एका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन.

Submitted by निलेश भाऊ on 14 February, 2014 - 03:21

एका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन.
DSCN5454.JPG
रस्ता नसलेली महाराष्ट्रातील अनेक आदिवासी गावं आजही विकासाच्या प्रतिक्षेत आहेत. माची प्रबळ हे अशाच अनेक गावांपैकीच एक आदिवासी गाव, एका रस्त्याने आडलेल्या या गावातील लोकांच्या जगण्याचा मार्ग सरकार कधी सुकर करणार? हाच प्रश्न आदिवासी बांधवाना पडलेला आहे. प्रबळगडांच्या कुशीच्या पायथ्याशी असणारे हे गाव. हयाच प्रबळगडावर ब्रिटीश राजवटीत माथेरान विकसित करण्याचे ठरले होते परंतु पाण्या अभावी इग्रंजानी हा विचार मागे घेतला. आज अनेक योजना आदिवासी विकास साधण्यासाठी अस्तिवात आहेत, परंतु त्या खरच खऱ्या-खुऱ्या आदिवासी पर्यत पोहचतात का? याचे सरकारला देणे-घेणे नसते असेच म्हणावे लागेल. थोडक्यात आपल्या शासनकर्त्याना योजना बनवता येतात पण राबवता येत नाहीत हेच दिसून येते. सन २००६ च्या हिवाळी आधिवेशनात याच आदिवासी गावाला आदिवासी विभागातून रस्ता व पुल विकास कामासाठी ६३ लाख निधी मजूर झाला होता. सदर निधीचे वाटप बांधकाम विभागाकडे झाले होते. पुढे या निधीचे काय झाले या साठी माहितीच्या आधाराखाली माहिती मागितली असता सदर निधी मधून गाव ठाकुरवाडी ते गाव माची प्रबळ या दरम्यान रस्ता व पुल झाल्याची माहिती मिळाली.पण एक कटुसत्य की हा रस्ता आणि पुल फक्त बांधकाम विभागाच्या लेखी होते. प्रत्यक्षात ते काम झालेच नाही. मग प्रश्न निर्माण होतो की रस्ता गेला कुठे ? मग अशाच अनेक योजना कागदावर पुर्ण होतात. पण प्रत्येक्षात जातात कुठे ? याची जाणीव सरकारला कधी होणार कुणास ठाऊक?
स्वातंत्र्याच्या ६६ वर्षापासून राज्यातील अनेक आदिवासी गावांना अजून रस्तेही पहायला मिळत नाही. यामुळे सरकार नावाची गोष्ट दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी गावापर्यत पोहचण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राज्यातील अशाच शेकडो दुदैवी गावापैकी असलेले ब्रिटिश राजवटीपासून हिल स्टेशन होण्यापासून वंचित राहिलेले माजी खाजदार श्री रामशेठ ठाकूर व आमदार श्री प्रशांत ठाकूर यांच्या पनवेल तालुक्यातील हे माची प्रबळ गाव.देशातील मुंबई, पुणे, ठाणे, नवीमुंबई,पनवेल, रसायनी या सारख्या महत्वाच्या शहरांच्या आवघ्या काही किलो मीटर आंतरावर असलेले हे गाव निसर्गाच्या आणि इतिहासाच्या कुशीत वसलेले गाव रस्ताविरहित आहे. गावात जायचे झाले तर डोंगर चढून कडया-कपाऱ्यातून वाट काढत जावे लागतं. खरं तर रस्त्याचे काय महत्व असते हे गावात गेल्याशिवाय इथल्या लोकांच्या वेदना ऐकल्या शिवाय कळत नाही. असं म्हणतात की एक रस्ता विकासाच्या अनेक वाटा गावात घेऊन येत असतो. पण इथल्या माणसांना विकासाच्या वाटांची स्वप्नच पडत नाहीत. त्यांना रस्ता हवाय तो रोजचं जगणं सुकर करण्यासाठी.गावातील गरोदर स्त्रिाया आजारी माणसे, शाळकरी मुले, तसेच वयस्कर माणसांना डोंगर उतरणे-चढणे शक्य होत नाही. परिणामी आजारी माणसांना वाहून नेण्यासाठी त्यांना जूनही डोलीचा आधार घ्यावा लागतो. उच डोंगर माथ्यावरुन खाच–खळग्यातून किलो मीटरची पायपिट करुन आलिवली प्राथमिक केंद्रात न्यावे लागते. त्यामुळे अनेकदा उपचार अभावी त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागते. याचा परिणाम काही वर्षापुर्वी कै.नामी गंधू वाघ या स्त्रीला सर्पदंश झाल्याने दुदैवी मरण आले .गावात चौथी पर्यत शाळा आहे. त्यासाठी दोन शिक्षक होते. परंतु मागील वर्षापासून एकाच शिक्षकाची शाळेवर हजेरी लागते. ते रोज पनवेल (नेरा) ते ठाकुरवाडी पर्यत गाडीवर येतात. पुढे माची प्रबळ पर्यत चालत येतात. शिवाय पुढील शिक्षणासाठी गावातील मुलांना पायपिट करुन दुसऱ्या गावी जावे लागते. दुसऱ्या गावात शाळेत जाण्या-जाण्याचे अंतर 8 ते 10 किलोमीटर असल्याने शिक्षणाची वाट बंद पडलीय. जी अवस्था शिक्षणाची आहे तिच अवस्था आरोग्याची आणि रोजगाराची आहे. गावातील लोक व्यवसाय म्हणून भाजीपाला लावतात व वन विभागाच्या जमिनीवर नाचणी, वरई करतात. तसेच जंगलात करवंदे, तोरण, कुळीद, कडुकंद, चिकटी, रानकेळी अश्या अनेक रानभाज्या मोठया प्रमाणात उपलब्ध असून हा तो मोठया बाजारपेठेत रस्ता नसल्याने घेऊन जाता येत नाही. त्यामुळे होईल तेवढा भाजीपाला डोक्यावर घेऊन आजुबाजुच्या गावामध्ये फिरुन विकावा लागतो. शिवाय डोक्यार लाकडे घेऊन ती विकून त्या पैस्यावर उधर्निर्वह करावा लागतो. आदिवासी लोक हा व्यवसाय अनेक वर्षापर्यत अशाच पध्दतीने करत आले आहेत त्यामुळे त्यांच्या डोईवऱ्या संघर्षाच्या ओझ्याने जीवन अतिशय कठिण बनले आहे

प्रबळगड
1_1.jpg
हा किल्ला माची प्रबळ गावाच्या कडेलाच लागून आहे हा किल्ला शिवकालीन आहे. त्याच किल्यावर माथेरान हिल स्टेशन म्हणून ब्रिटिश सरकारची योजना होती. परंतु पाण्या अभावी या किल्याचा माथेरान म्हणून विकास झाला नाही. जर प्रबळगडावर विकासाच्या दुष्टीने नजर फिरवली. तर माथेरान आणि प्रबळगड यामध्ये समानता दिसून येते.प्रबळगडावर शिवाय प्रबळगडावर एक श्री.गणेश मंदिर अनेक बुरुज, पाण्याची टाके, विविध पॉईट आहेत. बोरीची सोड या पॉईट वरुन तुम्हाला मुंबई, रसायनी, नवीमुंबई, पनवेल, गा्ढी नदी, कर्नाळा किल्ला याचे दर्शन घडून येते. त्याच प्रमाणे धोकीचा पॉईटवरुन माथेरान सहज दिसते व कलांवतीन पॉईट वरुन कलावंती, पेण किल्ला, चांदेरी, गाढीनदी याचे दर्शन घडते. शिवाय काळाबुरुज पॉईटवरुन मोरबे धरणाचे जवळून दर्शन होते.

कलावंती दुर्ग-
kalavantin-speps-1.jpg
हा दुर्ग देखील माचीप्रबळ गावाच्या कडेला लागून आहे. या दुर्गावर चढून जाण्यासाठी खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत. कोण्या राज्याचे कलावंती राणीवर प्रेम होत. ती त्याला सोडून जावू नये म्हणून त्याने कलावंती दुर्गाच्या माथ्यावर एक महल बांधला होता. याच माथ्यावर शिमग्याच्या सणाला माचीप्रबळ गावातील आदिवासी नृत्य करतात. हया दर्गाचे रुप इतके सुंदर आहे की या दुर्गाची पुर्वीकाळी सोडून गेलेल्या 33 जगामधील ठिकाणामध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे कलावंती दुर्गाचा 11 वा नंबर लागतो. परंतु अजूनदेखील याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले जात नाही.

माची प्रबळ गाव-
207264_199183040113870_7986545_n.jpg
माची प्रबळ गावालगत प्रबळगड आहे. कलावंतीन दुर्ग असा इतिहासकालीन ठेवा तर आहेच परंतु माची प्रबळ गावाच आजुबाजुचा परिसर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. माचीप्रबळ गावात पोचण्याअगोदर एका मोठया दगडावर जय हनुमान व श्री गणेशमृर्ती कोरलेली दिसून येते. शिवाय गावाच्या उजव्या हाताला एक पुराणिक शिवमंदीर आहे. व रात्री कडयावरुन मुंबई, पनवेल, रसायनी शहर विद्युत रोषणाईमुळे एखादया लग्न सराई प्रमाणे नटलेले दिसते.
59281_151245921567061_100000449610724_337763_788695_n.jpg

जर सरकारनं मनात आणलं तर या गावाचा कायापलट होऊ शकतो. या ठिकाणाचा समावेश माथेरान, महाबळेश्वर यासारख्या थंड हवेच्या ठिकाणामध्ये समावेश होऊ शकतो. एवढेच नव्हे तर तेथे एक उत्तम प्रकारचे आदिवासी पर्यटन ठिकाण म्हणून धिक महत्व या ठिकाणाला मिळू शकते. आज आदिवासीचे जगल, आदिवासीची संस्कृती आदिवासीच्या जगलातील रानमेवा यांची जर योग्यरित्या जपवणूक केली तर भविष्यात या ठिकाणाला नजिकच निर्माण होणारे मेगासिटीसारखे आंतरराष्ट्रीय उद्योग आणि पनवेल नजीकचे नवीन होणारे विमानतळ तसेच मुंबईृ, नवीमुंबई, ठाणे, पुणे, पनवेल या सारख्या मोठया शहरातून पर्यटकांचा ओढा मोठया प्रमाणात येऊ शकतो. यामुळे या ठिकाणला माथेरान आणि महाबळेश्वरसारख्या ठिकाणासारखा दुसरा पर्याय जगासमोर उभा राहील. शिवाय तेथील आदिवासी लोकांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊल हे नक्की. तसेच प्रबळगड हा माथेरान म्हणून निवड होऊन देखील पाण्याअभावी माथेरान येथे विकसित झाले नाही. त्यासाठी सध्या पाणी म्हणून पर्याय प्रबळगडाच्या मागच्या बाजूला मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे धरण हा पर्याय देखील सध्या उपलब्ध झाला आहे. जर विकासाच्या नजरेने पाहिले तर हया ठिकाणाचा विकास करणे अधिकच सोपे झाले आहे. पण त्यासाठी लागणारी मानसिकता सरकारकडे नाही. प्रत्येक निवडणूकीत स्थानिक नेत्याकडून निवडणूकीच्या तोडावर आश्वासनांची खैरात वाटली जाते. पण येथे अजुनही एका रस्त्याअभावी एक आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन ठिकाण म्हणून विकासासाठी नजर लावून बसलेले दिसते. 2006 च्या हिवाळी अधिवेशनात या गावाच्या रस्त्याचा मार्ग सुकर झाला होता. परंतु सदर निधी बांधकाम विभागाकडे सोपवला होता. याचा तपशलि माहिती अधिकारात विचारली असता सदर निधीतून ठाकूरवाडी ते माची प्रबळ दरम्यान रस्ता तयार केला आहे. अशी माहिती मिळाली. परंतु प्रत्येक्षात पाहिले तर ते फक्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी आहे. प्रत्यक्षात तेथे रस्ताच नाही. यामुळे यामध्ये नेमक काय तथ्य आहे. हे गावातील सर्वसामान्य आदिवासी लोकांना कळत नाही. काही ठिकाणी डोंगर फोडून रस्ता बनवायला लागेल त्यामुळे या गावाची कहाणी प्रतिनिधीक आहे. त्या आदिवासीच्या दुदैवी दशावताराला सरकारची उदासिनता जबाबदार आहे. एका रस्त्याने अडलेले आदिवासी गाव व विकासाच्या प्रत्यक्षात असलेले नविन आदिवासी पर्यटन ठिकाण एका रस्त्याने अडवलेल्या या गावाचा जगायचा मार्ग सरकार सुकर करणार का? हाच प्रश्न तेथील आदिवासीकडून विचारला जातोय.

ठिकाणाबद्दल अधिक माहिती http://machiprabal.weebly.com/

प्रतिक्रिया – संपर्क – इ-मेल – neel.nilesh0506@gmail.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीलेश भाऊ
खपूच छान लेख लिहिलाय. खरोखरच दयनीय अवस्था आहे तेथील लोकांची. मुंबई, पुणे सारखी नगरे एवढ्या जवळ असून, अजूनही विकस होत नाही हे दुर्देवच म्हणावे लागेल. माथेरानचा विकास जर त्याकाळी ब्रिटिशांनी केला नसता तर आज त्याचीही अवस्था प्रबळ गावासारखीच झाली असती. खूप वर्षांपूर्वी प्रबळगडावर गेलो होतो. माथेरानला गेल्यावर समोरील प्रबळगडावरील भगवा ध्वज फडकताना दिसतो. प्रशासनाने नक्कीच या परिसराचा विकास करायला हवा.

:-

छान लेख. मोंढा गावातील लोकांनी दिलेल्या लढ्याची या लोकांना अवश्य ओळख करून द्या.

जय सर प्रथम तुमचे मनापासून आभार मानतो, मी त्याच प्रबळगड आदिवासी गावातील मुलगा , हि माझ्या गावाची खरी परिस्थिती, आमच्या या समस्या सोडवण्यासाठी कोणीतरी मोठ्या मनाचा माणूस पुढे येईल यासाठीच मी या परिस्थिवर आधारित लेक तयार केला आहे. जमले तर हि माहिती जास्तीत- जास्त चागल्या लोकांपर्यंत पोहवण्यासाठी नक्कीच तुम्ही शेर करू शकता मला जर राहुल गन्धि सरांचा इमैल एडी मिळाला तर बरे होईल मी त्यांना हि माहिती मैल करेन. पुन्हा एकदा मनापासून तुमचे आभार !

निलेश इतर कुणी आपल्यासाठी काही करेल याची वाट बघण्यात अर्थ नाही. लोकशाही आहे ना भारतात मग आपणच सरकार. तूम्ही मिलिंद बोकिल यांचे पुस्तक घेऊन गावात सार्वजनिक वाचन करा. ते नाही मिळाले तर चित्रलेखाच्या दिवाळी अंकातला संध्या नरे पवार यान्चा लेख अवश्य वाचा. ( त्यांच्या वेबसाईटवर मिळेल तो. )

>>>> सदर निधीचे वाटप बांधकाम विभागाकडे झाले होते. पुढे या निधीचे काय झाले या साठी माहितीच्या आधाराखाली माहिती मागितली असता सदर निधी मधून गाव ठाकुरवाडी ते गाव माची प्रबळ या दरम्यान रस्ता व पुल झाल्याची माहिती मिळाली.पण एक कटुसत्य की हा रस्ता आणि पुल फक्त बांधकाम विभागाच्या लेखी होते. प्रत्यक्षात ते काम झालेच नाही.<<<<<<<
हे उघड गुपित आहे, फक्त कोणी जास्त बोलू लागले तर त्याचा गेम होऊ शकतो ही भिती देखिल आहेच. अशी असंख्य कामे/पुर्ल/रस्ते अन हो, टोल देखिल, "उद्धवा अजब तुझे सरकार, लहरी राजा, प्रजा आंधळी" या धर्तीवर चालू आहे. अन अशा कारभारामुळे वंचितांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी फुलेआंबेडकरान्चे नावासहित १९४८पासूनचे हुकमी बळिचे बकरे आहेतच. वाईट वाटते या परिस्थितीचे

इथे तपशीलात दिल्याबद्दल धन्यवाद. Happy

>>>> हा लेख फेस बुक वर शेयर करु का ? <<<< लेख फेसबुकवर कसा शेअर करायचा?
खरे तर प्रतिसादातील पोस्टीदेखिल शेअर करण्याची सुविधा हवीये, इट्स अ मस्ट!