जुन्या वर्तमानपत्रांचा संग्रह

Submitted by वर्षा on 10 January, 2021 - 13:55

नमस्कार,
माझ्या वडीलांकडे जुन्या वृत्तपत्रांचा खूप मोठा संग्रह आहे. त्यांना वाचनाची खूप आवड असल्याने आणि केवळ त्यांचा विषयच नव्हे (निवृत्त इतिहासाचे प्राध्यापक) पण सायन्स, भूगोल, पर्यावरण इ. विषयांत कमालीचा रस असल्याने त्यांनी महत्त्वाच्या घडामोडींचे/ऐतिहासिक घटनांचे/बातम्यांचे न्यूजपेपर जतन करायला सुरुवात केली आणि त्याचे छंदात रुपांतर झाले. त्यांच्याकडे जवळपास इंग्रजी-मराठी अशी २००० वृत्तपत्रे आहेत.
वयपरत्वे आता हे सांभाळणे कठीण झाले आहे. त्यामुळे हे कलेक्शन आता विक्रीस उपलब्ध आहे (मुंबईत). आम्हाला घरी कुणालाच ही वृत्तपत्रे कोण विकत घेऊ शकेल याचा अंदाज नाहीय. याबद्दल कुणाला माहिती आहे का?

त्यांच्याकडे १९६३ पर्यंतचे काही व १९६३ नंतरच्या ऑल्मोस्ट सर्व महत्त्वांच्या घडामोडींची वृत्तपत्रे आहेत. काही उत्तम मसिके आहेत. 'निसर्गसेवक' चा 'अभिजात' नावाचे पर्यावरणविषयक (आता बंद पडलेले आहे बहुतेक) अतिशय सुरेख दिवाळी अंकही आहेत. (त्यातील सलीम अली विशेषांकाचे मुखपृष्ठही मला अद्याप आठवतेय. असो.)
सर्व कलेक्शन डिटेलवार लिस्ट करणे अद्याप शक्य झाले नाहीय पण आज त्यांच्याशी बोलणे झाले त्यानुसार या कलेक्शनमधील काही महत्त्वाच्या अंक/घटनांचा संदर्भ इथे नमूद करतेय.

 • हिंदुस्थान टाईम्स (१९४२) - वर्ल्ड वॉर टू
 • गोडसेंची फाशी - मराठी वृत्तपत्र
 • १८५७च्या स्वातंत्र्यसमर शताब्दीनिमित्त निघालेला नवशक्तीचा अंक (१९५७)
 • गोव्यातील लषकरी कारवाई (१९६१)
 • भारताचे प्रथम रॉकेट लाँच (१९६१)
 • महाराष्ट्र टाईम्सचा प्रथम अंक (१९६२)
 • महर्षी कर्वे यांचे निधन (१९६२)
 • केनेडींची हत्या (१९६३)
 • बांगलादेश युद्ध (१९७१)
 • इमर्जन्सी (१९७५)
 • इंदीरा गांधी हत्या (१९८४)

आज बाबांशी याबद्दल बोलणे झाले तेव्हा यासंदर्भात माहिती विचारण्यासाठी सर्वात प्रथम मायबोलीचेच व्यासपीठ मनात आले म्हणून ही पोस्ट प्रथम मायबोलीवर टाकली आहे. आता हळूहळू इतर सोमिवर टाकेन. (सोमिबद्दलः कुणाला सोमिवरील असे काही समूह माहित आहेत का जिथे हे विचारणे उपयुक्त ठरेल?)
कुणाला काही माहिती/रेफरन्सेस्/रिसोर्सेस माहिती असतील तर नक्की सांगा. धन्यवाद. Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users