मला जी वाचायची आहेत ती पुस्तके

Submitted by टवणे सर on 3 February, 2020 - 18:09

बरेचदा नवीन प्रकाशित झालेल्या पुस्तकांची माहिती आपल्याला विविध मार्गाने मिळत असते. ती सर्वच पुस्तके वाचली जातात असे नाही. कधी अ‍ॅमेझॉनवर सुचवलेल्या पुस्तकात एखादे वाचावेसे वाटणारे पुस्तक दिसते तर कधी न्युयॉर्क टाइम्स बूक रिव्युमध्ये.

या धाग्याचा उद्देश मराठी/इंग्रजी वा इतर भाषांतील एखादे पुस्तक तुम्हाला दुकानात/ऑन्लाइन चाळताना, वर्तमानपत्रे, बूक रिव्यु, गूड रिड्स वा इतर कुठल्याही स्त्रोतातून माहिती झाले व तुमची उत्सुकता चाळवली गेली असेल तर त्याची माहिती इतरांनाही व्हावी हा आहे. पुस्तक शक्यतो २०१९/२०२० मध्ये प्रकाशित झालेले असावे. धागा जर अजून एक वर्ष टिकला तर पुढल्या वर्षी २०२०/२१ असा क्रायटेरिया लावू. पुस्तकाचे नुसतेच नाव वा यादी कृपया इथे डकवू नये. तुम्ही त्या पुस्तकाचे जर परिक्षण वाचले असेल, त्या पुस्तकाच्या ब्लर्बवरील माहिती वाचली असेल, चाळले असेल - तर त्याची त्रोटक माहिती इथे द्यावी व तुम्हाला ते का वाचावेसे वाटत आहे ते देखील लिहावे.

इथे नवीन मराठी पुस्तकांबद्दल अधिकाधिक लिहिले जाईल ही अपेक्षा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुरुवात मीच करतो.

Early Indians: The Story of Our Ancestors and Where We Came From
लेखक Tony Joseph

अ‍ॅमेझॉनवर पुस्तके चाळताना हे सुचक यादीत आले. पुरातत्त्वशास्त्रात आता अतिप्राचीन अवशेषांपासून मिळालेल्या जनुकीय पुराव्यांच्या जोडीने क्रांतिकारी बदल होत आहेत. पुस्तकाची संक्षिप्त ओळख वाचून खालील प्रश्नांना स्पर्ष करणारे, उत्तर देणारे हे पुस्तक असावे अशी अपेक्षा आहे. हा विषय खुणावणारा असल्याने हे पुस्तक वाचायच्या यादीत आहे.
मूळ भारतीय म्हणजे नेमके कोण? होमो सेपिअन्सच्या आधी इथे कोणी होते का (जसे नीअँडर्थल, डेनिसोवन)?
दख्खनच्या पठारावरचे सावळे/काळे दक्षिण भारतीय हे मूळचे व गोरे उत्तर भारतीय नंतर आलेले का? आर्यांचे मध्य आशियातून इथे स्थलांतर खरेच झाले का? की खूप स्थित्यंतरे झाली, अनेकविध समाज इथे मिसळत गेले?
मेहरगढ, हडप्पा, मोहेंजोदडो या संस्कृत्यांचे नक्की काय झाले? आपल्यात व त्यांच्यात काय दुवा आहे?
जनुकीय शास्त्राच्या आधारे जातव्यवस्था कधी उदयास आली याची उत्तरे सापडतील का?

साधारण २००५मध्ये डॉ. ब्रायन साइक्स यांचे सेवन डॉटर्स ऑफ इव्ह हे अतिशय माहितीपूर्ण तसेच रंजक पुस्तक वाचले होते. त्यात Mitochondrial DNA हा आईकडून अपत्याकडे प्रसारीत होतो मात्र बापाकडून नाही या तथ्याच्या आधारे मुलगी-आई-तिची आई असे मागे मागे जात संपूर्ण युरोपातील लोकसंख्येच्या सँपलद्वारे सात मूळ आयांचा सिद्धांत मांडला आहे. तसेच २०१३मध्ये नॅशनल जिओग्राफिक मासिकात डेनिसोवन माणसाचा शोध कसा लागला याची मोठी कव्हर स्टोरी होती. हे पुस्तक या दोन माझ्या मनात घर करून राहिलेल्या लेखांचे पुढचे पाऊल वाटले. कहाणी मानव प्राण्याची, सेपिअन्स या पुस्तकांनी अजून खतपाणी घातले होतेच.

किंडलवर विकत घेतले आहे. वाचून झाले व समजले तर सविस्तर परिक्षण लिहीन.

धागाकल्पना आवडली.

पुस्तकाच्या नावासोबतच कंसात प्रकाशन वर्ष लिहले तर बरे पडेल Early Indians: The Story of Our Ancestors and Where We Came From (2018).

याच्या सविस्तर परिक्षणाच्या प्रतिक्षेत.

इंटरेस्टिंग धागा.

----------------

The 1982–83 Bombay Textile Strike and the Unmaking of a Labourers’ City (२०१९)

गिरणी कामगारांच्या संपासंदर्भात संशोधन करून लिहिलेलं पुस्तक आहे. या वन-लायनरसाठीसुद्धा मला हे पुस्तक वाचायचंच आहे. गेल्या वर्षी लोकसत्ता-बुकमार्कमध्ये या पुस्तकाची अगदी त्रोटक काही वाक्यांतली ओळख आली होती. तेव्हाच हे विश-लिस्टमध्ये टाकलं होतं.
परवाच्या शनिवारी (१ फेब्रुवारी) लोकसत्ता-बुकमार्क पानावर या पुस्तकावर आधारित मोठा लेख आला आहे. तो वाचून त्यावर आणखी शिक्कामोर्तब झालंय.

लेखक डच आहेत. त्यांची बायको मराठी आहे. त्यामुळे ८०च्या दशकात त्यांचं अनेकदा मुंबईत येणं झालं. त्यादरम्यान त्यांनी हा अभ्यास सुरू केला. काही गिरणीकामगारांमध्ये जाऊन ते राहिले. पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत त्याच कामगारांची नावं आहेत.

-------------------

जरासं अवांतर : 'सेव्हन डॉटर्स ऑफ इव्ह'बद्दल वाचून मायटोकाँड्रिआबद्दलचा आगावाचा लेख आठवला.

Early Indians: .. हे पुस्तक मलाही वाचायचं आहे. हिंदूच्या या रविवारच्या पुरवणीत लेखकाची मुलाखत आली होती. ती वाचल्यामुळे या पुस्तकाबद्दल कळलं आणि उत्सुकता वाटली.
मुलाखतीची लिंक खाली देत आहे.
https://www.thehindu.com/books/the-indian-population-is-a-result-of-four...

बेंगलोर ते रायबरेली - वि.स. वाळिंबे मागच्या पुणे वारीत International book depot मध्ये मिळाले. अजून वाचायचे आहे. बर्याच दिवसापासून शाेधत होतो. त्याच्या नंंतरचे 'रायबरेली व त्यानंतर' वाचले होते आधीच.

मंदार, वि स वाळिंब्यांचे पुस्तक 70च्या दशकातील आहे. त्यामुळे खरे तर या धाग्यावर बाद! इथे तुम्ही 2019/20मध्ये विकत घेतलेली पुस्तके अपेक्षित नसून 19/20मध्ये प्रकाशित पुस्तके अपेक्षित आहेत.

@भरत, कविता गझल माझा प्रांत नोहे. शीर्षक चुकून चुकलं असेल. तसेही गझलेत असे प्लेन शीर्षक कसे चालेल? "वाचायची मला जी आहेत पुस्तके ती" असे काहितरी करावे लागेल ना.
बाकी, तुमच्याकडून इथे मराठी पुस्तकांच्या ओळखीची अपेक्षा आहे.

@ami, पुस्तक 2018च्या शेवटच्या आठवड्यात प्रकाशित झाले, जवळ जवळ 2019च. म्हणून या धाग्यावर लिहिले

थोडं अवांतर होइल पण संबंधितांना कदाचित उपयोग होइल या आशेवर लिहितो:

मी गेले काहि महिने एक बुक समरीजचं अ‍ॅप (ब्लिंकिस्ट) वापरतोय. पुस्तकांचा (नॉनफिक्शन) गाभा १०-१५ मिनिटांत वाचता/ऐकता येण्याची सोय यांत आहे. वाट्टेल तेंव्हा, वाट्टेल तिथे एयरपाड लाउन १५ मिनिटांत संपुर्ण पुस्तक "वाचणं" हि एक मोठ्ठी पर्वणी. दुसरा फायदा हा कि विशलिस्ट मधली पुस्तकं वाचली जातातंच, त्या व्यतिरिक्त इतर कॅची विषयावरची पुस्तकंहि लिस्ट मध्ये येत आहेत...

आता काहि प्युरिस्ट मंडळींना हा प्रकार आवडणार नाहि, पण सध्यातरी आयॅम एंजॉइंग इट. नाहि तरी नॉन्फिक्शन्स मधे एखादा संदेश/मुद्दा/विचार मांडलेला असतो, तो वाचकांपर्यंत पोचल्याशी मतलब. आणि तेच काम २-३ तासां ऐवजी १०-१५ मिनिटांत झालं तर और क्या चाहिये? इच्छुकांनी हे अ‍ॅप वापरुन लाभ घ्यावा म्हणुन हा पोस्टप्रपंच...

राज, इंटरेस्टिंग कल्पना आहे. वापरून बघायला काहीच हरकत नाही.

हे मी वाचलेले पुस्तक धाग्यावर पण टाका म्हणजे अधिक वाचकांपर्यंत पोहोचेल

वाचायची मला जी आहेत पुस्तके ती असं लिहिलं तर 'केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली' च्या चालीवर गाता येईल ☺️☺️

आजकाल मराठीत, जी वाचताना रात्र उलटून जाईल अशी पुस्तके लिहिलीच जात नाहीयेत / प्रसिद्धच होत नाहीत असा माझा समज होत चालला आहे.
ह्या समजाला छेद देणारी पुस्तके सुचवाल तर वाचायला आवडेल.

(मला वाचायला कुठल्याही प्रकारचे पुस्तक चालते.)

नाही नाही
इंडिया वॉन्टस यमक/काफिया/गझलीयत शीर्षक ☺️☺️☺️☺️

मला जी वाचायची आहेत ती पुस्तके
तुझ्या ग्रंथालयात सापडतील का रे?
आले मी ती शोधण्याच्या बहाण्याने
तर खोलशील का तुख्या हृदयाची द्वारे ?

अशी एखादी ग्रंथपालासारख्या काव्यात दुर्लक्षित झालेला व्यक्तीवर एखादी गझल तयार होऊ शकते.
(एखादा हिंदी शब्द हवा गझलेत म्हणुन 'खोलशील' का)

वाचायची मला जी आहेत पुस्तके ती
ग्रंथालयात तुझिया मिळतील का मला ती
मी शोधण्या तिथे ती, आले जरी मनाने
ह्रदया तुझी कवाडे, तू खोलशील का रे?
(अगागा मीटरमध्ये बसवायला किती मोडतोड करावी ती बिचाऱ्या शब्दांची) ☺️☺️

आफ्रिकेतले होमो सेपियन्स भारतात आले व इथे उत्क्रांत झाले ,त्यांना ancient ancestral south Indians असे म्हणतात ,ते होमो सेपियन्सच आहेत. यातले काही किनारपट्टीच्या बाजूने ऑस्ट्रेलियात पोचले ,ऑस्ट्रेलियन ॲबोरीजनल हे मुळातले भारतीयच आहेत,यांना ऑस्ट्रेलॉईड वंश असेही संबोधले जाते. खुप नंतर इराणी भट्क्या टोळ्यातील लोक भारतात आले व या मुल लोकांशी त्यांचा संयोग होऊन ancestral north Indians हे मिश्र लोक तयार झाले .त्यांनी aasi यांना दक्षिणेकडे पिटाळले.पुढे शेवटी युरेशियातून आर्य आले ज्यांना प्रामुख्याने संयोग ancestral north Indians बरोबर होऊन गौरवर्णिय भारतीय प्रामुख्याने उत्तर भारतीय तयार झाले.

मला जी वाचायची आहेत ती पुस्तके
अजून प्रकाशित झालीच नाही
फिरतोय मी अंधार्‍या वाटेनं कधीचा
पुस्तकांचे सूर्य उगवलेच नाही

द मेसेंजर, लेखक : शिव मलिक (२०१९)

या पुस्तकाबद्दलही मी लोकसत्ता-बुकमार्कमध्ये वाचलं.
शिव मलिक पत्रकार होते. त्यांच्या कामाचा भाग म्हणून त्यांनी मँचेस्टरमध्ये एका जिहादीची मुलाखत घेतली. ८-१० वर्षांनी एका अतिरेकी घटनेमुळे त्याच जिहादीशी त्यांचा परत संबंध आला. आता तो बदललाय, त्याचं मतपरिवर्तन झालंय, असं तो सांगत होता. त्यादरम्यान काय काय घडलं होतं, तो जिहादी कशा प्रकारचं काम करत होता, तो ज्या वर्तुळात वावरत होता त्यापासून त्याला दूर का व्हावंसं वाटत होतं याबद्दल तो त्यांच्याशी बोलला; त्यांनी त्याला बोलतं केलं; त्यातून आजचा मीडिया, फेक न्यूजची प्रवृत्ती यावर प्रकाश टाकला गेला आहे.... असं साधारण पुस्तकाचं स्वरूप आहे.

लोकसत्तात वाचलं होतं त्यातलं आठवतंय तितकं थोडक्यात लिहिलंय. पण तो परिचयपर लेख वाचून हे पुस्तक विश-लिस्टमध्ये टाकलंय.

The Anarchy: The East India Company, Corporate Violence, and the Pillage - William Dalrymple

मी प्राथमिक शाळेत असेतोवर गावात दोन तीन लाकडाचा कोळसा विकणाऱ्या वखारी शिल्लक होत्या. पुढे एखाद वर्षात त्या सगळ्याच बंद पडल्या व वखारी फक्त टिंबर डेपोत राहिल्या. पण या गावातल्या वखारी बघितल्यामुळे 'इंग्रजानी सुरत अन कलकत्त्याला उघडलेल्या वखारी व त्यांचे महत्त्व' याबाबत माझा मनात मोठा होईपर्यंत गोंधळ होता. लाकडं विकून इंग्रजांना असा काय फायदा होत असेल ते काही माझ्या ध्यानात आले नाही.

असो. इंग्रजी राजवटीचा इतिहास शिकताना आधी कंपनी सरकार आणि मग 1857च्या स्वातंत्रासमरानंतर (हा पूर्वी उठाव असे) 'ब्रिटिश राज' हे सहज (नॉर्मल) शिकले गेले. इंग्रजी राजवट ही इंग्रज सरकारचे (राणीच्या नावाने) भारतावर राज्य हेच डोक्यात बसलेले. पण ब्रिटिश सरकारचे राज्य उणेपूरे 90 वर्षांचे. त्याआधी जवळपास 100वर्षे कंपनीचे भारतावर राज्य होते. एक खाजगी भांडवलधारी कंपनीने एका प्राचीन संस्कृतीच्या समाजाने वसलेल्या प्रचंड भूभागावर राज्य कसे स्थापन केले असेल अन टिकवले असेल याचा इतिहास विल्यम डॅलरीमपलच्या The Anarchy या पुस्तकात असावा.

हे पुस्तक माझ्या वाचायच्या यादीत आहे, बघू कधी योग येतो.

The Anarchy - हे पुस्तक किंडल सजेशन्समध्ये अनेकदा दिसलंय; पण वाचावं की नाही ठरत नाही.

हो मलाही वाचायचे आहे हे. टण्या - मलाही अनेक वर्षे इंग्रजांची वखात म्हंटले की आमच्या घराजवळची लाकडाची वखार डोळ्यासमोर येत असे Happy

ललितच्या फेब्रुवारी २०२० च्या अंकात प्रवीण बांदेकरांच्या ' इंडियन अ‍ॅनिमल फार्म ' या कादंबरीबद्दल वाचलं.
या कादंबरीत " मानवी वर्तनव्यवहार प्राण्यांवर आरोपित करून रूपकात्मक पद्धतीने समकालीन वास्तवावर प्रकाश टाकला आहे. त्यामुळेच ही कादंबरी समकालीन सामाजिक आणि राजकीय स्थितीचे दस्तऐवजीकरण करण्या यशस्वी होते. पुढे जेव्हा कधी या काळाचा इतिहास लिहिला जाईल , तेव्हा ही कादंबरी महत्त्वाचा दस्तऐवज ठरेल.

मलाही अनेक वर्षे इंग्रजांची वखार म्हंटले की आमच्या घराजवळची लाकडाची वखार डोळ्यासमोर येत असे - हो, अगदी!

इंडियन अ‍ॅनिमल फार्म रोचक वाटते आहे. थोडेफार गूगल चाळले असता एक लेख सापडला.

https://indianexpress.com/article/express-sunday-eye/a-murder-on-animal-...

पुस्तकाची काही पाने इथे वाचता येतील
https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=52288338419272...

जयराम रमेश यांनी लिहिलेले A Chequered Brilliance: The Many Lives of V.K. Krishna Menon हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. 62च्या चीन युद्धाबद्दल ज्यांनी वाचले असेल त्यांना कृष्ण मेनन नक्कीच माहिती असतील. पण साम्यवादी, इंग्रजाळलेले व्यक्तिमत्व, तापट स्वभाव वगैरे अवगुण वगळता फारसे त्यांच्याबद्दल मी तरी वाचलेले नाही. त्यांचे भारतीय राजकारणातील स्थान व प्रभाव नक्कीच महत्त्वाचे आहे. जयराम रमेश सारख्या अभ्यासू लेखकाचे पुस्तक असल्याने उत्तम असेल याची खात्री आहे.

शेखर गुप्तांचा रिव्ह्यू: https://youtu.be/fkq-yi50bfs

Pages