कोरोना गो, गो कोरोना; साहेब म्हटले कोरोनाला

Submitted by पाषाणभेद on 10 March, 2020 - 21:56

कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला
असा तो व्हायरस पुचाट
गेला घाबरून साहेबांना ||ध्रू||

आले आले ते परदेशी
घेवून आले व्हायरसला
खोकून शिंकून झाले बेजार
त्यांनीच आजार पसरवला
खटाखट देवूनी मुस्कटात त्याच्या
एकदा व्हायरसचा आवळा गळा
कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला ||१||

कसला हा विषाणू व्हायरस
कोरोना नावाचा चायनाचा
थुंकू नका, हात तोंड धुवा
मास्क बांधा तुमच्या तोंडाला
कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला ||२||

कितीक आजार आले अन गेले
स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू पाहिले
चांगले खा प्या अन निट फिरा
सांभाळून आपल्या आरोग्याला
मंत्र हाच असे नाही दुसरे काही
व्हायरसपासून दूर रहायला
कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला ||३||

- पाषाणभेद
१०/०३/२०२०

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"सायमन परत जा" या चलेजाव चलवळीनंतर
"गो करोना, करोना गो" या चलेजाव चळवळीला जगाच्या इतिहासात मानाचे स्थान मिळेल.

हा मनुष्य "कहर" आहेच पण या मनुष्याला निवडुन देणारे ते ही "महाकहर" आहेत.
यात कोणाचा अपमान करायचा हेतु नाही पण आपल्या लायकीनुसारच आपल्याला नेते मिळतात किंवा आपण निवडतो !!!!!

हा मनुष्य "कहर" आहेच पण या मनुष्याला निवडुन देणारे ते ही "महाकहर" आहेत.>>> त्याला कोणी निवडून देत नाही. जो कोणी सत्तेत असेल त्याचे पादप्रक्षालन करून राज्यसभेवर जाऊन मंत्रिपद मिळवणे हाच फण्डा असतो याचा. यांच्याकडे सुखी माणसाचा सदरा आहे असे म्हटल्यास वावगे नाही . शून्य कष्ट घेऊन सत्ता उपभोगणारा एकमेव प्राणी असेल तो. ना ईडीची चिंता ना सिबीआयची ! त्याचे निवडणुकीच्या वेळचे कोणतेही भाषण काढून पहा तो ज्या लोकांचा वसा घेण्याचा आव आणतो त्यांच्या विकासाबद्दल एक शब्द नसतो. निव्वळ आम्हाला हे पद हवंय नि ते पद हवंय एवढंच असतं. हो अधून मधून आरक्षण आणि अट्रोसिटीवर वर काही चर्चा सुरु झाली कि त्यात थोड्या पिंका टाकतो तो.

बरोबर आहे जिद्दु.
पण आपण ज्यांचे देणे लागतो किंवा ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे आणी आपण देवु शकतो या लायक जर देवाने घडवलय तर समाजासाठी तेवढ तर करायला हवं पण नाही सगळे तोंडपुजे जमवुन ठेवलेत.
आता ईतके वर्ष झाले वेगवेगळ्या लोकंसोबत राहुन पण यांचे बोलणे, वागणे किंवा कपडे......काय बोलावे. बरं काही करता येत नसेल तर गप्प बसावे नां तर ते पण नाही.

साहेबांना कॉम्पीटिशन म्हणून कविता! फारच शूरवीर आहात पाभे. आता त्यांनी उत्तर म्हणून आणखी काही कविता नाही केली म्हणजे मिळवली!

ही कविता लुई शमाशा लुई ( चित्रपट - क्रान्ती) च्या चलीवर म्हणल्यास छान वाटेल ( गो करोना गो ...गो गो गो करोना... गो गो गो करोना)

@ हरचंद पालव, नाही हो सहज चाळा सुचला न बनवली.
पान जमवा ब्वॉ आता सुपारीसकट, कपाटाच्या बिजागरीचे नंतर बघू.

सहज आठवले म्हणून पाठवले का?

आता पानात घालतो मी सुपारी
आता पानात घालतो मी सुपारी
ढाण्या वाघ की उडी उद्या दुपारी
आता आली करोनाची बारी
तुम्हारे अदाओंपे मैं वारी वारी