सेपरेटेड पालकान्नी मुलान्चे सन्गोपन कसे करावे?

Submitted by अननस on 1 January, 2018 - 00:57

मी आणि माझी पत्नी आम्ही एकत्र राहील्यास भाण्डणे होतात म्हणून वेगळे राहातो. आमच्या मुलाचे सन्गोपन चान्गले व्हावे यासाठी आम्ही काय करावे? या परीस्थीतीतून गेलेल्या लोकान्चे किन्वा समपदेशकान्चे अनुभव काय आहेत ?

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला अनुभव नाही तरिही सांगावेसे वाटते, पटले तर घ्या नाहितर सोडून द्या....

मुलासमोर भांडू नका.
मुलांसमोर जोडीदाराबद्द्ल नकारात्मक बोलू नका. आपले त्याच्याशी पटत नाही म्हणजे तो वाईट आहे असे नाही हे त्याला समजावून सांगा.
आमचे पटत नसले तरिही आमच्यासाठी तू खूप महत्वाचा/ची आहेस आणि आमचे तूझ्यावर अत्यंत प्रेम आहे हे त्या आपत्यास जाणवेल असे वागा.
तुम्ही वेगळे राहता तर ज्याच्याकडे मूल त्याचीच सगळी जवाबदारी असे होऊ देऊ नका, त्या वाटूण घ्या.
दोघांनी मुलाबरोबर वेगळा वेळ आणि थोडा एकत्र वेळ घालवा.
एकत्र वेळ घालवताना स्वतःचे प्रॉब्लेम्स पूर्णपणे वेगळे ठेवा. त्याला काय आवडेल ते करा त्यावर बोला, चित्रपट पहायला जा, एकत्र जेवण बनवून जेवा, फिरायला जा.

मुलांचे संगोपन नीट व्हावेसे वाटत असेल आणि अजूनही एकत्र संसार करण्याची इच्छा दोघांमध्ये ही असेल तर एकत्र जाऊन समुपदेशन घ्या, जर त्यातून मार्ग निघाला नाही, भांडणे होतच राहिली तर वेगळे व्हा. पण पेपरवर टाईम टेबल सारखे पोराला वाटून नका घेऊ. त्याला/तिला हवं तेव्हा आई बाबाकडे जाता आलं पाहिजे अशी सोय ठेवा.
तुझ्याकडे ४ दिवस राहिलं माझ्याकडे २ च दिवस यावरून वाद घालू नका. Sad

सोनाली, तुम्ही दिलेला प्रतिसाद खुप उपयोगी आहे. याचा प्रयत्न व्हायला हवा. अनेक वेळा अस दिसते कि लहान मुले आपल्याला वाटते त्यापेक्शा लवकर परिस्थीती त्यान्च्या परिने जाणुन घेतात. आई बाबां बरोबर खुप छान वेळ मुलान्चा गेला तरिही ते एकत्र घरी जात नाहीत किंवा रहात नाहीत यावरुन त्याना कळते कि काही तरी बरोबर नाही. मुले झाल्यावर वेगळे होण यामध्ये मुलान्वर निश्चीतच अन्याय होतो, त्याना दु:ख होते. आपण फक्त याची काळजी घेउ शकतो कि या दु:खाने त्यान्च्यावर विशेष दुष्परिणाम होणार नाही.

दक्षिणा, सगळ्या गोष्टी कडे, सकारात्मक आणि निर्णयात्मक द्रुष्टीकोनातुन बघायला लावणारा आहे. याचा निश्चित विचार करेन.