सेवाभावी संस्था

एक लोहारकी

Submitted by शोभनाताई on 8 April, 2015 - 03:46

lohar1.JPG

शेखर बर्वे यांच्या 'पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत ' या पुस्तकावर आलेल्या प्रतिक्रियांच मी संकलन करत होते.गुलाबांच्या फुलांच चित्र असलेल एक अभिनंदनाच सुंदर भेट कार्ड दिसलं कोणाच असेल म्हणून उत्सुकतेन उघडल. आतल्या बाजूला कार्डाच्याच आकाराचा कागद चीकटवला होता.त्यावर कडेनी फुलांची सुंदर नक्षी काढलेली होती.वर स्केच पेननी अभिनंदन पत्र अस लिहील होत.

शब्दखुणा: 

तडका - सन्मान

Submitted by vishal maske on 27 March, 2015 - 11:09

सन्मान,...

चांगले काम करण्याच्या
प्रत्येकाला संधी असतात
अन् प्रत्येकाच्या कार्याच्या
इथे सर्व नोंदी असतात

त्यांच्या सत्कार्याचा भाग
देशाचीही शान होतो
अन् प्रत्येकाच्या सत्कार्याचा
सन्मानानं सन्मान होतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शब्दखुणा: 

सामाजिक उपक्रम २०१५ - आवाहन (सार्वजनिक धागा)

Submitted by सुनिधी on 9 March, 2015 - 10:45

नमस्कार,
सामाजिक उपक्रमाचे हे सहावे वर्ष. हा उपक्रम आता तसा आपल्याला नवा नाही. तरीही नवीन सभासदांसाठी थोडक्यात ओळख,
या उपक्रमात दरवर्षी अशा गरजु संस्थांना वस्तुरुपात मदत केली जाते ज्यांना सरकारकडुन जास्त मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यकरुन फक्त देणगीदारांवर चालते. त्याकरता देणग्या मागवण्याचे हे आवाहन आहे.

देणग्या मार्च-एप्रिल या २ महिन्यात मागवण्यात येतात. नंतर एकुण जमा झालेल्या निधीतुन संस्थांच्या प्राधान्यानुसार वस्तु खरेदी करुन त्यांना पोचवल्या जातात व त्याची रीतसर नोंद इथे दिली जाते.

आतापर्यंत खालील संस्थांना या उपक्रमाद्वारे वस्तुरुपी मदत केली गेली,

शब्दखुणा: 

डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार २०१५

Submitted by अतुल ठाकुर on 22 February, 2015 - 18:57

जुन्या कपड्यांचे काय करावे?

Submitted by मी अमि on 16 February, 2015 - 00:52

घरी खुप जुने कपडे जमा झाले आहेत. काय करावं कळत नाही. पुर्वी आई जुने कपडे बोहारणिला देऊन भांडी घेत असे. आता सोसायटीत बोहारणी येत नाहीत. कुठे येत असतील तर त्यांना गाठायला आम्ही दिवसभर नसतो. विनाकारण भांडी जमा करायची सुद्धा इच्छा नाही.

जुने कपडे डिस्पोज करण्यासाठी काय करता येईल? मला खालील पर्यांयांबद्दल माहिती/ मदत हवी आहे. मी मुंबईत राहते.

१. एखादी सेवाभावी संस्था जर कपडे स्विकारत असेल तर उत्तम. परंतु घरी येऊन न्यायला हवेत. तुमच्या ओळखी मध्ये अशी संस्था असल्यास सांगा.
२. रद्दी प्रमाणे जुने कपडे विकत घेणारी दुकाने असतात का? कृपया माहीत असल्यास सांगा.

२०१५ बृहन्महाराष्ट्र मंडळ १७वे अधिवेशन : लवकर नावनोंदणी करा

Submitted by BMM2015 on 13 January, 2015 - 12:39

convention_transparent_with_mararathi_name1.png
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १७वे अधिवेशन या वर्षी ३ ते ५ जुलैच्या दरम्यान लॉस एंजलिस जवळच्या अॅनाहाईममध्ये भरणार आहे. जगप्रसिद्ध डिस्नीलँडच्या जवळच असलेल्या प्रशस्त कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हे अधिवेशन होणार आहे. जगभरातील मराठी मंडळींना लॉस एंजलिस परिसरातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी ही एक आगळी वेगळी संधी चालून आली आहे.

आपला कट्टा चर्चा निष्कर्ष संकलन

Submitted by शांताराम कागाळे on 7 January, 2015 - 09:13

१ ले चर्चा सत्र :

विषयः मोदींना पर्याय काय, मोदींना पर्याय का नाही, मोदींना पर्याय निर्माण होणे आवश्यक आहे की नाही!
दिवसः ७ जानेवारी २०१५

१. मोदींसारख्या नेत्यांना पक्षांतर्गत व पक्षबाह्य असे दोन्ही ठिकाणी समर्थ पर्याय निर्माण होणे एका देशासाठी आवश्यक आहे.

२. काँग्रेसने तूर्त नवीन चेहर्‍यांचा विचार करावा व पक्षबांधणीवर फोकस ठेवावा. ज्योतिरादित्य शिंदे हे नांव दोन सदस्यांनी सुचवले.

प्रश्न गतिमंद मुली पिडीतांचा

Submitted by निक्षिपा on 29 December, 2014 - 02:33

नमस्कार, मला मायबोलीकरांकडून एक मदत हवी आहे. थोडीशी नाजूक बाब असली तरी योग्य व्यक्तींपर्यंत कसे पोहोचावे हे मला समजत नसल्यामुळे इथे मांडतेय. माझी अगदी जवळीची मैत्रिण मुंबईतील गतीमंद शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षीका आहे. मुलांची मानसिकता ओळखणे, त्यांना शिकवणे, यामध्ये ती माहिर आहे. तिच्या शाळेमध्ये एका गतिमंद निवासी संस्थेतून दर महिन्याला काही या गतिमंद मुलांना विविध गोष्टी शिकवण्यासाठी पाठवले जाते. त्यातील काही म्हणजे नीटनेटके राहणे, कपडे बदलणे, स्वतःची स्वच्छता राखणे इत्यादी. हे शिकवत असताना त्या मुलांची इन जनरल शारिरीक चाचणीपण केली जाते.

Pages

Subscribe to RSS - सेवाभावी संस्था