लेऑफ

Submitted by उपाशी बोका on 13 July, 2022 - 00:05

सध्या परिस्थिती अशी आहे की जगभरात बहुतेक सगळीकडेच महागाई वाढत आहे. त्यामुळे बहुतेक देशात व्याजदर वाढवले जात आहेत, ज्यामुळे महागाई आटोक्यात येईल. याचा एक परिणाम म्हणजे फायदेशीर व्यवसाय करणे, हळूहळू बऱ्याच कंपन्यांना कठीण होईल आणि त्यातूनच मग लेऑफ म्हणजे नोकऱ्या जाण्यास सुरुवात होणार आहे. म्हणून सर्वांना सावध करण्यासाठी हा धागा काढला आहे. कामावरून काढताना कंपनी आणि एच.आर. अजिबात दयामाया दाखवत नाही असा माझा बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे, म्हणून कृपया गाफील राहू नका.

१. तुमचे स्किल वाढवत रहा. नवीन गोष्टी शिकत रहा.
२. तुम्ही काम कसे केले, ते मॅनेजरला सांगू नका. फक्त रिझल्ट दाखवा.
३. कामाची पद्धत किंवा तुम्ही वापरता त्या युक्त्या कुणाला शिकवू नका.
४. मॅनेजमेंटवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या कामावर आणि कर्तबगारीवर विश्वास ठेवा.
५. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुणाचीही नोकरी कधीही जाऊ शकते, म्हणून नेहमी डोळे व कान उघडे ठेवा.
६. अवास्तव खर्च करू नका.
७. अडीअडचणीला कामी येईल, म्हणून नेहमी बचत करून थोडे पैसे हाताशी ठेवा.

पुढे येणाऱ्या संकटाची जाणीव करून देण्यासाठी सांगत आहे. जसे वाईट दिवस जातात, तसे चांगले दिवसही बदलतात. नोकरी चालू असेल, तेव्हा फक्त बोनस आणि प्रमोशन समोर दिसते पण परिस्थिती अचानक बदलू शकेल, हा विचार सहसा मनात येत नाही. कुणाला घाबरवायची इच्छा नाही, पण म्हणून तहान लागल्यावर विहीर खोदायला जाणे हे शहाणपणाचे होणार नाही.

दोन-चार ठिकाणी ओळखीच्यात ले-ऑफ झाल्याचे कानावर आले. तुम्ही पण कुठल्या कंपनीत नोकर कपात झाली अथवा नवीन भरती न करणे (ऑफर लेटर रद्द करणे), ऐकले असेल तर इथे लिहू शकता.

Group content visibility: 
Use group defaults

सहमत..
३. कामाची पद्धत किंवा तुम्ही वापरता त्या युक्त्या कुणाला शिकवू नका.>> हे तर १००%. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते ही मध्यमवर्गिय बकवास आहे. Use your skills for your benefit, not others.

८. एका पेक्षा जास्त मिळकतीचे स्त्रोत तयार करा. त्यात पॅसिव्ह ईन्कम देणार्‍या किंवा तुमचा कमीत कमी वेळ घेतील अशा मिळकतीच्या स्त्रोतांवर जास्त लक्ष केंद्रित करा.

नानबा, माझ्या कंपनीत लेऑफ झाला गेल्या महीन्यात. इन जनरल लिन्कडैनवरती सारख्या 'अव्हेलेबल फॉर जॉब' च्या पोस्टस दिसतात. companies are bracing , prparing in the wake of recession.

नानबा, माझ्या कंपनीत लेऑफ झाला गेल्या महीन्यात. इन जनरल लिन्कडैनवरती सारख्या 'अव्हेलेबल फॉर जॉब' च्या पोस्टस दिसतात. companies are bracing , prparing in the wake of recession.

नवीन Submitted by सामो on 13 July, 2022 - 17:1३ : which company? In India or somewhere else?

सुरुवात झाली आहे. माझ्या माहितीत ३ जण (भारत, अमेरिका आणि सिंगापूर) आय. टी., ऑईल अँड गॅस, फायनान्स या क्षेत्रातील होते.

आजच्या इकॉनॉमिक टाइम्स मधील बातमी.

अमेरिकेत महागाई दर ९.१% (८.८% या अपेक्षेपेक्षा जास्त) वाढला आहे. म्हणजे व्याज दर वाढणार, नोकरी कपात होणार. It is by design to tame the inflation.

कामाची पद्धत किंवा तुम्ही वापरता त्या युक्त्या कुणाला शिकवू नका.>> हे तर १००%. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते ही मध्यमवर्गिय बकवास आहे. Use your skills for your benefit, not others.
>>>>

गुरूपौर्णिमेच्या दिवशीच हे वाचायचे होते Happy

बिलकुल पटले नाही हे वेगळे सांगायला नकोच.

ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते ही मध्यमवर्गीय बकवास आहे की नाही याची कल्पना नाही. पण आपल्याकडचे ज्ञान ईतरांना दिले तर ते आपल्यापेक्षा प्रगती करतील ही नकारात्मक मानसिकता आहे असे मला वाटते.

मला वाटते सकारात्मक विचार हा झाला की आहे ते ज्ञान वाटण्यासोबतच आपणही समोरच्यांकडून, ईतरांकडून त्याबदल्यात नवनवीन ज्ञान मिळवावे. आहे त्याच ज्ञानाच्या भरवश्यावरच कश्याला आपला जॉब टिकवून ठेवायचा विचार करावा. अन्यथा आयुष्यभर आहे तेच करत राहावे लागेल Happy

आणि ज्यांना तुम्ही ज्ञान देऊ नका म्हणत आहात ते काही तुमच्या एकट्याच्या भरवश्यावर थोडी ना बसले असणार, त्यांच्यात ज्ञान मिळवायची ईच्छा आणि धमक असेल तर ईतर मार्गाने ते ज्ञान मिळवतीलच. आपण कुठे मिस्टर ईंडियाचा फॉर्म्युला घेऊन बसलो आहोत जे आपल्यालाच माहीत असते.

बाकी ज्ञान वाटले तरी ते वापरायची अक्कल जी वाटणार्‍यात असते ती कधीच वाटली जाऊ शकत नाही. ती त्याची स्वतःची असते आणि त्याच्याकडेच राहते. आणि ती तुमच्यात आहे तर जॉब पन्नास आहेत.

आपल्याला जे येतेय ते आपल्या हाताखालच्यांना शिकवावे, त्यांना आपला जागी बसवावे, त्याचवेळी आपण काहीतरी नवीन शिकावे आणि पुढच्या दिशेने प्रगती करावी. जी नेहमी बरोबरच्यांना सोबत घेऊनच होते. असे प्रत्येक जण आपापले ज्ञान आपल्याकडेच दडवून बसला तर ना तुमची प्रगती होणार ना कंपनीची म्हणजे पर्यायाने तुमचीच.

ऋन्मेष, मलाही मंदार यांचे फार पटले नाही, आय वोन्ट गो दॅट फार. पण हेही तितकेच खरे आहे की आपल्याला मदत कोणी करत तर नाहीच वरती आपण मदत केली तरी पीपल टेक इट फॉर ग्रान्टेड. ते शिकून सवरुन वर नाचतात. अर्थात अपवाद असणारच.

उबो,
परवाच इकॉनॉमिक्स टाइम्स मध्ये us रिसेशन बद्दल वाचले.तेव्हा असेच काहीसे मनात आले.
ले ऑफ कधीही होऊ शकतात.म्हणजे, एखादा 100 लोकांना बिलिंग देणारा कस्टमर आहे.त्याने अचानक पैसे वाचवायचे ठरवले तर तो प्रोजेक्ट आता देत नाही, नंतर बघू म्हणतो.कंपन्या अचानक प्रोजेक्ट आल्यावर नवी माणसं 3 महिन्याच्या आत मिळत नाहीत म्हणून थोडा बेंच घेऊन ठेवतात.
एकंदर प्रकारे स्वतःचे काम अगदी व्यवस्थित करत ज्ञान चांगले ठेवणे.
2001, 2009, 2013 अश्या लाटेत कधी न कधी परत ही परिस्थिती यायची आहेच.भारतात फार परिणाम झाला नाही तरी सिनियर लोक आधी नजरेत येतातच.

सिंगापूर मधे २०२१ साली प्रचंड कपात झाली. कॉन्ट्रॅक्ट, एम्प्लॉयमेन्ट पास वाल्यांची आधी गछंती झाली.. ५५ च्या आस पास वाल्यांना पॅकेज देऊन काढले.
परंतू २०२१ शेवटापासून २०२२ आता पावेतो नोकर्‍यांवर लाथ मारून लोक बाहेर पडले कारण नव्या प्रोजेक्ट्स साठी लोक कमी पडायला लागले तश्या कंपन्या भरती करू लागल्या आणि सॅलरी रेंज आता अर्थातच वाढली. मी पण संधी चा फायदा घेत त्याच ड्युरेशन ला जुन्या ठिकाणी १३ वर्षांनन्तर हिम्मत करून रीझाईन करून दुसर्या कं. ला जॉईन केले Happy
या वर्षी लोक च सोडून जात आहेत जास्त चांगल्या संधींच्या शोधात..
माझ्या माहितीत असे किमान १० लोक आहेत ज्यांना या वर्षी खूप चांगली ऑफर मिळालीये. ही लाट भारतात पण येईल असं वाटतं..

लाट भारतात 2021 ला आलीय, अजून चालू आहे.3-4 वर्षं अनुभव वाले लोक 130℅ हाईक घेऊन नोकऱ्या बदलत आहेत(अर्थात भूत पाहिलेला माणूस हा आपल्या मित्राचा मित्र असतो त्याप्रमाणे हे लोक मित्राचे मित्र आहेत,प्रत्यक्ष स्वतः किंवा स्वतःच्या मित्रांना 'देख, इतना मिलेगा.मंगता है तो आ जा' वाल्या अगदी जुजबी वाढीच्या ऑफर मिळालया आहेत Happy )

माझ्या टिममधले दोघेजण चांगली हाइक व मनासारखे लोकेशन घेऊन नुकतेच दुसरीकडे गेले. आम्ही दर आठवड्याला इन्टर्व्यु घेतच असतो, त्यात काहिजण हातात एक ओफर लेटर घेउन अजुन हाइक मिळाली तर घ्यावी ह्या उद्देशाने आलेले असतात. गेल्या दोन वर्षातील अनुभव हा आहे की आम्ही देत असलेला पगार कॅन्डिडेटच्या तेव्हाच्या पगाराच्या ४० टक्के इतका जास्त असुनही काही जणांनी ऑफर नाकारली. माझ्या एका जुन्या कलिगला आम्ही परत कंपनीत आणायच्या खटपटीत होतो, सुरवातीला तिही उत्सुक होती पण आमची ऑफर घेऊन तिने रिझाईन केल्यावर तिच्या कंपनीने तिला त्याहीपेक्शा जास्त ऑफरदेईऊन रिटेन केले आणि वर युरोपमधे पर्मनन्ट
संधीची ऑफर मिळेल हे गाजरही दाखवले.

मंदी येणार हे मीही ऐकलेय. शेअर्स मोडुन हातात कॅश गोळा करा हा सल्ला देणारा एक विडिओही यु ट्युबने दाखवला. पण अजुन मंदी दिसत नाहीये.

Use your skills for your benefit, not others.>> मला फक्त इतकेच म्हाणायचे आहे. बाकी सरांना प्रतिवाद करायची हिम्मत माझ्यात नाही.
आय. टी., ऑईल अँड गॅस, फायनान्स या क्षेत्रातील होते. >> ऑईल अँड गॅस सध्या तरी भारतात तेजीत आहे. लॉक डाउन मधे तुंबलेले प्रोजेक्ट्स आता फुल स्विंग मधे आहेत. सगळ्याच कंपन्या हायरींग मोड मधे आहेत. १०-१५ वर्षे अनुभवाला भरपुर डिमांड आहे.

Ok.
गेल्या 9 महिन्यात मी स्वतः: 200% hike मिळालेलं पब्लिक पाहिलंय.
100% hike अगदी 17-१८ वर्षे अनुभव असलेल्या माणसाला पण.
50-६०% अगदी regular.

(May be माझी कंपनी मुळात कमी पगार देत असल्याने hike अधिक वाटत असेल).

बरोबर आहे उबो.
200% मिळवणारे तवा गरम आहे, पोळी भाजून घेऊ, या पैश्यावर चांगलं होम लोन मिळवता येईल आणि वाईट वेळ आलीच तर त्यावेळी बँकेत गंगाजळी राहील अश्या दृष्टिकोनात असतात.कदाचीत लॉंग टर्म मध्ये दोन्ही मार्ग सारखेच असतील.

पण अजुन मंदी दिसत नाहीये. >>> सामान्य माणसाला मंदी येइल असे आधेच कळले तर ती मंदी कशाची ! शेअर मार्केट मधले पैशे सामान्याचेच डुबतात मंदी आली की ! एक मोठी बैक डुबणार आहे एबढेच सांगतो आत्ता. अभ्यास करा, बातम्या पहा ( न्युज चनेल वर या बातम्य फक्त खालील ओळित धावत्या येतात) , बातम्या जोड्या , आणी रिड इन बिट्वीन लाइन्स म्हणजे कोणती बैक ते कळेल.

कामाच्या वर्क फ्रॉम होम प्रकारामुळे आता ऑफिस मधून काम करणाऱ्या रिसोर्सेसची संख्या कमी झाली आहे. पूर्वी शक्यतो मुंबई वाले मुंबईत आणि पुणे वाले पुण्यात जॉब शोधायचे त्यामुळे खूप सारे candidate मिळायचे. आता मुंबई पुण्यात बसून पूर्णवेळ वर्क फ्रॉम होम कंपन्यांमुळे भारतात कुठेही जॉब करता येतोय. आणि आता पाहिले सारखं मोठ्या कंपन्याचे अप्रूप थोडे कमी झाले आहे. पैसे हवे तेवढे मिळाले तर लोक स्टार्टअप पण जॉईन करायला तयार असतात. चांगला candidate मिळाला की स्टार्टअप हवी ती salary द्यायाला मागे पुढे बघत नाहीत. परत वरून वर्क फ्रॉम होम.

ह्या एक कारणामुळे आता १०० ते २०० टक्के हाईक माझ्या कंपनीतील बहुतेक सोडून गेलेल्यांना मिळाली आहे आणि वरून काही जणांना वर्क फ्रॉम होम. चांगली replacement मिळायला नाकी नऊ येतात आणि वेळ जातोय तो वेगळा. एकेकाकडे हातात ३ ते ४ ऑफर्स असतात. शेवटच्या दिवसापर्यंत यांचं ठरत नाही उद्या कुठे जॉईन करायचं ते.

२००%, १००%, ६०% पगारवाढ कितपत sustainable आहे, याचा कुणी विचार करतं का? >>> सहमत

200% मिळवणारे तवा गरम आहे>>> सोडून गेलेले हेच विचार करत आहेत.

अमेरिकेत मंदीची लाट येणार अशी जोरदार बातमी आहे. अस जर झाले तर आपण सुरक्षित राहू काय ?
आज लोक जास्त पगार घेऊन नोकर्‍या बदलत आहेत. उद्या जेव्हा मंदी येईल आणि छाटणी सुरू होईल तेव्हा हेच प्रथम बळी का बकरा होणार आहेत.

लोक ऑफर घेतात.शेवटच्या दिवसापर्यंत सध्याची कंपनी, अजून 2-3 कंपनीत वाटाघाटी करत असतात.जॉइनिंग च्या दिवशी फोन ऑफ करून ठेवतात, इमेल ला उत्तरं देणं बंद करतात(थोडक्यात घोस्ट करतात.)कधीकधी करंट पगार खोटा सांगतात.सॅलरी स्लिप मागितल्या तर आता नाहीयेत, इथे होम टाऊन ला नाहीयेत वगैरे काहीही सांगतात Happy

'मला चांगली वेगळी ऑफर मिळालीय, मी तिकडे चाललो' असं स्पष्ट सांगणारे काही जणही असतात.त्यांना नव्या नोकरी साठी सदिच्छा देतो.बरेचदा जॉइनिंग आधी पाठवून दिलेली काही गिफ्ट असेल तर त्या कंपनीची ऑफर घेतली नाही तरी ती परत करत नाहीत(अर्थातच परत करणं किचकट, पण किमान तोंड देखलं 'परत घ्या मी पाठवतो' म्हणायचं जेश्चर दाखवत नाहीत.

सेलर्स मार्केट आहे की बायर्स मार्केट त्याप्रमाणे ज्याचे असेल तो हात धुवून घेतो.

लोक ऑफर घेतात.शेवटच्या दिवसापर्यंत सध्याची कंपनी, अजून 2-3 कंपनीत वाटाघाटी करत असतात.जॉइनिंग च्या दिवशी फोन ऑफ करून ठेवतात, इमेल ला उत्तरं देणं बंद करतात ! >>>> +11111!
हे एक्सपरिइन्स वाले करतातच पण फ्रेशरचा पण तोच अनुभव. ते ही जॉइनिंग च्या दिवशी ऑफर नाकारतात. येणारे येत नाही आणि
बाहेर जाणारे मॅनेजर लेव्हलची सॅलरी मिळतेय तर रिटेनचा प्रश्नच नाही... यांची कामे उरलेल्या लोकांनी करत बसा टाईमलाईन पाळायला मग तेही वैतागतात आणि रिझाईन करतात.

आमच्याकडे गेल्याच आठवड्यात , शनिवारपर्यंत "हो join होतेच मी सोमवारी " सांगणारी candidate सोमवारी सकाळी 2-3 missed calls नंतर सांगते " i hv some medical reasons in family . I need a week's time to join " . आणि मग हळूच " actually i hv another offer in hand as well " .

चांगली वेगळी ऑफर मिळालीय, मी तिकडे चाललो' असं स्पष्ट सांगणारे कमी जण असतात. एकाने स्पष्ट सांगितलेले कंपनी counter offer " देऊन retain करतेय. मला तुमच्याकडे यायचे आहे पण तुम्ही offer revise केलीत तर. आमच्या बजेट मध्ये होता म्हणून वाढवून दिले. मग तो इमानदारीत join झाला. 2 जण तर revised offer घेऊन joining date च्या दिवशी फिरले.

मंदी आली तर आपण इतके वर्ष आहोत म्हणून कंपनी काढणार नाही असे सांगता येत नाही. त्यांची गरज असेल तर ते ठेवणार, नको तेव्हा काढणार..
एखाद्याला 3 लाख महिन्याला मिळाले (ओळखीत लोकांना मिळताहेत यापेक्षाही जास्त) आणि एका वर्षाने लयॉफ झाला तरी त्याने 2-2.५ वर्षाचे कमावलेले असते आत्ताच्या तुलनेत. फक्त खर्च वाढवले/बेक अप नसेल तर प्रॉब्लेम जास्त.

ही पगार वाढेची लाट कशी आली? स्टार्टअप मुळे? वर्क फ्रॉम होम मुळे?

कारण billing rates तसेच दिसताहेत..

नानबा, करोना संकट म्हणा, इष्टापत्ती म्हणा, कंपनीज ना कळले की घरून काम करणाऱ्या लोकांकडूनही नीट पॉलीसी ठेवून उत्तम कामाचा आऊटपुट घेता येतो.एका शहरात हवे ते रिसोर्स पटकन न मिळणाऱ्या कंपनीज नी वेगळी राज्ये, वेगळी शहरं, गावं इथल्या लोकांना फोन करून तुमच्यात योग्यता असेल तर आम्ही नोकरी देतो, रिमोट वर्किंग चालेल म्हणून लोक घेतली.लोकांनी देशाच्या टोकाकडच्या राज्यात ऑफर स्वीकारून रिंमोट वर्क ने काम चालू केले.'आमच्या शिवाय तुला या शहरात घेणारे कोण, बस फाफलत' म्हणणाऱ्या कंपनीज मधून सिनियर लोक सोडून वेगळ्या राज्यातील कंपनीज मध्ये रिमोट जॉईन झाले.एक प्रकारे राज्यांच्या, गावांच्या सीमा अदृश्य झाल्या.
याचे तोटे कंपनीज ना झाले.सगळीकडून सगळीकडे लोक गेले.hr ला रोज मायग्रेन ची औषधं घेण्याइतका स्ट्रेस निर्माण झाला.एम्प्लॉयी फायद्यात गेले.स्वतःच्या होम टाऊन ला राहून मोठ्या शहरातला भाडेखर्च वाचून कामं चालू राहायला लागली.लग्न झालेल्या नोकरदार बायका नवऱ्या बरोबर सासरी गावात येऊन गांजल्या.त्यांना वर्क फ्रॉम होम बरोबर रितिभाती, सणवार, स्वयंपाक पाणी, लोकांच्या नाशता चहा डिमांड अशी बरीच गणितं सांभाळून रात्री जागून डेडलाईन गाठाव्या लागल्या.(अजून बरंच काही पण आता जास्त पकवत नाही.)

भारतातलं माहित नाही पण सध्या अमेरीकेत रिमोट जॅाबमुळे नको तेवढे फ्रॅाड्स सुरू झालेत.. लिप्स सिंकिंग करणाऱया लोकांना पकडून, हकलून आता कंटाळा येऊ लागलाय.. प्रॅाजोक्टमधे इतक्या ओपनींग्ज आहेत पण एक जेन्युअन कॅंडिडेट मिळता मिळता नाकीनौ येतंय

Pages