वाचन

वाचन कट्टा

Submitted by योडी on 31 October, 2012 - 05:53

वाचनाचा भस्म्या जडलेल्यांसाठी, पुस्तकांच्या गप्पा मारण्यासाठी..

काय वाचताय?कसं आहे?कुठे मिळेल? हे सगळं बोलण्यासाठी..
-परागची संकल्पना..

कृपया इथे बेकायदेशीर/ प्रताधिकारांचं उल्लंघन करणारे दुवे अथवा माहिती देऊ नये.
-अ‍ॅडमीन

विषय: 

मुलांचा पुस्तक क्लब - चालु करायचा का?

Submitted by सावली on 26 September, 2012 - 07:59

"आई, माझ्याकडे सगळीच लहान मुलांची पुस्तके आहेत. आता मला मोठ्या मुलांची पुस्तके घेऊन दे."

"हे काय!? हे नको मला. खुप वेळा वाचुन झालंय माझं. आणि ते पण नको. मोठ्या मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे, लहान मुलांचं !!"

असे संवाद तुमच्या घरी ऐकु येतात का? आमच्याकडे सुरु झालेत सध्या.
पुस्तके किती आणि कोणती विकत घ्यायची, पुन्हा ठेवायची कुठे हे प्रश्न आहेतच.
मग मला वाटले इथे आपण मुलांचा पुस्तक क्लब सुरु केला तर?

  • महिन्यातुन एकदा किंवा जसे जमेल तसे एकत्र भेटुन मुलांची पुस्तके शेअर करायची.

Down the Memory Lane

Submitted by टवणे सर on 19 November, 2010 - 03:48

माझ्या अगदी पहिल्या-पहिल्या आठवणींमध्ये मी भाऊंच्या म्हणजे माझ्या आजोबांच्या पाठीवर उभा राहून त्यांची पाठ चेपून देतो आहे. दुपारी बारा वाजता शाळेतून परतल्यावर वरच्या खोलीत ते गादी घालून पालथे झोपत. मग मी थोडा वेळ भिंतीचा आधार घेत हलके हलके त्यांच्या पाठीवर उभा राहत, चालत त्यांची पाठ चेपून द्यायचो आणि मग अभ्यासाला बसायचो. भाऊ मानेखाली दोन-तीन उश्या लावून मग ग्रंथालयाचे पुस्तक घेऊन वाचायला लागत आणि वाचता-वाचताच झोपी जात. ते झोपलेले असताना त्यांच्या हातातून गळून शेजारी पडलेले जाडजूड ’तुंबाडचे खोत’ नावाचे पुस्तक माझ्या चांगलंच लक्षात आहे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वाचनाची आवड अशीही!!!!!!!!!!!

Submitted by हर्ट on 7 April, 2010 - 11:35

या बीबीचा उद्देश -- वाचन, साहित्य कशाला म्हणतात याची जराही जाण नसताना -- काहीच्या काही वाचन करणारे वाचक नक्की काय वाचतात त्याबद्दल इथे लिहा.

विषय: 
शब्दखुणा: 

दुर्लक्षित/उपेक्षित झालेली उत्तम मराठी पुस्तकं आणि लेखक

Submitted by हर्ट on 10 June, 2009 - 13:47

जुनी मासिकं, दिवाळी अंक, काही निवडक ब्लाँग्स वाचताना काही पुस्तकांची, लेखकांची नावं वाचायला मिळातात जी पुर्वी कधी वाचलेली नसतात. थोडा शोध घेतला की कळतं ते पुस्तकं खरचं खूप छान आहे पण ते इतके दुर्लक्षित का झाले!!!!

विषय: 

Pages

Subscribe to RSS - वाचन