नोकरी-व्यवसाय

जपानमध्ये शाकाहारी पदार्थ कुठे मिळतील.

Submitted by Ashwini_९९९ on 23 March, 2022 - 23:53

नमस्कार........
माझा भाचा जपानला नोकरीनिमित्त जात आहे. पूर्ण शाकाहारी आहे.. नक्की पोस्टिंग कुठे आहे हे टोकियोला तो पोचल्यानंतर कंपनी सांगणार आहे.
जपानमध्ये आपले भारतीय शाकाहारी पदार्थ /जेवण कुठे मिळेल ह्याची माहिती हवी आहे. अगदी घरगुती पदार्थांचा आग्रह नाही. मागच्या वेळेस interview साठी गेला होता तेव्हा चांगलेच हाल झाले होते जेवणाचे ...

कर्मचारी सुधारणा कार्यक्रम

Submitted by पाचपाटील on 12 February, 2022 - 10:32

('कर्मचारी सुधारणा कार्यक्रम': एक केस स्टडी;
समस्या, सोल्यूशन्स, उद्देश, अटी, शर्ती वगैरेसहित)

१. जमलेल्या माझ्या तमाम सभ्य आणि विद्वान
स्त्री-पुरुष होss,

ज्वेलरी मेकिंग व्यवसाय

Submitted by पिहू१४ on 26 December, 2021 - 06:58

नमस्कार मायबोलीकर मला ज्वेलरी मेकिंग व्यवसाय सुरू करायचा आहे, त्या बद्दल माहिती हवी आहे . मार्केटिंग आणि इतर गोष्टी कशी सुरुवात करावी ? मी नाशिक ला राहते MIDC area आहे . कुणी माहिती देऊ शकेल का ?

मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा करियरची सुरुवात.

Submitted by हवा हवाई on 17 December, 2021 - 06:51

दहा वर्षे झाली गृहिणी बनून.
लग्नाआधी तीन आणि लग्नानंतर चार असा सात वर्षे जॉब करत होते.मग पहिलं मुल प्लस नवर्याची ट्रान्सफर यात करिअर मागे पडले.पहिले मुल तीन वर्षाचे झाले पुन्हा जॉब शोधायला सुरू केले, इंटरव्ह्यू दिले पण परत दुसऱ्या मुलाची तयारी आणि आगमन यात राहून गेले.
दुसरं मुल दोन वर्षाचे झाल्यावर पुन्हा एके ठिकाणी इंटरव्ह्यू दिला,अपॉइंटमेंट लेटर घेतले आणि कपाटात ठेवले आणि पुन्हा घरीच.
आता पुन्हा वाटु लागलेय कि वेळ वाया घालवता कामा नये.

हिंजवडी चावडी: होमवर्क आणि नेटवर्क

Submitted by mi_anu on 20 October, 2021 - 12:55

वेळ: सकाळी 8.30
तिकडे बाथरूम चं दार उघडल्याचा आवाज आला आणि इथे स्वप्नाने इडल्यांचा पहिला सेट कुकर मध्ये ठेवला.शक्य तितक्या वेळा कुटुंबाला गरम पदार्थ खायला घातल्यास पदार्थ उरण्याचे चान्सेस कमी होतात.शिवाय गोवेकर बाई म्हणतात ताजं गरम खा, वेट लॉस ची हार्मोन जागी होतात.लॅपटॉप ओट्यावर कोरड्या बाजूला ठेवून जपानची मीटिंग चालू होती. मध्ये इडली चं मिश्रण ढवळत असताना तिला बरेच वेळा 'यु वेअर गोईंग टू क्रिएट इश्यू इन मिदोलो मे' ऐकू आलं.तिने घाबऱ्या घाबऱ्या मैत्रिणीला फोन करून विचारलं.
"अगं हे मिदोलो काय आहे?आता नव्या टूल मध्ये टाकायचे का इश्यू?जीरा कुठे गेलं?"

शब्दखुणा: 

डुक्कर आणि कोंबडी

Submitted by सामो on 3 September, 2021 - 17:06

प्रकल्प व्यवस्थापनामध्ये एक मजेशीर concept आहे. ही concept मला रोचक तशीच अचूक वाटते म्हणून येथे देत आहे तसेच काही लोकांना ही माहीती नवीन असण्याची शक्यता आहे म्हणूनदेखील येथे देत आहे.

कोणत्याही प्रकल्पामध्ये बरेच team members असतात. पैकी प्रत्येकाचा सहभाग तसेच commitment ची पातळी ही निरनिराळी असण्याची शक्यता असते. ही commitment पातळी २ प्रकारात मोडते - डुक्कर आणि कोंबडी. ते कसे हे खालील गोष्टीवरून लक्षात येईल.

लॉक डाऊन मध्ये नौकरी सोडलेल्या माझ्या मुलाला नौकरी हवी आहे

Submitted by सुनिर on 3 September, 2021 - 04:04

माझ्या मुलाने SAP चा कोर्स करण्यासाठी नौकरी सोडली आणि कोर्से संपल्यानंतर LOCKDOWN ची सुरुवात झाली. त्याने MBA Finance केले आहे व B.A. (Business Analyst ) चा कोर्स केलेला आहे. त्याच्याकडे IATA चे सर्टीफिकेट पण आहे.
तो नौकरी च्या शोधात आहे.
कुणी मदत करू शकत असल्यास हवी आहे.
संपर्क : ravinsk@yahoo.co.uk

राघू

Submitted by सिद्धेश्वर विला... on 23 June, 2021 - 08:23

आज झालो भ्रष्ट मी

पसरले माझे दोन हात

पाठीवरती वार करुनि

केला साहेबा कुर्निसात

लावूनी चरणधूळ ललाटी

पकडून धरली गच गोटी

मागे वळूनी पाहतो तर

त्याचीही हिरवी शेपटी

कोण खोटा कोण खरा

हिशेब मनी नाही लागला

ज्याला मी साहेब समजलो

तोपण साला राघू निपजला

=======================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

शब्दखुणा: 

माहिती हवी आहे- महा ई सेवा केंद्र

Submitted by मी चिन्मयी on 21 June, 2021 - 04:17

बाजारात मध्यवर्ती ठिकाणी आमचा एक गाळा आहे. साधारण ८० स्क्वे. फु. जागा आहे. आसपास दुकाने, वस्ती आहे. एखादं झेरॉक्स सेंटरही नाही. तिथे महा ई सेवा केंद्र चालू करता येईल का? असेल तर काय प्रोसेस असते आणि सुरुवातीचा खर्च किती येईल? कृपया कुणाला कल्पना असल्यास सांगा.

Pages

Subscribe to RSS - नोकरी-व्यवसाय