आम्ही कॅलिफॉर्निया मध्ये सहा वर्षे एच-1 वीसा वर राहून 2012 मध्ये भारतात परत आलो. आता 2024 मध्ये मला पुन्हा अमेरिकेत जायची संधी मिळत आहे. यावेळी एल-1 वीसा वर जाउन ग्रीन कार्ड (ईबी-1 केटेगरी) आणि eventually अमेरिकन सिटिज़नशिप घेण्याची संधी आहे. संधी कॅलिफॉर्निया, टेक्सस आणि मिनेसोटा या राज्यात आहे. पण या दहा बारा वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मुलगा 11 वर्षाचा आहे आणि त्याच्या शाळेत सेट झाला आहे. बायको सध्या जॉब करते आहे परंतु तिच्या कंपनीचा अमेरिकेत प्रेजेन्स नाहीय. त्यामुळे तिला जॉब सोडून अमेरिकेत नवीन जॉब करावा लागेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमची वये आता लेट 40s मध्ये आहेत. त्या अनुषंगाने मला काही प्रश्न पडले आहेत.
1. या वयात बायको नवीन जॉब करून पुन्हा स्वत:ला from the scratch प्रूव करायला उत्सुक नाही. त्या ऐवजी ती पार्ट टाइम जॉब किंवा काहीतरी व्यवसाय करण्यास उत्सुक आहे. त्यामुळे सुरवातीची काही वर्षे तरी मी एकटाच कमावणारा असेन. तर आजच्या घडीला $130-140k वर्षाला हा पगार बे एरिया मध्ये पुरेसा असेल का?
2. कॅलिफॉर्निया ची मला बर्यापैकी माहिती आहे पण टेक्सस आणि मिनेसोटा ची माहीती नाही. तिकडे चांगले स्कूल डिस्ट्रिक्ट आहेत का. अर्थात असतीलच पण माहिती मिळाल्यास बरे होईल. तसेच इथे राहण्याचे फायदे तोटे समजले तर कुठे राहायचे हे डिसीजन घेण्यात मदत होईल.
3. सिटिज़नशिप मिळाल्यावर मला मुलाच्या हाइयर स्टडी मध्ये काही फायदा असेल का? म्हणजे भारतात राहून मुलाला एकटा हाइयर स्टडीस साठी पाठवणे vs अमेरिकेच्या सिटिज़न मुलाने अमेरिकेत राहून स्टडी करणे या मध्ये बेटर option कोणता असेल.
4. मुलगा आता 6वी मध्ये आहे. त्याला 7-8 वी पासून लगेच अमेरिकेत आणावे की दहावी पर्यंत भारतात राहू द्यावे.
5. वयाच्या साधारण 50 व्या वर्षी $140k पासून सुरू केल्यावर 66 व्या वर्षी रिटायर झाल्यावर साधारण किती सोशल सेक्यूरिटी बेनेफिट मिळेल? आणि तो सिटिझेन असल्याने होम मेकर असलेल्या बायकोला वेगळा मिळेल की आम्हा दोघांना एकत्र मिळेल?
याव्यतिरिक्त एक्सट्रा काही माहिती असेल तर ती देखील द्यावी
अमेरिकेत राहणार्या मायबोलीकरांकडून मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. अर्थात अमेरिकेत न राहणारे मायबोलीकर देखील उत्तरे देऊ शकतात पण शक्यतो धाग्याच्या अनुषंगाने उत्तरे द्यावीत 
भारतातून wfh करतो म्हणून
भारतातून wfh करतो म्हणून सांगा.
बोकलत,
बोकलत,
तेच सांगितलं होतं, तर म्हणतात मग सिटीजन्शिप नाही देणार, बसा बोकलत... आपलं बोंबलत. .. म्हणून इकडे विचारले प्रश्न.
३.१ मुलाच्या मागच्या व्हिसाशी
३.१ मुलाच्या मागच्या व्हिसाशी संबंधीत कटकटी आणि त्या निमित्ताने येणारी टेन्शन्स कमी होतील. हल्ली सगळ्यात मोठी काळजी असते ती शिक्षण पूर्ण झाल्यावर ३ वर्षांच्या आत H1 मिळवणे. (शिक्षण STEM मधले नसेल तर हा कालावधी १ वर्ष इतका कमी असतो).
३.२ सिटिझन / ग्रीनकार्डमुळे फीमध्ये सहसा फरक पडत नाही. पण मुलाने तुमच्या राहत्या स्टेटमधले कॉलेज निवडले तर इन स्टेट रिबेट मिळू शकतो (हे अर्थात युनि वर अवलंबून असते)
३.३ अंडरग्रॅडला काही स्कॉलरशीप्स फक्त सिटिझन्सना असतात.
३.४ सिटिझन / ग्रीका नसले तर विद्यार्थ्याच्या काम करण्याच्या तासांवर बंधने असतात (पूर्ण वेळ विद्यार्थी असण्याकरता) आणि कॅम्पसच्या बाहेरचे जॉब्स करता येत नाहीत.
३.५ सिटिझन / ग्रीका वाल्यांना को-ऑप / जॉब फेअर्स मधून कामाच्या संधी लक्षणीयरीत्या जास्त असतात.
यावेळी एल-1 वीसा वर जाउन
यावेळी एल-1 वीसा वर जाउन ग्रीन कार्ड (ईबी-1 केटेगरी) आणि eventually अमेरिकन सिटिज़नशिप घेण्याची संधी आहे.>> सध्या eb-1 category मधील ग्रीन कार्ड application साठी 2012 ची priority date आहे असं ऐकलं होतं. हीच परिस्थिती राहिली तर मुलगा कॉलेजला जाईपर्यंत ग्रीन कार्ड होईल का? याचा ही विचार करावा.
>>आजच्या घडीला $130-140k
>>आजच्या घडीला $130-140k वर्षाला हा पगार बे एरिया मध्ये पुरेसा असेल का?>>
बे एरीआ मधे तुम्ही कुठे रहाणार त्यावर बरेच काही बदलेल पण तरी सध्याच्या महागाईच्या दृष्टीने त्या भागात तीन माणसांच्या कुटुंबासाठी जी लो इनकमची रेंज आहे ती साधारण $85k-134k आहे. एकंदरीत खर्चाचा आणि संधींचा विचार करुन बरेच जण बेएरीआतून टेक्सासमधे मुव झाले. मिनेसोटात खर्च बराच कमी येइल. जालावर वेगवेगळ्या ठिकाणच्या कॉस्ट ऑफ लिविंगची माहिती मिळते/कॅलक्युलेटर्स आहेत त्यावरुन अंदाज घ्या.
टेक्सास/ मिनेसोटात कामाचे ठिकाण कुठे असणार आहे त्यानुसार रहाण्यासाठी जवळचे चांगले स्कूल डिस्ट्रिक्ट असणारे ठिकाण निवडता येइल. जालावर स्कूल रॅंकिंग वगैरे असतेच, त्या शिवाय तुम्ही इमेल करुन शाळेच्या मुख्य काउंसेलरशी संवाद साधू शकता. मुलाला इथे नव्या सिस्टिममधे रुळायला त्यांच्या कडून कशा प्रकारचे सहकार्य मिळेल, काय रिसोर्सेस असतील वगैरे विचारता येइल आणि त्या नुसार निवड करायला मदत होईल.
मुलाला तुमच्या सोबतच आणा. ११-१२ हे तसे अडनिडे वय, आईबाबांची साथ-सोबत पुढील ६-७ वर्षे फार गरजेची त्यामुळे आईबाबा परदेशात आणि मूल भारतात असे शक्यतो नको. त्याशिवाय इथे भारतासारखे १०+२ नाही. हायस्कूल म्हणजे ९वी ते १२ वी अशी चार वर्षे कॉलेज अॅडमिशनसाठी धरतात. काही विषयांची हायस्कूल क्रेडिट्स ८वीतच पूर्ण केली जातात. तर त्या दृष्टीनेही मूल इथल्या सिस्टिममधे जितक्या लवकर सुरवात करेल तितके चांगले.
ग्रीनकार्ड-सिटीझनशिप बाबत - तर त्यांच्या प्रायॉरिटी डेट्स मागे-पुढे होत असतात. विसा बुलेटिन वर माहिती मिळते. मात्र किती वेळ थांबायला लागेल त्याचा अंदाज बांधणे कठीण. ओळखीतल्या लोकांचे अंदाज वाढलेल्या बॅकलॉगमुळे चुकले. त्यामुळे मुलगा कॉलेजला जाईल तेव्हा ग्रीनकार्ड हातात नसेल असे गृहित धरुन प्लॅन करा.
सोशल सिक्युरीटीबाबत - त्याचा सिटीझन असण्याशी संबंध नाही. तुमची पुरेशी क्रेडीट्स जमा होणे गरजेचे. त्यासाठी ४० क्रेडीट्स - साधारण १० वर्षांची नोकरी हवी. ते लोकं किती रक्कम मिळेल याचा अंदाज बांधताना highest 35 years of earnings धरतात. non working spouse ला सोशल सिक्युरिटी मिळण्याचे वेगळे नियम आहेत. त्या नियमांनुसार working spouse च्या ५०% मिळते.
बे एरियात एकाच्या १३०-४०के
बे एरियात एकाच्या १३०-४०के पगारात जगणे काहीसं कठीण जाईल. रिटायरमेंट ची तजवीज आणि मुलाच्या शिक्षणाचा (अर्थात अजून सहा वर्षे आहेत त्याला चालू व्हायला, आणि त्याला पर्याय ही आहेत) विचार केला तर गणित आणखी काटकसरीचे बनेल.
अमेरिकेत व्हिसा/ स्टेटस आपल्या मनासारखा होईल यावर अवलंबून आडाखे बांधणे फारच दोलायमान लक्ष्याच्या पाठी धावणे आहे. तसं होणार नाही/ झालं नाही तर काय? असा विचार करून आडाखे बांधून ठेवा.
इथे तुम्हाला का यायचं आहे? तुमच्या पार्टनर आणि मुलाला का यायचं आहे? आणि त्यासाठी किती/ कुठल्या तडजोडी तुम्हाला आणि जास्त करून तुमच्या पार्टनर ला आणि मुलाला कराव्याशा वाटतात ह्याचा लेखाजोखा घ्या. कुठलं पारडं जड होतंय त्यावर ठरावा.
पार्टनर ला वर्क परमिट मिळणार आहे, आणि ते पार्ट टाईम काम करू इच्छितात हा सुद्धा मोठा प्लस पॉइंट आहे. मुलाला घेऊन या असेच सांगेन. इकडे आलात की आणखी पर्याय दिसून वाट काढाल.
मनाची तयारी आणि मार्ग काढायचा attitude/ सवय असेल तर स्थलांतराचे फायदेच जास्त होतात असं वैयक्तिक मत आहे.
स्वाती२च+१,
स्वाती२+१,
सोशल सिक्युरिटी साठी
https://faq.ssa.gov/en-us/Topic/article/KA-01897
२०२३ साली तुमच्या पगाराला जर ३५ वर्ष काम केले असेल तर ६६ व्या वर्षी $3,627 मिळतील. कमीत कमी १० वर्ष काम केले असले पाहिजे, जर २२ वर्ष काम केले तर २२/३५ * ३६२७ मिळतील. सोशल सिक्युरिटी ची रक्कम दर वर्षी वाढत जाते.
टेक्सास मध्ये स्टेट टेक्स नाही त्यामुळे हातात पगार जास्त येतो.
बे एरियात घरभाडे खुप आहे आणि मागच्या काही वर्षात खुपच वाढले आहे. त्यामुळे त्या भागात काम कराणारा एक गोरा मित्र सॅकरमेटो वरुन बे एरियात ट्रेन ने येतो आणि मग मोटरसायकलने कामावर जातो. ट्रेन मध्ये मोटरसायकल घेउन जाउ शकतो. जाता येता प्रवासाला ६ तास लागतात. आठवड्यातुन दोन दिवस (३ दिवस WFH) ऑफीस मध्ये असतो आणि प्रत्येक ट्रिप ला जाउन येण्यास $५८ खर्च येतो.
भारतात शिकलेली मुले अमेरिकेत लवकर रुळतात त्यामुळे लगेच घेउन जाणे चांगले. मात्र चांगल्या स्कुल डिस्ट्रिक्ट मध्येच राहाणे. बे एरियात कुपर्टिनो डिस्ट्रिक्ट चांगला आहे पण त्या भागात भाडे खुप जास्त आहे.
धन्यवाद माधव सोहा स्वाती२
धन्यवाद माधव सोहा स्वाती२ आणि अमितव.
>>टेक्सास/ मिनेसोटात कामाचे ठिकाण कुठे असणार आहे त्यानुसार रहाण्यासाठी जवळचे चांगले स्कूल डिस्ट्रिक्ट असणारे ठिकाण निवडता येइल.
माझा जॉब मोस्टली पुर्ण वेळ घरूनच असणार आहे. फक्त मला या तीन स्टेट्स पैकी एकामध्ये रहावे लागणार आहे.
>>मुलाला तुमच्या सोबतच आणा. ११-१२ हे तसे अडनिडे वय, आईबाबांची साथ-सोबत पुढील ६-७ वर्षे फार गरजेची त्यामुळे आईबाबा परदेशात आणि मूल भारतात असे शक्यतो नको.
मुलगा एकटा राहणार नाही. तशी वेळ आली तर बायको राहिल त्याच्या सोबत. मी किंवा ते दर सहा आठ महिन्याने भारत अमेरिका अप डाऊन करू. पण आलो तर मोस्टली सर्वच जण एकत्र येऊ
>>बे एरियात एकाच्या १३०-४०के पगारात जगणे काहीसं कठीण जाईल.
हो तिकडे जेम्तेम भागेल म्हणून मी इतर स्टेट चा पर्याय ओपन ठेवलेला आहे. ग्रीन कार्ड साठी साधारण २४ महिने लागतील अशी माहिती मिळाली होती. तरी बफर म्हणून मी ४ वर्षे पकडली आहेत.
>>इथे तुम्हाला का यायचं आहे?
माझं सर्वात महत्वाच कारण म्हणजे मुलाला उच्च शिक्षणाच्या योग्य संधी त्याला व मला कमीत कमी त्रास होईल अशा रितीने उपलब्ध करून देणे. एकदा तो मार्गी लागला की मिळणार्या सोशल सिक्युरीटी मध्ये भारतात आरामात येऊन रिटयर्ड लाईफ जगायचे
धन्यवाद साहिल. मी देखील ३
धन्यवाद साहिल. मी देखील ३ वर्षे walnut creek to Sacramento असा रोज प्रवास केलेला आहे ते देखील ड्राईव्ह करून त्यामुळे तुमच्या मित्राची अवस्था मी समजू शकतो
सोशल सिक्युरीटी चे calculation दिल्याबद्दल धन्यवाद 
प्रविणपा आणि शार्प शूटर एकच
प्रविणपा आणि शार्प शूटर एकच आहेत का?
मुलाला एकटे टाकून जाऊ नका.
मुलाला एकटे टाकून जाऊ नका.
सुवर्णसंधी सोडू नका.
दो मॅरेजेस आर मेड ईन हेवन द
दो मॅरेजेस आर मेड ईन हेवन द डिटेल्स नीड टू बी वर्क्ड आउट ऑन अर्थ म्हणतात तद्वत -
सुवर्ण्संधी सोडू नका. डिटेल्स मात्र वर्क आ उट करा. शुभेच्छा. पगारा मधे भागेल असे वाटते.
खूप उत्तम संधी आहे.
>> प्रविणपा आणि शार्प शूटर
>> प्रविणपा आणि शार्प शूटर एकच आहेत का?
होय. प्रविणपा चा सेव्ह केलेला पासवर्ड गूग्ल ने रिसेट केला. forget password करुन पास वर्ड रिसेट ची लिंक येईना म्हणून नवीन आय डी केला होता.
आज रिसेट पासवर्ड ची लिंक आली आणि प्रविणपा चा पासवर्ड रिसेट केला.
>> मुलाला एकटे टाकून जाऊ नका.
>> मुलाला एकटे टाकून जाऊ नका.
धन्यवाद सामो. नक्कीच नाही टाकणार एकटे. दोघांपैकी एक नक्की असेल मी डिटेल्स वर्क आउट करे पर्यंत त्याच्या सोबत
L1 विझा मुळे जॉब चेंज करता
L1 विझा मुळे जॉब चेंज करता येणार नाही त्यामुळे सॅलरी आधीच नेगोशिएट करता येते का बघा...
तुमचा एक्सपिरियन्स ( वय बघता) सॅलरी कमी देत आहेत... बे एरियात 1-2 इअर एक्सप ना इतका पैसे मिळतो... जस्ट अ रियालिटी चेक... प्लिज डोन्ट माईन्ड...
माझेही मत मुलाला
माझेही मत मुलाला तुमच्यासोबतच आणावे याला. कारण जितक्या लवकर इथे येईल तेवढा लवकर अॅडजस्ट होईल. ९वी ला हायस्कूल सुरु होते आणि ९-१२ महत्त्वाची वर्षे असतात इथे. सातवी आठवीला इथे आला तर तोवर नीट रुळेल.
बाकी कॉस्ट ऑफ लिविंग बे एरियात बरेच जास्त आहे हे तुम्हाला माहित असेलच. टेक्सस , मिनेसोटात त्यापेक्षा चीपर आहे. पण मिनेसोटात वेदर हा फॅक्टर विसरू नका. अजिबात सवय/ तयारी नसेल तर तो मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो.
बाकी जिसी ला २ वर्षे की कसे हे नक्की बरोबर आहे का ते बघा. इमिग्रेशन साइट्स वर तुमच्या कॅटेगरीसाठी करन्ट डेट पहा कोणती सुरु आहे, त्यावरून रिएलिस्टिक अंदाज यावा.
प्रविणपा - अॅडव्हान्स मधेच
प्रविणपा - अॅडव्हान्स मधेच वेलकम बॅक
तू एक दोन महिने आधी येउन गोष्टी सेटल करणे इतपर्यंत ठीक आहे. पण वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ मुलगा व पत्नीला तेथे असण्याचे इथल्या सेटलमेण्टच्या दृष्टीने फायदे काही नाहीत. तुमची काही कौटुंबिक कारणे असतील तर ते वेगळे.
मुलाच्या दृष्टीने जर उच्च शिक्षण इथे घेणार असेल तर जितक्या लौकर इथल्या सिस्टीम मधे शिक्षण सुरू होईल तितके चांगले. शक्यतो हायस्कूल सुरू होण्याच्या आधी (८ व्या ग्रेड पर्यंत). राहण्या बद्दल - तू जितकी माहिती दिली आहेस त्यावरून डलास्/ऑस्टिन बरे पडेल असे वाटते. बे एरियात तुला पगार आणखी निगोशिएट करावा लागेल (किंवा ग्रीन कार्ड व त्यानंतरही याच कंपनीत थांबण्याचा कालावधी होईपर्यंत त्याच पगारावर इथल्या खर्चाचा ताळमेळ ठेवावा लागेल). त्या रेंज मधे अगदी जमणारच नाही असे नाही पण टाइट होईल - मुख्य कारण म्हणजे रेण्ट्स. मिनेसोटा बद्दल काहीच माहीत नाही पण तिथली थंडी वगैरे फॅक्टर्स आहेत.
अमेरिकेत च सेटल होण्यासाठी
अमेरिकेत च सेटल होण्यासाठी असे धागे हवेतच .त्या लोकांना उपयोगी पडतो जे तिथे जाण्यास उस्तुक आहेत
आमच्या सारख्या न कसा ही असला तरी भारत च प्रिय आहे.
तरी माझे असे एक मत आहे.
उमेदी च्या काळात जगातील कोणत्या ही देशात जा जिथे खूप पैसे मिळतील.
पंधरा वीस वर्ष बाहेर च राहा.
खूप पैसे जमा करा.
आणि 45 मध्ये भारतात या.उद्योग व्यवसाय असेल तर मुलांकडे सोपवा
आणि आपल्या माणसा बरोबर रहा.
मुलांना बाहेर जावू ध्या.
तुमची 60 ,65 येईल तो पर्यंत मुल पण इथे येतील.त्यांची मुल तिथे असतील
असे नियोजन हवं.
पण कायम स्वरुपी हा देश सोडू नका
>>तुमचा एक्सपिरियन्स ( वय
>>तुमचा एक्सपिरियन्स ( वय बघता) सॅलरी कमी देत आहेत... बे एरियात 1-2 इअर एक्सप ना इतका पैसे मिळतो...
पण आता जो है सो है. सॅलरी आधीच नेगोशिएट करता येते का ते बघतो.
बरोबर आहे च्रप्स. मी मधली दहा वर्षे IT मधून ब्रेक घेतला होता. उस्का घाटा हो रेला है
>>प्रविणपा - अॅडव्हान्स मधेच वेलकम बॅक
दीपाली, सशल वगैरे बे एरिया ची गँग हल्ली माबोलीवर दिसत नाही.
धन्यवाद फारएण्ड. कदाचित वर्षभर नाहि पण सहा एक महिने थांबावे लागेल असे दिसतेय. येण्याचं ठरलं तर गटग करूच
>>पण कायम स्वरुपी हा देश सोडू नका
तुमच्या मताचा आदर आहे पण हा निर्णय To each is his own असा आहे. एखादे वेळेस आमच्या सारखी जुनी धोंडं परत येतीलही पण ज्या मुलांनी त्यांचं बालपण आणि तरुणपण तिथे घालवलय त्यांना इथे येण्यास भाग पाडणे माझ्या मते तरी योग्य नाही.
मुलाच्या दृष्टीने जर उच्च
मुलाच्या दृष्टीने जर उच्च शिक्षण इथे घेणार असेल तर जितक्या लौकर इथल्या सिस्टीम मधे शिक्षण सुरू होईल तितके चांगले. >> +१.
तसेच टेक्सास मधे स्टेट टॅक्स नसला तरी चांअग्ल्या स्कूल दिस्ट्रिक्ट असलेल्या ठिकाणि एकंदर घरांच्या किमती, रेंट्स, प्रॉपर्टी टॅ़क्स, इंश्यूरन्स कॉस्ट, कॉस्ट ऑफ लिव्हिंग ही खूप आहे हे डोक्यात असू द्या. स्टेटवाईड मिडियन किंवा एव्हरेज व्हॅल्ञु अतिशय फसव्या आहेत. तुमच्या डोक्यात जो एरिया असेल त्यानुसार बघा नि अंदाज घ्या.
मी मधली दहा वर्षे IT मधून
मी मधली दहा वर्षे IT मधून ब्रेक घेतला होता. उस्का घाटा हो रेला है
>>असे काही नसते हो.. पण जाऊ दे वेगळा विषय आहे... तुम्हाला शुभेच्छा -या पटापट... सेफ ट्रॅव्हल्स
१. >>आम्ही कॅलिफॉर्निया मध्ये
१. >>आम्ही कॅलिफॉर्निया मध्ये सहा वर्षे एच-1 वीसा वर राहून 2012 मध्ये भारतात परत आलो.<<
त्यावेळेस तुमचा सोशल होता हे गृहित धरतो. तसं असल्यास तुमचं स्टेटमेंट ssa.gov ला लॉगिन करुन बघा. बेनिफिट एलिजिबिलिटिकरता कमी वर्षं शिल्लक असतील. ग्रीन्कार्ड झाल्यावर तुमच्या सौ. ने लगेच नोकरी सुरु करुन १० वर्ष पूर्ण केली तर तिला सुद्धा रिटायर्मेंट (६७) नंतर, तिची बेनिफिट अमाउंट तुमच्या बेनिफिट अमाउंटच्या ५०%पेक्षा कमी असली तरिहि तिला वाढिव रक्कम (तुमच्या ५०%) मिळेल. तेहि तुम्हि हयात असलात तरीहि. म्हणजे तुम्हाला रिटायरमेंट (६७) नंतर १००% बेनिफिट मिळेल आणि तिला तुमच्या बेनिफिटच्या ५०%.
२. >>तसेच टेक्सास मधे स्टेट टॅक्स नसला तरी चांअग्ल्या स्कूल दिस्ट्रिक्ट असलेल्या ठिकाणि एकंदर घरांच्या किमती, रेंट्स, प्रॉपर्टी टॅ़क्स, इंश्यूरन्स कॉस्ट, कॉस्ट ऑफ लिव्हिंग ही खूप आहे हे डोक्यात असू द्या << +१
मिनिसोटात ट्विन सिटी असेल तर उत्तम, कॉस्ट ऑफ लिविंग स्टँडपॉइंट. पहिलि १-२ वर्षं थोडि कठिण जातील, नंतर सवय होते. फॉर एल१, देर मेनॉट बि इनफ रुम फॉर सॅलरी निगोशिएशन्स, बट आस्क फॉर मुविंग्/सेटलिंग अलाउंस.
३. इबि१ कॅटेगोरीत ग्रीनकार्ड २ वर्षात होते. यापुर्वि लेबर झालं असेल (असुमिंग सेम स्किलसेट) देन यु कॅन इवन कॅप्चर दॅट डेट (प्रि २०१२) टु एक्स्प्डाय्ट द ओवरॉल प्रोसेस...
चांगले स्कूल असणारा भाग
चांगले स्कूल असणारा भाग प्रचंड महागडा असतो. तसेच तिथे शाळेत जबरदस्त कॉम्पिटिशन असते. असल्या भागात टॉप १०% किंवा ५% मधे राहणे अवघड असू शकते. उलट थोडे कमी चांगले स्कूल असणारा भाग असेल तर तुमचा पाल्य तिथे जास्त चमकू शकतो कॉलेजच्या प्रवेशात ते जास्त महत्त्वाचे ठरू शकते. आणि घर भाडी आणि घरांच्या किमती थोड्या आवाक्यात येतात.
११ व्या वर्षी इतका culture शॉक कितपत झेपेल ते त्या मुलावर/मुलीवर अवलंबून आहे. काहींना सहज जमते. काहींना अवघड जाते.
बे एरिया मधे हवामान हा एक मोठा मुद्दा आहे. फार थंडी नाही आणि फार तीव्र उन्हाळा नाही. टेक्सस बहुतेक मोठ्या शहराचा आसपास उन्हाळ्यात प्रचंड गरम असते. थंडीत पाऊस आणि काही वेळा बर्फ पडून त्रास होऊ शकतो. मिनेसोटा त थंडी प्रचंड. ते कदाचित त्रासदायक वाटू शकेल.
टेक्सास हॉरिबल गरम होते..
टेक्सास हॉरिबल गरम होते.. मागच्या विकेंड गेलो होतो एका मित्राकडे- तंदूर झाला आहे डलास ... 105 वगैरे गेले होते... ... गरम लू वाहत होती.. झळा लागत होत्या...
आय वूड चूज कोल्ड ओव्हर हॉट ..
आय वूड चूज कोल्ड ओव्हर हॉट ... थंडीत काय इनर घालाल, थर्मल घालाल.. स्वेटर आणि जॅकेट घालाल..
गरम ठिकाणी काय करणार- जितके कमी कपडे तितका अजून जास्त त्रास होतो उन्हाच्या झळांचा...
म्हणजे तुम्हाला रिटायरमेंट
म्हणजे तुम्हाला रिटायरमेंट (६७) नंतर १००% बेनिफिट मिळेल आणि तिला तुमच्या बेनिफिटच्या ५०% << हे फक्त नॉन वर्किंग स्पाउस साठी का? कि वोर्किंग असेल तरीही?? दोघही रेगुलर वर्किंग असतिलतर (म्हणजे १० च्या बर्याच वर) काय नियम आहे?
>>दोघही रेगुलर वर्किंग
>>दोघही रेगुलर वर्किंग असतिलतर (म्हणजे १० च्या बर्याच वर) काय नियम आहे?>>
दोघेही आपापले स्वतंत्र बेनिफिट क्लेम करु शकतात. पण दोघांच्या उत्पन्नामधे बरीच तफावत असेल तर ज्याचे उत्पन्न जास्त आहे त्याच्या सोशल सिक्युरिटीवर दुसर्याने स्पाउझल बेनिफिट घेणे असेही करतात.
>>माझं सर्वात महत्वाच कारण
>>माझं सर्वात महत्वाच कारण म्हणजे मुलाला उच्च शिक्षणाच्या योग्य संधी त्याला व मला कमीत कमी त्रास होईल अशा रितीने उपलब्ध करून देणे.>>
ज्या स्टेटची निवड कराल तिथल्या पब्लिक युनिवर्सिटीज- इन स्टेट ट्युशन , प्रायवेट युनिवर्सिटी/आऊट ऑफ स्टेट टयुशन , एकंदरीत उच शिक्षणाच्या संधी याचाही विचार करा. तुम्ही कायमचे रहाणार नसल्यास आणि घरुन काम, स्नो मधून कम्युट नाही असे असेल तर आर्थिक बाजू विचारात घेवून मिनेसोटाचा विचार करायला हरकत नाही. थंडी-स्नो असले तरी त्यासाठी यंंत्रणाही असते. तसेही बदलत्या हवामानात थंडी किती तग धरणार हा प्रश्न आहेच. यावर्षी आम्हाला 'येरे येरे स्नो' म्हणायची वेळ आली.
L1 व्हिसा च्या spouse ला L2
L1 व्हिसा च्या spouse ला L2 व्हिसा मिळतो आणि ते लगेच काम सुरु करू शकतात। वर्क परमिट ची गरज नाही
L1A व्हिसा ला ग्रीन कार्ड २-३ वर्षात मिळून जाईल . L1B ला अजून १५-२० वर्षे लागतील
१३०-१४० हे बेटर आहे मिनिसोटा साठी
मुलगा नंतर दुसऱ्या स्टेट ला जाऊ शकतो uni साठी
रखरखाटापेक्षा स्नो कधीही
रखरखाटापेक्षा स्नो कधीही चांगला. चार वेगवेगळे सीझन असण्यासारखं सुख नाही. सतत निरभ्र आकाश किंवा सतत ऊन दोघांचा कंटाळा येतो. स्नो मध्ये भरपूर आऊटडोर ॲक्टीव्हीटी करता येतात. थंडीचा असा त्रास वगैरे काही होत नाही. आणि होतच असेल तर ते आल्यावर ठरावा.
बेकरी प्रचंड सेग्रिगेटेड आहे. एकदा स्कूल डिस्ट्रिक्ट प्रमाणे फासे टाकायचे ठरवले की भारतातून परत भारतात आल्यासारखे वाटेल..तीच स्पर्धा, तेच कल्चर!
मिनीसोटा बेस्ट बेट असेल मला वाटतं.
प्रविणपा, तुम्हाला संपर्कातून
प्रविणपा, तुम्हाला संपर्कातून निरोप पाठवला आहे.
माझं मात्र उलटं झालं. भयंकर
माझं मात्र उलटं झालं. भयंकर बर्फाळ प्रदेशात राहुन अरिझोनाला स्थलांतर केल्यापासुन मी जी खुश आहे ती अजुनही आहे.
टेक्सास कॅलिफोर्नियाएव्हडे
टेक्सास कॅलिफोर्नियाएव्हडे महाग नसले तरी वर म्ह्टले आहे तसे डलास फोर्टवर्थ भाग खूप महाग झाला आहे, फ्रिस्को, प्लेनो इत्यादी. आणि प्रॉपर्टी टॅक्स पण खूप वाढला आहे. तसेच उन्हाळा मागील काही वर्षांमधे खूप जास्त वाटतो आहे. ह्युस्टनला कमी असतील घरांच्या किमती कदाचित.
बापरे सुनिधी, अरिझोना? मला खूप थंड वा गरम दोन्ही आवडत नाही. आहे मी टेक्सासमधेच पण २०१३ मधे इथे आलो तेव्हा असे नव्हते खरे!
भयंकर बर्फाळ प्रदेशात राहुन
भयंकर बर्फाळ प्रदेशात राहुन अरिझोनाला स्थलांतर केल्यापासुन मी जी खुश आहे ती अजुनही आहे. >> वयाच्या पन्नाशीला स्थलांतर म्हणत असल्यामूळे मी ही मिनेसोटातल्या थंडीबद्दल (स्नो नाही) नीट विचार करून मग ठरवा असे सुचवेन. बहुतेक भारतीय थंद ते गरम असे स्थलांतर स्वखुशीने करताना बघितले आहेत - उलट दिशेने गेलेले फारच कमी जण ओळखीचे आहेत. तुम्ही नॉर्थ कॅरोलिनाचा विचार केला आहे का ?
१३०-१४०के मधे कॅलिफोर्नियाचा
१३०-१४०के मधे कॅलिफोर्नियाचा अजिबात विचार करु नका. तुम्हाला परत आल्यावर प्रचंड महागाई जाणवेल.
लल्लन्टाप असामी sneha1 अमितव
लल्लन्टाप असामी sneha1 अमितव त्रिपति स्वाती२ shendenaxatra राज maitreyee सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. मायबोली वर सर्वान्गाने माहीती मिळाली.
६ वर्षे राहिल्यामुळे महाग असलं तरी माझा personal preference कॅलिफोर्नियाचा आहे. सॅलरी negotiate केली आणि बायकोने काम सुरु केले तर चालण्यासारखे आहे. उन्हाळा इज माय फेव्रेट . स्नो अगदी फिरायला देखील आवडत नाही (Thanks to my stay in canada for over an year). त्यामुळे बहुतेक मिनेसोटा बाद. त्यामुळे टेक्सस आणि कॅलिफोर्निया चा विचार करेन आता.
>>प्रविणपा, तुम्हाला
>>प्रविणपा, तुम्हाला संपर्कातून निरोप पाठवला आहे.
वर्षा जी, तो निरोप मिळाला नाही. तुम्हाला एक निरोप पाठवला आहे तो मिळाला का चेक करा.
>>तुम्ही नॉर्थ कॅरोलिनाचा
>>तुम्ही नॉर्थ कॅरोलिनाचा विचार केला आहे का ?
होय परंतु कंपनीचा तिथे काही प्रेसेन्स नाहीय सध्या तरी. पुढच्या ६ महिन्यात काही प्रोजेक्ट्स आले तर नॉर्थ कॅरोलिना चा नक्की विचार करू.