बाळाचा आजार

Submitted by सीमि on 25 November, 2018 - 01:20

माझी 17 नोव्हेंबर 2018 ला सिझेरियन डिलिव्हरी झाली. Ivf प्रेग्नेंसी 38 आठवडे पूर्ण झाल्यावर 3.4 kg चं सुदृढ व गोंडस बाळ जन्माला आले.प्रेग्नेंसी मधले सगळे रिपोर्ट व सोनोग्राफी रिपोर्ट नॉर्मल होते. पण त्याचे वजन करताना आणि क्लीन करताना लक्षात आलं की त्याचा श्वासांचावेग जास्त आहे. आणि तो निळा पडू लागला. लगेच त्याला ऑक्सिजन वर तासभर ठेवण्यात आलं व तो नॉर्मल झाला. आमच्या कडे दिल्या नंतर तो पुन्हा निळा पडू लागला व डॉक्टरांनी त्याला icu मध्ये शिफ्ट केलं जिथे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. सुरुवातीला त्याचा श्वासाचा वेग 100 होता. ह्यात 3 शंका होत्या
1. हृदयाचे त्रास
2. Surfactant
3. Pneumonia

हृदयाचा 2 D echo नॉर्मल आहे. डॉक्टरांनी surfactant innitially 1 dose दिला त्याने काही फरक पडला नाही condition मध्ये. मग दुसराही दिला. पण surfactant चा प्रॉब्लेम कमी दिवसांच्या व कमी वजनाच्या बाळांना येतो. माझे बाळ पूर्ण दिवस व 3.4kg वजनाचे होते. At last pneumoniachi ट्रीटमेंट सुरू केली ज्यात high dose of antibiotic सुरू केले. 5 दिवसांनी तो व्हेंटिलेटरच्या बाहेर आलापण icu मध्येoxygen सप्लाय चालू आहे. 2 दिवस oxygen लेव्हल कमी करून 1-2 lit वर आणलीय जी minimum असते पण हा सप्लाय थांबवला की बाळा ला लगेच त्रास होऊ लागतो व तो निळा ही पडायला लागतो. हे सगळं काल पासून चालू आहे. डॉक्टर म्हणतात ही कंडिशन किती दिवस राहील सांगू शकत नाही. तरी जाणकारांनी प्रकाश टाकावा. Plz help...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या समस्येवर मला काहीच उपाय माहित नाही.

पण योग्य ते निदान होऊन बाळाला लवकर बरं वाटावं यासाठी देवाकडे प्रार्थना!

डॉक्टरांवर विश्वास आहेच पण अजूनही योग्य ते निदान होत नाहीय. त्यामुळे मायबोलीवर कोणाचा काही तसा अनुभव असेल आणि त्यातून काही मार्ग दिसला तर बरंच होईल

सीमि, नमस्कार.
सर्वप्रथम --- मी medical, pharma, pathology, nursing यातील तज्ज्ञ / व्यावसायिक नाही. सर्वसामान्य व्यक्ती आहे. किंवा कोणाबाबत असा अनुभवही नाही, हे स्पष्ट करते.

तुम्ही दिलेली माहिती वाचली. बाळ निळे पडण्याच्या पहिल्या नेहमीच्या शक्यता लक्षात घेऊन प्राथमिक टेस्ट आणि उपचार झालेले आहेत. याव्यतिरिक्त काय कारण असू शकेल या विचाराने नेटवर शोधले तेव्हा खालील माहिती मिळाली.
Blue baby syndrome / Methemoglobinemia.

यात,
(१)
नायट्रेट क्षारामुळे दूषित झालेले पाणी बाळाच्या शरीरात गेल्यवर त्याचे नायट्राईट मध्ये रूपांतर होऊन, त्यामुळे हिमोग्लोबिनची नैसर्गिक रचना बदलून methemoglobin तयार होते, जे नैसर्गिक हिमोग्लोबिन प्रमाणे ऑक्सिजन वाहून नेऊ शकत नाही. परिणामी बाळ निळे पडते.
(२) श्वासातून नायट्रिक ऑक्साईड किंवा अ‍ॅनेस्थेशियासाठी वापरली जाणारी औषधे यांचा परिणाम होऊनही अशी स्थिती (Methemoglobinemia ) उद्भवू शकते.

अधिक महिती साठी हे वाचा -- https://www.medicalnewstoday.com/articles/321955.php

बाळ नवजात आहे, तेव्हा हे सर्व अप्रत्यक्षपणे, तुमच्या शरीरातून त्याच्यापर्यंत पोचलेले असू शकते. ( पाणी, IVF दरम्यान घेतलेली औषधे, दूषित पाण्यवर पिकलेल्या / धुतलेल्या भाज्या, प्रदूषित हवा किंवा केमिकल कंपनीतील नोकरी किंवा केमिकल कंपनी घराच्या आसपास असणे, सिझेरियन साठी वापरलेल्या अ‍ॅनेस्थेशियाचा अप्रत्यक्ष परिणाम, इत्यादि. किंवा अजून काही कारण)

*******
दुसरे कारण सापडले -- Congenital (hereditary) methemoglobinemia

Hereditary methemoglobinemias may be divided into two categories as follows [16] :

** Methemoglobinemia due to an altered form of hemoglobin (ie, Hb M)
** Methemoglobinemia due to an enzyme deficiency (NADH reductase deficiency) that decreases the rate of reduction of iron in the hemoglobin molecule

Several variants of hemoglobin M have been described, including Hb Ms, Hb MIwate, Hb MBoston, Hb MHyde Park, and Hb MSaskatoon. These are usually autosomal dominant in nature. Alpha-chain substitutions cause cyanosis at birth, whereas the effects of beta-chain substitutions become clinically apparent in infants at 4-6 months of age.

यात बाळ जन्मतःच हिमोग्लोबिनच्या नैसर्गिक रचनेत फेरफार घेऊन येते. परिणामी हिमोग्लोबिनची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी झाल्याने बाळ निळे पडते.
अधिक महिती साठी हे वाचा --- https://emedicine.medscape.com/article/204178-overview

**********
मायबोलीवरचे डॉक्टर सभासद धागा नजरेत आल्यावर योग्य मार्गदर्शन करतीलच.
तोवर यातून काही क्ल्यू मिळेल म्हणून लिहीले.

पुन्हा एकदा --
ही सर्व पुस्तकी माहिती आहे. मला यातील सखोल ज्ञान / अधिकार नाही. तेव्हा तुमच्या डॉक्टरांचे निर्णय / मार्गदर्शन हेच अंतिम असेल कारण त्यांनी बाळाला, तुम्हाला त्याच्या जन्मापूर्वीपासून पाहिलेले, तपासलेले, उपचार दिलेले आहेत.

-- खूप शुभेच्छांसह,
कारवी

सीमि, नमस्कार.
सर्वप्रथम --- मी medical, pharma, pathology, nursing यातील तज्ज्ञ / व्यावसायिक नाही. सर्वसामान्य व्यक्ती आहे
माझ्या मैत्रिणिचा मुलगा असाच जन्मानतर निळा पडत होता , काही टेस्ट केल्यावर कळले की त्याच्या हृदयाच्या व्हेन्स उलट्या आहेत त्यामुले शुद्ध आणी अशुद्ध रक्त मिक्स होत होते, वोकार्ड कडे नेवुन ऑपरेट केल मला टेक्निकली निट सान्गता येणार नाही) पण ताबडतोब तद्याचा सल्ला घेणे योग्य ,बाळाला लवकर बर वाटु दे!

सीमि एक कळकळीची विनंती अशा बाबतीत social forum. वर opinion. विचारण्यात वेळ घालवू नका डाँक्टर वर विश्वास ठेवा किंवा एखाद्या expart चं second opinion घ्या.बाळाला लवकर बरं वाटू दे.शुभेच्छा

>>>>सीमि एक कळकळीची विनंती अशा बाबतीत social forum. वर opinion. विचारण्यात वेळ घालवू नका डाँक्टर वर विश्वास ठेवा किंवा एखाद्या expart चं second opinion घ्या.बाळाला लवकर बरं वाटू दे.शुभेच्छा<<<

+१११११११

बाळाला आता घाईत हलवु नका. आहे त्या डॉक्टरशी सतत संपर्कात रहा( असालच).पण त्याचे बाळाचे रीपोर्ट्स घेवून तातडीने दुसर्‍या डॉक्टरचे मत घ्या.
शुभेच्छा!

बाळाला आता घाईत हलवु नका. आहे त्या डॉक्टरशी सतत संपर्कात रहा( असालच).पण त्याचे बाळाचे रीपोर्ट्स घेवून तातडीने दुसर्‍या डॉक्टरचे मत घ्या.>>+१
तुमच्या बाळाला लवकर बरे वाटू दे अशी देवाकडे प्रार्थना.

सर्वांचे धन्यवाद!! बाळ आता व्यवस्थित आहे. ऑक्सिजन सप्लाय शिवाय नॉर्मल श्वास घेतोय. अजून icu मध्ये आहे पण लवकरच बाहेर येईल.

बाळाला आशीर्वाद.
लवकरात लवकर 'बाळांचा आहार' धाग्यावर याल अशी शुभेच्छा.

अरे वा! आता मजा करा बाळा बरोबर. Happy
आणि स्लीपलेस नाईट्सला तयार व्ह्या. Proud नेटफ्लिक्सवर काय बिंज वॉच करायचं याची यादी योग्य जागी मिळेलच.
वेळ असेल आणि तुम्हाला लिहिणं ठीक वाटत असेल तुम्ही इतका डीटेल मध्ये धागा काढलेलात तर काय निदान झालं ते लिहा.

खूप बरे वाटले आता, धागा वाचत होते पण काय लिहावे कळत नव्हते. बरे झाले बाळाच्या तब्बेतीबद्दल कळवले ते.☺️ +११११११११११११११

सुरुवातीला कसलेच निदान होत नव्हते. म्हणून surfactant आणि pneumonia चे औषधे simultaneously चालू केले. Surfactant चे 2 dose दिले जे की फार rarely कुण्या बाळाला लागतात. पण त्या नंतरही बाळाचा त्रास कमी झाला नाही जे की अशक्य असते म्हणून pneumonia चे अँटीबीओटीक dose continue केले. व finally तेच निदान झाले. त्यानंतर डायरेक्ट फीड दिल्यावर ऑक्सिजन लेवल ड्रॉप होऊन ऑक्सिजन लावावा लागला 2 वेळेस. आत्ता बाळाला ऑक्सिजन ची गरज लागत नाही. व तो व्यवस्थित फीड घेतो.
उद्या आम्हाला discharge मिळेल. सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद!!!

Pages