गर्दी

Submitted by अभिषेक अरुण गोडबोले on 9 November, 2019 - 02:04

"आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत" हे कळणं खूप गरजेचं असत.
प्रत्येकजण वेगळा असतो,चेहरा वेगळा,रंग वेगळा,गुण-दोष वेगळे आणि या वेगळं असण्यातच त्याच्या जन्माला येण्याचं कारण असतं.
प्रत्येकजण जर असा वेगळा नसता तर त्याची निर्मिती देवाला का करावीशी वाटली असती?

एकसारख्या दोन गोष्टी बनवणं आपल्याला माणूस म्हणून जिथं बोअर होत तिथं देवाला एकाच साच्यातल्या दोन मूर्ती बनवण्यात काय रस असेल?
आपण वेगळे आहोत हे एकतर स्वतःला लवकर लक्षात येत नाही,याच एक कारण म्हणजे वेगळं असण्याची आणि इतरांसारखं नसण्याची भीतीच मनात बसलेली असते.आपण वेगळे आहोत म्हणजे दुसऱ्यासारखे नाही आहोत हेच पटत नाही.

एकटेपणाला माणूस नेहमीच घाबरतो.त्यामुळं आपलं वेगळेपण लक्षात येऊनही त्याकडं दुर्लक्ष करून उलट इतरांच्या रांगेत जाऊन उभं राहायचा ,गर्दीत हरवून जायचा प्रयत्न अगदी कसोशीनं करताना अनेक जणांना आपण बघतो.
याची सुरुवात शाळेतून होते,
वर्गावरचे शिक्षक 'गप्प बस संस्कृती' मधले नसतील आणि शिकवण्यात पोरांनाही सामील करून घेणारे असतील तर शिकवताना ते हमखास काही प्रश्न मुलांना विचारात असतात आणि अशावेळी चालू असलेल्या विषयावर 'कधी एकदा मी बोलतोय' या पेक्षा 'मी कसा लपून राहीन कि जेणेकरून सरांचं/मॅडमच लक्ष माझ्याकडं जाणारच नाही
आणि मग मला बोलावं पण लागणार नाही यासाठी इतर सगळ्यांच्यात लपायचा प्रयत्न करणारे आपण सगळ्यांनी पाहिलेत!
कदाचित आपणही हि लपाछपी कधीनाकधी खेळली असेल!

मुद्दा असा आहे कि,जोपर्यंत स्वतःच वेगळं असं मान्य करत नाही तोपर्यंत मजाच येत नाही.ऐकत राहायची तयारीला असेल,पुढं होऊन जगायची भीती वाटत नसेल तरच समाज तुमच्यापाठी उभा राहतो.
कारण जेव्हा तुम्ही एकटं आणि स्वतंत्र राहायचा विचार करत असता तेव्हाच तुमच्या भोवती जमणाऱ्या गर्दीत स्वतःला गायब करणारे असंख्य तयार होत असतात!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users