मराठी : वाचन घडते कसे ?

Submitted by कुमार१ on 30 April, 2023 - 22:32

आपणा सर्वांना महाराष्ट्र दिन अर्थात मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

यंदाच्या २७ फेब्रुवारी रोजी आपण इथे मराठी भाषा गौरव दिन धुमधडाक्यात साजरा केला. त्या दरम्यान मराठी भाषेच्या अनेक पैलूंना आपण स्पर्श केला. आज मराठी भाषा दिनानिमित्ताने नवा लेख लिहिण्याचा मानस नाही परंतु एक वेगळी कल्पना मनात आली.

मराठी भाषकांचे मराठी वाचन किती प्रमाणात आहे आणि ते कोणकोणत्या माध्यमांमधून केले जाते याचा कानोसा घेण्याचा एक प्रयत्न करावा म्हणतो. मराठी वाचन करण्याची जी विविध माध्यमे आहेत त्यांचे खालील प्रमुख गटांमध्ये वर्गीकरण करता येईल:

* दैनिके
*नियतकालिके
* मराठी संस्थळे
* पुस्तके

या माध्यमांच्या अनुषंगाने खाली एक प्रश्नावली तयार केलेली आहे. आपल्या सवडीनुसार आपल्याला योग्य वाटेल त्या प्रश्नांची उत्तरे प्रतिसादांमधून द्यावीत ही विनंती. या प्रश्नांव्यतिरिक्तही आपणास काही अन्य टिप्पणी करायची असल्यास करू शकता. हा धागा जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने ललित विभागात काढलेला आहे. कृपया सहकार्य करावे.

दैनिके
१ . रोज कोणती दैनिके वाचता ? छापील का आंतरजालीय ?
२. फक्त बातम्या वाचता की अन्य सदरे देखील?
३. बातम्यांखेरीज आवडणारी सदरे कोणती ?
४. अजिबात न आवडणारी सदरे कोणती ?
५. छापील दैनिके कायमस्वरूपी चालू राहावीत असे वाटते का ?

अन्य नियतकालिके
( मासिक, साप्ताहिक, वार्षिक, इ. )
१. कोणती वाचता ? छापील/ आंतरजाल ?
२. त्यातील आवडणारी सदरे
३. दैनिकांच्या जोडीने यांच्या वाचनाची आवश्यकता वाटते का?

मराठी संस्थळे
१. कोणकोणत्या संस्थळांवर वावर असतो ?
२. इथले वाचन दररोज / अधूनमधून/ क्वचित करता ?
३. आवडणारे विभाग किंवा लेखनप्रकार
४. नावडणारे विभाग / प्रकार
५. फक्त वाचक आहात की अधूनमधून स्वतंत्र लेखन सुद्धा करता ?

पुस्तके
१. वाचण्याची वारंवारिता : दरमहा/ वर्षातून काही महिने/ क्वचित
२. वाचन प्रकार: छापील / इलेक्ट्रॉनिक
३. वाचन श्रवणाचा अनुभव असल्यास : पुस्तक वाचन आणि पुस्तक श्रवण यात अधिक काय आवडते ?
४. पुस्तक वाचनाचा स्रोत : वाचनालय / विकत / मोफत प्रकारे.
५. आवडणाऱ्या आणि नावडणाऱ्या पुस्तकांचा प्रकार.
६. भविष्यात छापील पुस्तके कायमस्वरूपी राहावीत असे वाटते का ?

* वाचनाच्या इतर प्रकारांसंबंधी काही लिहावयाचे असल्यास स्वागत.

वरील प्रश्नांच्या उत्तरांची सुरुवात माझ्यापासून करत नाही. माझी उत्तरे मी चर्चा समारोपाच्या शेवटी देईन. आपल्या सवडीनुसार आपण इथल्या प्रतिसाद आणि चर्चेमध्ये सहभागी व्हावे हे आग्रहाचे आमंत्रण !
धन्यवाद !
*************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दैनिके
१ . रोज कोणती दैनिके वाचता ? छापील का आंतरजालीय ? ...आंतरजालीय..रोज वाचली जात नाहीत.
२. फक्त बातम्या वाचता की अन्य सदरे देखील?
...अन्य सदरे.
३. बातम्यांखेरीज आवडणारी सदरे कोणती ?
...
४. अजिबात न आवडणारी सदरे कोणती ?
...
५. छापील दैनिके कायमस्वरूपी चालू राहावीत असे वाटते का ?
... डिजीटली वाचत असल्यामुळे चालू राहीली किंवा नाही तरी फरक पडणार नाही

अन्य नियतकालिके: वाचली जात नाहीत.

मराठी संस्थळे
१. कोणकोणत्या संस्थळांवर वावर असतो ?
...मायबोली
२. इथले वाचन दररोज / अधूनमधून/ क्वचित करता ?
...अधूनमधून
३. आवडणारे विभाग किंवा लेखनप्रकार
... पुस्तकांबद्लचे धागे, ललितलेख, कथा,निसर्ग वर्णन, प्रवासवर्णने.
४. नावडणारे विभाग / प्रकार.
...

५. फक्त वाचक आहात की अधूनमधून स्वतंत्र लेखन सुद्धा करता ?
...वाचक.

पुस्तके
१. वाचण्याची वारंवारिता : दरमहा/ वर्षातून काही महिने/ क्वचित
....दररोज, दरमहा.
२. वाचन प्रकार: छापील / इलेक्ट्रॉनिक
...इलेक्ट्रॉनिक (किंडल डिवाईस)
३. वाचन श्रवणाचा अनुभव असल्यास : पुस्तक वाचन आणि पुस्तक श्रवण यात अधिक काय आवडते ?
...पुस्तक वाचन.
४. पुस्तक वाचनाचा स्रोत : वाचनालय / विकत / मोफत प्रकारे.
... विकत
५. आवडणाऱ्या आणि नावडणाऱ्या पुस्तकांचा प्रकार.
... बायोग्राफी,फैन्टसी, थरारक, एडवेन्चर, ऐतिहासिक, गुढ,भूतकथा.
६. भविष्यात छापील पुस्तके कायमस्वरूपी राहावीत असे वाटते का ?
...नसली तरी चालतील.

दैनिके
१ . रोज कोणती दैनिके वाचता ? छापील का आंतरजालीय ? - छापील लोकसत्ता. (मराठीच विचारलंय म्हणून पण इंडियन एक्स्प्रेस छापील. काही महिन्यांपूर्वीपर्यंत छापील बिझिनेस स्टँडर्डसुद्धा.
२. फक्त बातम्या वाचता की अन्य सदरे देखील? - बातम्यांवर नजर. त्या जालावर आधीच कळलेल्या असतात.
३. बातम्यांखेरीज आवडणारी सदरे कोणती ? ओप एड पेजेस आणि शनिवार रविवारच्या पुरवण्या.
४. अजिबात न आवडणारी सदरे कोणती ? स्थानिक बातम्या. सध्या वृत्तांकनाचा दर्जा फारच घसरला आहे.
५. छापील दैनिके कायमस्वरूपी चालू राहावीत असे वाटते का ? - हो. ई वृत्तपत्रे असतील तर त्यांच्यासाठी पैसे असावेत. सध्याच अनेक वृत्तपत्रांची संकेत स्थळे पैसे भरल्याशिवाय किंवा सद स्यत्व घेतल्याशिवाय पूर्ण वृत्त / लेख वाचू देत नाहीत. बिझिनेस स्टँडर्डची ओप एड पेजेस फुकट वाचता येत नाहीत.

अन्य नियतकालिके ( मासिक, साप्ताहिक, वार्षिक, इ. ) - मासिके वाचत असे. गेली दोन वर्षे बंद केले आहे. दिवाळी अंक विकत व वाचनालयात वेगळी वर्गणी देऊन वाचतो.
१. कोणती वाचता ? छापील/ आंतरजाल ? - छापील. आंतरजालावरचं कोणी काही वाच म्हणून सांगितलं (फेसबुक वा अन्यत्र त्याची लिंक दिली , तरच)
२. त्यातील आवडणारी सदरे
३. दैनिकांच्या जोडीने यांच्या वाचनाची आवश्यकता वाटते का?- हो. मासिक साप्ताहिकां त बातमीपलीकडे जाऊन सविस्तर विचार, माहिती असते..

मराठी संस्थळे
१. कोणकोणत्या संस्थळांवर वावर असतो ? - मायबोली
२. इथले वाचन दररोज / अधूनमधून/ क्वचित करता ? दररोज
३. आवडणारे विभाग किंवा लेखनप्रकार - राजकीय, सामाजिक.पूर्वी कविता आवर्जून वाचत असे.
४. नावडणारे विभाग / प्रकार - कथा क्वचित वाचतो. खास कारण नाही. पण गोष्ट सांगणार्‍या कथा आवडत नाहीत.
५. फक्त वाचक आहात की अधूनमधून स्वतंत्र लेखन सुद्धा करता ? - लेखनही करतो. ठरवून नाही. तसा विषय, निमित्त असेल तरच

पुस्तके
१. वाचण्याची वारंवारिता : दरमहा/ वर्षातून काही महिने/ क्वचित - नियमित. रोज काही पाने तरी वाचतोच. वाचनालयातून आणून वाचतो. विकत घेतलेली पुस्तके वाचायचे राहून जाते आहे.
२. वाचन प्रकार: छापील / इलेक्ट्रॉनिक छापील
३. वाचन श्रवणाचा अनुभव असल्यास : पुस्तक वाचन आणि पुस्तक श्रवण यात अधिक काय आवडते ?
४. पुस्तक वाचनाचा स्रोत : वाचनालय / विकत / मोफत प्रकारे. - वाचनालय, विकत.
५. आवडणाऱ्या आणि नावडणाऱ्या पुस्तकांचा प्रकार. - कथा कादंबर्‍या विशिष्ट प्रकारच्या आवडतात. वाचनालयात दिसतात त्यातली बहुसंख्य आवडत नाहीत. अनुवादित कादंबर्‍यांच्या वाटेला जात नाही. सामाजिक, वैचारिक लेखन आवडते. वाचनालय कवितासंग्रह घेत नाही याचे वाईट वाटते.
६. भविष्यात छापील पुस्तके कायमस्वरूपी राहावीत असे वाटते का ? - हो.

सुंदर सुरवात. धन्यवाद !

ज्यांना प्रश्नावली नको वाटत असेल त्यांनी स्वतःच्या भाषेत लिहिले तरी चालेल.

दैनिके
१ . रोज कोणती दैनिके वाचता ? छापील का आंतरजालीय ? - छापील सकाळ, शनिवारचा लोकसत्ता.
२. फक्त बातम्या वाचता की अन्य सदरे देखील? - बातम्या, अन्य
३. बातम्यांखेरीज आवडणारी सदरे कोणती ?
धिंगाटांग, शनिवार रविवारच्या पुरवण्या. पाककृती, आरोग्य आणि व्यायाम विषयक
४. अजिबात न आवडणारी सदरे कोणती ?
अर्थ विषयक रटाळ विवेचन!

५. छापील दैनिके कायमस्वरूपी चालू राहावीत असे वाटते का ? - हो.

अन्य नियतकालिके ( मासिक, साप्ताहिक, वार्षिक, इ. ) - नाही

मराठी संस्थळे
१. कोणकोणत्या संस्थळांवर वावर असतो ? - मायबोली
२. इथले वाचन दररोज / अधूनमधून/ क्वचित करता ? दररोज
३. आवडणारे विभाग किंवा लेखनप्रकार - सामाजिक. कविता ,साहित्य विषयक, प्रतिसाद, मालिका, संगीत,
४. नावडणारे विभाग / प्रकार - काही लोकांचे रटाळ धागे, अनावश्यक बडबड
५. फक्त वाचक आहात की अधूनमधून स्वतंत्र लेखन सुद्धा करता ? - लेखन करते. ठरवून नाही. तसा विषय, निमित्त असेल तरच

पुस्तके
१. वाचण्याची वारंवारिता : दरमहा/ वर्षातून काही महिने/ क्वचित - नियमित. रोज काही पाने तरी वाचतेच. वाचनालयातून आणून वाचते. विकत घेतलेली पण वाचते.
२. वाचन प्रकार: छापील / इलेक्ट्रॉनिक छापील
३. वाचन श्रवणाचा अनुभव असल्यास : पुस्तक वाचन आणि पुस्तक श्रवण यात अधिक काय आवडते ?
४. पुस्तक वाचनाचा स्रोत : वाचनालय / विकत / मोफत प्रकारे. - वाचनालय, विकत.
५. आवडणाऱ्या आणि नावडणाऱ्या पुस्तकांचा प्रकार. - कथा कादंबर्‍या विशिष्ट प्रकारच्या असे नाही. वाचून ठरविते. अनुवादित कादंबर्‍या आवडतात. प्रवासवर्णने खूप आवडतात. सामाजिक, वैचारिक लेखन आवडते. कथासंग्रह आवडतात. आत्मचरित्र ही आवडते.
६. भविष्यात छापील पुस्तके कायमस्वरूपी राहावीत असे वाटते का ? - हो.

ब्लॉग्ज + मायबोली
गलिच्छ शब्द आलेले राजकारणाविषयी धाग्यांचा तीव्र तिटकारा आहे. काही जे आय डी तडीपार केलेत ते फार बरं झालं गेलेत.
कथा-कविता-रसग्रहण-लेख म्हणजे एकंदर बाकी सर्वच आवडते.
जर आवाज खणखणीत असेल, तर पुस्तक वाचनाइतकेच श्रवणही आवडते. -
https://www.youtube.com/@aaratikm
https://www.youtube.com/@pustakdarpan7662
पुस्तकांचा स्रोत - किंडल आणि भारतवारीत छापिल
नावडणारी पुस्तके - ऐतिहासिक.

>>>>माझी उत्तरे मी चर्चा समारोपाच्या शेवटी देईन.
जरुर! कुतूहल आहे. दर्जेदार आणि फक्त दर्जेदार लिखाण असते तुमचे.
प्रतिसाद, लिखाण - उच्च अभिरुची + सुसंस्कृतपणा

रोज कोणती दैनिके वाचता ? छापील का आंतरजालीय ?
दोन्ही
२. फक्त बातम्या वाचता की अन्य सदरे देखील?
बातम्या मुख्यत्वे, सदरे फक्त लोकसत्ता मधील
३. बातम्यांखेरीज आवडणारी सदरे कोणती ?
पूर्वी बरीच होती, सकाळ मधील तंबी दुराई, लोकसत्ता मधील पुस्तकांची ओळख करून देणारे, प्राणी जगत
सध्या एक शार्क वरती सिरीज सुरू आहे ती छान आहे
४. अजिबात न आवडणारी सदरे कोणती ?
राजकीय आणि वैचारिक, फारच शब्दबंबाल आणि क्लिष्ट
५. छापील दैनिके कायमस्वरूपी चालू राहावीत असे वाटते का ?
होय, सकाळी चहा कॉफ़ी घेताना मांडी घालून पेपर पसरून वाचण्यातली मजा डिजिटल ला नाही

अन्य नियतकालिके
( मासिक, साप्ताहिक, वार्षिक, इ. )
१. कोणती वाचता ? छापील/ आंतरजाल ?
दिवाळी अंक कधी कधी, पण तेही फार बोर होतात आजकाल
चित्रलेखा पूर्वी आवडत होते पण ते नंतर फारच एकांगी झालं आणि आता बंदच झाले, लोकप्रभा पण होते आवडीचे
अभिजित घोरपडे यांचे भवताल हे फार सुंदर असते मासिक
बाकी डिजिटल मध्ये स्पोर्ट्स मॅगझीन वाचतो
२. त्यातील आवडणारी सदरे
विशेष काही आठवण्यासारखी नाहीय
३. दैनिकांच्या जोडीने यांच्या वाचनाची आवश्यकता वाटते का?
कसेही

मराठी संस्थळे
१. कोणकोणत्या संस्थळांवर वावर असतो ?
फक्त माबो
२. इथले वाचन दररोज / अधूनमधून/ क्वचित करता ?
रोज
३. आवडणारे विभाग किंवा लेखनप्रकार
क्रीडा, विनोदी लेखन, चित्रपट, पुस्तके
४. नावडणारे विभाग / प्रकार
राजकीय, सरांचे धागे, कविता गझल (कधी कधी चांगल्या असतात पण बरेचदा अतिरेक होतो, मधल्या काळात तर फार उत आला होता), क्रिकेट विषयक
५. फक्त वाचक आहात की अधूनमधून स्वतंत्र लेखन सुद्धा करता ?
लेखन करतो कधी कधी
पुस्तके
१. वाचण्याची वारंवारिता : दरमहा/ वर्षातून काही महिने/ क्वचित
रोज
२. वाचन प्रकार: छापील / इलेक्ट्रॉनिक
दोन्ही, किंडल वर मुबलक पुस्तके उपलब्ध असतात, तेवढी छापील नाहीत
३. वाचन श्रवणाचा अनुभव असल्यास : पुस्तक वाचन आणि पुस्तक श्रवण यात अधिक काय आवडते ?
वाचन कधीही, खूप जणांना आवडतो पण मला व्यक्तिशः कधीच जमलं नाही, वाचन करताना आपण मजकूर, वाक्यरचना, परिच्छेद, उद्गारवाचक चिन्हे सगळी वाचत जातो, फोकस राहतो आणि लेखकांशी संवाद होतो, एखादे वाक्य पटकन मागे जाऊन परत वाचता येते, ऐकताना डोळे दुसरीकडे कान एकीकडे
त्याने तादात्म्य पावता येत नाही (वैयक्तिक मत)
पुस्तक वाचताना गाणी ऐकावीत हवे तर
आणि ऐकायचं असेल तर प्रवचन Happy
४. पुस्तक वाचनाचा स्रोत : वाचनालय / विकत / मोफत प्रकारे.
वाचनालये कमीच उरली आहेत आणि जी असतात तिथं कादंबरी आणि बाकीचे भरताड जास्त असतात असं अनुभव, अपवाद पुणे मराठी ग्रंथालय
पण दर वेळी जाऊन पुस्तक बदलून आणा आणि हवे असलेले शोधा याचा कंटाळा येतो
त्यापेक्षा किंडल वर स्कीम मध्ये बरीच चांगली पुस्तके फुकटात वाचायला मिळतात (99रु मध्ये तीन महिने) खूप परवडते
कित्येक पुस्तके एकदाच वाचनीय असतात ती विकत घेऊन नंतर पडून राहतात
संग्राह्य पुस्तके आवर्जून विकत घेतो

५. आवडणाऱ्या आणि नावडणाऱ्या पुस्तकांचा प्रकार.
आवडणारी अनेक पुलं, गोनिदा, गिर्यारोहण, क्रीडा, सायकलिंग, रनिंग, वर्ल्ड वॉर 2, ऐतिहासिक (कादंबरी नव्हे) राज्यक्रांती, युद्धे वगैरे
न आवडणारी - वपु (वैयक्तिक मत), अमिश, मेघना पेठे आणि तत्सम स्त्रीवादी लिखाण, प्रवीण दवणे, आत्मचरित्रे (अपवाद वगळता), मीना प्रभू (पुन्हा अपवाद वगळता)
६. भविष्यात छापील पुस्तके कायमस्वरूपी राहावीत असे वाटते का ?
नक्कीच, पुस्तकांचा वास, तो स्पर्श, मजकूर सगळं एकदम छान असतं
डिजिटल कितीही किफायतशीर असलं तरी ती मजा त्यात येत नाही

प्रश्नावली परत न छापता थोडक्यात -
छापील नवी पुस्तके वाचनालयातून (चालत दहा मिनिटांवर आहे)मिळतात. तिथेच चाळून पाहता आल्याने नको असलेली टाळता येतात.
सर्व प्रकार वाचतो. साधारण महिन्यात वीस पुस्तके वाचतो. (महिना वीस रुपये फी आहे.)
मराठी पेपर तिथे असतात पण टीवी चानेल्समुळे वाचायची गरज पडत नाही. (इंग्रजी पेपर हिंदुस्तान टाइम्स, साप्ताहिक इंडिया टुडे यातील वेचक लेख मोबाईलवर वाचतो.)
श्राव्य माध्यम माझ्या कामाचे वाटत नाही.

दैनिके
१ . रोज कोणती दैनिके वाचता ? छापील का आंतरजालीय ?
-लोकसत्ता. छापील.

२. फक्त बातम्या वाचता की अन्य सदरे देखील?
-जवळपास सगळं. (आर्थिक सोडून. त्यात मी झीरो.)

३. बातम्यांखेरीज आवडणारी सदरे कोणती ?
-संपादकीय.. चांगले लेख.

४. अजिबात न आवडणारी सदरे कोणती ?
-----
५. छापील दैनिके कायमस्वरूपी चालू राहावीत असे वाटते का ?
-हो.
अन्य नियतकालिके
( मासिक, साप्ताहिक, वार्षिक, इ. )
-हाताला लागेल ते.

१. कोणती वाचता ? छापील/ आंतरजाल ?
-असली तर छापीलच.

२. त्यातील आवडणारी सदरे
-चरित्र.., आठवणी.., कथा..

३. दैनिकांच्या जोडीने यांच्या वाचनाची आवश्यकता वाटते का?
-हो.

मराठी संस्थळे
१. कोणकोणत्या संस्थळांवर वावर असतो ?
-मायबोली.

२. इथले वाचन दररोज / अधूनमधून/ क्वचित करता ?
-जमेल तेव्हा.

३. आवडणारे विभाग किंवा लेखनप्रकार
-ललित

४. नावडणारे विभाग / प्रकार
----
५. फक्त वाचक आहात की अधूनमधून स्वतंत्र लेखन सुद्धा करता ?
-दोन्ही.

पुस्तके
१. वाचण्याची वारंवारिता : दरमहा/ वर्षातून काही महिने/ क्वचित
-शक्य असेल तेव्हा.

२. वाचन प्रकार: छापील / इलेक्ट्रॉनिक
-दोन्ही.

३. वाचन श्रवणाचा अनुभव असल्यास : पुस्तक वाचन आणि पुस्तक श्रवण यात अधिक काय आवडते ?
-वाचन.

४. पुस्तक वाचनाचा स्रोत : वाचनालय / विकत / मोफत प्रकारे.
-सगळे स्त्रोत वापरते.

५. आवडणाऱ्या आणि नावडणाऱ्या पुस्तकांचा प्रकार.
----
६. भविष्यात छापील पुस्तके कायमस्वरूपी राहावीत असे वाटते का ?
-हो.

इथले चोखंदळ वाचक आणि उत्तम लेखक प्रतिसादांमध्ये सहभागी झाल्याचे पाहून आनंद वाटला.

बहुतेकांना उत्तर देण्यासाठी प्रश्नावली नमुना योग्य वाटलेला दिसतो.
इथून पुढच्या प्रतिसादकांना एक सूचना :
तुमच्या प्रतिसादात प्रश्न कायम ठेवणार असाल तर तुमच्या उत्तरातील महत्त्वाचे शब्द ठळक करा. म्हणजे ते पटकन नजरेत भरतील.

धन्यवाद !

दैनिके
पाचेक वर्षांपूर्वी वाचायची बंद केली. आता बरं चाललंय माझं.. फार महत्त्वाचं काही हरवून जात असेल, असं वाटत नाही.

नियतकालिके :
मुक्त शब्द वाचायचो. ते मिळायचं बंद झालं. बंद पडलं म्हणतात. आश्चर्य वाटलं नाही.

मराठी संस्थळे
कोणकोणत्या संस्थळांवर वावर असतो - मायबोली, ऐसी अक्षरे, कोरा मराठी, काही ब्लॉग्ज.

आवडणारे लेखनप्रकार - कथा/ कादंबरी/ ललित/वैचारिक/चित्रपट परीक्षण/ पुस्तकांसंबंधी.

नावडणारे प्रकार-
पाककला, आरोग्यविषयक, धार्मिक, बागकाम, ज्योतिष, गुंतवणूक, मुलांचे संगोपन, कौटुंबिक, क्रिकेट, मार्गदर्शनपर.

फक्त वाचक आहात की अधूनमधून स्वतंत्र लेखन सुद्धा करता ?
वाचक आहे. आणि त्यातून मग भाषा यायला लागली. येत राहिली. काय काय देत राहिली. बदल्यात काय मागितलं नाय तिनं. पण सतत घेणं मलाच बरं वाटेना. म्हणून म्हटलं की तिच्याकडनं आलेल्यातलंच थोडंफार तिला देऊ. म्हणून मग लिहिण्याच्या भानगडीत पडलो, पडत असतो अधूनमधून. पण ते वरवरचं. ते काही खऱ्याचं नाही. मूळचा मी वाचकच.

पुस्तके
वाचण्याची वारंवारिता : दररोज
वाचन प्रकार: छापील पुस्तके.

पुस्तक वाचन आणि पुस्तक श्रवण यात अधिक काय आवडते?
पुस्तक वाचतो, ऐकत नाही. त्या प्रक्रियेत तिसरं कुणी असू नये, असं वाटतं. भविष्यात डोळे पूर्ण बाद झाले तर आपद्धर्म म्हणून श्रवण चालवून घ्यायला हरकत नाही.

पुस्तक वाचनाचा स्रोत :
वाचनालयाचा सभासद असतो. छोटासा संग्रहही आहे, त्यात बेरीज वजाबाकी होत राहते.

आवडणाऱ्या पुस्तकांचा प्रकार-
कादंबरी, कथासंग्रह, वैचारिक, ललित, स्पिरीच्युअल, मनोविश्लेषणात्मक, काही विशिष्ट लेखक/लेखिकांचे अनुवाद.

नावडणाऱ्या पुस्तकांचा प्रकार-
नाटक, आत्मचरित्रं, पौराणिक, शहरी-मध्यमवर्गीय प्रवासवर्णनं, प्रचारात्मक-भडक साहित्य, रहस्यमयी-थरारक-गूढ कादंबऱ्या, सुमार लेखिकांच्या प्रापंचिक कादंबऱ्या, प्रेरणादायी उष्टं खरकटं, विनोदी साहित्यिक म्हणवून घेणाऱ्यांची पुस्तकं, भाषणांचे संग्रह ज्यात प्रत्येक वाक्य संपल्यावर कंसात (हशा) (टाळ्या) अशी जबरदस्ती केलेली असते.

भविष्यात छापील पुस्तके कायमस्वरूपी राहावीत असे वाटते का ?
होय. जोपर्यंत मी आहे, तोवर तरी रहावीत, असे वाटते.

इंटरेस्टिंग धागा. जमेल तसे लिहितो:

दैनिके:
- इथे अमेरिकेत छापील मराठी दैनिके नाहीत. त्यामुळे सगळेच ऑनलाइन. लोकसत्ता, लोकमत या दोन साइट्स एकदातरी पाहतो. त्यात काही विशेष आवडण्यापेक्षा त्या साइट्स म्हणून सहज नॅव्हिगेट करता येण्यासारख्या आहेत हेच मुख्य कारण. पूर्वी केसरी, सकाळ च्याही साइट्स पाहात असे. आता बर्‍याच दिवसांत पाहिल्या नाहीत. सामना, दै प्रभात पाहतो अधूनमधून.
- पुण्याला आमच्या घरी किमान ४ पेपर्स येतात. तेथे असलो की ते सगळेच रोज वाचतो.
- बातम्या, सदरे, ललित, वैचारिक - सगळेच जे काही इंटरेस्टिंग वाटेल ते वाचतो.
- छापील दैनिके भारतात तरी अजून काही दिवस उपलब्ध असावीत असे वाटते. मात्र एकेकाळी या दैनिकांचा एक दबदबा, भारदस्तपणा होता. आता फार चीपपणा आला आहे. केसरी, सकाळ वगैरेंच्या लेखांमधून भाषेच्या अचूक वापराकरता संदर्भ शोधायचो एकेकाळी.

अन्य नियतकालिके:
फारशी वाचली जात नाहीत. मधे एकदा भारतातून दिवाळी अंक आणले होते पण ते सुद्धा पूर्ण वाचलेले नाहीत. मात्र भारतात असलो की वाचतो. नुकताच "अनुभव" चा अंक वाचला होता. त्यातले काही लेख आवडले होते.

मराठी संस्थळे:
- मायबोली, ऐसी अक्षरे, मिसळपाव ही "सोशल" मधे. इतर - अक्षरनामा, पूर्वी मराठी बिगुल होते ते. बाकी अधूनमधून बोल भिडू वगैरे कधी कधी.
- पैकी माबो अगदी दररोज कित्येक वेळा. बाकी अधूनमधून. इतरांपैकी त्यातल्या त्यात मिपावर जास्त.
- आख्खा विभागच आवडतो/आवडत नाही असे नाही. स्पेसिफिक लेखांप्रमाणे. काही विषयांत मुळातच फारशी रूची नाही - पाकृ, शास्त्रीय संगीताबद्दलचे सखोल लेख ई.

पुस्तके:
- भरपूर वाचतो. मराठीच्या संदर्भात असल्याने - जवळजवळ सगळीच छापील स्वरूपात.
- बहुतांश स्वतः विकत घेतलेलीच. कधीकधी मित्राकडून एखादे आणले तर.
- प्रत्येक भारतफेरीत ८-१० पुस्तके आणतो. शक्यतो गेल्या काही वर्षात प्रकाशित झालेली.
- इथे माबोवर, फेबुवरच्या मित्रांच्या पोस्टींमधून, भारतात सामना व इतर पेपर्स मधे नवीन पुस्तकांची ओळख असते त्यातून - अशी माहिती काढून त्याप्रमाणे विकत घेतो.
- विशेषतः राजकीय पुस्तकांच्या बाबतीत आवर्जून वेगवेगळ्या मतप्रवाहांबद्दलची घेतो.
- इथे आमच्या घरी आलेले मराठी लोक अनेकदा पुस्तके वाचायला घेउन जातात. विशेषतः भारतातून काही काळाकरता आलेले लोक. किमान ५-१० पुस्तके कोणत्याही वेळी अशी फिरत असतात.
- रूची नसलेले विषय वगळता आवडत नाही असे सांगणे कठीण आहे. पण ज्याला आजकाल "दवणीय" भाषा म्हणतात तसली भाषा असलेली पुस्तके सहसा घेत नाही. कादंबर्‍यांच्या बाबतीतही एक गाव व त्याचा होत असलेला र्‍हास अशा छापाची बरीच असतात. त्याचा आता कंटाळा येतो.
- प्रमाणे मराठीपेक्षा खूप वेगळ्या मराठी भाषेत/लहेजात असलेली २-३ आणली पण पूर्ण वाचली गेली नाहीत. समजावून घ्यायला खूप प्रयत्न करावा लागतो व सध्या "सोपी/आळशी करमणूक" सहज उपलब्ध असण्याच्या जमान्यात तितक्या नेटाने ते केले जात नाही.

वाचनाचे इतर प्रकारः
फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅप वरचे मराठी लेख. बहुतांश खूप एकतर्फी, आक्रस्ताळे व स्वतःच्या एको चेंबर्स मधे "परखड/रोकठोक" वगैरे कौतुके केलेले असतात. पण कधीकधी चांगले विचारपूर्वक लिहीलेलेही सापडतात.

एकूण दिवसभरात किती मराठी वाक्ये वाचली या वरकरणी बिनडोक मोजमापावर क्रम लावला, तर मायबोली, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इतर साइट्स, पुस्तके असा उतरता क्रम होईल बहुधा Happy

धन्यवाद सर्वांना !
एकाहून एक सुंदर, विस्तृत आणि रंजक प्रतिसाद आलेले आहेत.
प्रतिसादलेखक मोकळेपणाने व्यक्त झाल्याचे पाहून मनापासून समाधान वाटले.
माहितीमध्येही भर पडते आहे.

दैनिक-
लोकसत्ता app वाचते. मुख्यतः महाराष्ट्रातल्या बातम्या कळण्यासाठी. कधी वेळ आणि मूड असला तर चतुरंग, लोकरंग वगैरे उघडून वाचते. एरवी कुणी एखादा लेख खास वाचायला सांगितला असेल तर वाचते. पण मुख्यतः बातम्याच वाचल्या जातात. त्यातल्या त्यात लोकसत्ता बरा वाटतो म्हणून तो वाचते.

नियतकालिके- सध्या काही वर्षे साप्ताहिक साधना घरी येतं. ते वाचायला आवडतं. चालू घडामोडी आणि ऐतिहासिक, सांस्कृतिक, वैचारिक विषयांवर चांगले लेख असतात.
पूर्वी अंतर्नाद मासिक वाचत असे. काही लेख आवडायचे, पण बराचसा तोचतोचपणा वाटायला लागला होता. नंतर ते बंदच पडलं.

छापील किंवा इलेक्ट्रॉनिक, पण दैनिकं- नियतकालिकं टिकावीत असं वाटतं.

मराठी संस्थळांपैकी मी मायबोली आणि मैत्रीण सोडल्यास इतर कुठेही नाही.
मायबोलीवर दररोज येणं होतं. कथा, ललित, प्रवासवर्णनं, पाकृ, वैज्ञानिक, वैचारिक लिखाण वाचायला आवडतं.

पुस्तकं- बंगळुरूच्या महाराष्ट्र मंडळाचं वाचनालय आहे. तिथून पुस्तकं आणून वाचते. पुण्याला फेरी झाली की दर वेळी सात-आठ पुस्तकं आणली जातात. किंडलवरही वाचते. पण तिथे मुख्यतः फक्त नारायण धारपांची वाचली आहेत.
ऑडिओ बुक्सही ऐकते. काही फायदे आहेत, काही तोटे. पण चलता है!

आमच्या वाचनालयात गोष्टी छापणार्‍या मासिकांच्या भरपूर प्रती घेतात. पण मुक्त शब्द आमच्याच गावात निघत असून घेत नाहीत. साधना नाही. अंतर्नाद पूर्वी असे. अनुभव नाही. सत्याग्रही विचारधारा क्वचित दिसे. मिळून सार्‍याजणी असते आणि दिसते. पण त्यातही तोचतोचपणा .
ललित असते.
मी मध्यंतरी सजग या साहित्यविषयक द्वैमासिकाची वर्गणी भरली होती. पण वेळेअभावी वाचलं जात नाही म्हणून पुन्हा भरली नाही.
गंमत - कोणा नातलगाने वे नरेंद्र महाराजांचं एक मासिक निघतं त्याची वर्गणी माझ्या नावे भरली होती. ते एकदोन वर्षे घरी येत असे.

वेगळ्या नियतकालिकांची चांगली माहिती होते आहे.

एक जुनी आठवण.
सच्चे पर्यावरणप्रेमी दिलीप कुलकर्णी यांनी पूर्वी 'गतिमान संतुलन' नावाचे फक्त चारपानी छापील मासिक चालवलेले होते. त्याची वार्षिक वर्गणी फक्त तीस रुपये असायची. चार मोठ्या आकाराची पाने असायची. कागदाचा नाश कमीत कमी व्हावा या हेतूने चारच पाने असायची.

मी काही वर्षे त्याचा लेखक आणि वर्गणीदार होतो. सुमारे वीस वर्षे ती वार्षिक वर्गणीही तेवढीच राहिली होती ! अलीकडे ते बंद होणार आहे ( निदान छापील आवृत्ती) असे कुठेतरी वाचले होते.

गतिमान संतुलन या नियतकालिकातले लेख एकत्र करून तयार केलेलं पुस्तक वाचलं आहे.

@ भरत,
इकडे पुण्यात, मी ज्या लायब्ररीत जातो तिथं मुक्त शब्द असायचं. पण दिवाळी अंकानंतर एकही अंक दिसला नाही. दुकानांत दोन-तीन वेळा विचारलं. काहींनी ''मुक्त शब्द असा काही प्रकारच आम्ही ऐकला नाही'', असं सांगून मला शहाणं करण्याचा प्रयत्न केला. .
काहींनी ते बंद झाल्याचं सांगितलं. तुमच्या पोस्ट मधून, तसं काही नसल्याचं हे कळलं, हे बरं. Happy
(बाकी, मी एवढा घाईला आलो होतो, कारण त्यात मकरंद साठेंच्या त्रिधारा ह्या कादंबरी चे पुढचे भाग क्रमशः प्रकाशित होणार होते. त्याचं काय झालं बघायला पाहिजे आता.)

हो. मुक्त शब्दवाल्यांचं या कोणाशी जमत नाही असं दिसतं. मी आमच्या वाचनालयाला त्यांचा किमान दिवाळी अंक ठेवा असं सांगितलं तर डिस्काउंट कमी देतात की देत नाहीत असं कारण सांगितलं. मासिक तर घेतच नाहीत.
त्यांचं पुस्तकांचं दुकानही आहे.. २०२० की २१ ला दिवाळी अंक विकत घेण्यासाठी जायचा बेत होता. त्या आधी फोन केला तर म्हणे की आता आम्ही इतरांची प्रकाशने ठेवत नाही.

' परिवर्तनाचा वाटसरू’ हे मराठी पाक्षिक/ स्वघोषित ‘अनियतकालिक’ (?) कोणी वाचले आहे का ?
खूप वर्षांपूर्वी मी त्यांचे एक दोन अंक पाहिले होते. सध्या काय चाललय कल्पना नाही.

छान, धन्यवाद !
पूर्वी ते नवे होते तेव्हा त्यांनी मला दोन नमुना अंक पाठवले होते

दैनिक - छापील सकाळ . पहिल्या पानापासून अगदी शेवटच्या पानापर्यंत!! छोटे शब्दकोडे असते तेही रोज सोडवते. रविवारचा सप्तरंग आवडतो . वेगवेगळ्या विषयावरचे लेख चांगले असतात.
पूर्वी सगळे लेख आवडीने वाचायचे . पण आता राजकीय , वैचारिक वाचणे सोडून दिले आहे . App पेक्षा छापील अंक च चांगला वाटतो.
नियतकालिके - मी साप्ताहिक सकाळ ची वार्षिक वर्गणी भरली आहे
. आईबाबांनी मेनका प्रकाशन ची भरली आहे . त्यामुळे मेनका , माहेर चे अंकही वाचायला मिळतात.
मी पुणे नगर वाचन मंदिर ची सभासद आहे . त्यामुळे बरीच पुस्तके वाचून झाली आहेत . माबोवरच्याच पुस्तक धाग्यावरून नवीन पुस्तके कळतात . तीही आणते . दिवाळी अंक तर आवडीचे !! पण सध्या यांचा दर्जा खूपच खालावलेला आहे.
मायबोली आणि मिसळपाव ही दोन संस्थळे विशेष

साप्ताहिक सकाळ >>> पूर्वी जेव्हा वाचनालयाचा सभासद होतो तेव्हा हे नियमित वाचायचो. बऱ्यापैकी आवडायचे.
बरीच वर्षे त्यात थोरामोठ्यांची फोटोसह अवतरणे यायची. ती मस्त असायची.

१९९६ साली महाराष्ट्रात ‘गोडबाबा’ नावाच्या एका भोंदूने धुमाकूळ घातला होता. त्याच्या मते त्याच्या शरीरातून गोड पदार्थ बाहेर पडत असतात वगैरे ! त्यामुळे त्याने ओंजळीतून सोडलेले तीर्थ पिण्यासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या !

तेव्हा या साप्ताहिक प्रतिनिधीने प्रत्यक्ष येऊन माझ्यासह काही वैद्यकीय तज्ञांचे मत विचारले होते. (छोटीशी मुलाखत). मी त्यांना वैद्यकीय भाग समजावून सांगून ती सर्व फसवेगिरी आहे असे स्पष्टीकरण दिले होते.

Pages