस्थेला सध्या ज्या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे त्याची यादी व प्रमाण. तसेच त्या वस्तू विकत घेण्यासाठी किती पैसे लागू शकतील ते लिहावे.
५. आयकरात सूट मिळू शकत असेल तर तेही लिहा. पण बहुतेकवेळा ती सूट संस्थेला पैशाची मदत केली तरच मिळू शकते, वस्तुरुपात केली तर नाही.
६. संस्थेत या संदर्भात कोणाला संपर्क करायचा त्या व्यक्तीचे नाव, हुद्दा, संपर्क क्रमांक, वेळ, ईमेल इ. तपशील

२०१० मधे हा उपक्रम सुरु करण्यात आला. केलेल्या कामाची माहिती खाली देत आहे.

वर्ष २०१०

देणगीदारांची संख्या – १३
एकुण जमा देणगी - रुपये ५३,३८८/-
१. संस्था - पुण्यातील कोथरुड येथील अंधशाळा
अंधशाळेच्या मुलींना अत्यावश्यक अशा गोष्टी काही महिन्यासाठी (रक्कम रुपये ९६००) व रोख (१०,०००/-+७०९४ )
२. सुमती बालवनाला २६६९४ / - मुलांसाठी १० चटया आणि निवासी मुलांना लागणार्‍या कपाटांसाठी दिली.

वर्ष २०११

देणगीदारांची संख्या – १७
एकुण जमा देणगी - रुपये ५६,८१०/-.
संस्था - पुण्यातील कोथरुड येथील अंधशाळा
१. संस्था - पुण्यातील कोथरुड येथील अंधशाळा
अंधशाळेला ज्या वस्तु देण्यात आल्या त्यांची किंमत >> रुपये ३६,०००/-
वस्तु अंधशाळेला पोचवण्यासाठी आलेला खर्च >> रुपये ८१०/-.

२. सावली ट्रस्टला दिलेली रक्कम >> रुपये २०,०००/- ज्यातुन ४ मुलांच्या वर्षाच्या शिक्षणाचा व इतर काही निघु शकला.

वर्ष २०१२

एकूण देणगीची रक्कम रुपये ५०,५१५.२६ एवढी जमली.
देणगीदार - अंदाजे १५.
त्यापैकी ३५००० रुपये पुणे, कोथरुड येथील अंधशाळेला वस्तूरुपाने मदत दिली.
महिलादिन २०१२ गरजू संस्थेला मदत उपक्रमात जमा झालेल्या निधीतून १४,००० रुपयांच्या सोलापूर येथून खरेदी केलेल्या १०० सिंगल कॉटन प्रिंटेड बेडशीट्सची मदत सटाणा, जि. नाशिक येथील निवासी अपंग कल्याण केंद्राच्या वसतिगृहातील मुलांना करण्यात आली. तसेच ह्या संस्थेच्या वाचनालयाला १९ पुस्तके भेटीदाखल दिली.

वर्ष २०१३

देणगीदारांची संख्या - २०
एकुण जमा देणगी - १,३८,२६९.१० रुपये

संस्था - शबरी सेवा समिती
तीन वजनकाटे - रुपये २५५०/-
आदिवासी भागात चालविल्या जाणार्‍या १२ मराठी माध्यमाच्या शिशुशाळांसाठी शैक्षणिक साहित्य - रुपये २६.९६२/-
पुस्तके - रुपये १,३९६/-

संस्था - भगीरथ ग्राम विकास
२७ सौरदिव्यांचे वाटप - रुपये ४०,५००/-
संस्थेच्या शाळेतील मुलांसाठी चालविल्या जाणार्‍या वाचनालयासाठी व मोठ्यांसाठीच्या वाचनालयासाठी २६ पुस्तके - रुपये ५,७०७/-

संस्था - पुण्यातील कोथरुड येथील अंधशाळा
सीकॉन कंपनीचा सॅनिटरी नॅपकिन इन्सिनरेटर (डिस्पोझल युनिट) - रुपये ३८,३००/-

एकुणे वस्तुरुपात दिलेल्या देणगीची रक्काम - १,१५,४१५ रुपये

उरलेली रक्कम अंधशाळेच्या मुलींना नियमीत लागणार्‍या हायजीन वस्तुंकरता ठेवलेली आहे. आतापर्यंत ह्याचा विनियोग होऊ शकला नाही ह्याचे कारण गेली ३ वर्षे आपण जो स्टॉक दिला तो बराच जास्त झाला व तो अजुनही संपलेला नाही. अंधशाळेच्या मुख्याध्यापिकांनी स्टोक जेव्हा संपत येइल तेव्हा ताबडतोप कळवु असे सांगितले आहे. अंदाज आहे की ह्या मे-जुनमधे त्यांना नविन स्टॉक लागेल तेव्हा ही रक्कम वापरु).

ह्याशिवाय मैत्री, सावली, सटाणा ह्या संस्थांना देखील देणग्या मिळाल्या.

तर आजपर्यंत आपण ज्या संस्थांपर्यंत पोचु शकलो त्यांची पुन्हा एकदा यादी,

शबरी सेवा समिती
भगिरथ ग्रामविकास
कोथरुड अंधशाळा
मैत्री
सटाणा येथील अपंग मुलांसाठी चालवण्यात येणारी संस्था (सटाणा निवासी अपंग कल्याण केंद्र)
सावली सेवा ट्रस्ट

ह्यावर्षी पण सर्व संस्थांना संपर्क करुन त्यांना मुलांसाठी कशाची गरज आहे विचारुन घेतले जाईल व मिळालेल्या देणगीतुन जितकी गरज भागवता येइल तितकी भागवली जाईल.

विशेष सुचना -
सावली संस्थेतर्फे ज्या मुलामुलींच्या शिक्षणाची व इतर गोष्टींची देखील काळजी घेतली जाते त्यातल्या काही मुलांच्या शिक्षणाचा खर्च बर्‍याच मायबोलीकरांनी उचलला आहे. यंदाचे हे तिसरे वर्ष. ह्या वर्षीच्या देणग्या देखील ह्याच उपक्रमाद्वारे मागवल्या जातील. जुनमधे मुलांच्या शाळांच्या फिया भराव्या लागतील.

वर आवाहन केल्यानुसार ह्याशिवाय अजुन काही गरजु संस्थेची तुम्हांस माहिती असेल तर अवश्य कळवा.

अधिकाधीक संस्थांपर्यंत पोचायचे धाडस केवळ मायबोलीकर देणगीदारांमुळेच करत आहोत. हा उपक्रम संस्था व देणगीदार ह्यांच्यातले केवळ माध्यम आहे.

देणग्या, महिला दिन ८ मार्च पासुन मागवण्यास सुरु करत आहोत.

ह्यावर्षी उपक्रमात सहभागी होत असलेली नावे,
अरुंधती कुलकर्णी, मो, स्वाती२, कविन, केदार जोशी, सुनिधी.

अजुन ज्यांची इच्छा आहे त्यांनी जरूर सहभागी व्हावे.

धन्यवाद

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा उपक्रम गेली काही वर्षे सातत्याने चालवत आला आहात त्या बद्दल तुमचे (अरुंधती कुलकर्णी, मो, स्वाती२, कविन, केदार जोशी, सुनिधी) कौतुक आणि अभिनंदन!!!

>>हा उपक्रम गेली काही वर्षे सातत्याने चालवत आला आहात त्या बद्दल तुमचे (अरुंधती कुलकर्णी, मो, स्वाती२, कविन, केदार जोशी, सुनिधी) कौतुक आणि अभिनंदन!!!>> सहमत.

अतिशय स्तुत्य उपक्रम! मला देणगी द्यायला नक्की आवडेल. सध्या वेळ देऊ शकणार नाही:( जर काही नवीन संस्थांना मदत करण्याचा विचार असेल तर माझ्या ओळखीची एक अस्तित्व प्रतिष्ठान नावाची संस्था आहे जी लहान मुलांसाठी गुरुकुल नावाची निवासी शाळा चालवते. ह्या उपक्रमाची प्रमुख गीतांजली देगांवकर हिला मी खूप वर्षांपासून ओळखते! अतिशय गोड आणि समर्पित व्यक्तिमत्व आहे तिचं. मी अधिक नेमकी (वर विचारलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने) माहिती मागवली आहे. पण माझ्याकडे असलेल्या माहितीपत्रकातील काही माहिती इथे देत आहे.
1. Astitva Gurukul-
Every year thousands of people from nomadic tribe migrate all over Maharashtra. They cannot stay at any place for more that 8-10 days’. So the problem for education and for basic needs is same. Astitva started the school for these children before 6 years. The volunteers found that these children are the first generation attending the school. They also found that so many of
them are parentless or staying with single parent. So they are not having proper guidance. Due to the poor economic condition they are becoming child labor. Most of the parents, basically mother (father is no-more) is HIV +ve. So the mother and the kids are not getting any help or support from family and community. Astitva started the residential school for these children which are known as “GURUKUL”. Volunteers are working for children all round development. Library, Computer knowledge and sports are in daily routine.45 students are getting education in the Gurukul. Astitva is running school from class 1st to 7th. From class 8th, the students enrolled in nearer village.

आपल्यापैकी कोणाची एखाद्या नवीन गरजु संस्थेची ओळख झाली असेल तर त्याबद्दलची माहिती मागवत आहोत>>

'मैत्री' ही नवीनच माहित झालेली संस्था नाही, तरीही त्या संस्थेचा विचार होईल ना? येत्या शैक्षणिक वर्षासाठी, मेळघाटात जाऊ शकणार्‍या स्वयंसेवकांसोबत तिथल्या मुलांकरता (पाट्या ई. मागच्याच वर्षी दिले असल्याने) काही वैज्ञानिक खेळणी (शाळेत एक किंवा दोन अशी सामाईक), पेटीतील प्रयोगशाळा (टीनपासून बनवलेली पेटी ही मेळघाटात अजूनही प्रचलित आहे, त्यामुळे त्या तिकडूनच बनवून घेतल्या जातील. असे केल्याने काही प्रमाणात का होईना स्थानिक कारागिरांना रोजगारही उपलब्ध होणार आहे, विज्ञान विषयक वस्तु मात्र इथे पुण्यात किंवा जिथे किफायतशीर ठरेल तिथे खरेदी करता येऊ शकेल) असे नवीन उपक्रम ठरत आहेत. मेळघाटातल्या कोणत्याच शाळांमधे नीट अशी प्रयोगशाळा नाहीये. त्यामुळे काही मायक्रोस्कोप, स्लाईडस् टेस्ट टयुबस असा एक संच एका पेटीत अशा प्रकारे एका शाळेत विद्यार्थी संख्येनुसार १/२ पेट्या द्यायच्या ज्या इतरही शाळांमधून फिरवता येतील अशी योजना आहे.

त्या करता नीट सुस्पष्ट असे निवेदन तयार करून झाले की इथे टाकेनच.

मैत्री संस्थेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी संस्थेच्या वेबसाईटचा दुवा. Happy
http://www.maitripune.net/Home.html

हा उपक्रम गेली काही वर्षे सातत्याने चालवत आला आहात त्या बद्दल तुमचे (अरुंधती कुलकर्णी, मो, स्वाती२, कविन, केदार जोशी, सुनिधी) कौतुक आणि अभिनंदन!!! >>>> +१ अनुमोदन Happy

हा उपक्रम गेली काही वर्षे सातत्याने चालवत आला आहात त्या बद्दल तुमचे (अरुंधती कुलकर्णी, मो, स्वाती२, कविन, केदार जोशी, सुनिधी) कौतुक आणि अभिनंदन!!! >>>> +१

हा उपक्रम गेली काही वर्षे सातत्याने चालवत आला आहात त्या बद्दल तुमचे (अरुंधती कुलकर्णी, मो, स्वाती२, कविन, केदार जोशी, सुनिधी) कौतुक आणि अभिनंदन!!! >>>> +१

हा उपक्रम गेली काही वर्षे सातत्याने चालवत आला आहात त्या बद्दल तुमचे (अरुंधती कुलकर्णी, मो, स्वाती२, केदार जोशी, सुनिधी) कौतुक आणि अभिनंदन!!>>. +१

ह्यात माझ्यानावाचं शेपूट ह्यावर्षीच जोडलं गेलय. मला ही संधी दिल्याबद्दल ह्याआधीपासून हे काम करणार्‍या सगळ्यांनाच धन्यवाद. Happy

हा उपक्रम गेली काही वर्षे सातत्याने चालवत आला आहात त्या बद्दल तुमचे (अरुंधती कुलकर्णी, मो, स्वाती२, केदार जोशी, सुनिधी) कौतुक आणि अभिनंदन!!>>. +१

मी ही यालाच मम म्हणतो
>> हा उपक्रम गेली काही वर्षे सातत्याने चालवत आला आहात त्या बद्दल तुमचे (अरुंधती कुलकर्णी, मो, स्वाती२, कविन, केदार जोशी, सुनिधी) कौतुक आणि अभिनंदन!!!

मी एक वेबसाईट बनवली आहे. अजुन अपूर्ण आहे पण पहिलं पान पाहु शकता. अनेकदा काही आजार जे पूर्ण बरे होत नाहीत, किंवा त्याच्याशी मैत्री करुन आयुष्य काढावं लागतं ती मंडळी स्वतः एकमेकांना मदत करण्यासाठी एकत्र येतात. मला आधार/मदत गट आणि पाठपुरावा केंद्रांची माहिती माझ्या वेबसाईटवर द्यायची आहे. प्रत्येक गटाला एक पान विनाशुल्क द्यायचे आहे. अशा तर्‍हेने त्यांना वेबवर जागा मिळेल आणि त्यांचा संपर्क वाढेल. अनेकांना त्यांच्या उपक्रमांचा फायदा घेता येईल. शोभनाताईंच्या पार्किन्सन्स मित्र मंडळाचा समावेश केला आहेच.

मला आर्थिक मदत नकोय. फक्त कुणाला अशा तर्‍हेच्या गटाची माहिती असल्यास मला कळवावी.

या वेबसाईटवर ज्या गटांचा समावेश होईल ते एनजीओ नसावेत, एखाद्या ट्रस्टशी किंवा धार्मिक संस्थेशी संबंधीत नसावेत. ज्यांना काही आजार आहे अशी माणसे किंवा त्यांचे नातेवाईक यांनी पुढाकार घेऊन हे गट सुरु केलेले असावेत आणि त्यात कामे करणारी माणसे ही पगारावर नसावीत. अशा तर्‍हेचे "इन्फॉर्मल" स्वरुप ज्यांचे आहे अशा गटांची माहिती हवीय.

वेबसाईटचा पत्ता : http://www.anubandh.org/

हा उपक्रम माझ्या संशोधनाशीदेखिल निगडीत आहे. अनेकांकडे जाऊन माहिती मिळवावी लागणार आहे. तेव्हा डोक्यात असा विचार आला कि आपण नुसती माहिती मिळवुन आपले संशोधन करण्यापेक्षा यांच्या संघर्षात थोडासा आपलादेखिल वाटा उचलावा. तेव्हा ही साईट बनवली. आपल्या सुचनांचे स्वागत आहे.

हा उपक्रम गेली काही वर्षे सातत्याने चालवत आला आहात त्या बद्दल तुमचे (अरुंधती कुलकर्णी, मो, स्वाती२, कविन, केदार जोशी, सुनिधी) कौतुक आणि अभिनंदन! Happy

या उपक्रमात सहभाग / काम करणे म्हणजे काय अपेक्षित आहे? ते सांगु शकाल का? शक्य असल्यास मदत करायला आवडेल.

हा उपक्रम संस्था व देणगीदार ह्यांच्यातले केवळ माध्यम आहे. >>> लोकहो हे अगदी योग्य आणि नेमक्या शब्दात लिहिलेले आहे. गेले काही वर्ष हा उपक्रम चालू आहे. तो केवळ तुमच्यामुळे !! ह्यात आम्ही सर्व भुमिका निभावतो ती मेसेंजरची, पैसे आणि सामान पोचते करण्याची. आणि पारदर्शीरितीने इथे तो पूर्ण व्यवहार लिहिण्याची. तस्मात तुमच्या सहकार्याची (आर्थिक) गरज आहे. तरच असे उपक्रम यशस्वी होऊ शकतात.

सर्वांना धन्यवाद!

जाई, नाव नोंदवून घेतले आहे.

हर्पेन, ओक्के.

अतुल ठाकुर, साईट बघते.

सावली, उपक्रमात दोन प्रकारे सहभागी होता येते. गरजू संस्था / मुलांना आर्थिक मदत करणे हे तर आहेच! शिवाय ह्या उपक्रमातील स्वयंसेवक मंडळी जे काम करत आहेत त्यात सहभाग - वेगवेगळ्या गरजू संस्थांची माहिती जमा करणे, ती बाफाच्या हेडर मध्ये दिलेल्या निकषांनुसार तपासून पाहणे, त्यानुसार मायबोलीकरांना आवाहन - संपर्क इत्यादी, गरजू संस्थेला कोणत्या वस्तूंची आवश्यकता आहे ही माहिती घेणे, त्यानुसार त्यासाठी आवश्यक निधीचा अंदाज घेणे व तसे आवाहन, वस्तूची खरेदी, त्या वस्तू गरजू संस्थेपर्यंत पोहोचविणे, पावत्या - अपडेट्स - फोटोग्राफ्स हे देणगीदात्यांपर्यंत पोहोचविणे, बाफावर अपडेट्स देत राहाणे, संस्थेचा फॉलो-अप ठेवणे इ. इ. आवश्यक तशी फोनाफोनी, इमेल्स, संस्थेला प्रत्यक्ष भेट इ. आणि सर्व स्वयंसेवकांचा परस्पर-समन्वय साधणे.

थोडक्यात एखाद्या मेसेंजरचे काम. Happy

मंडळी, या उपक्रमासाठी मदतनीस म्हणून यावर्षी मी पहिल्यांदाच सहभागी होत आहे. मला सहभागी केल्याबद्दल आभार. यापूर्वी एक देणगीदार यापलीकडे माझा फारसा सहभाग नव्हता. दरवर्षी हा उपक्रम पार पाडण्यासाठी बरेच मायबोलीकर आपला बहूमोल वेळ देऊन विविध प्रकारे मदत करतात. काही माबोकरांच्या कुटुंबीयांनीही यात सहकार्य केले आहे. मायबोलीकरांनी केलेली आर्थिक मदत आणि ती मदत योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी स्वयंसेवकांनी देऊ केलेला वेळ यामुळेच हा उपक्रम सातत्याने सूरु आहे.

काल गीतांजली ताईला इमेल केली होती त्याचे उत्तर म्हणून तिने खालील माहिती पाठवली आहे. ह्यात पहिल्या आणि सहाव्या प्रश्नाचे अधिक सविस्तर उत्तर (संस्थेच्या कामाची थोडक्यात माहिती व नेमकी गरज) देण्यास तिला सुचवते आहे. हा धागा संयुक्तामध्ये असल्याने त्याचा दुवा तिला दिला नाही. तिच्याकडून माहिती कळली की हा प्रतिसाद संपादित करेन. गीतांजली ताई पुण्यात असते. ह्या उपक्रमात ज्या पुण्यातील सहभागी व्यक्ती असतील त्या तिची अथवा ती त्यांची भेट घेऊ शकेल.
१. संस्थेचे नाव:- अस्तित्व प्रतिष्ठान
संस्थेचे कार्य:
>संस्था गुरुकुल चालवते ते खूप गरीब, एकच पालक असलेल्या मुलामुलींसाठी निवासी शाळा म्हणून. बहुतेक मुलेमुली शाळाबाह्य व बालमजूर असून, काही पालक HIV +ve आहेत. या मुलामुलींसाठी संस्था निवासी शाळा चालवीत आहे. या मुलांनी स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभे राहावे यासाठी त्यांना व्यवसाय प्रशिक्षणही दिले जाते.
> संस्थेच्या माध्यमातून बचतगट, सेंद्रिय शेती इ. विषयावर प्रशिक्षण दिले जाते. शहराकडे होणारे स्थलांतर कमी होऊन गावांचा विकास व्हावा हे मुख्य ध्येय आहे
२. नोंदणी :- ट्रस्ट अंतर्गत : क्रमांक :- ई ४१०४ पुणे
३. वेबसाईट चे काम सध्या सुरु केले आहे.
४. मदत :- संस्थेला कुठलीही सरकारी मदत मिळत नाही. काही लोकांकडून थोडीफार वस्तुरूप मदत मिळते आहे.
५. आयकरात सवलत ८०G अंतर्गत आहे. शिवाय आता FCRA (परदेशी मदतीसाठीची मान्यता) मिळाली आहे त्यामुळे तीही अडचण येणार नाही.
६. संस्थेच्या नितांत गरजा :- संस्थेच्या मुलांसाठी पाणी शुद्धीकरण साठी एखादे उपकरण, Fridge इ. साठी गरजेची आहे. शेतीमध्ये ठिबक सिंचनासाठी देखील आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे.
मला वाटते गरजा तर खूप आहेत, पण तुमच्यातर्फे मिळणारी कोणतीही मदत आमच्या दृष्टीने मोलाचीच आहे. कारण ती अत्यंत आत्मीयतेने मिळणार आहे.
७. संपर्क व्यक्ती:- गीतांजली देगावकर,
अध्यक्ष,
०९८९०६९०५१३,
वेळेची काही अडचण नाही.
e-mail :-astitvapune२८@gmail. com
geet.astitva@gmail.com

मला एक प्रश्न पडला आहे! हा धागा संयुक्ता पुरता मर्यादित ठेवण्याचे काय कारण आहे? धागा सार्वजनिक केला तर अधिक मदत मिळू शकेल. की केवळ संयुक्ता सभासदांनी जमवलेला निधी वापरावा अशी कल्पना आहे?

Oh Awesome! Thank you Cinderella! मी ताबडतोब ही लिंक पाठवते तिला! धागा सार्वजनिक आहे हे कसे ओळखावे? (जर header मध्ये संयुक्तापुरता अशी ठळक अक्षरातील सूचना नसेल तर?)

धाग्याच्या हेडरखाली 'निवडक दहात नोंदवा'च्या खाली पण उजव्या बाजूला 'फक्त ग्रूप सभासदांसाठी' असं लिहिलेलं दिसेल.

जिज्ञासा, फाईल दिसत नाहिये. टाकली आहेस असे वाटले. नसेल टाकली तर टाक किंवा संपर्कातुन पाठवशील प्लिज.
सर्वांना धन्यवाद.

ह्यावर्षीपासुन ह्या उपक्रमाबाबत(देणग्या मागवायची पद्ध्त) मायबोलीचे धोरण थोडे बदलले आहे व ते देणग्या मागवायला सुरुवात करु तेव्हा लिहुच. ते धोरण ठरेपर्यंत धागा थांबवला होता.

अ‍ॅडमिन, सर्व कामे सांभाळताना ह्यातही लक्ष घालुन नवीन धोरण निश्चित करुन धागा पुन्हा चालु केला त्याबद्दल तुमचे खुप आभार.

ह्याही वर्षी खुप प्रतिसाद मिळेल अशी आशा.

विक्रम, स्नेहालयाच्या माहितीबद्दल आभार. वर लिहिल्याप्रमाणे स्नेहालयाला कोणत्या वस्तुंची गरज आहे ते कळवु शकाल का?

अकु, लगेच सर्वांना उत्तरे लिहिल्याबद्दल धन्यवाद.

सिंडरेला, धन्यवाद!
सुनिधी, नाही वर्ड फाईल टाकली नाहीए कारण त्यात फार general माहिती आहे. ह्या धाग्याचा दुवा ताईला पाठवला आहे. धागा वाचून तिला नेमकी काय माहिती अपेक्षित आहे ते कळेल मग मी ती माहिती इथे लिहीन. शिवाय पुण्यातील कोणीतरी तिला प्रत्यक्ष भेटू वा तिच्याशी बोलू ही शकेल.

गीतांजली ताईकडून आलेल्या माहितीप्रमाणे माझा आधीचा प्रतिसाद संपादित केला आहे. त्यात आता संस्थेच्या कार्याची थोडक्यात ओळख आणि सध्याच्या नितांत गरजा याचा समावेश आहे.

Pages