माळीण दुर्घटनाग्रस्तांना मदत.

Submitted by जीएस on 5 August, 2014 - 13:59

माळीण गावावर कोसळलेल्या आपत्तीबद्दल आपण वाचलेच असेल. दुर्घटनेबद्दल समजल्यापासून रा. स्व. संघ आणि वनवासी कल्याण आश्रमाचे स्वयंसेवक घटनास्थळी अहोरात्र कार्यरत आहेत.

दुर्घटनाग्रस्तांना मदत व पुनर्वसन हा कामाचा पुढचा टप्पा आहे. माझा स्वतःचा या मदतकार्याशी थेट संबंध नाही. पण इथे केलेली मदत खर्‍या गरजूंपर्यंत पोहोचेल याची माझ्या या संस्थांबद्दलच्या गेल्या वीस वर्षांतील अनुभवावरून खात्री देऊ शकतो.

म्हणून त्यासाठीचे वनवासी कल्याण आश्रमाचे आवाहन इथे देत आहे.

malinvka.jpg

रा. स्व. संघ जनकल्याण समितीमार्फत मदत द्यायची असल्यास पत्ता.
RSS JANKALYAN SAMITI (MAHARASHTRA PRANT)
Bhageshwar Niwas', 1609, Sadashive Peth,
Tilak Road, Pune - 411 030,
Phone 24324071

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुनिधी, पैसे पाठवण्यासाठी आश्रमाचा खाते क्रमांक
Account name- Vanvasi kalyan ashram maharashtra.
Bank Name- Bank of Maharashtra, Chinchwad Branch
Account No- 20160364136
IFSC CODE – MAHB0000127
PAN NO- AAATV3624K

एजे, मला फोनवरुन एवढेच ़ ़जमत आहे सध्या.

घटना घडल्याची बातमी आल्याबरोबर माझा भाऊ माळीण गावी पोहोचला. तो तिथे दोन दिवस होता. ते महत्वाचं नाही. त्याची निरीक्षणे कदाचित मदतकार्यासाठी इच्छुक असलेल्यांना उपयोगी पडतील.

१. बघ्यांनी केलेल्या गर्दीने जेसीबी, अ‍ॅम्ब्युलन्स सारख्या वाहनांना रस्ता उरला नाही
२. सतत पाऊस आहे. त्या स्थितीत मदतकार्य चालू आहे. मंचरला नियंत्रण कक्ष उभारलेला आहे. पुण्यात नियंत्रण कक्ष आहे.
३. सरकारी यंत्रणा कामाला लागलेली आह.
४. दळणवळण यंत्रणा उद्ध्वस्त झाल्यावर बीएसएनलचे लोक आले होते. तातडीने सॅटेलाईट फोन उपलब्ध करून दिला आहे.
५.मृतांना आणि जखमींना मदत जाहीर झाली आहे. तिला वेळ लागेल.
६. दरड कोसळून गावठाण नष्ट झाले. त्याट सत्तर घरं गेली आहेत. पण वाड्यांना धोका पोहोचलेला नाही. आतापर्यंत १०० मृतांना बाहेर काढून अंत्यसंस्कार झाले आहेत.
७. सरकारी पातळीवर गावठाण पुन्हा वसवण्याचे प्रयत्न चालू आहेत. प्राधान्य शाळेला देण्यात येत आहे. मुलांना आश्रमशाळेचा आधार आहे.
८. प्रत्यक्ष ढिगारे हटवण्यासाठी पाऊस आणि रस्ता नसल्याने वेळ लागतो आहे आतापर्यंत झालेल्या मदतकार्याची माहीती घेऊन जिथे गरज आहे ती मदत देऊ केल्यास नेमकं काम होईल, तसंच विनाकारण होणारी गर्दी टाळता येईल.

कदाचित या माहीतीचा उपयोग होऊ शकेल.
https://www.facebook.com/221940834493680/photos/a.221941514493612.58373....

वाह, फारच चांगली माहिती दिलीत. धन्यवाद ! Happy
आपल्याकडे अनेकदा मदत करण्याचा उत्साह असलेल्या व्यक्ती आणि संस्था खुप असतात,
पण त्यांचा एकमेकांमधे समन्वय नसल्याने बरेचदा मदत विस्कळित स्वरुपात होते असे वाटते.

सकाळ रीलीफ फंडाची आजपर्यंतची कामे भरपूर आहेत, तिथेही मदत देता येईल. सकाळ रीलीफ फंड एक मोठे नाव आहे या क्षेत्रात, मी नेहमी त्यांच्या कामाविषयी वाचत आलो आहे ,आपण तिथेही मदत देऊ शकता,महेशजींच्या सूचनेप्रमाणे मदत करणार्या अनेक संस्थांचे पत्ते यथावकाश इथे देईनच, अधिक माहीतीसाठी ही बातमी वाचावी.
http://www.esakal.com/esakal/20140802/5321506026787666904.htm

चांगली माहिती एके ठिकाणी जमा होत आहे. ती पाहून ज्यांना जिथे सोयीचे वाटेल त्या माध्यमातुन लोक मदत करू शकतील. तसा हा प्रत्येकाच्या विश्वासाचा, सोयीचा प्रश्न आहे. Happy

ईश्वराचे आशीर्वाद असोत!
>>>

दरड कोसळून १५१ लोकांचे प्राण घेतले त्यावेळी हे इश्वराचे आशिर्वाद अथवा हा इश्वरच कुठे चुलीत गेला होता काय ?

कर्मविपाकाच्या स्गोष्टी नका सांगू राव ::राग:

ईश्वराचे आशीर्वाद असोत!
>>>

दरड कोसळून १५१ लोकांचे प्राण घेतले त्यावेळी हे इश्वराचे आशिर्वाद अथवा हा इश्वरच कुठे चुलीत गेला होता काय ?

कर्मविपाकाच्या स्गोष्टी नका सांगू राव ::राग:

रॉहू : अशा प्रकारच्या दुर्घटनांमुळे हेलावून जाऊन अनेक गोष्टींवरचा विश्वास उडतो खरा. काहींचा तात्पुरता, तर काहींचा कायमचा. पण म्हणुन जर कोणाचा असेल विश्वास तर निदान त्याला असे उडवून लावू नका कृपया.
तुकारामांनी देखील संसारात अनेक समस्या आल्यावर सुद्धा भक्तीचा दृष्टीकोन सोडला नव्हता. आणि म्हणाले होते

बरे झाले देवा निघाले दिवाळे । बरी या दुष्काळे पीडा केली ॥
अनुतापे तुझे राहिले चिंतन । जाला हा वमन संवसार ॥

असो, विषयांतराबद्दल क्षमस्व !

दरड कोसळून १५१ लोकांचे प्राण घेतले त्यावेळी हे इश्वराचे आशिर्वाद अथवा हा इश्वरच कुठे चुलीत गेला होता काय ?

कर्मविपाकाच्या स्गोष्टी नका सांगू राव
सत्य स्वीकारण्याची मानसिकता नाही हे दिसून येतं. तुमच्या घरात तुम्ही इतके सुखी आहात . इथ तुम्हाला ईश्वरी कृपा दिसत नाही का ?