जपानमध्ये शाकाहारी पदार्थ कुठे मिळतील.

Submitted by Ashwini_९९९ on 23 March, 2022 - 23:53

नमस्कार........
माझा भाचा जपानला नोकरीनिमित्त जात आहे. पूर्ण शाकाहारी आहे.. नक्की पोस्टिंग कुठे आहे हे टोकियोला तो पोचल्यानंतर कंपनी सांगणार आहे.
जपानमध्ये आपले भारतीय शाकाहारी पदार्थ /जेवण कुठे मिळेल ह्याची माहिती हवी आहे. अगदी घरगुती पदार्थांचा आग्रह नाही. मागच्या वेळेस interview साठी गेला होता तेव्हा चांगलेच हाल झाले होते जेवणाचे ...

Group content visibility: 
Use group defaults

<< तेव्हा चांगलेच हाल झाले होते जेवणाचे >>
या अनुभवातून शिकून, मांसाहार करण्याचा प्रयत्न कर, जमल्यास जपानी जेवणाची सवय कर असे सांगता येईल का?

त्याला स्वतःलाही ती कल्पना आहे की तस करायला लागणार आहे..पण एकदम सुरुवात करण नाही जमणार ..त्यामुळे निदान सुरवातीच्या काही महिन्यांसाठी तरी...

मी पण घरच्यांना असेच सांगायचो कि जेवणाचे हाल होतायत... चिकन चापत असायचो Happy

अश्विनी - तुमच्या भाच्याला शाकाहारीच हवे असेल तर त्याला स्वतःला कूक करायचा पर्याय आहेच... होप त्यांना कूकिंग येते... नसेल तरी बाहेर गेल्यावर शिकतोच माणूस...

स्वयंपाक शिकणे आणि घरी बनवणे.
जपानला गेलो नाही कधी पण चीन मध्ये मोठी शहरे वगळता मांसाहार करत असूनही हाल झाले, काय आहे, कसं खावं, कळत नाही, काही पदार्थांचा वास सहन होत नाही, काही एवढे कच्चे असते खाववत नाही मग पोटात मुकट्याने ढकला आणि शांघायला परतून मग हव्या त्या जेवणावर ताव मारा असे झाले होते. मी फक्त १० ते १५ दिवस गेलो होतो प्रत्येक वेळी. हॉटेलमध्ये राहिलो त्यामुळे स्वतः बनवुन खाण्याची सोय नव्हती, शक्य नव्हते.

भारतीय शाकाहाराची शोधाशोध करावी लागेल. पण जपानमध्ये बौध्द धर्माचे पालन करणारी मंडळी आहेत. त्यामुळे जपानी शाकाहार (बुद्धा क्युझिन्/ शोजिन रोरी - टोफू, भात इ ) मिळण्यास फार अडचण होऊ नये. ऑनलाईन सर्च केल्यास ज्या भागात आहे तिथले बुद्धा क्युझिन हॉटेल्/देऊळ सापडेल.

युट्यूबवर व्हिगन/व्हेजिटेरिअन इन जापान असं शोधून बघा. भरपूर व्हिडिओज आहेत. आजकाल सगळीकडे एकतरी भारतीय रेस्टॉरंट आणि ग्रोसरी स्टोअर असतंच. शिवाय स्वतः स्वयंपाक शिकणे हे तर आहेच.
मांसाहार करायला हवा असं आजिबातच नाही पण सुरूवातीला चुकून एखादा पदार्थ (उदा. फिश सॉस) गेला पोटात तर जाऊ दे!
जरा शोधाशोध केल्यावर HappyCow आणि Vegan passport ही दोन apps सापडली. शिवाय जपानसाठी https://vegewel.com/en/ ही एक वेबसाईट सापडली. आणि अॉफिसमधली लोकं देखील मदत करतीलच या साठी. शुभेच्छा!

इथे जपानचे वाहते पान आहे ना त्यात मदत मिळेल.

माझा पुतण्या क्याम्पस मुलाखतीतून इतर चारजणांबरोबर तिकडे गेला होता आणि एकत्र राहिल्याने २ वर्षे काही अडचण आली नाही. आता तिकडे नाही.

ब्रेड, सॉसेस, राईस, फळं, बेसिक भाज्या सगळीकडे मिळतीलच
आम्ही शांघाय ला राहिलो होतो.मार्केट मध्ये जास्तीत जास्त फिश आणि बाकी समुद्री गोष्टी असायच्या.वेफर्स सारखे दिसणारे प्रॉन चिप्स पण.पण उलट जास्त चैन केली फळांची आणि भाज्यांची.पार्सेमॉन मला आवडतात, ताजे मिळायचे एकदम.

त्याला स्वतःलाही ती कल्पना आहे की तस करायला लागणार आहे..पण एकदम सुरुवात करण नाही जमणार ..त्यामुळे निदान सुरवातीच्या काही महिन्यांसाठी तरी...>>>>>>>>>>>अजून गेला नसेल तर भारतातून सवय करून घ्यावी मांसाहाराची

बौद्ध लोक मांसाहार करतात की >> +१. अनेक बौद्ध देशांत भिख्खू सोडले तर बाकी कुणी शाकाहारी नाहीत. काही ठिकाणी तर तेही शाकाहारी नसावेत.

बौद्ध लोक मांसाहार करतात की >>> जर एखाद्या देशात शाकाहारापेक्षा मांसाहार मुबलक प्रमाणात ऊपलब्ध असेल तर मग धर्म कुठलाही असो, तिथे पिढ्यानपिढ्या राहणारी जनता मांसाहाराकडेच वळणार हे साहजिक आहे. त्यामुळे शाकाहार मांसाहार हे धर्मापेक्षा उपलब्धतेवर अवलंबून असावे असे वाटते. धर्माचे नियम काय आपणच बनवले आहेत.

शक्य झाल्यास हळूहळू मांसाहाराला सुरुवात करावी या विचारांशी सहमत. सोबत आपले जेवण आपण बनवायलाही शिकावेच. त्याला स्वतःला याची कल्पना आणि मनाची तयारी आहे हे उत्तम. आणि पुढे मागे तिथेच सेटल होणार असेल तर प्रश्न मिटेलच, नवरा बायको मिळून स्वयंपाकाचा जुगाड करतीलच. भाच्याला शुभेच्छा Happy

भारतीय जिभेला जपानी खाद्यपदार्थ खाण्यासाठी तयार करायला थोडा वेळ द्यावाच लागेल. मग तो शाकाहार असो वा मांसाहार. खुप फिक्या चवीचं असतं त्याचं अन्न. Adegashi tofu, vegetable Okanomoayi(cabbage pancake), edamame, sushi ह्या पदार्थांची तोंडओळख आणि जमलं तर मैत्री करावी लागेल.

अश्विनी, जर टोक्योमध्ये असेल आणि बेसिक जॅपनीज कळत असेल, बोलता येत असेल तर फार प्रॉब्लेम येणार नाही. आता तिथे बरीच भारतीय रेस्टॉरंट्सही झाली असतीलच. तसंच लोकल रेस्टॉरंट्समध्येही मिळू शकतं. थोडं एक्स्प्लोअर करायची तयारी हवी.

अरे पण बाबाजींना जायला महिनाभर वेळ हातात असेल तर बेसिक खिचडी, फुलके, दाल तडका, पोहे, उपमा, थालीपीठ शिकायला काय हरकत आहे? तसेही आजकाल MTR वगैरेंचे तयार रेडी टु कुक पाकिटे मिळतात की. मायक्रोव्हेव मध्ये भात होणारा छोटा राईस कुकर मिळतो की. हा इलेक्ट्रीक आहे

VARNIRAJ IMPORT & EXPORT WITH V LOGO Electric 1.5 L Mini Electric Multi-Purpose Cooker- Multicolour अ‍ॅमेझॉनवर आहे

अश्विनी, भाच्याला मायबोलीची ओळख करुन दे हाय काय नी नाय काय. महिनाभरा साठी टिन मधले राजमा छोले बरोबर न्यायचे. किंवा तिथे बिन्स मिळतीलच की. जपान फार महाग आहे असे ऐकलेय मग बाहेर २ दिवसाकरता खाणे ठीक आहे. शिकलात तर वाचाल ही नवी म्हण बनवा.

प्रत्येक विकतच्या पदार्थाचे इन्ग्रेडियांट्स न वाचणे किंवा कोणाला न विचारणे ( जपानी वाचता येत नसेल तर )
हे इतके केले तरी अनेक प्रकारचे ब्रेड, काही प्रकारच्या ओनीगिरी , स्नॅक्स खाता येईल.

(बुद्धा क्युझिन्/ शोजिन रोरी ) - हे सगळे प्रकार महागड्या कुझिन मध्ये मोडतात सहज मिळणार नाहीत शिवाय हे खरोखरच सहज उपलब्ध नाहीच.

लंच साठी अनेक भारतीय रेस्टॉरंट असतात त्यात साधारण 1000 येन मध्ये ( आत्ताची किंमत माहीत नाही ) जेवण होऊन जातं
किंवा इटालियन मध्ये काही प्रकार मिळतीलच

मुख्य प्रश्न रात्रीच्या जेवणाचा कारण ते भारतीय रेस्टॉरंट मध्ये महाग पडते त्यामुळे ते स्वतः करून खाणे.
थोडे रेडी टू इट आणि रेडी टू कुक पदार्थ नेता येतील
रेडी टू इट भाज्या, करी इत्यादी नेलं तर तिथे रेडिमेड शिजवलेला भात मिळतो सिल्ड पॅक मध्ये तो मावे मध्ये गरम करून त्याबरोबर खाता येईल

काही बेंतो शॉप्स मध्ये ( जेवण सिलेंक्त करून खणाच्या डब्यात भरून देतात) भात आणि एखादं स्टर फ्राईड भाजी, टोफू मिळेल. त्यात कसले सॉस आहेत ही चिकित्सा करू नये. किंवा इथून पण नुसता भात आणता येईल.

रेडी टू कुक मध्ये धनश्री फूड्स चे पदार्थ खूप चांगले आहेत . त्यावरच्या स्टेप फॉलो केल्या तर सोपं आहे ते
फक्त जरा महाग वाटू शकेल.

लेबल वाचून सगळे जाणून घेण्याचा चिकित्सक पणा कमी केला तर सुखाने जगता येइल

<<अॉफिसमधली लोकं देखील मदत करतीलच या साठी.>>> तोक्यो मध्ये नसाल आणि खूप जपानी टाइप ऑफिस असेल तर लोकांना व्हेजिटेरियन जेवण म्हणजे काय हे कळणार नाही :haha:

<<<लेबल वाचून सगळे जाणून घेण्याचा चिकित्सक पणा कमी केला तर सुखाने जगता येइल>>> प्रत्येक इन्ग्रेडीटण्ट तत्वत: व्हेज मध्ये मोडतो की नॉनव्हेज मध्ये अशी चिकित्सा करण्याबद्दल याला + इन्फिनिटी.

मस्त पोस्ट सावली! भाचा गुटगुटीत होऊनच परत यायचा Happy
लोकांना व्हेजिटेरियन जेवण म्हणजे काय हे कळणार नाही :haha: >> +१०० शोजिन रोरी/बुद्धा क्युझिन लिहीले ते ह्याच अनुषंगाने. महाग अपेक्षित नाही. व्हेजिटेरियन म्हणजे अंडे, श्रिंप चालेल का अशे दहा प्रश्न होतात. त्यापेक्षा बुद्धा bowl, बुद्धा क्युझिन इ शब्द सांगितले (अ‍ॅक्सेंट सहित - बुडाह!) की बरोबर शाकाहारी पदार्थ देतात.

@रश्मी....त्याच selection लास्ट इअर ला झालं होत... कोविड मुळे अडकला होता....आत्ता १४ मार्च ला त्यांनी तिकीट आणि विसा पाठवून दिला ..आणि आज तो गेला पण...ऊद्या पहाटे आपल्या वेळेप्रमाणे पहाटे ५.३० ला टोकियो ला पोचेल...
सगळीच गडबड झाली

अश्विनी, नॉन व्हेज खाणं न खाणं याबद्दल अनेक कारणं असू शकतात. (अनेक लोक व्हेगन बनत आहेत वगैरे ते काहींना प्रयत्न करूनही मांसाहार जमत नाही वगैरे. यातही वेगळी कारणे असू शकतात, माझे दोन तीन मित्र घरात पिढ्यान पिढ्या मांसाहार करत असून त्यांना सहन होत नाही म्हणुन शक्यतो टाळतात.)

मुद्दाम मांसाहार करा असा सल्ला देण्यापेक्षा, सुरवातीला ऍडजस्ट करून घेत असताना काय भारतीय पर्याय उपलब्ध आहेत तिथे एवढे बघावे असे मी म्हणेन. कुणाला व्हेजच हवे, नॉनव्हेज नकोच असेल तरीही, किंवा नॉनव्हेज खाणारी व्यक्ती असेल तरीही, भारतीय नॉनव्हेज पर्याय काय हा सुद्धा सुरवातीला गंभीर प्रश्न आहे.

जपानच कशाला केरळमध्ये गेलो तरी व्हेज / नॉनव्हेज खाणारे कोणीही असो सुरवातीला हाल होतील.
मग तिथला तो भल्या मोठ्या शितांचा बॉईल्ड राईस, तोंडी लावणे काहीही असो, व्हेज की नॉनव्हेज त्या सोबतच खायचे आणि तेही खोबरेल तेलातील पदार्थांसोबत. . सुरवातीला नको वाटते, घसाही खवखवतो पण होते सवय आणि मग ते आपण एन्जॉयपण करू लागतो.

मूळ समस्या असा मोठा बदल (व्हेज असो की नॉनव्हेज) स्विकारणे हा आहे. तरुण पोरा, जा बिनधास्त, शिक तिथले खाणे, आणि त्याची मजा सुद्धा घे असे सांगा त्याला.
टेस्ट डेव्हलप होते तशी अनलर्न पण करता येते. आपल्याकडील मसालेदार, चटकदार (आपण कितीही म्हणत असु आमच्याकडे मसालेदार नसते तरीही) पद्धत अनलर्न करता येते आणि तिथली टेस्ट डेव्हलप करता येते.
सुरवातीला परत आपल्याकडील मसालेदार उग्र वाटतात. पण तेच खात राहिले तर परत त्यांची सवय होते.

तिथे असताना मी भारतीय खाणे मिस करतो आहे असे म्हणण्यापेक्षा इथे येऊन आठवडा झाला की त्याने आता मी तिथले खाणे मिस करतो आहे असे म्हटले पाहिजे.

मग म्हणता येईल तो जगाचा अनुभव घेत आहे.

जो माणूस शाकाहारी आहे त्याला मांसाहाराची सवय करून घ्या असला सल्ला वाचून हसू आले.
>>>>>

मांसाहार न करण्याबाबतची कारणे प्रत्येकाची वेगळी असतात. बरेच जन्मजात शाकाहारी लग्नानंतर जोडीदारासोबत म्हणून मांसाहार करू लागलेले पाहिलेत. एक ऊदाहरण घरात आहे त्यामुळे हे बरेपैकी शक्य वाटते. त्यामुळे मला तर तो सल्ला पटला. विचार जरा वेगळा केला. बरेचदा मांसाहार जमणार नाही हा मेंटल ब्लॉक असतो. पण हे परदेशात गेल्यावर तेथील शाकाहारी पदार्थांबाबतही होऊ शकते जे आपल्याला अनोळखी असतात. किंवा ईथले कोंबड्या, बकरे आणि डुकरेच खाणाऱ्या मांसाहारप्रेमींनाही तिथले प्राणी वा ते बनवण्याचे प्रकार झेपतीलच असे नाही. बरेच पदार्थ आपल्याला आवडले जाण्याची शक्यता असूनही केवळ मेंटल ब्लॉकमुळे जर चवच बघितली जात नसेल तर आयुष्यभर हा खाण्यापिण्याचा प्रॉब्लेम राहणारच. बस्स जो विचार वेगळे शाकाहारी पदार्थ ट्राय करण्याबाबत करणार तोच मांसाहारी पदार्थांबाबत करायचा आहे. याऊपर शाकाहार-मांसाहार हा भेद मनातून काढता आला तर पर्याय नक्कीच वाढतील नाही का..

मासे ही समुद्रातली भाजीच की! अमेरिकेत सुशी मिळते तशीच जपानात असते का काही कल्पना नाही. पण ती असेल तर त्याच्याशी लवकर मैत्री जुळावी. त्याला वास, चव काहीच अशी वेगळी नसते. सोय सॉस आणि वसाबीचीच काय ती किक. सुरुवात रोल्स पासून करा फक्त. एकदम सशिमी नको. त्याला ते व्हेजच आहे हेच डोक्यात ठेवायला सांगा.
सावली म्हणत्येय तसं फार वाचत बसायचं नाही. फिश सॉस म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे भलतंच काही तरी येतं. पण त्याची चटक लागली की त्याच्याविना काहीच गोड लागत नाही.

व्हेजीटेरिअन माणसाला non veg खायला सांगणे हा सल्ला सांगायला सोपा आहे पण अमंलात आणायला खुप कठिण. असो. मला अजुनही ते जमल नाही. जीव वाचवायचा म्हणुन त्या एक्स्ट्रीम केस मध्ये करेन अ‍ॅडजस्ट पण सॅलड आणि फ्रुट्स असतील तर त्यावर चालवेन बहुदा सुरुवातीचे दिवस. त्या बरोबर प्रोटीन शेक .
खालील लिंक सापडली ती बघा काही उपयोगी पडते का.
https://www.thenomadicvegan.com/vegan-in-japan/

मी जपानमध्ये 5 ते 6 वेळा गेलो आहे आणि वास्तव्य 3 ते 4 आठवडे होते…. शाकाहारी माणसाने पहिल्यांदा ’वाताशी वा बेजितेरियन देसु’ -मी शाकाहारी आहे.... ’ निक्कु नाशी’ म्हणजे ’ मीट नको-मांस नको’ हे सांगणे आवश्यक आहे त्याच बरोबर…सकाना ने तोरी नाशी ( मासे व चिकन ) नाही हे देखील... अंडे वर्ज्य असल्यास ’तमागो नाशी’.
खेड्यात असाल तर ’बेजितेरियन’ समजत नाही , तिथे ’साइशोकु शुगिशा’ म्हणा
Don't worry about this word if you are just visiting Tokyo -- just say "vegetarian".)
जपानमध्ये अनेक रेस्तॉरंट्स मध्ये हे सांगितल्यावर ’ करे’ म्हणजे करी हा एक प्रकार भाज्या टाकून मिळतो त्या बरोबर साधा भात मिळतो. उकडलेला बटाटा व क्रीम खाता येते. स्टर फ्राईड व्हेजिट्बल्स मिळतात. बर्‍याच हॉटेलात (वास्तव्य असल्यास) उत्तम पाश्चात्य ब्रेकफास्ट मिळतो. तिथे फळे असतात व ’योगुर्तो मिल्कु’ म्हणजे ताक देखील मिळते.
या शिवाय डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये ब्रेड, चीज इ मिळतात, उत्तम ज्युसेस मिळतात.
मोठ्या शहरात भारतीय रेस्टॉरंट्स आहेत पण महाग आहेत..
बर्‍याच जपानी लोकांना आपल्या शाकाहारी सवयी माहित असतात त्यामुळे त्यांच्याबरोबर गेल्यास हॉटेलात आपले पदार्थ मिळतात. उदा: ओकोनोमियाकी म्हणजे तिथला दोसा, त्याची टॉपिंग्ज ठरवता येतात, तेंपुरा म्हणजे तिथल्या भज्यांत अंडे असते पण छान लागतात.
अशा प्रकारे थोडे इनोव्हेशन, थोडे कुतुहल असे करून मी माझ्या शाकाहाराचा त्रास होऊ दिला नाही

<< जो माणूस शाकाहारी आहे त्याला मांसाहाराची सवय करून घ्या असला सल्ला वाचून हसू आले...
>>

It is not the most intellectual of the species that survives; it is not the strongest that survives; but the species that survives is the one that is able best to adapt and adjust to the changing environment in which it finds itself. - Charles Darwin

काही खाण्यासाठी जगतात, काही जगण्यासाठी खातात. शेवटी आपापली मर्जी.

तिथे जाऊन हवे ते मिळवून खाणे, बनवून खाणे हे सुद्धा सर्व्हायव्हल स्किल मध्ये मोडते. माझा एक जर्मन कलीग चीनला डेप्युटेशनवर होता तीन वर्षे. तो व्हेगन झाला होता केव्हापासूनच. चीन मध्ये राहूनही व्हेगन खात होता व्यवस्थीत.

अशा ठिकाणी कुणी गेले जिथे आता मांसाहार करण्यावाचून गत्यंतर नाही अन्यथा केवळ कंद, मुंळे फळं खात रहावे लागून कुपोषण होईल असे असेल तर डार्विनचे कोटेशन त्याला सांगता येईल.

एरव्ही मांसाहार करा करू नका ज्याचा त्याचा प्रश्न.

तळटीप: यावरून व्हेगन लोकांचे कुपोषण होतेच असे कुणास मांडायचे असेल तर वेगळा धागा काढुया त्यासाठी.

'जपानमधले मायबोलीकर' शोधल्यावर बरेच धागे आले.
पण जपानचं वाहतं पान गप्पा धागा २०१७ लाच गोठला आहे. पण इतर धाग्यातून आइडी कळतीलच. तर भाच्याने माबोचे सभासदत्व घेऊन त्यांच्याशी संपर्क करावा म्हणजे ते मायबोलीवर लॉगिन नसले तरी इमेल जाईल. शिवाय बरेच दिवस राहणे असल्यास आणि ते जवळच राहात असल्यास ओळख होईल.

तळटीप: यावरून व्हेगन लोकांचे कुपोषण होतेच असे कुणास मांडायचे असेल तर वेगळा धागा काढुया त्यासाठी.>> आहे माझा धागा.

@रश्मी....त्याच selection लास्ट इअर ला झालं होत... कोविड मुळे अडकला होता....आत्ता १४ मार्च ला त्यांनी तिकीट आणि विसा पाठवून दिला ..आणि आज तो गेला पण...ऊद्या पहाटे आपल्या वेळेप्रमाणे पहाटे ५.३० ला टोकियो ला पोचेल...
सगळीच गडबड झाली>>>>>अरे असे झाले होय . तरी पण त्याला मेसेज टाक की राजमा किंवा तश्या बिन्स टिन मधल्या मिळतील त्या भाता बरोबर घे. माझ्या चुलत दिराचे सेम असेच झाले. घरी कधी चहा पण नाही केला, प्युअर व्हेज माणुस. जपान मध्ये महिनाभर होता. नुसता दुध भात, चहा व ब्रेड यावरच राहीला. ही गोष्ट १० वर्षापूर्वीची. त्यामुळे आता बराच बदल झाला असेल.

मांसाहारी असला एकदा व्यक्ती म्हणजे तो सर्व प्रकारचा मांसाहार करू शकेल हे अशक्य आहे
आपण इथे बोकड,कोबडी खाणारे म्हैस किंवा कुत्र्याचे मांस खावू शकणार नाही.
उलटी होईल.
शाकाहारी लोकांचे पण तेच आहे काही भाज्या किंवा डाळी विषयी तिरस्कार असतो.
तो का निर्माण होतो तो गहाण प्रश्न .
मी फुल कोबी,पत्ता कोबी,तुर डाळ खात नाही समोर फक्त ह्याचे पदार्थ दिसले तरी तिरस्कार निर्माण होतो
किती ही भूक लागली तरी मी ये खावू शकत नाही.
मसाला डोसा सोडला तर बाकी सर्व दक्षिण भारतीय व्यंजन मी खावू शकत नाही.
भले लाल चटणी आणि चपाती खाईन.
आपल्याला हवं ते पदार्थ मिळणे हे खूप महत्त्वाचे.
पोट च भरायचे असेल तर फळं,ज्यूस,पिझ्झा नी पण भरेल.

युनिव्हर्सल सर्वांना आवडणारे .
चीझ, दूध, दही,बटर, अंडा,फळं,ब्रेड,पाव,बटाटा,चिकन फक्त शिजवलेले असेल तरी,
इत्यादी इत्यादी .
काहीं nadat नाही.
हे पदार्थ सर्व ठिकाणी जगात मिळतात.
आणि सर्वात भारी settle झाल्यावर स्वतःचे जेवण स्वतः बनवणे.
ज्याला साधे जेवण बनवत येत नसेल तर तो नोकरी करणाऱ्या कंपनीचे काय भले करणार आहे.
हा प्रश्न आहेच

<<ज्याला साधे जेवण बनवत येत नसेल तर तो नोकरी करणाऱ्या कंपनीचे काय भले करणार आहे.
हा प्रश्न आहेच
>> Lol

वाह, चांगले झाले. जापानला पोचल्यावर कळेल का कोणत्या शहरात रहायचे आहे ते? एक वर्ष माहिती होते तर या वर्षात त्याने तयारी केली असेलच ना? आजकालची मुलं तशी माहिती जमवतात आणि त्यांचे पण सोर्सेस असतात.
मस्त जमून जाईल त्याचं Happy

तेवढा दंडात कॉलरा घुसवून घ्या.

अहो, तिकडे हमाल बिमाल काही नाहीयेत. तुम्ही हमाल हमाल म्हणून ओरडा, कुत्रं देखील येणार नाही.

आता जागतिक महायुद्ध अटळ!

मला वाटतं दोन हजार रुपयांचे येन करून नेता येतात. आमचे काका गेले होते तोक्योला, तेव्हा त्यांनी दोन हजारांचे येन करून नेले होते. केव्हा गेले होते तुमचे काका? नाईंटीन फोर्टीमध्ये, म्हणजे ते जेव्हा गेले तेव्हा मी दोन वर्षांचा होतो.
----------------
या वरील सर्व गोष्टींमध्ये जी गत इतर विषयातील सल्ल्यांची, तीच वरती जपानमधील शाकाहाराच्या बाबतीत सल्ल्यांची वाटते आहे.

भाचे पोचले .आता एका महिन्यात रुळतील . काळजी करू नका .
आता बाकीच्यांनी धडा घेऊन मुलांचे शिक्षण चालू करा . लाड थांबवा . काही अवघड नाही . मी एका महिन्यात शिकलो . आता भाजी भाकरी पिठले व्यवस्थित जमते .

ह.पा Lol

रेव्यु व मानव यांच्या पोस्ट्स आवडल्या. आणि विक्रमसिंह यांची सुपातल्यांना उपयुक्त (जपानी सूप नव्हे) Wink

योगुर्तो मिल्कु हे फारच लडिवाळ नाव आहे Happy

मांस, मासे, अंडी ई. न चालणार्‍यांत काही असे असतात की जे थेट मांस दिसले तर खात नाहीत पण पदार्थांत लपले असेल तर चालते. केकमधल्या किंवा अमेरिकन आइसक्रीम मधल्या अंड्यासारखे. तर काही "प्रखर व्हेज" लोकांना तितकेही चालत नाही. तुमचा भाचा जर पहिल्या प्रकारात असेल तर चालून जाईल. कारण बर्‍याच एशियन पदार्थांत सुप्तरीत्या अंडी/मांस असते पण वरकरणी कळत नाही. व्हेज सूप मधे चिकन ब्रॉथ वगैरे.