नवीन लेखनाचा धागा चाचणी

Submitted by Srd on 26 November, 2025 - 09:52

वाचू आनंदें या विभागात नवीन लेखनाचा धागा काढत आहे.

मराठी आणि इंग्रजी अशी दोन्ही पुस्तके मी वाचतो. मराठी पुस्तके मला स्थानिक नगरपालिका वाचनालयातून मिळतात. तिथे कुणीतरी नवनवीन पुस्तके सुचवतो आणि ती आणली जातात. त्यावर समाधानी आहे. पुस्तके विकत न घेता वाचनाचा छंद जोपासता येतो. इंग्रजी पुस्तकं तिथे फारशी नाहीत. जी आहेत ती फार जुनी पिवळी पडलेली आहेत. पण इंग्रजी वाचन करणारे लोक / वाचक जगात खूप असल्याने त्यांचा खपही बराच असतो. तसेच लेखकांना त्यातून चांगले मानधन मिळते. काही साठ वर्षे जुनी झालेली पुस्तके प्रताधिकारमुक्त होतात आणि ती वेगवेगळ्या साईट्सवर free download करता येतात. ती मी वाचतो. काही साईट्स मात्र प्रताधिकारमुक्त न झालेली पुस्तकेही देतात. ती मिळण्याचे भाग्यच. असे वाचक किती असतील की जे स्वतः पुरतेच पुस्तक मिळवतात आणि वाचतात. त्यांकडे प्रकाशक आणि लेखक दुर्लक्ष करत असावेत. तर एकूण ठीक चालले आहे.

पुस्तके विकत घेऊन वाचण्याची माझी पुंजी फारच तोकडी आहे त्यामानाने माझी वाचनाची भूक फारच आहे. असो.
तुमचे विचार याबाबत काय आहेत?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users