वर्तुळ

Submitted by धनश्री- on 4 August, 2022 - 03:03

खरं तर अर्पितान काहीही प्रश्न न विचारताही, नेहमी सिराज , तिला स्वतःच्या डेटबद्दल इथ्यंभूत माहीती द्यायची. आई व मुलीत जर सांमजस्यपूर्ण नाते असेल तर असे होणे साहजिकच नाही का! आईने अगदी मैत्रिणच असले पाहिजे असे नसते कारण आई एकच मिळते. परंतु जरी आईने , मुलीचे मन लावुन ऐकून घेतले तर मुलगी तिच्यापाशी कित्येक गुपिते उघडी करते हे अर्पिताला इतक्या वर्षांच्या आईपणानंतर, माहीत होतेच की.
सिराज काही बोलत नाही हे पाहून, अर्पिताने कॉफीचा कप सिराजपुढे ढकलत स्वतः घोडं दामटवलं. "सिरु कशी झाली मग कालची डेट? कुठे भेटलात? किती वेळ गप्पा झाल्या?"
"खास नाही झाली. वेळेचा अपव्यय नुसता.."
अर्पिता, सिराजला जाणुन होती. तिची लव्ह स्टाइल होती, 'वेळ देणे'. म्हणजे बघा प्रत्येकाच्या लव्ह स्टाइल्स (https://www.truity.com/test/love-styles-test) असतात - काहींना वाटते भेटवस्तू महत्वाच्या असतात तर काहींना उत्तेजनात्मक शब्द उदा - स्तुती ,कॉम्प्लिमेन्टस, दिलासा तर काहींकरता, 'प्रिय व्यक्तीने केलेली कॄती महत्वाची असते तर काहीं करता स्पर्श' पैकी सिराजला 'वेळ' महत्वाचा वाटे. ती नेहमी, अर्पिताला सांगे "आई मला वेळ घालवायचा नाही गं. डेटिंग अ‍ॅपवरती सगळेजण 'गेमफेस' म्हणजे त्यांचे सर्वोत्तम रुप दाखवितात. मूळात असतात वेगळेच."
अर्पिताने परत मायेने विचारले "अरेच्या असे झाले तरी काय?"
"काही नाही गं तो मुलगा डेटच्या मध्यावर मला म्हणतो की तो अमेरिकन मुलींबरोबर डेटवर जातो. पण लग्न मात्र भारतिय मुलीशीच करणार."
अर्पिताने विचारले "अगं मग त्यात काय? त्याचे विचार, संवादाची स्टाइल जास्त करुन भारतिय मुलींबरोबर जमत असेल. त्या त्याला जास्त कम्फर्टेबल वाटत असतील."
"अगं पण हे बरोबर वाटतं का? या मुलाचे मूळात, डबल स्टँडर्ड आहेत हे. "
"त्यात डबल काय? तू नाही अनेकांना डेट करुन , जोडीदार एकच निवडणार?"
"मी माझ्या डेटपूलमधूनच निवडणार ना. त्यात तर काही भेद करणार नाही. कसं सांगू - तो सिन्सिअरली डेट करतच नाहीये गं. डेट करतानाच त्याने ठरविले आहे की - जोडीदार हिला नाही बनवायचे. फक्त वेळ घालवायला ही बरी."
धिस वॉज अ‍ॅन 'आहा!!" मोमेन्ट फॉर अर्पिता. तिला अचानक मुलीबद्दल अनेक भावना मनात दाटून आल्या. किती समंजस आहे ही. खर्‍या अर्थाने मोठी होते आहे. विचार करायला शिकते आहे.
"आई कालचा तुझा इन्टर्व्ह्यु कसा गेला?" - सिराज
"वेळेचा अपव्यय नाही म्हणता येणार पण नकाराची खात्री आहे. खास नाही गेला." - अर्पिता
"सिरु, हा मुलगा फार अंतर्मुख आहे, तर तो अति स्त्री दाक्षिण्य दाखवतो, याला भारतिय मुलीशीच लग्न करायचे आहे तर अमका बालिश वाटतो ...... अशी प्रत्येकात खोटच काढत राहीलीस तर बोलणं पुढे सरकणार कसं? गिव्ह देम अ चान्स!!!! अ_चा-न्स. आणि एक लक्षात ठेव तुझ्यासारखेच ते ही अननुभवी आहेत. यु बोथ आर सपोस्ड टू ग्रो & हेल्प इच अदर ग्रो. रेडीमेड हीरा कसा मिळेल तुला?!!"
"आई, तुला नाही वाटत अमका इन्टर्व्ह्यु वेळेचा अपव्यय होता? तू नाही मनातल्या मनात, चरफडत?"
"हो थोडासा वेळेचा अपव्यय वाटतो. पण यात लॉस म्युच्युअल आहे ना. अर्ध्या तासात माझी लायकी पारखता येइल का एम्प्लोयर्स ना? जशी माझी नोकरीची संधी मी प्रत्येक वेळी गमावते तशीच गुणवत्ता असलेल्या कँडिडेटची, त्यांची संधीही जाते. अर्थात मला इन्टर्व्ह्युचा सराव होतोच हा प्लस पॉइन्टच आहे" - अर्पिता
"याचा अर्थ आपण सेम बोटीत आहोत?" - सिराज
"अगदी. दर इन्टर्व्युला माझ्या आशा बळावतात आणि तो फसला की उर्जा प्रचंड ड्रेन होते. या भरती-ओहोटीच्या लाटा मलाही जडच जातात. बट आय गिव्ह मायसेल्फ अ चान्स" - अर्पिता
यावर सिराजला खुदकन हसूच आलं. तिची कॉफी एव्हान पिऊन झालेली होती. "सेम बोटीत? अगं आई पण निदान तुझं एक बरं आहे - तुला कोणी आवडतं, सगळं आलबेल आहेसं वाटतं आणि मग तिच व्यक्ती तुला 'घोस्ट' करते असं तर नाही होत. " - सिराज
सिराजचा कप सिंकमध्ये टाकत, अर्पिता म्हणाली - "होल्ड युअर हॉर्सेस स्वीटी!!! कशावरुन असं म्हणतेस? अगं सगळे म्हणजे एकूण एक रिक्रुटर्स घोड्यावर बसून येतात "रेझ्युमे दो - अभी दो - क्विक क्विक - क्विक आणि एकदा इन्टर्व्यु झाला की चक्क फोनही उचलत नाहीत. मग 'नकार' कळवणं दूरच. मी वाट बघत बसते आता फोन येइल, मग फोन येइल."
आता मात्र सिराजला हसू आवरेना, हे म्हणजे २२ वर्षांची ती आणि ५० वर्षांची मी एकाच अनुभवास सामोरे जात होतो. मोठी गंमतच होती.
"म्हणजे मला जसा एखादा मुलगा आवडून जातो पण तो ना धड नकार कळवतो ना होकार. फक्त टांगून ठेवतो तसं तुझं जॉब बाबत , एखाद्या कंपनीबाबत खरच होतं?" - सिराज हसत हसत.
" हो तर. आणि मग क्वचित तोच मुलगा तुला दुसर्‍याच मुलीबरोबर दिसतो, तशीच मलाही त्याच जॉब ची पोस्टिंग काढून टाकलेली दिसते." - अर्पिता
"हाहाहा आई हे स्टॉकिंग झालं ग. आय कॅन सो सो मच रिलेट टु इट."
या स्टॉकिंगच्या मुद्द्यावरती मात्र दोघींनाही हसू आवरेना.
सिराजला उशीर झाल्याने ती आंघोळीला पळाली आणि इकडे अर्पिता पुढच्या इन्टर्व्युचे मटिरिअल वाचायला, तिच्या होम-ऑफिसमध्ये स्थानापन्न झाली. जिथे ती इंडस्ट्रीमध्ये 'एजिझम' ला सामोरे जात होती तिथे सिराज "चाइल्डिश' वाटुन मुलांना डेट नाकारत होती. हे एक प्रकारचं रिव्हर्स एजिझमच होतं.
आयुष्य हे असच असतं. कधीकधी एखादं वर्तुळ पूर्ण होतं नाही का. बघायची नजर हवी. आपल्याला काय वाटत? Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विश यु गुड लक शर्मिला.
छुपे आहे पण आहे. ऑप्शनल फिल्ड असेल तर डिग्री पूर्ण केल्याचे वर्ष जिथे जिथे मागतात तिथे मी देतच नाही. व्हाय द हेल दे नीड इट????

थॅंक्स सामो.

ऑप्शनल फिल्ड असेल तर डिग्री पूर्ण केल्याचे वर्ष जिथे जिथे मागतात तिथे मी देतच नाही. व्हाय द हेल दे नीड इट???? >> पण रेज्युमे वर जन्मतारीख असते नं.. पहिला ‘अरे बापरे!’ तिथे येतो. पुढचा ‘अरे बापरे’, ‘मला पूर्ण वेळेचं काम नको..’ ला येतो. ….हा.. हा..

गेले वर्षभर मी घरी बसले.. आता जरा कंटाळा आला म्हणून बघते जरा.. इथे.. तिथे.. काही सापडतं का, ते..

नाही जन्मतारीख अ नो नो. रेझ्युमेवरती मी कधीच जन्मतारीख पाहीली नाहीये.
सापडेल. यु विल क्रॅक इट. धीरज और सबुरी!! नक्की होइल.

रेस्युमे वर जन्मतारीख, पासपोर्ट नंबर,घरचा पूर्ण पत्ता टाकणारे लोकही पाहिले आहेत.. हि सर्व पर्सनल इन्फो आहे- जॉइनिंग करतानाच एच आर ला द्यावी.. त्या आधी नाही...

रेस्युमे वर जन्मतारीख, पासपोर्ट नंबर,घरचा पूर्ण पत्ता टाकणारे लोकही पाहिले आहेत.. हि सर्व पर्सनल इन्फो आहे- जॉइनिंग करतानाच एच आर ला द्यावी.. त्या आधी नाही...

>> Really? मी आत्तपर्यंत एकुणएक resume / bio data/ cv वर ही माहिती पाहिली आहे.