नोकरी-व्यवसाय

ऑनलाईन व्यवसाय (कपडेविक्री) सुरू करण्याबाबत माहिती हवी आहे.

Submitted by Cuty on 3 December, 2020 - 07:57

कोरोनाकाळात, प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीकडे लोकांचा कल खूप वाढला आहे. आता सणसमारंभ आणि लगिनसराईचे दिवसही लवकरच येतील. त्यातही इतर अनेक गोष्टींपेक्षा कपड्यांची खरेदी तर आजकाल हटकून ऑनलाईनच केली जाते. मला फक्त लेडिजसाठी टाॅप्स, ड्रेस इ. (साडी नाही) कपड्यांचा व्यवसाय करायची ईच्छा आहे. पुण्यात असताना फक्त सोसायटी व जवळपासच्या एरियामधे घरातच लेडिज कपडेविक्रीचा थोडासा अनुभव आहे. पण त्याला काही अगदी व्यवसाय म्हणता येणार नाही. मला मुले लहान असल्याने स्वतंत्र दुकान वगैरे ईतक्यात जमणार नाही. शिवाय लगेच फार भांडवल गुंतवण्याची रिस्कही घ्यायची नाही.

शब्दखुणा: 

कतार मधील कुणी मायबोलीकर आहेत का?

Submitted by यक्ष on 30 November, 2020 - 05:44

कतार मध्ये वास्तव्याविषयी काही प्रश्न विचरायचे आहेत. कतार मधील कुणी मायबोलीकर असल्यास कृपया कळवणे!

धन्यवाद.

सोसायटी मेंटेनन्स बिलिंगविषयी

Submitted by विक्षिप्त_मुलगा on 25 October, 2020 - 14:09

मी राहत असलेल्या रहिवासी सोसायटीचे दरमहा मेंटेनन्स बिल्स (प्रत्येक सदनिकाधारकाला देण्यासाठी) बाहेरून एका व्यक्तीकडून तयार करून घेतले जाते. तेव्हा माझ्या मनात असे आले की, आपल्या सोसायटीचे मेंटेनन्स बिल्स आपणच बनवावे, म्हणजे सोसायटीचे थोडेफार पैसे वाचतील आणि आपल्या सोसायटीचे काम नीट जमू लागले की मग आजूबाजूच्या इतर सोसायट्यांचेही काम घ्यावे, म्हणजे अधिकचे चार पैसे कमावता येतील.

तर या कामाविषयी थोडी माहिती हवी आहे.

१. अशा प्रकारच्या सेवेला काय संबोधले जाते? म्हणजे जर उद्या मला जाहिरात करायची असेल तर नेमकी काय service देत आहोत असे जाहिरातीत द्यायचे??

प्रोजेक्ट मधून रोल ऑफ होताना कसा attitude हवा ?

Submitted by ऱोहि on 15 October, 2020 - 03:20

कधी कधी असं होत कि manger खडूस असतो , कधी टीम mates भावखाऊ असतात . मी ज्या प्रोजेक्ट मध्ये assign झाले तेंव्हा तो ongoing प्रोजेक्ट होता. नव्या टीम मध्ये छोट्या छोट्या टीम झाल्या होत्या . सगळेच मला नवीन असल्याने कुणी KT प्रॉपर दिली नाही तरी मी तेंव्हा चालवूंन घेतले. बरेच जण prod चा ऍक्सेस असल्याने काही prod ला fail झालं तरी डिटेल्स द्यायचे नाहीत . मुळात माझा स्वभाव खूप बडबड करण्याचा नाहीये ,त्यामुळे खूप त्रास झाला .
लोक त्यांना assign केलेली कामे सुद्धा इतक्या भाव खाऊन करतात याचा राग यायचा. आता प्रोजेक्ट संपत आलाय सो मला release करत आहेत .

सॉफ्ट स्किल्स कसे शिकावेत?

Submitted by सामो on 29 August, 2020 - 11:25

सॉफ्ट्स्किल्स नक्की कसे शिकायचे? मान्य आहे की अनुभवांनी जरुर काही प्रमाणात शिकता येतात. पण बालपणी आपल्या पाल्यांना शिकवता येतात का? मूळात आडात (पालक) नसतील तर पोहर्‍यात (पाल्य) येउ शकतील का? तुम्हाला काय वाटते तुम्ही सॉफ्ट स्किल्स्मध्ये कितीसे पारंगत आहात? तुम्ही कसे शिकलात?

नोकरी किंवा कंत्राटी काम मिळण्यात नशीबाचा सहभाग

Submitted by केअशु on 15 August, 2020 - 03:30

सध्या कोरोनाप्रतापामुळे अनेकांच्या नोकर्‍या जात आहेत.कंत्राटी कामे मिळेनात.कधीतरी कोरोना अगदी नगण्य उरेलच; किंवा संपुष्टातसुद्धा येईल. त्यावेळी पुन्हा नोकरी संशोधन किंवा नवे कंत्राटी काम मिळवायला लोक बाहेर पडतीलच.

खाजगी नोकरी शोधताना किंवा नोकरी करत असताना किंवा कंत्राटी कामे मिळवताना काही वेळा असे निदर्शनास येईल की आपण पात्र असूनही आपल्याला संधी मिळालेली नाही किंवा प्रमोशन मिळालेले नाही.उलट आपल्याला डावलून ज्याला संधी दिली गेलीय त्याला नक्की काय पाहून त्या पदावर काम करण्याची संधी दिली गेली असावी किंवा नक्की काय तपासून कंत्राट दिले गेले असावे अशी शंका येते.

शब्दखुणा: 

॓Courses For Quality Professionals—IT Company

Submitted by dodo14 on 20 July, 2020 - 03:36

नमस्कार, Quality Analyst Professional साठी certification Course ची माहिती हवी आहे आणि certified Institutes बद्दल पण माहिती हवी आहे मुंबई मध्ये असतील तर

Few courses as per my knowledge
Certified Scrum Master
ISO 900०
Lean

अजून एक प्रश्न आहे सध्या सगळे online class घेणार आहेत मग त्याला किती value असेल जॉब मार्केट मध्ये please advies

शब्दखुणा: 

हिंजवडी चावडी: लॉकडाऊन नॉकडाऊन

Submitted by mi_anu on 24 June, 2020 - 15:38

(डिस्क्लेमर: या लेखमालिकेतले मांजर आणि ऑफिस पूर्णपणे प्रातिनिधिक आणि काल्पनिक आहे.वात्रटपणे माहिती गुगल करून खऱ्या माणसाशी किंवा ऑफिसशी संबंध लावल्यास दात पाडण्यात येतील.)

NRI आणि समाजाचे दुटप्पी धोरण.

Submitted by सखा on 27 May, 2020 - 17:41

परदेशात राहणाऱ्या भारतीय लोकांबद्दल साधारणपणे एक दुटप्पी धोरण असतं असा माझा अनुभव आहे.
खरं म्हणजे परदेशात जाणं आणि तिथेच स्थायिक होण हे एक फार मोठं डिसिजन असत आणि तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु दुसऱ्याच्या या खासगी जीवनात नाक खुपसायची सवय असल्यामुळे आपल्याकडे त्याची चर्चा होतेच. बहुतेक वेळा टाकल आईबापाला इथं आणि तिकडे मस्त मजा मारत आहेत असे एक करूण चित्र उभे केले जाते. माझ्या मते ते फार स्टरियोटाइप आहे.

Pages

Subscribe to RSS - नोकरी-व्यवसाय