मुलांसाठी खेळणी /गेम्स इत्यादी

Submitted by मेधा on 2 December, 2009 - 12:29

एच ओ आकाराच्या ट्रेन सेटबद्दल माहिती लिहा बरं कोणी तरी - कुठला घ्यावा, कुठे स्वस्त मिळतात, सुरवातीला मिनिमम काय काय भाग असावेत , त्यात हळू हळू भर घालायची असेल तर कुठले भाग घ्यावेत ?

( मॉडेल ट्रेनच्या मापांबद्दल ( गेज व स्केल) बद्दल माहिती इथे आहे
http://en.wikipedia.org/wiki/Rail_transport_modelling_scales

http://en.wikipedia.org/wiki/H0_scale )

वेगवेगळ्या वयाच्या मुला मुलींकरता वी , एक्स बॉक्स, पी एस २ , डीएस गेम्स कुठले चांगले तेही लिहा.

याशिवाय फिशर प्राइस, व्ही टेक यांची खेळणी, ब्लोकुस सारखे बोर्ड गेम्स याबद्दलची तुमची, मुलांची मतं/ अनुभव लिहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एच ओ? म्हणजे नक्की कोणता? स्पष्ट कर. माझं खेळण्यातलं ज्ञान अगाध आहे...
वी चे आमच्याकडे बरेच गेम्स आहेत. बघून सांगेन कोणकोणते ते.
माझ्या धाकट्याला फक्त नी फक्त कार्स हव्या असतात. बाकी कशाही कडे तो फार काळ लक्ष देत नाही. मध्यंतरी कॉस्टकोत थॉमसचा ट्रेन्स, ट्रॅक्सचा मोठा सेट मिळाला. ते जोडून दोन दिवस खेळला. आता नुसता ट्रेन हातात घेऊन कार्स सारखा खेळतोय त्यांच्याशी.
मुलींकरता पॉली पॉकेटस वगैरे टाईपच्या डॉल्स आहेतच की. तुझ्या मुलीला आवडत नाही का?

http://www.ikea.com/us/en/catalog/products/00060763
हा कन्स्ट्रक्शन सेट मस्तय. माझा ४ वर्षाच्या मुलाने बराच खेळला. आयकीयातला ट्रेन ट्रॅक पण चांगलाय. तो दोन वर्षाचा होता तेव्हा पासुन झिकसॉ पझल्स छान करतो. ते वेगवेगळे आणत रहातो. स्टोरी रीडर त्याच्या सध्या खुप आवडीचं आहे.
http://www.ikea.com/us/en/catalog/products/20101871
ह्या रगवर कार मस्त खेळतो.

माझे मुलगे खालील गेम्स वर्षानुवर्ष मजेत खेळतात, मुलींचे माहित नाही.
एक्स बॉक्स - वय १०+ जर स्पोर्ट फॅन असतील तर मॅडन, एन. बी. ए. २के१०, वय ८+ - गिटार हिरो - हा मी पण खेळते
डिएस - वय ५+ सुपर मारिओ, ब्रेन एज - हा मी पण खेळते

हे काय गेम्स आहेत (विडिओ इ.) आणि कुठे मिळतात ते पण सांगा. धागा सुरु केल्याबद्दल धन्यवाद शोनु. मी आजच पार्ल्यात भाच्यासाठी काय घेऊ विचारणार होते. हे सगळे गेम्स तुमच्या मुलांना "कूल" वाटतात ना ? Happy

अडीच - तीन वर्षांच्या मुलांना हा सेट पण फार आवडतो
http://www.amazon.com/Thomas-Friends-Wooden-Railway-Figure/dp/B00005BLMC...

हा स्टार्टर सेट आहे. खरोखर आवड असेल तर यात हळू हळू भर घालता येते.

थॉमस किंवा त्यासारखे ट्रॅक्स, इंजिनं व इतर खेळणी अनेक कंपन्या बनवतात. सगळेच मॉडेल दिसायला सारखे असले तरी ट्रॅक्स कंपॅटिबल असतातच असं नाही.

बॅटरीवर चालणारी थॉमस व इतर इंजिनं सुद्धा काही काही इतर इंजिनांच्या ट्रॅक्सवर चालत नाहीत.
आयकियाचे ट्रॅक्स इतर ट्रॅक्सबरोबर सहज नीट बसत नाहीत. थोडा जोर द्यावा लागतो. शिवाय आयकियाचे कनेक्टर प्लास्टीकचे असतात - आमच्याकडे मोडून झाले बरेच Sad

आयकियाचे ट्रॅक्स इतर ट्रॅक्सबरोबर सहज नीट बसत नाहीत. थोडा जोर द्यावा लागतो. शिवाय आयकियाचे कनेक्टर प्लास्टीकचे असतात - आमच्याकडे मोडून झाले बरेच >> लाकडाचे आहेत आमच्याकडे पण दुसर्‍या सेटला जोर देऊन मात्र बसवावे लागतात.

सिंडरेला, एक्स बॉक्स हा गेम कन्सोल आहे. त्यात नवीन गेम सीडी रूपाने किंवा इंटरनेटवरून डाऊनलोड करून खेळता येते. कन्सोल किंमत अंदाजे $२५०, गेम साधरण $५०
डिएस - हा पोर्टेबल गेम प्लेअर आहे. त्यात गेम कार्ट्रीज घालून खेळता येते. प्लेअर किंमत $१०० - $१५०, गेम साधारण $१५-$२५
मुलांना (मुलगे) कुठलेही व्हिडिओ गेम कूल वाटतात, माझ्या भाचीला सोनी प्लेस्टेशन आवडते, त्यावर ग्राफिक्स चांगले आहे (हे आणखी एक गेम कन्सोल).

सध्या नविन असल्याने आमच्याकडे Wii जोरात आहे. लेकच काय गेले ४ दिवस आम्ही सगळेच खेळतोय आणि आता अंग दुखतय.. मोशन सेंसर असल्याने खेळायला मजा येते.
Wii sports
Wii sports resort
30 Family Party great games
हे ३ गेम्स घेतलेत सध्या.

बाकि नेहेमिच यशस्वी कलाकार म्हणजे बार्बी, पॉली पॉकेट्स,ब्रॅट्स आहेतच.

गेल्या महिन्यात क्रेयोलाचा ग्लो बोर्ड घेतला.. ह्याचा गाडीत फार म्हणजे फारच उपयोग होतो.
काळोख झाला कि कार मधे काहिच करता येत नाही तेव्हा जुईला हा फारच आवडला. http://www.walmart.com/catalog/product.do?product_id=10160732&findingMet...
आमच्याकडे ह्या पेक्षा छोटी साइझ आहे.

ps3 माझी भाची खेळत असते. त्यात आता नवीन आलेला बॅटमनचा गेम खूप फेमस आहे.

तिचे वय आहे ८ पण हा गेम १३ वर्षावरील मुलांसाठी आहे तसा पण ७ वर्षापासूनच सगळी खेळताना दिसतात. (पिअर प्रेशर ने भाचीने बहीणीकडे हट्ट करून करून घेतला शेवटी बहीणीने, किमंत $४००/-)

हाय मला थोडा रेलेटेडच प्रश्न आहे.
माझी मुलगी साडेसहा महिन्यान्ची आहे. आम्हि नुकतेच तीन महिने पुण्यात राहुन आलो. तिथे तिला सतत आजी-आजोबा-मामा बरोबर खेळण्याची, सारखे बाहेर मोकळ्या हवेत फिरण्याची सवय झाली होती. इथे आल्यापासुन ती मलूल असते असं वाटतेय. तिचे गप्पा मारणेही कमी झालेय. सध्या इथल्या थंडीत बाहेरही नेता येत नाही तिला फारसे. तिला खेळणी आहेत बरीच पण त्यात रमत नाहीये सध्या, सारखे जवळ घेउन बसायला लावते. थोडक्यात पुण्यात जेवढा दंगा करायची ना तो एक्दम कमी आहे. तिचे रन्जन करण्यासाठी काय करता येईल? सारखं आई-बाबा दोघं बघुन ती बोर होत असेल ना? तुम्ही काय करता/केले? खूप माणसान्चा राबता याला काही पर्याय नाही होऊ शकत तरी काय करु शकतो?
आम्हाला दोघांनाही खूप गिल्टी वाटतेय Sad आणि त्याहुन जास्त अगतिक

ज्ञाती, इथे पब्लीक लायब्ररीमधे वैगरे लहान मुलांचे वर्ग चालवले जातात. toddler music किंवा storybook reading असे. लहान मुलांना समवयस्कर सवंगडी मिळतात. (आणि पालकांच्या सुद्धा नवीन ओळखी होतात.)
आजूबाजूला जरा माणसं बघून मुलांना सुद्धा छान वाटते. आमच्या दोन्ही मुलांनी असे वर्ग खूप एन्जॉय केलेत.

असे क्लासेस जिंबोरीमधे पण असतात. २-३ दिवस लायब्ररीमधे, २-३ दिवस जिंबोरीमधे असं करुन तिला रमवता येईल.

अगदी मस्त बीबी. मी परवाच विचार करत होते असा एक बीबी हवा. इन ट्रू मायबोली स्पिरिट, एक खेळणी एक्ष्चेन्ज प्रोग्राम चालवावा असे वाट्त होते. बघा जमते आहे का!
१) अल्टिमेट म्हण्जे बार्बी. बारबी व केन चे लग्न लावणे.
२) काहीतरी करायचे प्रोजेक्ट - निटिन्ग सेट, स्पायरो ग्राफ, कलिडो स्कोप. फॅशन डिजायनिन्ग सेट, सॅन्ड आर्ट सेट, पॉट्री रंगवायचे सेट. पीओपी साच्या मध्ये घालून वाळू द्यायचे व मग रंगवायचे.
३) प्ले डो. बेस्ट. मला लै आवड्ते.
४) टेबलावर चादर पसरून आत घर घर. - १०० रू चा किचन सेट तुबा मध्ये तर बंब परात वगैरे पण मिळते
दोन भाजके शेंगदाणे व मध्ये गूळ लावून लाडू.
५) टीचर टीचर. भिन्ती भर रंगवून.
६) लेगो ब्रिक्स वयाप्रमाणे. अतिशय चान्गले कल्पना शक्ती साठी.
७) आइसक्रीम सेट/ लेमनेड बनविणारी बाहुली.
८) बोलिन्ग अ‍ॅली तील प्लास्टिकचा सेट मिळतो
९) ज्वेलरी सेट बनविणे. पालक पाहिजे बरोबर
१०) जिग सॉ पझल्स.

ज्ञातीची लेक सहा महिन्याची आहे. तिला ह्या वर्गांना प्रवेश मिळेल का ? इशानला तरी नव्ह्ता मिळाला.

ज्ञातीची लेक सहा महिन्याची आहे. तिला ह्या वर्गांना प्रवेश मिळेल का ? इशानला तरी नव्ह्ता मिळाला.>>>
हो मिळतो. जिंबोरी मधे ५ महिन्यापासून घेतात.
आणि पब्लीक लायब्ररीमधे सुद्धा. अर्थात ते तुमच्या सिटी लायब्ररीवर अवलंबून आहे.
आर्या / आदित्य अश्या वर्गात ५ महिन्याचे असल्यापासून जात होते.

@ ज्ञाती--इकडे canada मधे early years centre असतात ०-६ years च्या मुलांसाठी त्या सारखी US मधे काय असतात मला माहीत नाही पण शोध घेतल्यास सापडेल (वर एकदोघांनी सांगीतल्याप्रमाणे).

आजूबाजुला मित्र मैत्रीणी ओळखीचे असतील तुझ्या ज्यांना लहान मुलं आहेत त्यांनी मिळून एक प्लेग्रुप बनवा आणि एकमेकींकडे जमत जा. मुलीबरोबर तुलाही चेंज. अशा ग्रुपचा फायदाही खूप होतो.

आर्च म्हणतेय तसं, आजच एका मैत्रिणीशी बोलताना समजलं. ती म्हणाली आम्ही एक ग्रुप काढतोय, ज्यात तिच्या मुलाच्या वयाची मुलं आहेत. त्यात मुलं आणि आया जमणार आठवड्यातुन एकाच्या घरी, ज्यात मुलं धमाल करतिल आणि आया गप्पा :). कधी घरी, कधी मॉलमधे. खाण्या-पिण्याचं साधं-सोपं किंवा बाहेर.

ज्ञातीला जो प्रश्न पडलाय तोच मलाही आहे. माझा मुलगा आता दोन वर्षांचा होईल. सध्या वेदरमुळे (आणि त्याला सर्दी झाल्याने) अजिबात बाहेर पडू शकत नाही त्यामुळे कंटाळला आहे.
कॅलिफोर्नियात असताना चांगल्या वेदरमुळे बाहेर पडू शकत होतो, लायब्ररीतही स्टोरीटाईम वगैरे सेशन्सना आवर्जून जात होतो. आता जर्सी सिटीमध्ये सर्वच नवीन असल्यामुळे जरा सेट व्हायला वेळ लागतो आहे. पण आर्च, प्रिती म्हणतात तसं काँप्लेक्समध्येच ओळखी वाढवून ग्रूप जॉईन करण्याचा विचार मीही करत आहे. लायब्ररीतही शोध घेईन.
जिंबोरी काय आहे?

धन्यवाद राहुल, प्रीति, सिन्डरेला, आर्च, मिती. बरेच पर्याय सुचवलेत.
जिम्बोरी मध्ये अगदी ५ महिन्याच्या बाळालापण आहेत क्लासेस.

ज्ञाती अगदी शक्य असेल तर एक पपी आणा. स्टेट्स मधले मोठे घर असेल तर कुत्रा पाळणे हे अगदी शक्य आहे. लॅब्राडोर किन्वा डॅशुन्ड किड फ्रेन्ड्ली ब्रीड्स आहेत. तुम्ही घरीच असाल तर करू शकाल. कुत्र्याचे काम पड्ते हे खरे असले तरी अ डॉग मेक्स अ फॅमिली कंप्लीट. मुलगी नक्की जास्त आउट्गोइन्ग, फ्रेन्ड्ली बनेल.
हा नातेवाइक जवळ नसण्याचा प्रशन सगळी कडेच आहे. आपण आपली उत्तरे शोधली पाहिजेत. अगतिक व्हायला होते हे अगदी खरे.

हवा सुधारल्यावर बेबीला घेउन पार्कात जाता येइल. जिथे तिच्या वयाची मुले भेटतील.

तुमच्या कॉम्प्लेक्समधे किंवा जवळपास मुलांचा प्ले ग्रूप आहे का ते शोध. लायब्ररीत समवयस्क मुलांच्या आयांना विचारत जा प्ले गृपबद्दल. देशी दुकानात एखादा फ्लायर लावून पहा.
क्रेग'स लिस्टवर माहिती विचार, तुमच्या भागातल्या फ्रीसायकल गृपवर पण विचार .

नमस्कार. मला ५ ते १० वर्ष तसेच १३-१५ वर्षाच्या मुलांसाठी काहि वेगळी ,चांगली खेळणी सुचवणार का ?.. शक्यतो बॅटरी ओप्रेटेड नको आहेत ..
आतापर्यत Tangram ,Jenga, 3D puzzles, Magnext, pictureka or i spy kind of games etc. खुप आवड्लेत मुलांना ..
अजुन काहि सुचवा प्लिज
धन्यवाद.

आमच्या कडे थोमास झाला खेळून एक वर्ष .. तेव्हा ब्यातरी ओपेरातेड नव्हते घेतले.. नन्तर कोणी तरी फिशर चा जियो ट्रक्स सेट दिला .. तेव्हा पासून आम्ही हि खूप एन्जोय करतो.. जरा महागडा प्रकरण आहे जर रिमोट च्या ट्रेन घायच्या असतील तर.. पण $१०० मध्ये बराच मोठा सेट झाला आहे .. एक एक करून बरेच पार्टस जमा केले .. ट्रक्स लावायला सहज जमत मुलांना .. साधारण ३-६ वर्ष साठी एकदम मस्त . अजूनही हि मोठा लावायचा असेल तर आम्हाला मदत करावी लागते..

कॉम्मुनिती क्लासेस पण छान असतात. $२०-$ ४० किवा प्रत्येक वेळेस नोमिणाल फी घेवून पण असतात क्लासेस . ते बघ आहेत का आजू बाजूला

Pages