गाठुडं

अमेरिकन गाठुडं!--१०

Submitted by सुरेशकुलकर्णी on 14 March, 2021 - 03:14

सगळी बांधाबांध झाली. मुलाने मला पैंटिंगचे किट, कॅमेरा, सकाळी वॉकसाठी ट्रॅक सूट, बायकोला सुनेने कपडे, अजून कायकाय घेऊन दिले होते. (बायको काय-काय घेतलं नाही सांगत!) सामना पेक्षा आमचे पाय ज्यास्त जड झाले होते. तो सकाळचा गारवा, सुंदर सुरेख वातावरण, फुलांपेक्षाही सुंदर पिवळी पडून गळालेल्या पाईन ऍपलच्या पानांचा सडा, आपली माणसं, सगळंच येथे सोडावं लागणार होत.

डिकीत सामान अन डोळ्यात पाणी घेऊन आम्ही घर सोडलं. नातींनी सोबत येण्यासाठी ठेवणीतले सूर काढले. चार दिवसात माया लागली होती. आज आजून त्यांचं रडणं कानात घुमतय!

विषय: 

अमेरिकन गाठुडं!--८, आणि--९

Submitted by सुरेशकुलकर्णी on 9 March, 2021 - 02:14

वीक एन्ड आला. एक शॉर्ट ट्रिप करण्याचे ठरले. सॅन अँटोनियो.
"किती लांब आहे?" मी विचारले.
"काही नाही, तीन साडेतीन तासाच्या ड्राइव्हवर आहे." मुलगा म्हणाला. या अमेरिकेत प्रवासाचे अंतर मैल किंवा किलोमीटरवर कधीच मोजत नाहीत. किती वेळ लागेल यावर मोजतात!
हल्लीची मुलं खूप छान ट्रिप मॅनेज करतात, याचे प्रत्यंतर या वेळेसही आले.
मुलाने प्रवासासाठी सात सीटर दांडगी गाडी भाड्याने घेतली होती. पेट्रोल टाकी फुल! गाडी परत करताना टाकी फुल करून द्यावी लागती म्हणे.

विषय: 

अमेरिकन गाठुडं!--५

Submitted by सुरेशकुलकर्णी on 2 February, 2021 - 09:51

एव्हाना मी बऱ्यापैकी येथे (म्हणजे ऑस्टिनच्या घरात) रुळलो आहे. मुलाचे घर ज्या कॉलनीत आहे (येथे याला कम्युनिटी म्हणताना ऐकलंय) तो परिसर देखणा आहे. एका बिल्डिंग मध्ये तीन घरे मध्ये पॅसेज लगेच त्याला लागून तीन घरांचा रो, अशे तीन माजले, म्हणजे एकंदर आठरा अपार्टमेंट्स. अश्या बऱ्याचश्या बिल्डिंगा आहेत. तीस -चाळीस तरी असतील. कोठेही लिफ्ट नाही. या सर्व इमारतींना एक कंपाउंड घातले आहे, चौकोनी लोखंडी बारचे. सर्व इमारतींना जोडणारा एक चांगला प्रशस्त टाररोड आहे. कार, ट्रक इत्यादी वाहनांसाठी. हा भाग सोडला तर बाकी जमीन हिरवळीने झाकली गेलेली आहे. मॅपल आणि इतरही खूप झाडे आहेत.

अमेरिकन गाठुडं!--४

Submitted by सुरेशकुलकर्णी on 30 January, 2021 - 23:39

येथे गरीब असो श्रीमंत असो कार आवश्यक आहे. 'कार' हि येथे, रोटी-कपडा-और मकान इतकीच गरजेची आहे. त्याला करणेही आहेत. विरळ आणि विखुरलेली रहिवाशी वस्त्या. दूर अंतरावरील गरजेच्या वस्तूंचे आउटलेटस, सार्वजनिक वाहतूक खूप अविकसित, त्यामुळे तिच्यावर अवलुबुन रहाणे अशक्य, स्वस्त कार्स, आणि त्या साठी सहज, कमी दरावरील कर्ज, उत्तम रस्ते, त्यामुळे चारचाकी वाहन गरजेचे झाले असावे. तसेच येथील कार चालवायला तश्या सुलभ आहेत. ऑटो गेअरचा गाड्या असतात. हाताने टाकण्याचा फक्त एकच गियर, रिव्हर्स गियर. हातात स्टियरिंग, पायात ब्रेक आणि एक्सलेटर! त्यामानाने टुव्हीलर्स, बाईक नगण्य होत्या. 'बाईक' हि येथे लक्सवरी समजली जाते!

Subscribe to RSS - गाठुडं