या आधीचे भाग
एक तरी गज़ल अनुभवावी - प्रस्तावना
___________________________________________________________________________________________________________________________
हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन
दिल के ख़ुश रखने को 'ग़ालिब' ये ख़याल अच्छा है
इश्क़ ने 'ग़ालिब' निकम्मा कर दिया
वर्ना हम भी आदमी थे काम के
इश्क़ पर ज़ोर नहीं है ये वो आतिश 'ग़ालिब'
कि लगाए न लगे और बुझाए न बने
वो आए घर में हमारे ख़ुदा की क़ुदरत है
कभी हम उन को कभी अपने घर को देखते हैं
हे आणि असे कित्येक अशार ... आपण वेळोवेळी ऐकलेले, वापरलेले ... शायरीला "ग्लॅमर" मिळवून देणारे
गज़ल / शेरोशायरी चा विषय निघाला कि पहिले नाव येते ते म्हणजे मिर्ज़ा असद-उल्लाह बेग खान अर्थात मिर्झा गालिब ...
सर्वात प्रसिद्ध शायर ...
सर्वोत्तम हा शब्द मी मुद्दमच टाळलाय ... कारण अनेक जण मीर-तक़ी-मीर ला सर्वक्षेष्ठ शायर मानतात ... आणि ते फारसं खोटं नाही.
मीर ला ख़ुदा-ए-सु़ख़न हा 'किताब होता ... शायरीचा देव
खुद्द गालिबने ही मीर चे कौतुक केलंय ...
गालिब म्हणतो
'ग़ालिब' अपना ये अक़ीद: है, ब-क़ौल-ए-'नासिख़'
आप बे-बहरा है, जो मो'तिक़िद-ए-'मीर' नहीं
अक़ीद म्हणजे विश्वास. नासिख हा प्रसिद्ध उर्दू शायर. ब-क़ौल-ए-'नासिख़' म्हणजे नसिख च्या म्हणण्याप्रमाणे (कथनानुसार)
बे-बहरा म्हणजे फायदा करून न घेणारा / दुर्दैवी आणि मो'तिक़िद-ए-'मीर' म्हणजे "मीर" वर विश्वास (श्रद्धा) ठेवणारा
हे गालिब , नसिख च्या कथनाप्रमाणे आपल्याला हा विश्वास आहे कि मीर वर श्रद्धा नाही तो स्वत:चा फायदा करून न घेणारा (दुर्दैवी) आहे
म्हणजेच ज्याला उर्दू शायरी करायची आहे त्याला "मीर" च्या शायरीचा श्रद्धापूर्वक अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही
अर्थात गालिबला स्वतःच्या शायरीचा सार्थ अभिमानही होता
गालिब असंही म्हणतो
रेख़्ते के तुम्हीं उस्ताद नहीं हो 'ग़ालिब'
कहते हैं अगले ज़माने में कोई 'मीर' भी था
रेख्ता हे उर्दूचे जुने नाव ... गालिब तू एकटाच उर्दूचा (उर्दूत लिहिण्याचा) उस्ताद आहेस असे नाही ... असं म्हणतात दुसऱ्या जमान्यात कोणी एक मीर पण होऊन गेला ...
मीर चा मोठेपणा मान्य करतानाच आपणही "उस्ताद" आहोत आणि मीर च्या तोडीचे आहोत हे सूचित करायला विसरत नाही
पण गालिब का मीर हा वाद (घातलाच तर) न संपणारा आहे ... रफी-किशोर वादासारखा
त्यामुळे हा वाद बाजूला ठेवू ....
कोणीही काहीही म्हटले तरी गालिब हा गालिब होता ... त्याच्याच शब्दात ...
हैं और भी दुनिया में सुख़न-वर बहुत अच्छे
कहते हैं कि 'ग़ालिब' का है अंदाज़-ए-बयाँ और
सुख़न-वर म्हणजे शायर ...
दुनियेत अनेक उत्तम शायर आहेत ... पण गालिब ची शैली (अंदाज़-ए-बयाँ - सांगण्याची पद्धत) वेगळीच आहे
गालिब बद्दल लिहिताना मूळ गझल बाजूलाच पडली ... अर्थात इथे आत्तापर्यंत सात अशार आले आहेत ... ह्यातला प्रत्येक शेर हा एकेका गझलेचा भाग आहे .. म्हणजे सात गझला इथेच झाल्या ...
यातलीच एक गझल पुढच्या भागात
वाचतोय. माफ करा पण लिखाण जरा
वाचतोय. माफ करा पण लिखाण जरा त्रोटक वाटले.
धन्यवाद हर्पेनजी ...
धन्यवाद हर्पेनजी ...
पुढच्या भागात अधिक विस्तृतपणे मांडण्याचा प्रयत्न करतो
छान सुरूवात झाली आहे! उर्दू
छान सुरूवात झाली आहे! उर्दू भाषा फार प्रिय आहे! तुम्ही वाचत असलेली पुस्तके, साईट्स इत्यादी पण लिहा. रेख्ता तर अफलातून साईट आहे!